AMIT MUGALEVery good book to read, I like gandhian thoughts.
UDAY SANTOSHसर्वांनी जरूर वाचायला हवे असे पुस्तक
MAHENDRA PATIL योग्य संदर्भासह अभ्यासपूर्ण मांडणी असलेले पुस्तक आहे.
Prashant Patilलेट्स_किल_गांधी या मराठी पुस्तकाबद्दल काही.....
हे अजिबात एकांगी विचाराने लिहलेले नाही, जी परिस्थिती तेव्हा होती तिचं यात यथार्थपणे विवेचन आलं आहे. गांधी विरोधक आणि प्रेमी यांनी जरूर एकदा तरी वाचावं ही विनंती, हे पुस्तक यामध्ये तीन भागांमध्ये विभाजित केलेले एकूण १४ प्रकरणे आहेत. पहिल्या भागात गांधी हत्येचा पूर्ण ‘आंखो देखा’,गांधी हत्येमध्ये आरोपी असणार्या प्रत्येकाची वैयक्तिक माहिती व त्यांचे कारनामे, ९ जानेवारी १९४८ ते ३० जानेवारी १९४८ यातील प्रत्येक दिवसाच्या घडामोडी, पोलिस तपासातील गोंधळ, गांधी हत्येचे फसलेले सात प्रयत्न यांचं विवरण आहे. दुसर्या भागात स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच्या काही वर्षांमधील राजकीय परिस्थिती, फाळणीला कारणीभूत व्यक्ती आणि घटना, नेहरू आणि पटेल यांच्याशी गांधींचे होणारे मतभेद व एकाकी गांधी, त्यावेळचा हिंसेचा उद्रेक आणि ती हिंसा रोखण्यासाठी गांधींनी केलेले प्रयत्न यांच्याविषयी माहिती आहे. तर तिसर्या भागात गांधीहत्येची लाल किल्यातील विशेष न्यायालय सुनावणी, आरोपींची अपिले व शिक्षेची अंमलबजावणी, आणि १९६७ साली गांधीहत्येची चौकशी साठी नेमल्या गेलेल्या कपूर आयोगाचा अहवाल यावर विस्तृत माहिती दिलेली आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील यात तेव्हा गांधी प्रेमी आणि विरोधी दोघांनीही वाचावं अशी विनंती आहे. ‘हिंदुस्थानच्या फाळणीस फक्त गांधीच जबाबदार होते’, ‘गांधींनी हिंदूंना वार्यावर सोडले होते’, ‘गांधींनी मुसलमानांचे अवाजवी लाड केले’, ‘गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी भारत सरकारला भाग पाडले’, ‘भारतमातेला वाचविण्यासाठी गांधींना मारणे हाच एक पर्याय होता’......वगैरे वगैरे सगळ्या आक्षेपांना पुराव्यानिशी उत्तरे मिळतील या
प्रा. चंद्रकांत शं. पाटगांवकरमहात्मा गांधींचे पणतू श्री. तुषार गांधी यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील प्रस्तावना संपूर्ण पुस्तकाचा परिचय करून देणारी आहे.
आजही नव्या विद्यार्थी पिढीमध्ये भारताच्या फाळणीला महात्मा गांधी हे जबाबदार होते, असा सार्वत्रिक गैरसमज आढळून येतो. नव्या पिढीसाठी सत्य काय आहे याची वास्तव माहिती मिळणे शक्य होणार आहे.
हे पुस्तक वाचून महात्मा गांधीबाबतचे गैरसमज दूर करावेत अशी अपेक्षा आहे.
JYOTI GRANTH WARTA 15-12-2010सर्व काही हकिकत अत्यंत खरेपणाने मांडणे हा लेखकाचा उद्देश. गांधीजींचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात अनेक इतिहासकालीन नोंदी, गांधी खून खटल्याचा वृत्तांत, बचाव पक्षाचे वकील आणि न्यायाधीशांनी लिहिलेली पुस्तके, वर्तमानपत्रातील अहवाल, अनेक जणांशी केलेली तोंडी चर्चा व तुषार गांधींनी लहानपणापासून घरी ऐकलेल्या हकिकती यांचा आधार घेण्यात आला आहे. म्हणूनच हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे.
Dainik Punyanagari 21.11.10गांधीजींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा आणि त्यासंदर्भात केल्या जाणा-या अपप्रचाराचा समाचार घेणारे ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक आहे. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या आणि मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येच्या इतिहासाचा तपशिलाने वेध घेण्यात आला आहे.
प्रत्येकवर्षी ३० जानेवारीला प्रमुख सरकारी व्यक्ती राजघाटाला भेट देऊन गांधींजीच्या समाधीवर पुष्पचक्र वाहतात. सकाळी ११ वाजता शांतिदूत महात्मा गांधींचा वध झाला हे सांगणारा भोंगा वाजवला जातो, पण गांधीजींच्या त्यागाचे मात्र आज विस्मरण झाले आहे. १९४७ मध्ये भारताचे विभाजन ज्या कारणामुळे झाले, त्याच मार्गावर भारत आज पुन्हा जाऊ लागला आहे. द्वेष आणि हिंसाचाराचा हा प्रवाह वेळेवर रोखला नाही तर ‘देश’ म्हणून आपले अस्तित्व धोक्यात येईल आणि आपल्याला वाचवण्यासाठी आज गांधीजी आपल्यात नसल्याने त्यांचे हौताम्य व्यर्थ जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.
गांधीजींची हत्या अचानक झालेली नाही. त्यामागे मोठे षड्यंत्र होते. या हत्येशी ठरावीक विचारधारा मानणा-या प्रवृत्तींचा जवळचा संबंध होता. गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न अनेकदा झाला. मात्र, त्याची दखल पुरेशा गांभीर्याने घेतली गेली नाही. २० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थना सभेच्या वेळी मदनलाल पाहवा या निर्वासित पंजाबी तरुणाने एका गावठी बॉम्बचा स्फोट केला. पुढे अटक झाल्यावर आपण गांधीहत्येच्या कटात सहभागी होतो असे मदनलालने मान्य केले. या टोळीचे नेते पुण्यातले होते. त्यातील एकजण हिंदू राष्ट्र आणि अग्रणीचा संपादक आणि प्रकाशक होता, हेही त्याने सांगितले. ही नियतकालिके गोडसे आणि आपटे मराठीतून छापत आणि प्रसिद्ध करत असत. अशा प्रकारे सर्व माहिती उपलब्ध असूनही, पोलिसांना वेळेत गुन्हेगारांची नावे शोधता आली नाहीत, की त्यांचा मागोवा घेता आला नाही? गांधीजींच्या हत्येचा कट रचणारे नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे दिल्ली रेल्वे स्थानकाच्या विश्रांतीगृहात भेटले आणि बिर्ला हाऊसकडे गेले. संध्याकाळच्या प्रार्थनासभेत आलेल्या गर्दीत ते सहज मिसळून गेले. शुक्रवार ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी गोडसेने गांधींना अडवले आणि आपल्याकडच्या ९ मिमी बरेटा पिस्तुलातून त्याने अगदी जवळून गांधींच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. ‘हे राम’चा उच्चार करत गांधी खाली कोसळले.
या आधीही तीन किंवा जास्त वेळाही प्रयत्न करून गोडसेला जमले नाही, ते त्याने यावेळी साध्य केले. यावेळी पोलीस काय करत होते? परिस्थितीचे गांभीर्य माहीत असूनही त्यांचे पुरेसे लक्ष का नव्हते? ते निष्काळजीपणे वागले का? की सोयीस्करपणे त्यांनी या प्रकरणी कानाडोळा केला? गांधीजींच्या हत्येनंतर अशा प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत अनुत्तरीत आहेत. किंबहुना, काही बाही विधाने करून, भलती कारणे पुढे करून बरेचदा गांधीजींच्या हत्येचा पुरस्कार केला जातो. हे सर्वस्वी चुकीचे आहे. यासंदर्भात पुरेशीच चर्चा होणे तसेच गांधीजींच्या शेवटच्या दिवसांचे नेमके चित्र जगापुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठीच ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकाचे प्रयोजन केले आहे.
गांधीजींवर पहिला हल्ला १९३४ मध्ये पुण्यात झाला, तेव्हा त्यांच्या गाडीवर एक बॉम्ब पेâकण्यात आला. यावेळी पाकिस्तानची कल्पनाही अस्तित्वात नव्हती आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा प्रश्नच उदभवलेला नव्हता, मात्र गांधीजींनी तसे केल्याचा अपप्रचार अनेकांनी केला. रा. स्व. संघ आणि हिंदू महासभेचे लोक गांधींचा फोटो आपल्या पायताणाखाली चिकटवून त्यांचा अवमान करत असत. या संघटनांच्या शिबिरात कार्यकत्र्यांनी नेमबाजीचे शिक्षण देताना गांधीजींचा फोटो लक्ष्य म्हणून वापरण्यात येत असे. याच लोकांनी गोडसे आणि आपटेला खुनाचे नियोजन करण्यात मदत केली. त्यांना निधी, साहित्य आणि समर्थन दिले. याच लोकांनी गांधी हत्येनंतर मिठाई वाटली आणि फटाके वाजवले. हिंदू पुराणात राक्षसांना मारण्याच्या क्रियेस, चांगल्या शक्तींकडून दुष्टांचे निर्दालन करण्याच्या क्रियेस ‘वध’ असे म्हणतात. त्यांनी गांधी हत्येलाही ‘वध’ असे म्हटले. ही परिस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळेच गांधीजींचे नेमके विचार आणि त्यांचा काही लोकांद्वारे केला गेलेला विपर्यास समजून घेणे आवश्यक आहे.
गांधीजींची हत्या करणा-या हल्लेखोरांवरील खटला नवी दिल्ली येथे लाल किल्यात थाटलेल्या खास न्यायालयात भरवण्यात आला. फिर्यादी पक्षाची उदासीन वृत्ती बघता खटल्याचा निर्णय आधीच ठरवल्यासारखे भासले. सावरकरांना काहीही करून निर्दोष सोडायचे होते तर इतरांची शिक्षा आधीच ठरली होती. त्यामुळे बचाव पक्षाला त्यांच्या हिंदू-मुस्लिम द्वेषाच्या विचारांचा प्रसार करण्याची पूर्ण संधी दिली गेली. सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे गांधीजींच्या हत्याNया गोडसेला न्यायालयात आपला संताप दोनदा व्यक्त
करू दिला गेला. एकदा लाल किल्ल्यात आणि दुस-यांदा पंजाब उच्च न्यायालयात. कोर्टाने त्याची जबानी लेखी नोंदल्यानंतर त्याच्या विधानांमुळे भारतातील आधीच क्षीण झालेल्या ऐक्याला किती नुकसान पोहचू शकेल हे भारत सरकारच्या लक्षात आले. नंतर झटका आल्याप्रमाणे सरकारने त्यावर बंदी घातली आणि हिंदू अतिरेक्यांना प्रचारासाठी अजून एक साधन दिले. उच्च न्यायालयाने गोडसेच्या ‘मे इट प्लीज युअर ऑनर’ भाषणावरची बंदी उठवली, पण त्याआधी अतिउजव्या विचारसरणीच्या हिंदू अतिरेकी संघटनांनी अशा भावनांना उत्तेजन देणा-या लोकांचा मोठा गट तयार करण्यासाठी या विधानांचा गुप्तपणे प्रचारासाठी वापर केला. गांधीजींची हत्या झाल्यापासून आजपर्यंत अनेक प्रकारे परिस्थितीची मिमांसा झाली आहे. दुर्दैवाने यासंदर्भात दोषी असलेल्यांना फारशी कडक शिक्षा झाली नाही. विंâबहुना, आजही गांधीहत्येबाबत अनेक गैरसमज आढळतात. या समाजांचे निराकारण ‘लेट्स किल गांधी’मधून तपशिलाने करण्यात आले आहे.
(गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेले आणि मेहता प्रकाशनने प्रकाशित केलेले हे ८०३ पानांचे हे पुस्तक ६९५/- रुपयांना उपलब्ध आहे.)