* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: MUD CITY
 • Availability : Available
 • Translators : APARNA VELANKAR
 • ISBN : 9788177667585
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 134
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
 • Available in Combos :DEBORAH ELLIS COMBO SET
Quantity
Buying Options:
 • Print Books:
PARVANA`S BEST FRIEND, SHAUZIA, HAS FLED AFGHANISTAN AND IS FACED WITH SURVIVING ON HER OWN ON THE STREETS OF PESHAWAR, PAKISTAN. WITH HER DOG AS HER ONLY FRIEND, SHE MUST SCROUNGE FOR FOOD, BEG FOR MONEY AND LOOK FOR A SAFE PLACE TO SLEEP EVERY NIGHT. BUT COULD IT BE WORSE THAN A LIFETIME SPENT LIVING IN A REFUGEE CAMP? THIS IS A POWERFUL AND VERY HUMAN STORY OF A FEISTY, DRIVEN GIRL WHO TRIES TO TAKE CONTROL OF HER OWN LIFE. PRAISE FOR THE BREADWINNERN MORE THAN 200,000 COPIES SOLD N WINNER OF SWEDEN`S PETER PAN PRIZE, THE ROCKEY MOUNTAIN BOOK AWARD AND THE UNIVERSITY OF CALIFORNIA`S MIDDLE EAST BOOK AWARD""A GREAT KIDS` BOOK`` A GRAPHIC GEOPOLITICAL BRIEF THAT`S ALSO A GIRL-POWER PARABLE.” - NEWSWEEK "A BOOK... ABOUT THE HARD TIMES- AND THE COURAGE - OF AFGHAN CHILDREN.`` - WASHINGTON POST PRAISE FOR PARVANA`S JOURNEY N WINNER OF THE JANE ADDAMS PEACE AWARD "THROUGH SPARE, AFFECTING PROSE, ELLIS...MAKES THE CHILDREN`S JOURNEY BOTH ARDUOUS AND BELIEVABLE.`` - BOOKLIST "THIS SEQUEL...EASILY STANDS ALONE... AN UNFORGETTABLE READ.`` - SCHOOL LIBRARY JOURNAL (STARRED REVIEW)
परवानाची जिवलग मैत्रीण शौझिया. अफगाणिस्तानातून पळून आलीय. पाकिस्तानात... पेशावरच्या रस्त्यावर भटकतेय. त्या छोट्या मुलीबरोबर आहे जास्पर. - तिचा कुत्रा! रोजच्या घासभर अन्नासाठी झगडा, आणि रात्री डोकं टेकण्यापुरती सुरक्षित जागा मिळावी, म्हणून अखंड धडपड! - तिला जगायचंय! हिंमतीने उभं राहायचंय!! ... स्वतःच बेचिराख आयुष्य सावरण्यासाठी, एकाकी लढा देणाऱ्या शूर अफगाण मुलीची डोळ्यात पाणी उभं करणारी कहाणी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #JYOTSANALELE #BIOGRAPHY &TRUESTORIES #THEBREADWINNER #SHOUZIA #PARVANA #MUDCITY #APARNAVELANKAR#DEBORAHELLIS #PARVANAS JOURNEY #MEGHANADHOKEIAMATAXI #डेबोराएलिस
Customer Reviews
 • Rating Starपूर्वा बडवे,पुणे.

  अफगाणिस्तान तालिबान राजवटीच्या कब्जात गेल्यानंतर तिथल्या सामान्य माणसांचे जे काही हाल झाले त्याच जिवंत चित्रण डेबोरा एलिस या लेखिकेने या पुस्तकांतून केलेले आहे. अकरा वर्षांची परवाना जिने जन्माला आल्यापासून आकाशात जमिनीवर फक्त बॉम्बच पाहिले होते.तालिान्यांनी काबुलवर कब्जा मिळवल्यावर पहिल्यांदा स्त्रियांना घरात कोंडून घातलं.शाळांमधून मुलींची हकालपट्टी केली,स्त्रियांना नोकऱ्यांवरून हाकललं गेलं, पुरुष सोबत नसताना बाईचं पाऊल रस्त्यावर पडलं की लाथाबुक्क्यांनी चिरडून तालिबानी सैनिकांच्या बंदुकीसमोर मरणाला सामोरं जाणं होतं.सक्तीचा ड्रेसकोड लादला गेला.पुस्तकांच्या होळया केल्या. एकंदर रोजच पडणारे बॉम्ब , जीव वाचवण्यासाठी घर सोडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी वाताहत, कित्येक आगीचे लोळ, पाय गमावलेले कितीतरी लोक, भुकेल्या माणसांची फरपड ,कित्येक महिनो न महिने प्रकाशाचा स्पर्श न झालेल्या अंधाऱ्या ,शिळ्या ,ओलसर हवेत गुदमरून जगणाऱ्या स्त्रिया ,सुन्न करून टाकणारं तालिबानी क्रूर पशुत्व असं खूप काही लेखिकेने परवानाच्या नजरेतून या पुस्तकात मांडले आहे. `द ब्रेडविनर` या पुस्तकातून भेटलेल्या परवानाचा `परवाना` हा दुसरा भाग आहे. `द ब्रेडविनर` मध्ये बॉम्बस्फोटात पाय गमावल्याने खुरडत खुरडत कुटुंबाला घास भरवणाऱ्या परवानाच्या वडिलांना जेव्हा तालिबान्यांनी तुरुंगात फेकलं ,तेव्हा वय लहान असल्याने आणि स्त्रियांना घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने केस भुंडे करून,पुरुषी कपडे घालून तालिबान्यांनी नजर चुकवत कबुलच्या बाजारात फेरीवाल्याचं काम करून स्वतःच्या कुटुंबाला जिवंत ठेवणारी ही अफगाण मुलगी परवाना. तिचं धैर्य ,चिकाटी, निष्ठा , प्रेम, माणुसकी कितीतरी अंगांनी ही परवाना तिच्यासोबत त्या काळचं अख्खं आगीत होरपळलेलं अफगाणिस्तान आपल्यापुढे जिवंत उभं करते.ही संघर्षकथा खरोखरचं वाचकाला प्रचंड सुन्न करते,हादरवून सोडते. या दोन्ही पुस्तकात परवाना सोबत आपण तो काळ आणि तिथलं भयाण वास्तव पाहतो. तर तिसऱ्या भागात `शौझिया` मधे शौझिया ही परवानाची मैत्रीण.दोघी सोबत राहून काबुल मध्ये मुलाच्या वेशात चहा विकून आणि नंतर काही कामे करून एकमेकांना सोबत करत रोजचा संघर्ष करत असतात.वाटा वेगळ्या होतात तरी जगण्याचा संघर्ष प्रत्येक अफगाणिस्तान मधल्या व्यक्तीला तितकाच थरारक आणि अटळचं होता. शौझियाचा प्रवास थोडा वेगळा असला तरी तिच्या स्वभावानुसार तिची झालेली हेळसांड आणि त्यातून आजूबाजूच्या घडामोडी यातून निर्वासितांच्या जगण्यातली धडपड , लाचारी, भूक, उदासीनता, हे चित्र ही वाचकाला खूप अस्वस्थ करून सोडते.या तिन्ही कादंबऱ्या आपल्याला त्या विखारी युद्धाचा क्रूर चेहरा दाखवतात. जगभरात सत्तासंघर्षात भरडल्या जाणाऱ्या अबोध निरागस मुलांची होणारी वाताहत मुलांची वाताहत हाच लेखिकेच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे.त्या टोरान्टोच्या रुग्णालयांमध्ये मनोरुग्णांसाठी `कौन्सिलर ` म्हणून काम करणाऱ्या ओन्टारिओच्या ख्यातनाम लेखिका आहेत. स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्ती आणि शांतता मोहिमेअंतर्गत त्यांनी जगभरातल्या देशांत काम केलं आहे.अफगाण निर्वासितांसाठी रशिया आणि पाकिस्तानात उभारलेल्या छावण्यांमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून दीर्घकाळ काम केलं. त्यावेळी त्या मुलीची बहीण आणि आई यांच्याकडून ऐकलेली ही थरारक सत्यकथा त्यांनी `द ब्रेडविनर ` मध्ये शब्दबद्ध केली.लेखिकेच्या सगळ्याच पुस्तकांना देशविदेशांतून पुरस्कार मिळाले आहेत पण `ब्रेडविनर` ही ट्रायॉलॉजी खूप गाजली. आजही अफगाणिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या पाकिस्तान, रशिया, आणि इराणमधल्या निर्वासितांच्या शिबिरांमध्ये,या देशांमधल्या गलिच्छ झोपडपट्ट्यांमध्ये लाखो अफगाणी माणसं किडेमुंग्यांसारखी जिवंत आहेत.कित्येकांच आयुष्य शिबिरांमध्ये कोंडून जगण्यात संपलं. कित्येकांच्या हत्या झाल्या तर कित्येकांचे हातपाय तोडले गेले, डोळे फोडले गेले. विध्वंसाच्या राखेतून पुन्हा उभारण्यासाठी या दुर्दैवी देशाला जगभरातल्या मदतीची गरज आहे.लेखिकेला रॉयल्टी म्हणून मिळालेली सर्व रक्कम अफगाणिस्तानातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाते. -©पूर्वा बडवे,पुणे. ...Read more

 • Rating StarVaishnavi Potdukhe

  I have found the book to be fascinating and stimulating at the same time. Hardly have I ever read books of such caliber of writing. Your books are an excellent piece of writing even though originally written by Deborah Ellis. The choice of words ad way of expression is just अप्रतिम. Again, I would just like to express my deepest thanks that because of you such amazing work could reach millions of people. From the time when I was 12 years old, I`ve read these three books innumerable number of times and yet I find myself crying at certain events. I am sure just the way it has changed my life for the better, it has for others as well. ...Read more

 • Rating StarDAINIK PRABHAT 01-04-2007

  अफगाण युद्धात हरवलेलं लहानपण... विस्तीर्ण वाळवंटाचा आणि खळाळत्या नद्यांचा, भाजीपाला, शेतीमुळे समृद्ध आणि संपन्न अफगाणिस्तान हा मध्य आशियातला चिमुकला देश. या देशावर आक्रमण करणाऱ्या घुसखोरांच्या टोळ्यांनी अफगाणिस्तानातली सारी समृद्धी निर्दयपणे पायाखाल तुडवली आणि तिथूनच या देशाचा इतिहास रक्तलांछित झाला. आज सतत युद्धाच्या छायेत असलेला देश अशीच अफगाणिस्तानातच ओळख झाली. तालिबान्यांनी या देशाचे लचके तोडलेच; पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर या देशाचा मोठा विध्वंस झाला. लाखो माणसं बेघर झाली, काही कायमची जायबंदी झाली. रक्ताची माणसं कायमची तुटली. तालिबान्यांच्या अत्याचारामुळे अफगाणिस्तानातल्या मुलींच्या चेहऱ्यावर न कळत्या वयात बुरखा आला आणि मुलींचं शिक्षणही बंद झालं. या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीत सर्वाधिक नुकसान झालं ते लहान मुलांचं. आधी तालिबान्यांनी, नंतर अमेरिकेच्या विमानांनी आणि रणगाड्यांनी लाखो मुलांना पोरकं केलं. त्यांचं लहानपण हिरावून घेतलं. त्यांचे हात-पाय तोडले, कित्येकांचे जीवही घेतले. तीव्र नैराश्येच्या गर्तेत कित्येकांच्या भावना बोथट झाल्या आहेत. अजूनही कित्येक मुलं युद्धामुळे दुरावलेले आले अब्बू-अम्मी परत भेटतील, या आशेवर आहेत. खायला अन्न आणि प्यायला कुजलेलं मांस, गवत इतकंच नव्हे, कागद हीही कित्येक भरकटलेल्या मुलांच्या मेजवानीची साधनं आहेत. या भयाण परिस्थितीत जगणाऱ्या चिमुरड्याचं अत्यंत हृद्य असं दु:ख डेबोरा एलिस या अमेरिकन लेखिकेने आपल्या ‘द ब्रेडविनर’, ‘परवानाज् जर्नी’ आणि ‘मड सिटी’ या तीन पुस्तकांमधून मांडलं आहे. अफगाणिस्तानमधल्या परवान्याची कहाणी सांगणारं ‘परवानाज् जर्नी’ हे पुस्तक जेन अ‍ॅडॅम्स पीस अ‍ॅवॉर्डचं मानकरी ठरलं. या तीनही पुस्तकांचा ओघवता अनुवाद केला आहे अपर्णा वेलणकर यांनी. या पुस्तकांमधून वाचकांना भेटणाऱ्या परवाना आणि शौझिया या दोघी मैत्रिणींच्या आयुष्याबद्दल वाचताना आपल्या मनाला त्याचे चटके बसतात. अफगाण युद्धात बेचिराख झालेली आपली आयुष्यं सावरण्याचा आणि आपली स्वप्नं कधीतरी पूर्ण होतील, याची वाट बघणाऱ्या या दोन चिमुरड्या मुली. आपल्या साध्यासुध्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुरक्षित वातावरणात राहत असताना मोठेपणी फ्रान्समध्ये जाऊन लव्हेंडर फुलांच्या बागेत बागडण्याचं स्वप्न दोघीही रंगवत असतात. तिथल्या आयफेल टॉवरवर एकमेकींना भेटायचंही त्या ठरवत असतात, पण एका धमाक्यात या दोन मैत्रिणींची ताटातूट होते आणि त्यांची घरं बेचिराख होतात. दोन मैत्रिणींनी रंगवलेलं सुंदर स्वप्न तिथंच तुटतं. तालिबान्यांच्या भीतीपोटी या दोघीही मुली मुलाच्या वेशात वावरत असतात. आपले सुंदर, लांबसडक केसही त्या कापून टाकतात. शौझिया पाकिस्तानातल्या निर्वासितांच्या छावणीत पळून जाते, तर परवाना अफगाणिस्तानातच नरक यातना सोसते. आयुष्याची एवढी वाताहात होऊनही या दोघींचा एकमेकींशी संवाद संपत नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा, नवीन घडमोडींचा उल्लेख त्या एकमेकींना लिहिलेल्या पत्रात करत राहतात. पत्रं लिहूनही ती एकमेकींना पोहोचवण्यासाठीची सोय तरी युद्धात कुठे राहिलेली असते! मग जवळच्याच पिशवीत या मुली ही पत्रे ठेवत असतात आणि एकमेकींना भेटल्यावर ती देणार असतात. शौझियाला पाकिस्तानात येणारे अनुभव, तर परवानाला अफगाणिस्तानात अम्मीला शोधताना क्षणोक्षणी द्यावी लागणारी झुंज आपल्याला व्यथित करून जाते. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत अनुवाद केलेली ही पुस्तकं वाचताना आपणही परवाना आणि शौझियाबरोबर प्रवास करतो आणि कधीतरी डोळ्यांत टचकन पाणी उभं राहतं. -वर्षा आठवले ...Read more

 • Rating StarMAHARASHTRA TIMES 21-01-2007

  छळछावण्यातल्या जिवंत कहाण्या... तालिबानी राजवटीच्या छळकहाण्या लोकांना माहीत होत्या. तिथल्या हुकूमशहांची जुलमी राजवट आणि अमेरिकन सैन्याकडून होणारे बॉम्बहल्ले यामुळे उद्ध्वस्त झालेल्या जगाची माहितीही मिळाली. याच अंधेर नगरीत मुलींच्या वाट्याला आलेले अतयाचार आणि त्यांचं दु:ख प्रथमच या पुस्तकांच्या निमित्ताने लोकांसमोर आलं. केस कापून, मुलांचे कपडे घालून आपल्या कुटुंबाला जगवण्याची धडपड करणाऱ्या अफगाणी मुलीची कहाणी डेबोरो एलीस या लेखिकेने शब्दबद्ध केली. तिच ‘द ब्रेडविनर’ म्हणून मराठी वाचकांसमोर आली. त्या पुस्तकाला वाचकांचं प्रेम लाभलं. ‘द ब्रेडविनर’ पुस्तकात उल्लेख झालेल्या परवाना आणि शौझियाची कहाणीही तितकीच चटका लावणारी आहे. त्यांच्याही कहाणीला मराठी शब्दरूप देण्यात आलं आहे. शौझिया आणि परवाना दोघीही मैत्रीणीच. पण त्यांची कहाणी समांतर रेषेत घडते आणि दोन वेगवेगळ्या पुस्तकांतून वाचायला मिळते. शौझियाच्या आयुष्यातलं दु:ख कमी की परवानाच्या असा विचारही आपल्या मनाला करवत नाही. दोन्ही मुलींच्या आयुष्यात आलेले अनुभव चार भिंतीत आयुष्य काढणाऱ्या आपल्यासारख्यांचा थरकाप उडवते. ‘परवाना’ हा ‘द ब्रेडविनर’चा दुसरा भाग. परवानाची आई भावंडांपासून ताटातूट झाली आहे. अब्बू खंगून-,खंगून मेले. मृत्युच्या या तांडवाने ती अधिक खंबीर झाली आहे. तिला आपल्या आईला शोधायचं आहे. पण त्यासाठी जगायला हवं. पोटाची आग भागवण्यासाठी काहीही करायला हवं. उद्ध्वस्त शहरात आपल्याला काही काम मिळणार नाही, हे माहीत असतानाही ती चिकाटीने काम मिळवत राहते. एका कुटुंबात तिला सहारा मिळतो. पण आजूबाजूच्या अराजकामुळे ही माणसं आपल्यातलं माणूसपणही विसरतात. त्याचे चटके या मुलांना बसले. ते वाचून आपणही अस्वस्थ होतो. परवानाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. तिला घाण आणि अस्वच्छतेचा तिटकारा आहे. पण तिच्या आसपास बॉम्बस्फोटने छिन्नविछिन्न झालेले देह पडलेले असतात. त्यातही ती स्वच्छता राखयाचं काम करत राहते. पण त्याहीपेक्षा लक्षात राहते ती तिच्या आईला भेटण्याची धडपड. परवानाला तिची आई भेटते. लौकिकार्थाने तिथे तिची कहाणी संपते, तरीही तिच्या भयानक प्रवासातले अनुभव आपल्याला सुन्न करतात. दुसरं पुस्तक ‘शौझिया’, शौझियाच्या आयुष्यातही परवाना सारखीच फरफट झालेली पण तिचे भोग अधिक तीव्र असतात. त्यामुळे परवानासारखं हिच्या आयुष्यात चांगलं घडावं असं आपण मनोमन म्हणत राहतो. पण तसं घडत नाही. शौझिया एका छावणीत थांबलेली. फ्रान्समधल्या लॅव्हेंडरच्या जांभळ्या फुलांच्या शेतात जाण्याचं स्वप्न पाहणारी. त्याच स्वप्नात राहून सत्याचा सामना करायला तयार असलेली शौझिया परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुळीच तयार नाही. वीरा मौसीच्या कणखर नजरेतून दूर कुठेतरी पळून जाऊ, असं शौझियाचं स्वप्न आहे. आणि ती पळतेय, याच प्रयत्नात तिच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास आणि अनेक दुष्ट अनुभव. म्हणूनच शौझियासारखी अनेक मुलं परिस्थितीमुळे लहानपणीच परिपक्व झाल्याचं दिसतं. शौझियाच्या वाट्याला जांभळ्या फुलांचं शेत येत नाही. पण आपण, ती कुठे तरी सुखी असेल, अशा विचारात हे पुस्तक संपवतो. दोनही अनुवादित पुस्तकांची शैली ओघवती आहे. पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेलं ठराविक उत्पन्न अशाच मुलांच्या मदतीसाठी वापरलं जातंय. -अर्पणा पाटील ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CRIMINALS IN UNIFORM
CRIMINALS IN UNIFORM by SANJAY SINGH, RAKESH TRIVEDI Rating Star
Dinesh Singh

Outstanding writing very well factual presentation of issues

ASHRU
ASHRU by V. S. KHANDEKAR Rating Star
Shashi sanap

अश्रू ही कादंबरी वाचून पूर्ण झाली.. अतिशय सुंदर व मार्मिक वि. स. खांडेकरांच साहित्य लेखन टिळक,मा.गांधी,नेहरू,आगरकर यांचा विचाराचा प्रचंड प्रभाव असलेलं टिळकांच्या आग्रह खातर शिक्षक झालेला शंकर मुख्य पात्र,प्रेमळ निस्वार्थी पत्नी उमा,सावत्र असून भवाच्या पत्नीवर जीव देणारी सुमित्रा , केवळ अहिंसा ने स्वतंत्र मिळणार नाही असा मानणारा ,क्रांती विचारक भाऊ अरविंद आणि लक्षवेधक शंकर चा मित्र दिगंबर .. अश्रू कादंबरी ही मुळात प्रत्येकांच्या घरात घडणारी गोष्ट आहे,किती ही अडचणी आल्या तरी देखील घरातला कर्ता मात्र कधीही विचलित होत नाही तो त्यांच्या विचारांवर ठाम राहतो, अश्या वेळी त्याला घरातील मंडळींची साथ देखील तशीच मिळते..शंकर हा खूप प्रामाणिक पात्र आहे,बहिणीचे लग्न,मुलाची सायकल,पत्नी साठी एक पातळ ,शाळेतील स्वखर्चाने फी भरणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक... समाजातील काही लोकांनी पैसेच्या मोहात ओढण्याचा देखील प्रयत्न यामध्ये केलेला आहे।। शेवट मात्र अश्रू ठिपकन येणारा आहे.. अश्रू आहेत म्हणून तर या जगात प्रीती,भक्ती,सेवा,त्याग व्यतीचे स्वभाव गुण आहेत... ...Read more