Shop by Category LITERATURE (36)CHILDREN LITERATURE (108)FICTION,TRANSLATED INTO MARATHI (2)NOVEL (9)NONE (1)HUMOUR (7)ILLUSTRATIVE (1)AGRICULTURE & FARMING (1)ESSAYS (53)FICTION (403)View All Categories --> Author ANU KUMAR ()VANESSA HOWARD ()VAISHALI RANADE ()SARITA MANGESH PADAKI ()MADAN KATARIA ()DR.H.V.SARDESAI ()PILGAONKAR SACHIN ()RAJANI BHAGWAT ()TENDULKAR VIJAY ()KIRAN BEDI ()P.N. PARANJAPE ()
Latest Reviews DONGRI TE DUBAI by S.HUSSAIN ZAIDI Ranjeet Waghmare तस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही... -------- मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरव (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक. या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे. ...Read more ASHRU by V. S. KHANDEKAR UMA NIJSURE पुस्तकाचे नाव - अश्रू लेखक - वि.स. खांडेकर ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो. अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल. मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच . असो . आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच पण ज्यांनी अज़ून वाचलेलं नाहीये त्यांनी नक्की वाचावे.- उमा निजसुरे ...Read more
DONGRI TE DUBAI by S.HUSSAIN ZAIDI Ranjeet Waghmare तस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही... -------- मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरव (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक. या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे. ...Read more
ASHRU by V. S. KHANDEKAR UMA NIJSURE पुस्तकाचे नाव - अश्रू लेखक - वि.स. खांडेकर ही कहाणी आहे एका सामान्य , नाकासमोर चालणार्या अर्थातच गरीब असलेल्या ध्येयवेड्या शिक्षकाची. प्रेमळ बायको , खाष्ट सावत्र आई , उडाणट्प्पू भाउ, प्रेमात पडलेली बहिण, आठ वर्षाचा मुलगा , जुगारी मित्र दिगंबर , लबड ढोंगी पापासाहेब, अपर्णा, गायकवाड हे विद्यार्थी अशी भरपूर पात्र कादंबरीत आहेत .जणू काही एखाद्या मराठी सिरियल चा मसाला. मुलाला साधी सायकल ही घेऊन देता येत नाही म्हणून अश्रू ढाळणारा हा नायक. ध्येयवादाचे चटके त्याला बसतात. त्याच्या डोळ्यतून अश्रू येतात. पण ते अश्रू हेच तो आपले वैभव मानतो. अकरावी बारावीत असताना ही कादंबरी पहिल्यांदा वाचली . आणि खांडेकरांची मिळतील तेवढी सगळी पुस्तके वाचून काढली. अश्रू तला नायक आज़च्या दुनियेत दुर्मिळ झालाय म्हणजे इतकं आदर्श कोणी आज दिसतही नाही. तरीही ही कादंबरी परत परत का वाचावीशी वाटते कळत नाही. कदाचित खांडेकरांच्या लेखणी ची किमया असेल. मुखपृष्ठ अर्थातच चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे . त्यांचे मुखपृष्ठ असले की पुस्तक घ्यावेसे वाटतेच . असो . आपल्या पैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच पण ज्यांनी अज़ून वाचलेलं नाहीये त्यांनी नक्की वाचावे.- उमा निजसुरे ...Read more