* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: LETS KILL GANDHI !
 • Availability : Available
 • Translators : AJIT THAKUR
 • ISBN : 9788184981445
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 820
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : POLITICS & GOVERNMENT
 • Available in Combos :MAHATMA GANDHI COMBO SET - 6 BOOKS
Quantity
ON 30 JANUARY 1948 MAHATMA GANDHI, FATHER OF A NEWLY LIBERATED INDIAN NATION, WAS MURDERED BY A HINDU EXTREMIST. SINCE THEN, MANY LIES HAVE BEEN PASSED OFF AS TRUTHS, HALF-TRUTHS HAVE BEEN MIXED WITH TRUE INCIDENTS AND PASSED OFF AS WHOLE TRUTHS. GANDHI WAS RESPONSIBLE FOR THE PARTITION ; GANDHI SHELTERED MUSLIMS AND ABANDONED HINDUS ; KILLING GANDHI WAS THE ONLY WAY TO SAVE INDIA ; THESE WERE, AND EVEN TODAY ARE, SOME OF THE STATEMENTS PROPAGATED BY HINDU EXTREMISTS AND FOLLOWERS OF GODSE TO JUSTIFY GANDHI S MURDER.
३० जानेवारी १९४८ रोजी, नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचे पितामह महात्मा गांधी यांचा एका हिंदू अतिरेक्याने वध केला़ त्यानंतरच्या काळात अनेक असत्य गोष्टी सत्य ठरवण्यात आल्या़ काही अर्धसत्यांचे वास्तविक हकिकतींमधे मिश्रण करून त्या गोष्टी पूर्ण सत्य म्हणून खपवण्यात आल्या़. ‘‘भारताच्या फाळणीस गांधीच जबाबदार होते,’’ ‘‘गांधींनी मुसलमानांना आसरा दिला आणि हिंदूंना वा-यावर सोडले,’’ ‘‘गांधींना ठार करणे हाच भारताला वाचवण्याचा एकमेव मार्ग होता़’’ गांधी हत्येचं समर्थन करण्यासाठी हिंदू अतिरेकी व गोडसेच्या अनुयायांकडून तेव्हा अशी अनेक विधाने केली गेली आणि आजही केली जातात़ सर्व काही हकिकत अत्यंत खरेपणाने मांडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे़ गांधीजींचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात अनेक इतिहासकालीन नोंदी, गांधी खून खटल्याचा वृत्तान्त, बचाव पक्षाचे वकील आणि न्यायाधीशांनी लिहिलेली पुस्तके, वर्तमानपत्रातील अहवाल, अनेक जणांशी केलेली तोंडी चर्चा व तुषार गांधींनी लहानपणापासून घरी ऐकलेल्या हकिकती यांचा आधार घेण्यात आला आहे़. राजकीय हत्यांच्या आजवरच्या इतिहासात, कामकाजातील ढिसाळपणा, मानवी चुका आणि संपूर्ण बेपर्वाई दाखवूनही कामचुकार अव्यावसायिक अधिकारी वर्ग बिनधास्तपणे दोषारोपातून सुटल्याचे दुसरे उदाहरण नसेल़ हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे़.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LETSKILLGANDHI #LETSKILLGANDHI #लेट्सकिलगांधी #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AJITTHAKUR #TUSHARGANDHI "
Customer Reviews
 • Rating StarParikshit Yeole

  मनुवादी विचारांच्या मंडळींना म.गांधी का आणि कसे खुपत होते याचं उदाहरण तुषार गांधींच्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात एका महत्त्वपूर्ण घटनेची माहिती दिलेली आहे. एकदा एक तरूण म. गांधींच्या उरळीकांचन च्या आश्रमात आला होता. म. गांधीजींसाठी भेट म्हणून ्यानं एक टोपली आणली होती. आश्रमातल्या सुशीलानं ती टोपली घेतली. त्यात फळं आहेत, असं तो तिला म्हणाला. म. गांधीजींना त्याला भेटायचंय अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पण, ‘बापू कामात असल्याने भेटू शकणार नाहीत’, असं सुशीलानं त्याला सांगितलं. तिनं त्याला नाव विचारलं खरं पण त्यानं नाव सांगितलं नाही. थोड्यावेळाने तो तिथून निघून गेला. काही वेळानंतर शिष्यांनी ती टोपली उघडून पाहिली तर त्यात जुने फाटके जोडे - चपला असा ऐवज ठेवलेला आढळला. गांधीजींचे शिष्य चिडले पण गांधी हसले. ते म्हणाले, ‘हे विकून जे काही पैसे मिळतील, ते हरिजन फंडामध्ये जमा करा.’ त्या फाटक्या जोड्यांची विक्री करून चार रुपये हरिजन फंडात जमा झाल्याचे दुस-या दिवशी गांधीजींनी प्रार्थनेच्या वेळी उपस्थितांना सांगितले. तोच तिथे आलेला एक तरूण भडकलाच. चुकून का होईना पण आपण हरिजन फंडाला मदत केली, या विचाराने त्याचा पारा चढला, तो संतापला. आश्रमात त्यानं गोंधळ घालायला सुरुवात केली. `‘हरिजन निधीला ते पैसे दान करण्याची परवानगी मी दिली नव्हती " असे म्हणत तो जोरजोरात पैसे परत मागू लागला, आरडाओरडा करू लागला. सरदार पटेलही तेव्हा तिथे उपस्थित होते. त्याचा आकांडतांडव पाहता पटेलांनी प्रार्थनासभेतून त्या तरूणाला जबरदस्तीने हाकलून लावले. त्याचा चेहरा मात्र उपस्थित असलेल्या सर्वांच्या लक्षात राहिला. काही दिवसांतच म. गांधीच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्याचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला, तेव्हा सगळ्यांना लक्षात आले की उरळीकांचनच्या आश्रमात आकांडतांडव करणारा माथेफिरू तरूणच म. गांधींचा मारेकरी निघाला. होय, तोच खुनी अतिरेकी नथुराम गोडसे ! ...Read more

 • Rating StarGanesh Belhekar

  लेट्स किल गांधी नावाचं पुस्तक वाचायला हवं अतिशय छान आहे...... गांधी हत्येचा कट कसा केला गेला हे कळतं... आणि गांधींची महानता देखील.

 • Rating StarAMIT MUGALE

  Very good book to read, I like gandhian thoughts.

 • Rating StarUDAY SANTOSH

  सर्वांनी जरूर वाचायला हवे असे पुस्तक

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHABNAGULO
BHABNAGULO by TASLIMA NASREEN Rating Star
Chandrakant Kavathekar

हे पुस्तक एका स्वतंत्र मनोवृत्तीच्या संवेदनशील स्त्री लेखिकेचे काही विशिष्ट घटनांवर केलेल्या परखड भाष्यांची नोंद आहे.आशयाची पुनरावृत्ती व काहीसे अरण्यरूदन वाटणारी शैली हे ठळक दोष जाणवत असूनही लेखिकेची तळमळ व प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची वृत्ती जाणवत ाहते.व म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक वाचायला हवे असे.Chandrakant Kavathekar ...Read more

SARPACHA SOOD
SARPACHA SOOD by SUDHA MURTY Rating Star
Yashashri Rahalkar

पुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा! ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more