* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: KHATYAL KHALASHI ANI GADBAD GOSHTI
 • Availability : Available
 • ISBN : 8177667734
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 32
 • Language : MARATHI
 • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
N/A
घड्याळातून कोकिळा कशी आली पळून अक्रोडाच्या होड्यांतून ठेंगु गेले निघून बाहुली पडली अन् उशीतच लपली हत्तीची चांगली खोडच मोडली खेळण्यातली खेळणी खुदुखुदु हसतात गडबड गोष्टी मग मजा मजा सांगतात
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarNEWSPAPER REVIEW

  निर्मला मोने यांच्या या दुसऱ्या पुस्तकात ‘खलाशी’, ‘बाहुली आणि परी’, ‘विदुषक आणि रेडिओ’, ‘अस्वलाची शेपटी’, अशा चार गडबड गोष्टी आहेत. बालमित्रांच्या विश्वात खेळण्यांना एक वेगळे भावनिक स्थान असते. बालमनातला खेळण्यासाठी, खेळणी घेण्यासाठीचा हट्ट हे सगळे बलसुलभ असते. प्रस्तुतच्या पुस्तकाच्या ज्या चार गोष्टी आहेत त्यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधनदेखील साधता आलेले आहे. ‘खलाशी’ या गोष्टीचा नायक त्यांच्या सगळ्या मित्रांसाठी कायम चर्चेचा विषय असतो. सदा एकटाच राहणारा, कमी बोलणारा खलाशी, त्याच्या अंगात कायम कोट असतो आणि हातातले हातमोजे कधी न निघणारे. याचे कारण न शोधता प्रत्येक जण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतो, वर त्याला नावेही ठेवतो. पुढे काय होते? त्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा वाचायलाच हवी. ‘बाहुली आणि परी’ ही गोष्ट आहे शोनू आणि मोनू या दोन मैत्रिणींची ‘विदूषक आणि रेडिओ’ या गोष्टीतल्या गडबड्या-धडपड्या विदुषकाच्या करामती करतात. विदूषकाच्या हुशारीमुळे घरात शिरलेला चोर पकडला जातो, हे खासच. चिंटू अस्वलाची गोष्ट - त्याचे शेपटीचे वेड - त्यासाठी तो आपल्या सगळ्या मित्रांना खूप त्रास देतो. चिंटू अस्वलाच्या वेड्या हट्टापायी त्याला शेपटी लावली जाते, नंतर प्रत्यक्षात काय होते? चिंटू अस्वल या प्रकारातून काय शिकतो? यासाठी अर्थातच पुस्तक वाचले पाहिजे. देविदास पेशवे यांची कारागिरी म्हणजे कथाचित्रे आहेत. सौ. मोने यांचे हे तिसरे पुस्तक त्यात ‘खट्याळ खलाशी’, ‘उशीत बाहुली’, ‘धडा’, ‘मजेशीर होड्या’ अशा चार गोष्टी आहेत. मुलांची खेळणी-टेडी अस्वल, रंगीबेरंगी कपड्यांचा जोकर, छान फ्रॉकवाली बाहुली, उंच मानेचा जिराफ, माकड, घोडा छान पळणारी मोटारगाडी अशा स्वरूपाची असतात. ही खेळणी त्यात बोलणारी-खेळणी या पुस्तकातल्या गोष्टीत भेटतात. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SWARGACHA SAKSHATKAR
SWARGACHA SAKSHATKAR by TODD BURPO AND LYNN VINCENT Rating Star
DAINIK LOKMAT 21-07-2019

स्वर्गाचं दार ठोठावलेल्या चिमुरड्याचा प्रवास... प्रत्येकाची स्वर्गाची संकल्पना वेगवेगळी आहे. पण ती जिवंतपणे अनुभवण्याची संधी या पुस्तकातून लेखकाने वाचकांना उपलब्ध करून दिलेली आहे. टॉड बर्पो या लेखकाच्या कोल्टन नावाच्या चार वर्षांच्या मुलाची अ‍ॅपेडिकसची शस्त्रक्रिया झाल्यावर त्याला आलेल्या विलक्षण अनुभवांचा संचय ज्यात आपल्या कल्पनेतच सामावलेल्या स्वर्गाची गाठभेट घडवून देणारं हे पुस्तक. त्यात लेखकाने या चिमुरड्याचा मृत्यू जवळ आला असता त्याला अ‍ॅनेस्थेशिया दिल्यावर आलेल्या अनुभवांचं हे सुंदर पुस्तक. वाचता-लिहिता न येणारा हा चार वर्षांचा बालक ज्या पद्धतीने स्वर्गाची वर्णने आणि त्याचे तपशील यांची बायबलशी सांगड घालतो तो प्रकार त्याच्या कुटुंबीयांना विस्मयकारक असाच आहे. ...Read more

MICRO
MICRO by MICHAEL CRICHTON, RICHARD PRESTON Rating Star
DAINIK LOKMAT 21-07-2019

विद्यार्थ्यांची चित्तथरारक कहाणी... आपल्याकडे एखाद्या विशिष्ट वर्गाला गृहीत धरून पुस्तके लिहिण्याचे प्रमाण तसे विरळच आहे. पण इतर देशात अशा प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात लिहिले जाते आणि विशेष म्हणजे या लिखाणाला जगभरात प्रसिद्धी मिळते. जास्तीत जास्तभाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद होतात. अशाच प्रकारचे मायक्रो नावाची मायकेल क्रायटन आणि रिचर्ड प्रेस्टन या इंग्रजी लेखकांनी लिहिलेली मायक्रो कादंबरी. त्याचा मराठीत अनुवाद डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे. या कादंबरीचे कथानक हे केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथील सात पदवीधारक विद्यार्थ्यांच्या भोवती फिरणारे आहे, या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जगातली विलक्षण भरारी पाहायला मिळते. पण त्याचसोबत या मुलांचा साक्षात मृत्यूच्या कक्षेत प्रवेश होताना त्यांच्या हवाईच्या घनदाट अरण्याशी संबंध येतो आणि तिथे त्यांना आक्रमक मानवी हितसंबंधावर मात करून जगण्यासाठी निसर्गाच्याच विघातक शक्तीचा वापर करावा लागतो त्यचे वास्तववादी वित्रण, अंगावर शहारा आणणारी ही कादंबरी. ...Read more