Shop by Category FICTION (407)SPORTS (2)SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT (96)DICTIONARY (1)PLAY (20)SCIENCE FICTION (29)FICTION,TRANSLATED INTO MARATHI (2)HORROR & GHOST STORIES (14)REFERENCE AND GENERAL (68)CLASSIC (14)View All Categories --> Author MADHAV MORDEKAR ()JAMES JOSEPH ()MINEKE SCHIPPER ()CHRIS GAYLE ()FRANK MCCOURT ()NISHIKANT SHROTRI ()DR.SUNILKUMAR LAWATE ()JAIN ARUNA ASHOK ()KUMAR KETKAR ()LATIFA ALI ()NASEEMA HURZUK ()
Latest Reviews GABHULALELYA CHANDRABANAT by VISHWAS PATIL K. G Bhalerao गाभुळलेल्या चंद्रबनात --तमाशा कलेचा दस्ताऐवज -------------------------------------------------------- ढोलकी हलगीचा कडकडाट आणि न्रुत्यसम्राद्नीचा पदन्यास, नेत्रपल्लवी,सोंगाड्याच्या हजरजबाबी जुबानीने उडवलेले हास्याचे फवारे,सवाल जबाब,रंगबाजीने त्या भरलेला रंग आणि गण,गवळणी,लावण्या, पोवाड्याच्या सुरावटीने सजलेला,पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वगनाट्यांनी गहरेपण आलेला तमाशाचा फड हा मराठमोळ्या, महाराष्टीय मनाला भुरळ घालणारा जीवंत लोककला प्रकार.म्हणूनच तर रसिक जनांचं वढाळ मन तमाशाच्या तंबू कड धावत असतं.अशी ही जीवंत लोककला जीती जागती ठेवली ती या कलारसिकांनी आणि गावकुसाबाहेरच्या प्रेक्षक, कलावंतांनी. तमाशा जसा रसिकांच्या मनाला भूरळ घालतो तसाच तो अभ्यासकांच्या मनालाही भूरळ घालतो.त्या साठी विद्यापीठीय अभ्यासक जसे पायाला भिंगरी बांधत त्याचा शोध घेतात तसेच काही रसिक अभ्यासकही जिद्न्यासा म्हणून संशोधन करत असतात.अनेकांनी तमाशावर पी.एच.डी.केल्या. तर काहींनी फडमालकांची चरित्रे वाचकां समोर आणले.काहींनी त्यातील कलावंतांवर लेखनीचा झोत टाकला. सुप्रसिद्ध कादंबरीकार,ज्यांच्या सिध्दहस्त लेखनीतून साकारलेल्या ऐतिहासिक,सामाजिक कादंब-यांनी वाचकांच्या मनात घर केलं ते विश्वास पाटील यांची`गाभुळलेल्या चंद्रबनात ` ही कादंबरी तमाशा कलेचा दस्ताऐवज घेऊन आली आहे. यापूर्वी ही त्यांनी `चंद्रमुखी `नावाची कादंबरी लिहून या तमाशा कलेकडे वाचकांच्या नजरा वळवलेल्या होत्या. आता आलेली त्यांची `गाभुळलेल्या चंद्रबनात ` ही तीनशे एक पानांची कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशीत केली आहे.नौशाद आणि संगीतकार राम कदमांना विश्वास पाटलांनी ही कादंबरी अर्पण केली आहे. या कादंबरीत जसे तमाशाच्या पडद्याआडचे,राहुटीतले जग येते तसेच अनेकदा स्टेजवरचा तमाशाही येतो.त्यातील ` मोहना बटाव `,`असा झुंजला महाराष्ट्र माझा `, `संत तुकाराम ` अशा काही वगनाट्यांची कथानक काही अंशी गरजेपुरती येतात. ज्यामुळे वाचकांना संपूर्ण वगनाट्यांची कल्पना येऊ शकते. खर तर उमर साठीतला बाकेराव बानगीकर आणि त्याच्या प्रेमसागरात मसोळीसारखी डुंबण्यासाठी आलेली सतरा अठरा वर्षाची न्रुत्याची बिजली रंगकली आणि या दोघांनांही माशासारखं पाण्याबरोबर काढून तरफडायला लावणारा हिशोबी,धूर्त खलनायकी पात्र आणि वास्तवातल खलनायकी जगणं जगणारा ऐशारमी,विलासी गगण आप्पा या मुख्य पात्रांच्या अनुषंगाने अनेक पात्र येत या कादंबरीचा सोनेरी गोफ कुशलतेने पाटलांनी विणला आहे. बाकेराव सारखा हजरजबाबी सोंगाड्या,गोड गळ्याची गायकी असलेला स्वरसम्राट,आपला फड,वगनाट्य सर्वोत्तम होण्यासाठी सतत धडपडणारा,त्यासाठी मान अपमान, नुकसानीची पर्वा न करणारा आणि म्हणूनच रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेला,रसिक मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नर कलावंत पण त्यालाही पुरुषी संशयी मनावर काबू ठेवता येत नाही.तर दुसरीकडे अप्रतिम सौदर्याचं चांदणं अंगाअंगावर जन्मतःच घेऊन आलेली,तारुण्याने मुसमुसलेली जवान,रसरसलेली रंगकली जिच्या रोमारोमात भिनलेली कला.तिचा हा ऐवज तिलाच जगण्याच्या टप्याटप्यावर नागिणीसारखा डंख मारत रक्तबंबाळ करत रहातो.या दोन प्रेमीयुगलामध्ये सतत बिबवा म्हणून कार्यरत असणारा बाकेरावचा फड पार्टनर गगण आप्पा. रंगकली व बाकेराव यांना एकमेकांपासून दूरवण्यासाठी, तमाशाचा गल्ला अपमतलबासाठी उपयोगात आणणारा या दोनही कामी सतत व्यूहरचना आखणारा धूर्त असा तो आहे.या अनुषंगाने या तिघांच्याही संबंधाने अनेक पात्र येत राहतात.हे तिघही कधी यशाचे शिखर गाठतात तर कधी अपयशाच्या खोलदरीत ढकलले जाण्याचा अनुभव घेत राहतात.नदीच्या लाटेनं हळुवार आपलं अंग बदलत पुढपुढे सरकावं तसं कथानक वाचकांना उत्सुकता वाढवत पुढेपुढे नेत राहत. शेवटी रंगकली आणि बाकेरावच्या प्रेमाचाच विजय होतो.अनेक वळण घेत ते एकमेकांच्या जीवनात पुन्हा येतात. गगण आप्पा मात्र इतरांना फसवता फसवता स्वतः च त्या फसवणूकीच्या चिखल दलदलीत अडकतो ते कधीही न सावरण्यासाठी. एखादा नाट्य कलावंत अथवा तमाशा कलावंत जणूकाही एखाद्या पात्रासाठीच जन्माला आलेला असतो.जसा या कथानकात युवराज पाटणे ` छत्रपती संभाजी महाराजांच्या ` भूमिकेसाठी तर बाकेराव ` संत तुकारामांच्या ` भूमिकेसाठी. शेवटी संत तुकाराम महाराज जसे गरुडवाहनातून वैकुंठाला गेले तसे बाकेराव संत तुकारामांची भूमिका करताना अखेरच्या वैकुंठ गमनाचा सीन आटोपून त्या गरुडवाहनातच आपलं कलेवर सोडतात. मानवी स्वभावाचे सुष्ट-द्रुष्ट नमुने, नात्यातील गुंतागुंत, त्याग-स्वार्थ येथेही आपणास दिसतो. कादंबरी वाचताना अनेक माहितीचे कलावंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.पण अनेकांचे मिक्सिंग असल्याने आपली फसगत होते. तमाशाच्या फडात जगण्याच्या मजबूरीने काही कलावंत येतात तर काही कलेची हौस म्हणूनही येतात. तर काहींना वारशाने ही कला जोपासावी लागते.पण या तमाशा कलावंतांच जगणं सामान्य माणसाच्या,नाट्यकलावंताच्या,चित्रपट कलावंतांच्या जगण्यापेक्षाही कसं भिन्न आहे,भणंग आहे, `सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वाता एवढे `असंच त्यांच विश्व आहे.आणि विश्वास पाटलांसारख्या कसदार लेखनीचा परिसस्पर्श त्याला लाभल्याने वाचकांना बारकाव्याने ते जगणं समजून घेण्यासाठी खूपच मदत झाली आहे. असेच म्हणावे लागेल. के.जी.भालेराव ...Read more NOT WITHOUT MY DAUGHTER by BETTY MAHMOODY Jayesh Naiknavare `नॉट विदाऊट माय डॉटर` हे पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण झाले. पुस्तकातील सर्व घटना ही १९८३ च्या आसपासची आहे. पुस्तक वाचून जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मन अगदी सुन्न पडले होते. ती वसुस्थिती अक्षरशः मला माझ्या डोळ्यांपुढे दिसत होती. एकदम अनोळखी प्रदेश त्यात तेथ क्रांती झालेली कशाचाच कशाला ताळमेळ नाही. आणि असा देश जेथे सर्व कायदे हे पुरुषाच्या बाजूने होते अगदी स्त्री ने संतती नियमन करणे हा सुद्धा गुन्हा होता आणि त्याला शिक्षा ही देहदंडाचीच. या सारखे आजून अनेक जाचक कायदे त्या देशात त्या वेळी अस्तित्वात होते. आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून सर्व काही सोडून त्याच्या मागे इथवर ६००० मैलांचा प्रवास करून आल्यावर तिच्या लक्षात येते की आपण किती मोठ्या संकटात सापडलो आहोत. तोच तिचा नवरा तिच्या जीवावर उठतो तिला बेदम मारझोड करणं, शिवीगाळ करणं हे तर नित्याचेच होऊन जाते. तिला सतत तिच्या मुली पासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. रात्रंदिवस तिच्यावर पाळत ठेवतो. पण ती धीर सोडता तिच्या मुली साठी सर्व काही सहन करत राहते आणि अखेरीस ती तेथुन पळून जाण्याचा विचार करते आणि मग सुरू होतो तो सुटकेचा खडतर, जीवघेणा प्रवास. या सर्व प्रवासात तिचा फक्त एकाच गोष्टीवर विश्वस असतो ती म्हणजे `ईश्वर` ती तिला आणि तिच्या ६ वर्षाच्या लहान मुलीला हेच सांगत राहते की ईश्वर सर्व काही ठीक करेन. आणि तोच एक आशेचा किरण धरून तिचा खडतर प्रवास सुरु होतो आणि ती त्यात यशस्वी सुद्धा होते. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. ...Read more
GABHULALELYA CHANDRABANAT by VISHWAS PATIL K. G Bhalerao गाभुळलेल्या चंद्रबनात --तमाशा कलेचा दस्ताऐवज -------------------------------------------------------- ढोलकी हलगीचा कडकडाट आणि न्रुत्यसम्राद्नीचा पदन्यास, नेत्रपल्लवी,सोंगाड्याच्या हजरजबाबी जुबानीने उडवलेले हास्याचे फवारे,सवाल जबाब,रंगबाजीने त्या भरलेला रंग आणि गण,गवळणी,लावण्या, पोवाड्याच्या सुरावटीने सजलेला,पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक वगनाट्यांनी गहरेपण आलेला तमाशाचा फड हा मराठमोळ्या, महाराष्टीय मनाला भुरळ घालणारा जीवंत लोककला प्रकार.म्हणूनच तर रसिक जनांचं वढाळ मन तमाशाच्या तंबू कड धावत असतं.अशी ही जीवंत लोककला जीती जागती ठेवली ती या कलारसिकांनी आणि गावकुसाबाहेरच्या प्रेक्षक, कलावंतांनी. तमाशा जसा रसिकांच्या मनाला भूरळ घालतो तसाच तो अभ्यासकांच्या मनालाही भूरळ घालतो.त्या साठी विद्यापीठीय अभ्यासक जसे पायाला भिंगरी बांधत त्याचा शोध घेतात तसेच काही रसिक अभ्यासकही जिद्न्यासा म्हणून संशोधन करत असतात.अनेकांनी तमाशावर पी.एच.डी.केल्या. तर काहींनी फडमालकांची चरित्रे वाचकां समोर आणले.काहींनी त्यातील कलावंतांवर लेखनीचा झोत टाकला. सुप्रसिद्ध कादंबरीकार,ज्यांच्या सिध्दहस्त लेखनीतून साकारलेल्या ऐतिहासिक,सामाजिक कादंब-यांनी वाचकांच्या मनात घर केलं ते विश्वास पाटील यांची`गाभुळलेल्या चंद्रबनात ` ही कादंबरी तमाशा कलेचा दस्ताऐवज घेऊन आली आहे. यापूर्वी ही त्यांनी `चंद्रमुखी `नावाची कादंबरी लिहून या तमाशा कलेकडे वाचकांच्या नजरा वळवलेल्या होत्या. आता आलेली त्यांची `गाभुळलेल्या चंद्रबनात ` ही तीनशे एक पानांची कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशीत केली आहे.नौशाद आणि संगीतकार राम कदमांना विश्वास पाटलांनी ही कादंबरी अर्पण केली आहे. या कादंबरीत जसे तमाशाच्या पडद्याआडचे,राहुटीतले जग येते तसेच अनेकदा स्टेजवरचा तमाशाही येतो.त्यातील ` मोहना बटाव `,`असा झुंजला महाराष्ट्र माझा `, `संत तुकाराम ` अशा काही वगनाट्यांची कथानक काही अंशी गरजेपुरती येतात. ज्यामुळे वाचकांना संपूर्ण वगनाट्यांची कल्पना येऊ शकते. खर तर उमर साठीतला बाकेराव बानगीकर आणि त्याच्या प्रेमसागरात मसोळीसारखी डुंबण्यासाठी आलेली सतरा अठरा वर्षाची न्रुत्याची बिजली रंगकली आणि या दोघांनांही माशासारखं पाण्याबरोबर काढून तरफडायला लावणारा हिशोबी,धूर्त खलनायकी पात्र आणि वास्तवातल खलनायकी जगणं जगणारा ऐशारमी,विलासी गगण आप्पा या मुख्य पात्रांच्या अनुषंगाने अनेक पात्र येत या कादंबरीचा सोनेरी गोफ कुशलतेने पाटलांनी विणला आहे. बाकेराव सारखा हजरजबाबी सोंगाड्या,गोड गळ्याची गायकी असलेला स्वरसम्राट,आपला फड,वगनाट्य सर्वोत्तम होण्यासाठी सतत धडपडणारा,त्यासाठी मान अपमान, नुकसानीची पर्वा न करणारा आणि म्हणूनच रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेला,रसिक मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नर कलावंत पण त्यालाही पुरुषी संशयी मनावर काबू ठेवता येत नाही.तर दुसरीकडे अप्रतिम सौदर्याचं चांदणं अंगाअंगावर जन्मतःच घेऊन आलेली,तारुण्याने मुसमुसलेली जवान,रसरसलेली रंगकली जिच्या रोमारोमात भिनलेली कला.तिचा हा ऐवज तिलाच जगण्याच्या टप्याटप्यावर नागिणीसारखा डंख मारत रक्तबंबाळ करत रहातो.या दोन प्रेमीयुगलामध्ये सतत बिबवा म्हणून कार्यरत असणारा बाकेरावचा फड पार्टनर गगण आप्पा. रंगकली व बाकेराव यांना एकमेकांपासून दूरवण्यासाठी, तमाशाचा गल्ला अपमतलबासाठी उपयोगात आणणारा या दोनही कामी सतत व्यूहरचना आखणारा धूर्त असा तो आहे.या अनुषंगाने या तिघांच्याही संबंधाने अनेक पात्र येत राहतात.हे तिघही कधी यशाचे शिखर गाठतात तर कधी अपयशाच्या खोलदरीत ढकलले जाण्याचा अनुभव घेत राहतात.नदीच्या लाटेनं हळुवार आपलं अंग बदलत पुढपुढे सरकावं तसं कथानक वाचकांना उत्सुकता वाढवत पुढेपुढे नेत राहत. शेवटी रंगकली आणि बाकेरावच्या प्रेमाचाच विजय होतो.अनेक वळण घेत ते एकमेकांच्या जीवनात पुन्हा येतात. गगण आप्पा मात्र इतरांना फसवता फसवता स्वतः च त्या फसवणूकीच्या चिखल दलदलीत अडकतो ते कधीही न सावरण्यासाठी. एखादा नाट्य कलावंत अथवा तमाशा कलावंत जणूकाही एखाद्या पात्रासाठीच जन्माला आलेला असतो.जसा या कथानकात युवराज पाटणे ` छत्रपती संभाजी महाराजांच्या ` भूमिकेसाठी तर बाकेराव ` संत तुकारामांच्या ` भूमिकेसाठी. शेवटी संत तुकाराम महाराज जसे गरुडवाहनातून वैकुंठाला गेले तसे बाकेराव संत तुकारामांची भूमिका करताना अखेरच्या वैकुंठ गमनाचा सीन आटोपून त्या गरुडवाहनातच आपलं कलेवर सोडतात. मानवी स्वभावाचे सुष्ट-द्रुष्ट नमुने, नात्यातील गुंतागुंत, त्याग-स्वार्थ येथेही आपणास दिसतो. कादंबरी वाचताना अनेक माहितीचे कलावंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.पण अनेकांचे मिक्सिंग असल्याने आपली फसगत होते. तमाशाच्या फडात जगण्याच्या मजबूरीने काही कलावंत येतात तर काही कलेची हौस म्हणूनही येतात. तर काहींना वारशाने ही कला जोपासावी लागते.पण या तमाशा कलावंतांच जगणं सामान्य माणसाच्या,नाट्यकलावंताच्या,चित्रपट कलावंतांच्या जगण्यापेक्षाही कसं भिन्न आहे,भणंग आहे, `सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वाता एवढे `असंच त्यांच विश्व आहे.आणि विश्वास पाटलांसारख्या कसदार लेखनीचा परिसस्पर्श त्याला लाभल्याने वाचकांना बारकाव्याने ते जगणं समजून घेण्यासाठी खूपच मदत झाली आहे. असेच म्हणावे लागेल. के.जी.भालेराव ...Read more
NOT WITHOUT MY DAUGHTER by BETTY MAHMOODY Jayesh Naiknavare `नॉट विदाऊट माय डॉटर` हे पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण झाले. पुस्तकातील सर्व घटना ही १९८३ च्या आसपासची आहे. पुस्तक वाचून जेव्हा पूर्ण झाले तेव्हा मन अगदी सुन्न पडले होते. ती वसुस्थिती अक्षरशः मला माझ्या डोळ्यांपुढे दिसत होती. एकदम अनोळखी प्रदेश त्यात तेथ क्रांती झालेली कशाचाच कशाला ताळमेळ नाही. आणि असा देश जेथे सर्व कायदे हे पुरुषाच्या बाजूने होते अगदी स्त्री ने संतती नियमन करणे हा सुद्धा गुन्हा होता आणि त्याला शिक्षा ही देहदंडाचीच. या सारखे आजून अनेक जाचक कायदे त्या देशात त्या वेळी अस्तित्वात होते. आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून सर्व काही सोडून त्याच्या मागे इथवर ६००० मैलांचा प्रवास करून आल्यावर तिच्या लक्षात येते की आपण किती मोठ्या संकटात सापडलो आहोत. तोच तिचा नवरा तिच्या जीवावर उठतो तिला बेदम मारझोड करणं, शिवीगाळ करणं हे तर नित्याचेच होऊन जाते. तिला सतत तिच्या मुली पासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. रात्रंदिवस तिच्यावर पाळत ठेवतो. पण ती धीर सोडता तिच्या मुली साठी सर्व काही सहन करत राहते आणि अखेरीस ती तेथुन पळून जाण्याचा विचार करते आणि मग सुरू होतो तो सुटकेचा खडतर, जीवघेणा प्रवास. या सर्व प्रवासात तिचा फक्त एकाच गोष्टीवर विश्वस असतो ती म्हणजे `ईश्वर` ती तिला आणि तिच्या ६ वर्षाच्या लहान मुलीला हेच सांगत राहते की ईश्वर सर्व काही ठीक करेन. आणि तोच एक आशेचा किरण धरून तिचा खडतर प्रवास सुरु होतो आणि ती त्यात यशस्वी सुद्धा होते. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. ...Read more