* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: ASWALACHI SHEPTI ANI GADBAD GOSHTI
 • Availability : Available
 • ISBN : 817766770X
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 32
 • Language : MARATHI
 • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
N/A
घड्याळातून कोकिळा कशी आली पळून अक्रोडाच्या होड्यांतून ठेंगु गेले निघून बाहुली पडली अन् उशीतच लपली हत्तीची चांगली खोडच मोडली खेळण्यातली खेळणी खुदुखुदु हसतात गडबड गोष्टी मग मजा मजा सांगतात
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK LOKMAT 06-05-2007

  ‘निर्मला मोने यांच्या या दुसऱ्या पुस्तकात ‘खलाशी’, ‘बाहुली आणि परी’, ‘विदूषक आणि रेडिओ’, ‘अस्वलाची शेपटी’, अशा चार गडबड गोष्टी आहेत. बालमित्रांच्या विश्वात खेळण्यासाठी, खेळणी घेण्यासाठीचा हट्ट हे सगळे बालसुलभ असते. प्रस्तुतच्या पुस्तकातच्या ज्या चार ोष्टी आहेत त्यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधनदेखील साधता आलेले आहे. ‘खलाशी’ या गोष्टीचा नायक त्याच्या सगळ्या मित्रांसाठी कायम चर्चेचा विषय असतो. सदा एकटाच राहणारा, कमी बोलणारा खलाशी, त्याच्या अंगात कायम कोट असतो आणि हातातले हातमोजे कधी न निघणारे. याचे कारण न शोधता प्रत्येक जण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतो, वर त्याला नावेही ठेवतो. पुढे काय होते? त्यासाठी ही हृदयस्पर्शी कथा वाचायलाच हवी. ‘बाहुली आणि परी’ ही गोष्ट आहे. शोनू आणि मोनू या दोन मैत्रिणींची ‘विदूषक आणि रेडिओ’ या गोष्टीतल्या गडबड्या-धडपड्या विदूषकाच्या करामती करतात. विदूषकाच्या हुशारीमुळे घरात शिरलेला चोर पकडला जातो, हे खासच. चिंटू अस्वलाची गोष्ट - त्याचे शेपटीचे वेड - त्यासाठी तो आपल्या सगळ्या मित्रांना खूप त्रास देतो. चिंटू अस्वलाच्या वेड्या हट्टापायी त्याला शेपटी लावली जाते, नंतर प्रत्यक्षात काय होते? चिंटू अस्वल या प्रकारातून काय शिकतो? यासाठी अर्थातच पुस्तक वाचले पाहिजे. देविदास पेशवे यांची कारागिरी म्हणजे कथाचित्रे आहेत. सौ. मोने यांचे हे तिसरे पुस्तक त्यात ‘खट्याळ खलाशी’, ‘उशीत बाहुली’, ‘धडा’, ‘मजेशीर होड्या’, अशा चार गोष्टी आहेत. मुलांची खेळणी टेडी अस्वल, रंगीबेरंगी कपड्यांचा जोकर, छान फ्रॉकवाली बाहुली, उंच मानेचा जिराफ, माकड, घोडा, छान पळणारी मोटरगाडी अशा स्वरूपाची असतात. ही खेळणी त्यात बोलणारी-खेळणी या पुस्तकातल्या गोष्टीत भेटतात. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BETTER
BETTER by DR.ATUL GAWANDE Rating Star
DAINIK LOKMAT 18-08-2019

शल्यविशारदाचं चिंतन... वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा दर्जा सुधारण्याबाबत बरेचदा नामवंत लोक क्रीडापटूंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात. चिकाटी, परिश्रम, मेहनत, सराव आणि अचूकपणा यांचे यथोचित समतोल या क्रीडापटूंमध्ये पाहायला मिळतो. पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान े केवळ कुठल्यातरी परिणामावर अवलंबून राहून कसे मिळवता येईल. त्यासाठी अवचित अतिप्रसंगाचे होणारे आगमनदेखील तितकाच महत्त्वाचा भाग असतो. जीवन-मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या जीवाची घालमेल अत्यवस्था यांना सामोरे जाताना तुम्हाला अचूक आणि तितकाच विनाविलंब निर्णय घ्यायचा असतो. तो अनुभव थरारक व जीवनाच्या परिभाषेवर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित होते. अतुल गवांदे लिखित ‘बेटर’ हे पुस्तक एका शल्यविशारदाचं गुणवत्तेबाबतचं चिंतन आहे. ...Read more