Medha Marathe

About Author

Birth Date : 27/03/1952

मेधा मराठे यांच्या लेखणीने मुख्यत: साहित्यातील कथा आणि एकांकिका या क्षेत्रांत विहार केला आहे. हरबावडी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. धनंजय, वसंत, सारांश, लोकप्रभा आदी दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. काही कथास्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकेही पटकावली आहेत. ना तलाकशुदा... ना शादीशुदा, चेला, मर्द, अश्वत्थामा, चिरंजीव, तिची केस इत्यादी एकांकिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या ना तलाकशुदा... ना शादीशुदा या एकांकिकेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. बराक ओबामा - यस वी कॅन, रवींद्रनाथ टागोर यांच्या अप्रतिम कथा या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला. हितोपदेश हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. दिग्दर्शन, अभिनय, अभिवाचन या कलाप्रकारांची त्यांना विशेष आवड आहे आणि या कलांमध्येही त्यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
MATICHE MAMA AVAGHE JIVAN Rating Star
Add To Cart INR 280
SWARGACHA SAKSHATKAR Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

VAISHAKH
VAISHAKH by RANJEET DESAI Rating Star
ANGHA ATUL KILLEDAR

रणजित देसाईंच्या अगदी सुरवातीच्या काळातला हा कथासंग्रह. ग्रामीण बाजाच्या या कथा रणजित देसाईंची भाषेवरची आणि माणसे निरखण्याची शैली दाखवतात. सर्व कथा वाचनीय. शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या सुट्ट्या आठवल्या. हा कथासंग्रहसुद्धा तसाच हपापल्या सारखावाचून काढला. ...Read more

ANANDTARANG
ANANDTARANG by GRECHEN RUBIN Rating Star
DAINIK LOKMAT 15-09-2019

परिवर्तनाची बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्या्या एका विशिष्ट टप्प्यावरती अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तिथून पुढे सुरू होतो त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टली वाहून घेते. आनंदी कसे व्हावे याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगानुयुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमकं काय आहे. त्यात तिने कोणते कोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more