DAINIK KESARI 03/07/2022 आपल्या दैनंदिन भावविश्वाच्या पलीकडे असे जग आहे, जिथे सतत काही ना काही घडत असते. नवीन उलथापालथ होत असते. घटना घडल्यानंतर त्याचा आढावा प्रसारमाध्यमांद्वारे घेऊन आपण पुन्हा आपल्या कामांकडे वळतो. वरवरचं दिसणं सोडलं तर अंतर्गत घडामोडी किती खोलवर परिणाम करात, त्यात नाहक कसे बळी पडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.
संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी हे दोन्ही लेखक ज्येष्ठ गुन्हे शोध पत्रकार असून यांनी शोध पत्रकारिता करून अनेक हाय प्रोफाइल्स गुन्हे उघडकीस आणले आहेत. या लेखकद्वयींचं पहिलं पुस्तक ‘तेलगी स्कॅम’ खूप गाजलं. या पुस्तकाच्या यशानंतर आता हे लेखकद्वयी वाचकांसाठी रोमांचक, थरारक अशी कहाणी घेऊन आले आहेत. ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही कादंबरी चित्तथरारक अशी खाकी वर्दीची कहाणी आहे. मूळ कादंबरी हिंदी भाषेत आहे. त्याचा मराठी अनुवाद मुकुंद कुळे यांनी केला आहे.
कादंबरीतील कथानक मुंबई परिसरात घडतं. कादंबरीचं निवेदन तृतीयपुरुषी असून पात्रांच्या संवादातून कथानक आणखी रंजक होत राहते. कादंबरीची सुरुवात होते एका ब्रेकिंग न्यूजने. भारतातील सगळ्यात श्रीमंत आसामी कुबेर. कुबेरच्या घराबाहेर म्हणजे कुबेरियाबाहेर एक स्फोटकांनी भरलेली बेवारस गाडी आढळते आणि तिथून सुरू होतं थरारनाट्य. या प्रकरणी पोलीस दल, बॉम्बशोध पथक, मीडिया सगळे जमा होतात. ही कसे पाहण्यासाठी १७वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यतिन साठेला पाचारन केले जाते आणि त्याला सीआययूचा प्रमुख केले जाते. या प्रकरणाची चौकशी एटीएस, एनआयए, मुंबई पोलीस या सर्वांकडून सुरू होते. एक प्रकारे त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. कथानकातील प्रसंग वर्तमानातून भूतकाळात पुन्हा वर्तमानात अशा पद्धतीने घटनांची मांडणी केलेली आहे की, वर्तमानातील घटनेचा भूतकाळाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि कथानक जसजसे पुढे जात राहते तसतसे अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि वाचकांची उत्कंठा वाढत राहते.
या गाडी प्रकरणात आणखी एक प्रकरण घडतं ते म्हणजे हसमुख जैन हत्या प्रकरण. या प्रत्येक घटनेनंतर साठेच्या संशयास्पद हालचाली सगळ्यांच्या नजरेत येतात. खरेच या सगळ्यामागे यतिन साठेचं नियोजन होतं का? हे करून त्याला काय मिळणार होतं? का यामागे खरा सूत्रधार कोणी वेगळा आहे? हे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. या पुस्तकात अनेक सरकारी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा याविषयी उल्लेख आहे. या यंत्रणांच्या कामकाजाची, नियोजनाची माहिती यातून कळते. कादंबरीत अनेक पात्रे प्रसंगानुरूप भेटतात. मुंबई पोलीस आयुक्त महावीर तोमर हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अधिकारी. त्याने आपल्या पदाच जोरावर वसुलीतंत्र सुरू केलेलं असतं. तोमर आपल्या पदाचा गैरवापर करून कसे खेळ खेळतो आणि इतरांना अडकवतो पण खरे काय आहे? या प्रकरणाचा सूत्रधार कोण? या गुन्ह्यामागील नेमका हेतू कोणता? तो सूत्रधार सापडतो का? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
एखाद्या गुन्ह्यामागे कसे नियोजन केले जाते आणि आपल्या हाताखालील वक्तींचा प्याद म्हणून कसा वापर केला जातो? आणि प्रकरण अंगाशी आल्यावर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी कसे दुसऱ्याला उद्ध्वस्त केलं जातं. हे वास्तव यात मांडले आहे. पोलीस दलात ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही टीम कोण तयार करते, हा प्रश्न उद्भवतो. ही केस कशा पद्धतीने सोडवली जाते. त्यामागची प्रक्रिया कशी असते. हे वाचताना एखाद्या चित्रपटाची कथा वाचतोय की काय असे भासते. एक प्रकारचं थ्रिल याद्वारे अनुभवता येतं. या पुस्तकाद्वारे कोणत्याही यंत्रणेला बदनाम करण्याचा हेतू नाही. पण काही व्यक्तींमुळे संपूर्ण यंत्रणा कशी बदनाम होते, यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे.
या कादंबरीत यतिन साठी सोबतच सतत उल्लेख येतो तो गुन्हे शोध पत्रकार संजय त्रिवेदी यांचं. तो ही या प्रकरणातील दुवे कसे शोध्तो. हे समजते. यातील बाकीची पात्रे गृहमंत्री सरदेशपांडे, कुबेरचा मुख्या सुरक्षारक्षक अमन चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप वर्मा, एटीएसचा प्रमुख पलांडे, पोलीस निरीक्षक नित्या, आर्य, रोहतगी, जितेंद्र नागपुरे, महेश भोर, शिक्षा भोगणारा पोलीस गजानन झेंडे, कुबेर, कुबेरचा मुलगा ध्रुव, संचिनी, नीना डायस या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन जाणून घेण्यासाठी ही रोमांचक आणि थरारक कादंबरी नक्की वाचा.
लेखकद्वयी यांना गुन्हे शोध पत्रकारितेचा ४० वर्षांचा अनुभव आहे. अनेक प्रकरणं त्यांनी जवळून अनुभवली आहेत. अनेक प्रकरणं मिडियासमोर आणले आहेत. त्या निरीक्षणातून, कामाच्या अनुभवातून या कादंबरीची निर्मिती झाली. या कादंबरीच्या आकृतिबंधामुळे ही कथा त्यांना विस्तृतपणे आणि रंजकतेने वाचकांसमोर आणता आली. कादंबरी नक्की वाचा आणि अनुभवा ‘कहाणी खाकी वर्दीची’.
– अस्मिता प्रदीप येंडे ...Read more
डॉ. शरद जाधव एम.डी.(मेडिसीन) ठाणे *मेळघाटच्या अख्ख्या जीवनाचा ठसा मनावर उमटवणारे पुस्तक `कुलामामाच्या देशात`*
वानखडे साहेबांचे अनुभव आणि देशमुखांचे कथन घेऊन निघालेले कुलामामा मेळघाटातून सह्याद्रीत पोहोचलेच. हा एक उत्तम ,अस्सल साहित्याचा ठेवा आहे..
वर्तमानपत्रात मेळघाटाील बातम्या म्हणजे भूकबळी, आदिवासी, वाघाने घेतलेले आणि वाघांचे बळी याबद्दल मनात एक पुसट चित्र तयार झाले होते. वेळोवेळी मेळघाटच्या सौंदर्याचे वाचलेले बहारदार वर्णन उत्सुकता वाढवत होतेच.
खरे सांगायचे तर पश्चिम महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्यासारख्या मंडळींनी सह्याद्रीला ओलांडून कधी परशुरामाचा कोकण नीट पाहिलं नाही. ऊसशेती, भाज्या, फळे पिकविणाऱ्या देशावराच्या मंडळीना डोंगर, समुद्र, भातशेती, आंबा, काजू, पोफळी, मासेमारी करणारे कोळीबांधव यांच्या जीवनाविषयी फार जुजबी माहिती, तीही साहित्य आणि टीव्ही या माध्यमातून होते. खरे तर, कोकण बघण्यासाठी लहान गावात किंवा वाडीत राहायला पाहिजे. केवळ सहल करून खरा अनुभव येईल असे वाटत नाही. आदिम मानव आणि निसर्ग यांच्याजवळ जाण्याची ना वृत्ती ना संधी असे वाटत असताना हे पुस्तक हाती आले.
भारत वाघसाठी ओळखला जातो. जंगल वाघ, शिकार, सफारी एवढ्यापुरतच मर्यादित आहे काय?
दुर्बिणीतून वाघ बघणे आणि छायाचित्र
टिपणे आणि त्यात कृतकृत्य होणे म्हणजे गुलहौशीपणा असे वाटायला लागले.
भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली वाचलेली माणूस आणि निसर्गाची माहिती वाचतांना तिथली माणसे आणि जीवन कसे असेल याची केवळ कल्पना मनात होती.
आज या पुस्तकाने ते बंद दार किलकीले केले आणि मेळघाट चा एक कवडसा आत आला आहे.
कथनाच्या मध्यस्थानी असलेल्या कुलामामाचाच नव्हे तर मेळघाटच्या अख्ख्या जीवनाचा ठसा मनावर उमटला.
आठवण झाली ती माडगूळकरांच्या माणदेशी माणसांची आणि मालगुडी डेज ची. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या हलाखीच्या दिवसात मुंबई सकाळ मध्ये आठवड्याला एक माणदेशी माणूस उभा केला आणि पुढे त्याची पुस्तक झाली. त्यातील प्रत्येक माणूस अस्सल होता. देशमुख वानखेडे
यांच्या बाबतीत असेच घडले असावे. मला तर वानखडे साहेबांच्या कारमध्ये आपण सुद्धा मागच्या सीटवर बसून ऐकतो आहोत असे पुस्तक वाचताना वाटले. मेळघाट म्हणजे केवळ आदिवासी, केवळ निसर्ग सौंदर्य केवळ वाघ आणि त्याच्या कथा नसून
मनुष्य, निसर्ग, जीवन, माणसाच्या भावना, कल्पना, श्रद्धा, अंधश्रद्धा सर्वांचा एक रंगपट उभा राहिला. कधी मेळघाटात यायचे भाग्य लाभले तर या पुस्तकातील प्रत्येक माणूस, प्रत्येक जागा हुडकण्याचा माझे मन प्रयत्न करेल. फॉरेस्ट खात्याच्या खाकी वर्दीतील माणसाच्या आत एक एक संवेदनशील साहित्यिक, रसिक, जीवनाकडे तटस्थ पण हसऱ्या वृत्तीने बघणारा माणूस दिसतो.
मी सोलापूरकर. वऱ्हाडात रमलेल्या चींत्तमपल्ली यांच्या गावचा, त्यांच्याच शाळेत आणि कॉलेज मध्ये शिक्षण घेतले हे बिरूद मिरविणारा. मारोतराव साहित्यात निसर्ग, जंगल घेऊन आले आणि अख्खा महाराष्ट्र विदर्भात जाण्याची स्वप्ने बघू लागला. असे वाटते की मारोतराव जर विदर्भाचे गदिमा असतील तर देशमुख-वानखडे व्यंकटेश असावेत.
...Read more