Eckhart Tolle

About Author

Birth Date : 16/02/1948

श्री. एकहार्ट टोले हे मूळचे जर्मन; पण आता अमेरिकेत स्थायिक झालेले प्रज्ञावंत, आत्मदर्शी लेखक. The Power Of Now या त्यांच्या पुस्तकानं त्यांना जगात सर्वत्र अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळवून दिली. कुठल्यातरी अज्ञात प्रेरणेमुळे ते चांगलं करिअर करण्याची शक्यता सोडून चेतना जागरणाच्या साधनेत मग्न झाले. द्वेष, हिंसा, अत्याचार ही मानवतेला जडलेली, अहंकारातून निर्माण झालेली दुखणी आहेत हे त्यांच्या ध्यानी आलं. यावर उपाय म्हणजे पृथ्वीवर एका नव्या चेतनेचं जागरण नि प्रकटन असं ते सांगतात. पति-पत्नी, आई-वडील, मुलं, मित्र-सहकारी या सर्वांच्या नातेसंबंधांना ही जागृत चेतना टवटवीत, अर्थपूर्ण करते. उपनिषदं, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्तसाधना या सर्वांचा मोकळेपणाने संदर्भ देत ते सृष्टिविकासाला अनुकूल अशी एक नवीन जीवनपद्धती सुचवीत आहेत. ती म्हणजे A New Earth – हे पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद – अवनी एक नवी या नावाने आपल्याला सादर करीत आहोत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AVANI EK NAVI Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

HILLARY CLINTON
HILLARY CLINTON by ATUL KAHATE Rating Star
DAINIK LOKMAT 16-02-2020

कर्तृत्ववान हिलरींची प्रेरणादायी कहाणी... अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या विजयाची खात्री जनमानसात होती; मात्र अनपेक्षितपणे या निवडणुकीत हिलरी यांचा पराभव करीत डोनाल्ड ट्म्प दिमाखात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. हिलरी यांचे आयुष्य अत्यंत कार्यक्षम आणि अतिशय नाट्यमय घटनांनी समृद्ध राहिले आहे. अनेक वादविवादांची पार्श्वभूमी असली तरी तरुणपणी त्यांनी सामाजिक कार्यात घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. कौटुंबिक आयुष्यात मुलगी, पत्नी, आई आणि आजी या जबाबदाऱ्या समर्थपणे निभावताना त्यांनी सिनेटर व परराष्ट्रमंत्री या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यादेखील लीलया पेलल्या आहेत. अशा कर्तृत्ववान महिलेची ही प्रेरणादायी कहाणी. ...Read more

ANITALA JAMIN MILTO
ANITALA JAMIN MILTO by ARUN SHOURIE Rating Star
DAINIK LOKMAT 16-02-2020

नाते व न्यायव्यवथेवरचं अभ्यासपूर्ण भाष्य... देशाची लोकशाही ज्या चार स्तंभावर उभी असते त्यात न्यायालय हे एक आहे. कुठल्याही पक्षाच्या सरकार किंवा समाजातील कुणाकडून कुणावरही अन्याय होणार नाही, तसेच समता, बंधुतेची रुजवण कायम ठेवण्याची जबाबदारी ही न्यायवयवस्थेवरच्या विश्वासावर टिकून असते. पण लोकशाहीचा हा शेवटचा स्तंभ किती दुर्बल आणि असाहाय झाला असल्याचे लेखक अरुण शौरी या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणतात. तसेच त्यांच्या पत्नी अनिता या दुर्धर आजाराने त्रस्त असतानादेखील त्यांना अजामीनपात्र वॉरन्ट्स बजावण्यात येते. अत्यंत तटस्थपणे व काटेकोर अभ्यास करून नाते, समाज, न्याय यांपैकी कुठल्याही एका व्यवस्थेवरचं नियंत्रण ढळू न देता भाष्य करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे. कधी विनोदी तर कधी संतापाने उद्विग्न करणाऱ्या भावनांचा हा कल्लोळ नक्की वाचकांना खडबडून जागे करणारा आहे. ...Read more