Vijay Andhere वि . स खांडेकरांची गाजलेली ययाती... देवयानी आणि ययाती यांच्या निखळ प्रेमाची साक्ष देणारी ययाती...
SANDIP CHAVAN सेकंड लेडी ही आयर्विंग वॅलेस या अमेरिकन लेखकाची गाजलेली रहस्यकथा (कादंबरी) आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केलेला आहे.
रशियाची गुप्तचर संस्था केबिजी, अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीची हुबेहूब नक्कल (डमी) तयार करते. अमेरिका अध्यक्षांची खर पत्नी जेव्हा एका ठरलेल्या कार्यक्रमासाठी मॉस्को मध्ये येते तेव्हा तिच्या जाग्यावर नकली व्यक्ती अतिशय योजनाबद्ध रीतीने बदलवली जाते. या कामासाठी केबिजीने तीन वर्षे मेहनत घेतलेली असते. या योजनेचा हेतू काय असतो? ही गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला समजते का? अमेरिकी अध्यक्षांना या गोष्टीचा सुगावा लागतो की नाही? केबीसीला हवी असणारी माहिती मिळते की नाही? आणि शेवटी व्हाईट हाऊसमध्ये राहते ती अध्यक्ष्यांची खरी पत्नी असते की खोटी? हे जाणून घ्यायला ही कादंबरी वाचायला हवी.
ही कादंबरी वाचताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या रहस्यकथेत आपण इतके हरवून जातो की काळ- वेळेचे भानही आपल्याला राहत नाही. समोर एखादा हॉलिवूड चित्रपट पाहतोय अशी रंगत ही कादंबरी वाचताना येते. पुढे काय होणार याची उत्कंठा शेवटापर्यंत राहते हे या कथेचे यश आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी बदलणे आणि तिच्या जागी खोटी व्यक्ती पत्नी म्हणून पाठवणे हे काम म्हणजे थोडी अतिशयोक्ती वाटते. परंतु पूर्वग्रह न ठेवता पुस्तक वाचल्यास वाचक त्यामध्ये हरवून जातो हे निश्चित!
ही काल्पनिक कथा वाचत असताना पाश्चात्य लेखकांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते. अनुवादकाने घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे. ...Read more