|
|
उत्तम, दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणे आणि शहराबरोबरच ग्रामीण लेखकांनाही वाव देणे या ध्येयाने श्री. अनिल मेहता यांनी अत्यंत साधेपणाने 'मेहता पब्लिशिंग हाऊस' ही प्रकाशन संस्था दिपावली 1976 रोजी सुरू केली. प्रथितयश लेखक डॉ. आनंद यादव यांचे
'माळावरची मैना' हे पहिले पुस्तक प्रकाशित करून प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकलेल्या या संस्थेने आपल्या 33 वर्षांच्या वाटचालीत वैविध्यपूर्ण विषयांवरची पुस्तके प्रकाशित केली आहेत.
|
आपल्यासारख्या रसिकांनी आमचे सभासद व्हावे, यासाठी टी बुक क्लब योजना टी बुक क्लबचे सभासद व्हा आणि क्लबची पुस्तके निम्म्या किंमतीत मिळवा या योजनेतील सहाही पुस्तके घेणे आवश्यक विश्वभाषा इंग्रजीतील दर्जेदार साहित्य मराठीत आणून मराठीला संपन्न करणारा टी बुक क्लब या बुक क्लबचे सभासद 50 रू. भरून होता येते.
या क्लब अंतर्गत दरवर्षी 6 इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले जातात. सभासद झाल्यास ही पुस्तके आपण निम्म्या किंमतीत मिळवू शकतात. या क्लब मधील पुस्तके जसजशी प्रकाशित होतील तसतशी आपणास त्यासंबंधीची माहीती कळवली जाते. ही सर्व सहाही पुस्तके घेणे आपल्यावर बंधनकारक राहील. या सहा पुस्तकांपुरती ही सभासद फी मर्यादीत राहील. या क्लब च्या सभासदांना आमच्या प्रकाशनाची इतर पुस्तके 20% सवलतीत मिळू शकतील.
|
|