* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Zombee literally means wresting. This is an account of a youth from interior Maharashtra. He fights his way through just to complete his secondary education. His landless father tilling lands for others, thinks his son`s education not only unaffordable but unwise also, He helplessly watches his mothr permanently fated to thankless labour, contineously working for an evergrowing family deep in the cluthes of customs and superstitions. He had to wrestle with hardships and hunger to complete his school education. This autobiographical novel is an authentic tale as much of the author and his family as of any of the hundreds of landless families from rural interiors.
आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हेवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच! पु. ल. देशपांडे
* प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार १९८८. * महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९. * दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स- उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९. * दे.भ.पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार पुरस्कार १९८९. * मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०. * साहित्य अकादमी पुरस्कार १९९०. * प्रवरानगर-विखेपाटील पुरस्कार १९९१ * संजीवनी साहित्य पुरस्कार ,कोपरगाव १९९४
Keywords
Customer Reviews
 • Rating StarVrushali Gawand

  मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा मी माझा एक छानसा पुस्तक अनुभव घेऊन आलीय. अथक प्रयत्नांची, जिद्दीची अशी हि कादंबरी आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे. आज तुम्हाला मी आनंद यादव यांच्या साहित्य क्षेत्ातील मानाचा "साहित्य अकादमी पुरस्कार" मिळालेल्या झोंबी या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव सांगणार आहे. यातून जे काही मला अनुभवाला आलं, मला शिकायला मिळालं ते तुम्हाला उलगडून सांगतेय तुम्हा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते, तुमचे अभिप्राय नक्की कळवा. झोंबी म्हणजे लढा, युद्ध. पुस्तक वाचल्यावर हे शीर्षक पुस्तकाला किती समर्पक आहे हे लक्षात येत, कारण आनंद यादव यांच हे पुस्तक म्हणजे सुद्धा असाच एक लढा आहे. एक विरुद्ध अनेक असा लढा. मग तो लढा त्यांनी अनेक आघाड्यांविरुद्ध लढला, परिस्थिती, जातीव्यवस्था, गरिबी, वशिलेबाजी, तर कधी स्वतःच्या माणसांविरुद्ध. खरतर माझ्यासारख्या एका शहरी वातावरणात वाढलेल्या मुलीला हे पुस्तक वाचताना सुरवातीला शंकाच वाटली होती. हे पुस्तक मला नीट समजेल का? कारण अनेकांकडून ऐकलं होत या पुस्तकातील भाषा ग्रामीण आहे, कथेचा बाज ग्रामीण आहे, आणि सगळ्यांशी माझा संबंध कधी आलाच नव्हता. पण जस जस पुस्तक वाचत गेले, तसं तसं या पुस्तकाशी एकरूप होत गेले. आणि यातच लेखकाचं सर्व यश सामावलं गेलंय. हे पुस्तक कोणत्याही थरातील वाचकांना आपलंस करत यात शंका नाही. ग्रामीण-शहरी असा भेद हे पुस्तक वाचताना आड येत नाही कि कुठेही ग्रामीण भाषा समजून घेण्याची अडचण जाणवत नाही. अगदी सहजरित्या समजून जात सर्व काही नि तितक्याच प्रकर्षानं जाणवत लेखकाचं संघर्षमय जीवन. शिक्षणपूर्तीच ध्येय असलेला लहान मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान वयातच प्रौढ बनून अनंत अडचणींना सामोरं जातो आणि याच अक्षरशः जिवंत वर्णन केलय आनंद यादव यांनी. लेखकाच्या बालमनाचं एकच स्वप्न असत शिकून कोणीतरी मोठं माणूस व्हायचं, घरची गरिबी दूर करायची. पण ते शिक्षण सुद्धा त्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही एकलव्यासारखी स्थिती असते छोट्या आनंदची, स्वतःची विद्या त्याला स्वतःलाच मिळवावी लागते, ते हि घरच्या लोकांनी कितीतरी वेळा परिस्थितीची कारण देत मागितलेली गुरुदक्षिणा देऊन. त्या काळात असलेली बालविवाहाची प्रथा, वर्णव्यवस्था, गरिबी या सर्वांविरुद्ध लेखकानं दिलेला लढा म्हणजे झोंबी. शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच झाले पाहिजे हा नियम असलेली समाजव्यवस्था, गरीब मुलांच्या शिक्षणाची नसलेली सोय, अगदी फ्रीशिप सुद्धा सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीयांना मिळावी अशी वशिल्याची पद्धत, घरची जबादारी, लहान भावंडांचा सांभाळ, शेतीची काम या सगळ्यातून वेळ मिळाला तर शाळा या सर्वांवर मात करून लेखकानं ज्या जिद्दीनं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं त्या सर्वांचं यथासांग वर्णन पुस्तकात केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरीच का झालं पाहिजे? ज्या गरिबांना फ्रीशिपची जास्त गरज आहे ती त्यांना न मिळता आर्थिक सुस्थितीत असणाऱ्यांना का मिळावी ? गरीब मुलांना केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीत, चांगले कपडेलत्ते नाहीत म्हणून शिक्षणाचा अधिकार का नाकारावा? या सारखे असंख्य प्रश्न छोट्या आनंदच्या मनात रोज उभे राहत नि परिस्थितीमुळे हतबल होऊन मिटून जात. दोन वेळच अन्न मिळायची मुश्किल असताना त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करतात. आपलं जे वय खेळण्या बागडण्याचं असत तिथे आनंद यादव यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, एकीकडे शेती करून दुसरीकडे शिक्षण पूर्ण केले. घरात वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध पाहून त्यांना मधेच एकदोनदा शाळा सोडावी देखील लागली. नाईलाजास्तव शिक्षण मधेच थांबल्यावर त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांना झालेलं दुःख यामध्येसुद्धा ते खचले नाहीत. तर झालेल्या दुःखावर मात करण्यासाठी जेव्हा ते आजूबाजूच्या लोकांशी, त्यांच्या परिस्थितीशी आणि पर्यायाने सर्व समाजव्यवस्थेशी जवळ आले तेव्हा जन्माला आला त्यांच्यातला कवी, लेखक, विचारवंत. समाजाच्या ज्या स्तरातून आनंद यादव आले होते, जी समाजरचना, जे लोक, जी कार्यप्रणाली त्यांनी पहिली होती त्या समाजव्यवस्थेचे जिवंत चित्र त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं. अगदी आहे तशाच भाषेत म्हणूनच कदाचीत ते आपल्याला जास्त जिवंत वाटत. जनमाणसात त्याच वेगळेपण उठून दिसत. अथक प्रयत्न करून आनंद यादव यांनी मॅट्रिक पूर्ण केली, नि त्यांच्या याच लढ्याची कथा म्हणजे झोंबी. हा लढा लढताना त्यांना प्रसंगी आपल्याच माणसांशी सुद्धा बंड करावं लागलं. पण त्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होते. अजाणते वयात झालेल्या त्यांच्या आई बाबांचे लग्न, संसारात मुलाबाळांची भर पडत चाललेली, कर्जबाजारी शेतमळा, भावंडांचे मृत्यू, हे सर्व त्यांनी डोळ्यादेखत पाहिलं होत नव्हे तेच आयुष्य ते जगत आले होते. त्यांना ठाऊक होत जर आज आपण शिकून मोठे झालो तर उद्या आपल्या घरची हि परिस्थिती नक्की बदलेल. म्ह्णून सर्व समाजव्यवस्थेच्या जुन्या, बुरसटलेल्या मतांना छेद देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. या पुस्तकाने आपल्याला एक अशी शिकवण दिलीय, जी आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडेल. ती म्हणजे माणसानं नेहमी ध्येयपूर्तीसाठी जगावं, आपल्या स्वप्नांसाठीं झगडावं.ती पूर्ण करण्याचे मनापासून प्रयत्न करावेत. कारण जितका मोठा संघर्ष तितकेच मोठे त्याचे यश. छोट्या आनंदचा लढा होता शिक्षणासाठी तेच त्याच ध्येय होत. आपल्यापुढे सुद्धा असंच कोणतं ना कोणतं ध्येय नक्की असेल शिक्षण, करिअर, आपलं घर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची स्वप्न वेगळी,ध्येय वेगळी पण करावा लागणारा संघर्ष मात्र सारखाच. कधी तो संघर्ष या समाजाविरुद्ध करावा लागेल, कधी परिस्थितीविरुद्ध तर कधी आपल्याच माणसांविरुद्ध देखील. पण जर आपलं ध्येय योग्य असेल तर मागे वळून न पाहता त्या लढ्यात उतरा. आयुष्याच्या त्या झोंबीसाठी सज्ज रहा. यातूनच आपल्याला आपला उज्ज्वल भविष्यकाल मिळेल. जो इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देईल. म्हणतात ना, "मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची" ........... ...Read more

 • Rating Starआशिष नेताजीराव शिंदे सरकार

  5वि 6वि ला असताना हे पुस्तक वाचलं होतं. अजून सुद्धा मनामध्ये घर करून आहे.

 • Rating StarMakarand Labade

  लहानपणात मोठ्या यातना सोसणार अप्रतिम आत्मचरित्र..hats of Anandji

 • Rating StarAshish Sawant

  झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे.. सहसा मला आत्मचरित्र वाचायला आवडत नाही. पुस्तक घेऊन आल्यावर समजले आत्मचरित्र आहे. पण पु.ल. देशपांडेंची प्रस्तावना आहे बघितल्यावर विचार केला पाच दहा पाने वाचून बघ....नाही आवडले तर परत करू. दुसऱ्याच पानावर मिळालेल्या पुरस्कारांची यादी बघून पुस्तक चांगले असणार वाटू लागले. पु.लं. ची प्रतिक्रिया जवळपास दहा बारा पाने आहे. पूर्ण वाचावी अशी वाटली नाही. ती सोडून सरळ कथेला हात घातला ...पहिली पाच दहा पाने सटासट वाचली आणि दहा बारा पानावर कथेतल्या `आंदया` चा जन्म एक सहज ओळीमध्ये झाला "मुलाचा जन्म झाला म्हणून बापासकट सगळ्याना आनंद झाला म्हणून मुलाचे नाव आनंद ठेवले आणि तो `आनंद` म्हणजे मीच" ह्या दहा बारा पानात जे लेखकाच्या जन्मा आधीचे वर्णन केले आहे.. त्यात लेखकाच्या सहज सोप्या आणि धावत्या लेखन शैलीने धम्माल उडवून दिली आहे. ह्या दहा बारा पानातच समजून गेले ह्या कादंबरी वजा आत्मकथेत दम आहे...पुस्तक बदलून घायचा विचार मनातून काढून टाकला जवळपास 380 पानाचे हे पुस्तक आनंद यादव ह्यांच्या जन्मापासून ते SSC पर्यंतच्या करकीर्दीवर घडलेला धावता घटनाक्रम आहे. ह्या कादंबरीतून आपल्याला ग्रामीण जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे, दारिद्र्याचे, माणसांच्या विविध स्वभावाचे, प्रखर गरिबी आणि दुर्गम इच्छाशक्तीचे प्रदर्शन होत राहते लेखकांचे बालपण सुस्तिथीतून अतिशय गरिबीकडे चाललेले असते...सतत शिव्या घालणारा बाप...दहा बारा बाळंतपणे काढणारी बारीकशी आई... जगलेली सात आठ रोगी भावंडे...आयुष्यभराची मेहनत...गरिबी...वर्षातून एकदाच मिळणारी अंगावर घालायची कापडे.... अस्वच्छता....आजारपण...उपासमार....आणि अतिशय कठिण परिस्थितीत सुद्धा शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा आनंदा बघून डोळ्यात पाणी उभे रहाते. जमेल तसे राबून....दिवसरात्र उपाशी राहून....बारा पंधरा तास शेतातील मेहनतीची कामे करून....शाळेतला एखादा तास हजर राहून....मोट ओढत रात्रंदिवस केलेला अभ्यास...सतत होणारी मनाची आणि शरीराची उपासमार....वडिलांचा स्वार्थी आणि अप्पलपोटेपणा....शिक्षणाला सतत होणार विरोध...काही शिक्षकांचा मिळणार आधार आणि काही शिक्षकांचा कडवा राग...आणि ह्या सगळ्या अडचणीतून तावून सुलाखून सुद्धा तालुक्यात पाहिले येणे...शाळेत पाहिला...दुसरा नंबर येणे...केवळ आणि केवळ मजबूत ईच्छाशक्ती वरच शक्य होऊ शकते. मामाशी लग्न करून दिलेल्या आपल्याच लहान बहिणीचा क्षयरोगाने झालेला मृत्यू आणि त्यानंतर मामा आणि त्यांच्या मुलावर आलेले पोरकेपण हे वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालते...मामाला बायकोची आणि त्यांच्या लहान मुलाला आईची किती गरज होती ह्याचे लेखकाने केलेलं वर्णन अप्रतिमच. ह्या टोकावर वाचकाने काही वेळ नक्की एक पॉज घेऊन ते दुःख अजमावून बघावे. पु.लं. च्या भाषेत म्हणायचे तर झोंबी म्हणजे एक बाल्य हरवलेलं बालकांड. नक्कीच वाचण्यायोग्य कलाकृती आहे...ह्याचा असर तुमच्या मनावर नक्कीच खोलवर कोरला जाईल. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

EKA SAINIKACHA MRUTYU
EKA SAINIKACHA MRUTYU by Margaret Evison Rating Star
Dr.Pramod Bankhele

हे पुस्तक मार्गारेट एव्हीसन च एकटीच नव्हे ,त्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलांच्या मातांच्या भावनांचं सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करणार आहे.या पुस्तकामुळे एक प्रश्न मात्र मनात येतोच युद्धात किंवा लष्करी कारवाई मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाचा सर्व स्तरातून दुखवटा व्यक्त केला जातो कुटुंबाला मदत ही केली जाते.आणि ते योग्य ही आहे पण लष्कराला कमीदर्जाच्या किंवा अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे जर सैनिक गमवावे लागत असतील त्यांचं काय? फार उत्तम म्हणून गौरवलेला "रंग दे बसंती" या चित्रपटात ही हाच प्रश्न उपस्थित केलाय,खर तर बुलेटप्रूफ जॅकेट्स,बर्फाळ प्रदेशात वापरण्याची साधन इत्यादी दर्जाहीन असल्यानं आपण किती सैनिक गमावले?चांगलं अन्न योग्य पुरेश्या आणि तात्काळ उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था जर सैनिकांना मिळत नसतील तर वीर गती प्राप्त झालेल्या सैनिकांना पुष्पचक्र वाहताना यांचे हात कसे थरथरत नाहीत?संरक्षणासारख्या गोष्टीतील त्रुटी दाखवणं म्हणजे देशद्रोही ठरवलं जाण असली भिकार मानसिकता जिथे असेल तिथं बोलायचं तरी कुणी? सामान्यांच्या करावर संरक्षणाच्या नावाखाली देश लुटणार्यांना शाहिद झालेल्या सैनिकांच्या नाव घेताना लाज ही वाटत नाही.म्हणून म्हणतो हे पुस्तक फक्त मार्गारेट च नाही ते जगातील सर्व सैनिकांच्या मातांच ,कुटुंबीयांच आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी युद्धखोरी करणाऱ्या मुळे त्रासलेल्या सगळ्या बाधितांच आहे. ...Read more

NOT WITHOUT MY DAUGHTER
NOT WITHOUT MY DAUGHTER by Betty Mahmoody Rating Star
Atul Pahurkar‎

अनेक दिवसा पासून हे पुस्तक वाचायचे होते . शेवटी एकदाचे वाचून काढले काही तासातच . लव जिहाद किती घातक आहे याचे वर्णन करणारे एकमेव मराठी पुस्तक आहे . सर्व तरुण महिलांनी नक्की वाचायला पाहिजेत. या कादंबरीतील लेखिका अश्या माणसावर प्रेम करते जो हुशार , देखा , आणि चांगला कमावता आहे . त्यालाच ती सर्व समजते . पण पुढे ती खूप मोठ्या संकटात सापडते . तिचा प्रियकर हा जरी शरीराने अमिरीकेत राहत असला तरी मनाने तो इराणी होता.प्रेम आंधळं असते , ती त्याच्या सोबत लग्न करते. तो तिला पुढे गळ घालतो , " इराणला मायदेशी चल काही दिवसासाठी आपण परत येऊयात, इराण खूप सुंदर जागा आहे , तुला नवीन देश पाहायला नक्की आवडेल". पण ही तशी एक चाल असते तो तिला फसवतो आणि तिला इराणला आणतो. तिकडचे गरम वातावरण आणि रूढी आणि परंपरा तिला आवडत नाही . ती परत जायचं बोलते पण तिचा पती तिला कानाखाली मारतो आणि बोलतो "तू कुठे जाणार नाही इकडेच या देशात आयुष्यभर राहणार". इराण हा पुरुषप्रधान देश आहे . स्त्रियांच या देशात कोणी ऐकत नाही . ती कश्या प्रकारे इराण मधून पळ काढते . तिला काही चांगले लोक भेटत जे तिला आणि तिच्या मुलीला या नारकातून बाहेर पडण्यास मदत करतात . खूप रोमांचित आणि अंगावर काटा आणणारी की कादंबरी आहे . ही कादंबरी वाचून जिद्द असली की आपण काय नाही ते करू शकतो याचे जिवंत उदाहरण समजते . हे पुस्तक वाचून, आपला देश हा इतर देशा पेक्षा किती चांगला आहे याची जाणीव झाली. तसेच लव जिहाद किती घातक आहे याची कल्पना आली. पुस्तक वाचून जेवढं motivation भेटले तेवढे कधी भेटले नाही. भारताला जे लोक असुरक्षित देश बोलतात त्यांनी ही कादंबरी वाचायला हवी . ...Read more