* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZATPAT VYAKTIMATVAVIKAS : SWAPARIVARTANACHE NAVIN TANTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667936
  • Edition : 7
  • Publishing Year : MAY 2007
  • Weight : 110.00 gms
  • Pages : 68
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERYONE LIKES TO BE A WINNER IN THIS COMPETITIVE WORLD. PEOPLE WANT NAME, FAME, MONEY OR SUCCESS QUICKLY. EVERYONE IS IN A HURRY. EVERYONE WANTS IT INSTANTLY. FOR ACHIEVING SUCCESS, ONE IS REQUIRED TO ACQUIRE NEW SKILLS & HABITS. MANY PEOPLE DO NOT KNOW ABOUT NEW SKILLS AND HABITS. THEY SHOULD KNOW THAT. NOONE HAS PATIENCE TO LEARN THESE NEW SKILLS. EACH ONE WANTS IT INSTANTLY. THIS BOOK WILL HELP YOU DISCOVER NEW SKILLS & HABITS WHICH ARE REQUIRED FOR SUCCESS INSTANTLY & LEARN THEM INSTANTLY.
आजचा जमाना हा ‘इन्स्टन्ट’चा जमाना आहे. येथे सर्व काही, अगदी यशसुद्धा इन्स्टन्ट हवे आहे. म्हणजेच झटपट हवे आहे; पण ते तसे मिळत नाही. कारण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आणि इथे कोणालाही थांबायला वेळ नाही. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावेत व कसे करावेत हेही कित्येकांना माहीत नाही. हे बदलही आपल्याला झटपट हवे असतात. ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-08-2007

    व्यक्तिमत्व परिवर्तनासाठी तीन दिवस... तीन दिवसात आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो असे कोणी म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु तसे करणे शक्य आहे अशी खात्री ‘झटपट व्यक्तिमत्त्व विकास’ हे छोटेखानी पुस्तक वाचून होऊ शकेल. स्वपिवर्तनाचे त्यात एक नवीन तंत्र (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग) विशद करून सांगण्यात आले आहे. आपल्या मराठी माणसाचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा असल्याचा अभिनिवेश जगजाहीर आहे. त्यामुळे स्वत:ला बदलायला आपण तयार नसतो. समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहे– असेल हरी तर देईल खाटल्यावरी. कुणीतरी आयते सगळे आणून देईल. आता या आपल्या लाडक्या गृहीतकृत्यांना घट्ट कवटाळून बसायचे, की ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ हे वास्तव लक्षात घेऊन परिस्थितीशी सामना देण्याएवढी लवचिकता दाखवायची, परिवर्तनाची तयारी ठेवायची असा विचार करायला हवा की नाही? तुम्ही लवचिक आहात, बदलायला तयार आहात, नव्या स्पर्धेच्या वातावरणात प्रगतीच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून दैदीप्यमान यश मिळवण्यास उत्सुक आहात असे तुम्हाला वाटत असेल तर झटपट व्यक्तिमत्त्व विकास हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकेल. या नव्या युगातल्या स्पर्धात्मक वातावरणात आपल्या अंगी असणाऱ्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून ऐहिक विकासाचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. संन्यस्त जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून आपल्या वृत्तीप्रवृत्तींना दडपून ठेवण्यात अर्थ नाही. इंग्लंड-अमेरिकेत न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एन. एल. पी.) म्हणून परिवर्तनाची एक प्रणाली विकसित केली गेली आहे. त्यामुळे न्यूनगंडाने पछाडलेल्या, नैराश्याने हैराण झालेल्या, काळलीने पोखरलेल्या व्यक्तीमध्ये उत्साह चैतन्याचा तसेच आत्मविश्वास, ध्येयाचा ध्यास, इच्छाशक्ती यांचा झरा खळाळू लागतो असा अनेकांचा अनुभव आहे. आपला मेंदू हा एक महा संगणक आहे. आपल्या इंच्छेप्रमाणे आपल्या भावना, विचार आणि कृती यात बदल होत राहतात. आपल्या सवयीही बदलत असतात. आपण स्वत: सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून नेहमी उच्च प्रतीची कामगिरी करू शकतो. आपल्या मज्जासंस्थेद्वारे मेंदूकडे ज्ञानेंद्रियांद्वारे गोळा होणारी सर्व माहिती पोहोचविण्याची प्रक्रिया अहोरात्र चालू असते. या प्रक्रियेची विशिष्ट भाषा असते. या भाषेद्वारे मेंदूला सूचना मिळतात. त्या सूचनांच्या संदर्भात मेंदू निर्णय घेतो. ते निर्णय आपण कृतीत उतरवतो. या प्रक्रियेत सूचनांची भाषा हा महत्त्वाचा घटक असतो. भाषा ही वेगवेगळी भाव व्यक्त करते. भाषा वाकवता येते. एकच विचार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट करता येतात. भाषा वाकली की सूचनांचे अर्थ बदलतात. सूचना बदलल्या म्हणजे मेंदूचे निर्णयही बदलतात. आपल्या कृतीतही त्यामुळे बदल होतो. आपण सूचनांसाठी या शब्दयोजना करतो त्यामुळे मेंदू गोंधळात पडतो. मेंदूला नकारात्मक भाषा कळत नाही. त्यासाठी सकारात्मक कृती घडवून आणतील. चित्त स्थिर ठेव, हसतमुख रहा, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना लक्ष ठेव. फुप्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेव... यासारख्या सकारात्मक भाषेचे-कल्पनाचित्र रंगवत राहिले तर त्याच्याशी मिळवून घेणे मेंदूला सोपे जाते. तशी सूचना मेंदू देतो. त्याप्रमाणे कृतीला आपण प्रवृत्त होतो. कल्पनाचित्राशी जुळवून घेण्याचा मानसिक सराव केला तर होणारी कृतीही सफाईदार होते. उपजत कौशल्य असल्यासारखी ती वृत्ती आपल्यालाही उभारी देते. हे सूत्र लक्षात ठेवले तर तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येईल आणि हे शास्त्र वापरून तीन दिवसात आपणास आत्मपरिवर्तन साध्य होऊ शकेल. पहिला दिवस : न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगचा आरंभ करताना आपल्याजवळ काय आहे, आपल्याजवळ काय नाही, आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय नको आहे याची नोंद करायची आहे. डावीकडे आवडत्या गोष्टी लिहा. उजवीकडे नावडत्या, नको असलेल्या गोष्टी लिहा. त्याच्यापुढे आपल्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्यांची नोंद करा. ज्या नाहीत त्यांची नोंद करा. नावडणाऱ्या गोष्टींबाबतही अशीच नोंद करा. दुसरा दिवस : आपल्याकडील टाकाऊ गोष्टींचे रुपांतर आपल्याला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये कसे करायचे हे दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासाचे मध्यवर्ती सूत्र आहे. उदा. धूम्रपान आणि मदिरापान या गोष्टी ठाऊक वाटत असतील तर सुदृढ आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व हे रुपांतर हवेसे वाटेल. त्यासाठी धूम्रपान व मद्यपान यापासून दूर रहायला हवे. (डिस-असोसिएट). त्यामुळे जी उत्तेजना मिळत असे किंवा रंजन होत असे, ते अन्य मार्गाने आवडत्या गोष्टींद्वारे मिळवायचे आहे. (असोसिएट व्हा.) तिसरा दिवस : स्वत:भोवती ऊर्जेचे वर्तुळ तयार करण्यासाठी प्रयोग करणे. पुस्तकात या प्रयोगाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या प्रयोगात पाच टप्पे आहेत. स्वत:ला नवीन सवय लावण्यासाठी प्रचंड मानसिक बळ लागते. त्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. सवय अंगवळणी पडली की ऊर्जा जास्त लागत नाही. चांगल्या सवयी लावण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या सवयी या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीसारख्या असतात. बदल आवश्यक असतो तेव्हा झटपट बदलण्याची वृत्ती बाणवा. बदल नको असेल तर बदलण्याएवढा ठामपणाही ठेवा. आपल्या नकारात्मक विचार-वृत्तींना सकारात्मक वळण देण्याचे काम केवळ आपल्या योग्य भाषेद्वारे मेंदूला सूचना देऊन होऊ शकते, या कल्पनेचा शास्त्रीय पातळीवर पाठपुरावा करून, तिचा प्रभावीपणा अजमावण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमचे हे तंत्र आपल्यालाही उपयुक्त करू शकेल. अवघ्या साठ पृष्ठांमध्ये हे सर्व तंत्र विशद केलेले आहे. त्यामुळे ते आत्मसात करण्याला आणखीनच सुलभ ठरेल. झटपट व्यक्तिमत्व विकास ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book