* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YA SUKHANO
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664621
  • Edition : 5
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 375.00 gms
  • Pages : 256
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HUMAN LIFE IS FULL OF VARIOUS FEELINGS LIKE LOVE, HATRED, HAPPINESS, SORROW, JEALOUSY, CRITICISM, PRAISE, DEFORMITIES, INTELLIGENCE, BEAUTY AND SO MANY OTHER THINGS. THE ARTICLES IN THIS BOOK MAINLY REVEAL THE FACTS AND FACTORS BEHIND THESE WHILE THEY ALSO DISCUSS THE BASIC PRINCIPLES OF LIFE, THE ORIGINAL ATTITUDES, THE MENTALITY, AND ALSO THE DIRECTIONS OF LIFE. HE USES SIMPLE INCIDENTS AND EVENTS OF LIFE TO REVEAL THIS. THESE ARTICLES REVEAL THE MATURED, BALANCED, SENSITIVE, YOUNG MIND SEARCHING THE ACHILLES HILL OF LIFE; AND REFLECT UPON HIS ATTRACTIVE PERSONALITY. EACH ARTICLE IS A SHORT ONE, YET IT HAS THE CAPACITY TO CAPTIVATE THE MINDS READING IT, COMPELLING THEM TO THINK. HIS SUCCESS AT THE VERY FIRST ATTEMPT IS ASTONISHING. ANAND YADAV.
मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती, बुद्धीचे स्थान, सौंदर्याचे मर्म, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती-प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत-उपमादी अलंकाराच्या, घटना-प्रसंगांच्या माध्यमातून आविष्कृत केलेले आहेत. लेखकाचे एक प्रौढ, संतुलित, संवेदनशील, सर्वागांनी जीवनाचे मर्म शोधणारे चिरतरुण मन आणि आकर्षक, मोहक व्यक्तिमत्व या लेखांतून व्यक्त होते. अतिशय छोटेखानी स्वरूपाचे हे लेख मनाचा ठाव घेणारे, त्याला गुंगवून टाकणारे, पदोपदी वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहेत. पहिल्याच पुस्तकाचे त्यांचे हे यश विलक्षण वेधक ठरावे, अशा योग्यतेचे आहे. - आनंद यादव
स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार २००५ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #YASUKHANO #YASUKHANO #यासुखांनो #ESSAYSMARATHI #SURESHVASANTNAIK "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVA KAL 10-12-2007

    ‘सुखी कसे व्हाल? आपला मार्ग! या सुखांनो... मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित व सुरेश वसंत नाईक लिखित ‘या सुखांनो...’ हे पुस्तक मानवाला जगण्याची नवसंजीवनी देणारे आहे. सध्याचा जमानामानव संसाधनाचा विकास (Human Resource Development) तसेच मानवी संबंधाचा (Huan Relationship) आहे. याबाबत पाश्चिमात्त्य व जपानीच संस्कृतीवर आधारित निरनिराळी पुस्तके, प्रशिक्षिण व शिबिरे भारतात घेतली जातात. निरनिराळ्या उद्योगांत कामगारांपासून उच्चवर्गीय अधिकाऱ्यांपर्यंत परदेशी संस्कृतीतील विचार पोहोचण्याचा आटापिटा चालतो. निरनिराळ्या पंचतारांकित हॉटेल तसेच हिलस्टेशनला याबाबत कार्यक्रम घेतले जातात. याचीच फलश्रुती म्हणजे दिवसरात्री उद्योगाठिकाणी काम करून उत्पादनवाढ भरमसाठी पगारवाढ पण प्रत्यक्षात कामगार व अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत जीवनात दूरदर्शनवरील निरनिराळ्या मालिकात दाखवले जाणारे नात्यातील ताणतणाव्, जीवनातील एकाकीपणा, वाढत जाणारी वैफल्यभावना व एकमेकांतील जीवघेणी जीवनस्पर्धा बहुतेक प्रमाणात येतात. आईवडील मग विभक्त कुटुंबपद्धती अनुसरून आपल्या मुलांना पण जीवघेण्या स्पर्धांमध्ये उतरवतात. अशा वेळी मानवी जीवनातील आश्वासक जीवनमूल्ये देणारे कोणी हवे असते. मानवी जीवनातील आनंद, सुरक्षितपणाची घट्ट भावना, श्रद्धा, भक्ती, विवेक इत्यादी बाबत सुसंस्कार माणसाला हवे वाटतात. खरे तर मानवी जीवनाला फक्त पैसा नको असतो. हवे असते ते जीवनाचे सौंदर्य, निखळ आनंद, सुहास्य, रोजच्या दैनंदिन कामकाजात निर्लेप विनोदाच्या साहाय्याने विचारांचे प्रदूषण टाळून सुख आपल्या दारात आणायचे आहे ते आपल्याला सांगितले आहे. वेदपुराणात संत साहित्यातील उदाहरणे आणि विचार जे ज्ञान या पुस्तकातून त्यांनी इतरांसाठी परावर्तित केले आहे ते त्यांनी वेद, पुराण, भारतीय संस्कृती व भारतीय संत साहित्य यातून प्रामुख्याने घेतले आहे. काही ठिकाणी परदेशी उदाहरणे आली आहेत. पण तीही सर्वसामान्य लोकांना सहज समजतील अशीच. इंग्रजी भाषेतील अवतरणे आली तेथे त्यांनी त्यांचे सुलभ मराठी भाषांतर दिलेले आहे. हे सर्व इतके अचूक व आपुलकीने केले आहे की वाटते, आपला कोणी हितचिंतक मित्र, सहृदय, नातेवाईक किंवा वाडवडील आपल्याशी हितगुज करत आहे. ‘या सुखांनो’ पुस्तकात सुखाचे जे मंत्र दिले आहेत ते आचरणास पण सोपे आहेत काही ठिकाणी लेखकाने आपल्या मनातील जुनी जळमट काढावयास लावलेली आहेत हे इतक्या सहजतेने करावयास लावले आहे की कधी आपण सुधाराणापथावर आलो हेच आपणाला कळत नाही. सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांनी ‘या सुखांनो’ हे पुस्तकपुरस्कृत करताना लिहिले आहे की, ‘मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती, बुद्धिचे स्थान, सौंदर्याचे मम्र, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती-प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत उपमादी अलंकाराच्या घटना-प्रसंगाच्या माध्यमातून अविष्कृत केलेले आहेत.’ अनुभवातून जन्मलेले सकस विचार ‘या सुखांनो’ पुस्तकाचे लेखक प्रस्तावनेत म्हणतात की, ‘‘तैतरीय उपनिषद वाचताना प्राचीन ऋषींनी या जीवनाचे अत्यंत मौलिक रहस्य लोकांपुढे उकलून सांगितलेले दिसते ही शिकवणूक म्हणजे मंत्रच आहेत. ‘मननात त्रायते इति मंत्र:।’ त्या विचाराला मंत्र असे म्हातात. हे मंत्र किंवा विचार त्यांना निव्वळ कवि कल्पनेतून किंवा प्रतिभेतून सुचलेले नाहीत. तर अनेक वर्षे जीवनाचे विचारमंथन केल्यावर (तप केल्यानंतर) त्यांनी अनुभूतीचा कस लावूनच हे विचार स्वीकारले आहेत. त्या सू़क्ष्म चिंतनातूनच त्यांना गवसलेले हे जीवनरहस्य समाजापुढे ठेवले. त्या ऋषींच्या मते आनंद हा जीवनाचा रस आहे. या आनंदरसाशिवाय जगो हे अत्यंत निरस होय. त्यांना आढळले की, हा आनंद सर्व चांगल्या कृतीतून (सुकृतातून) निर्माण होतो. या उपनिषदाच्या त्यांच्या अनुभवान्ती हा आनंद त्यांना मनुष्याच्या हृदयात आढळला (त्यालाच त्यांनी ईश्वर असे म्हटले आहे.)’’ भीती, राग, चिंता, निराशा दूर सास! अतिशय उद्बोधक अशा या पुस्तकात मानवी मन त्याचे विकार उदाहरणार्थ अढी, निंदा, भीती, राग, चिंता, निराशा व मत्सर यावर प्रत्येकी स्वतंत्र लेख आहे. प्रत्येक लेख आपल्याला विचार करावयास लावणारा आहे. हे विकार विषय मनात कसे येतात. कसे असतात, कसे मनात घर करून बसतात, व कसे अपायकारक असतात याची सांगोपांग सोपी माहिती उदाहरणे देऊन दिली आहे. हे विकारविषय मनातून कसे काढून टाकायचे याबाबत आपल्याशी विचारविनिमय केला आहे. हे सर्व वाचल्यावर आपण आपल्या मनाचा स्वत:ला मानसोपचारतज्ञ बनून सर्व सकारात्मकम तसेच नकारात्मक बाजू तपासून समस्याच्या गाभ्यापर्यंत जातो. हळूहळू आपणात आपले विचार सकारात्मक बदलण्याची शक्ती येत जाते. चांगले विचार, चांगली कृत्ये हळूहळू आपल्या मनाला व आपल्याला सुरक्षित व शांत शांत बनवत जातात. खरंच हे सर्व विलक्षण आहे. याची अनुभूती घेण्यासाठी ‘या सुखांनो’ वाचावेच. अवतरणांचा खजिना अनेक ठिकाणी मराठी कवितेच्या ओळी, हिंदी दोहे उद्बोधित केलेले आहे. गीतरामायण, भगवद् गीता, शेक्सपियरची नाटके यांचे यांचे संदर्भ दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर तुकोबारायापासून समर्थ रामदास स्वामीपर्यंतच्या संत साहित्यातील वचने जागोजागी दिलेली आहेत. पतंजली योगसूत्रापासून भाऊसाहेब पाटणकरांपर्यंतच्या साहित्यातील समर्पक विचारांची अवतरणे लेखात जागोजागी दिलेली आहेत. आनंदयात्रा, सुख आले माझ्या दारी, सखे सोबती, कृतज्ञ मी, कृतार्थ मी, जे होते ते भल्यासाठीच, सुखा सखा विनोद यासारख्या अनेक लेखातून जीवनाची सकारात्मक बाजू दाखवून लेखकाने जीवनाची ती आपल्या वाचकांच्यात परावर्तीत केलेली आहे. खरंच पुस्तक एकदा वाचून समाधान होत नाही. ज्या ज्या वेळी आयुष्यात निराशा, पराभव, ताणतणाव यासारख्या समस्या ‘या सुखांनो’ पुस्तकाचे वाचन केल्यास आपल्या जीवनात आलेले मळभ, निराशेचे ढग जीवन आनंदरूपी वाऱ्याबरोबर नाहिसे होतील यात शंकाच नाही. हे पुस्तक हे नुसते लेखकांची हितगुज नसून प्राचीन भारतीय संस्कृती, जीवनमूल्ये व जीवनरस याबरोबर हितगुज आहे. आपण जीवन जगावे म्हणून अनेक गोष्टी करतो मग हे ‘सर्वात्मक सर्वेश्वर’ करुणाकरांकडे नेणारे पुस्तकही प्रत्येकाने वाचावे. -पंकज पंडीत कुलकर्णी ...Read more

  • Rating Starज. अ. पाटील

    सर्वप्रथम आपण मला ‘या सुखांनो’ हे आपले पुस्तक सप्रेम भेट दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. या पुस्तकातील सर्व लघुनिबंध मी वाचलं. अतिशय आवडले. मी आपले अभिनंदन करतो. आपले लेख मला लघुनिबंधाच्या धाटणीचे वाटले. ते वाचल्यावर मला ‘जुनी पुस्तके’, ‘वाट चुकल्याा आनंद’ या सारखे लघुनिबंध लिहिणारे प्रा. ना. सी. फडके आणि‘अज्ञानाचा आनंद’, ‘दोन मेणबत्त्या’ यासारखे लघुनिबंध लिहिणारे प्रा. काणेकर यांची आठवण झाली. आपली लेखन शैली आणि निवेदन पद्धती या मातब्बर लेखकांच्या तोडीची आहे. त्यात भाषा सौंदर्य तर आहेच आणि सहजता व ओघही आहे. पुस्तकातील लेख रोजच्या जीवनाशी परिचित आहेत. म्हणून ते सामान्य वाचकाला वाचावेसे वाटतात. अल्पावधीतच या पुस्तकाचे दोनदा पुनर्मुद्रण झाले. ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. सर्व लेखातून आपला बहुश्रुतपणा जाणवत आपल्या विचारांना तात्विक आणि आध्यात्मिक बैठक आहे. पुस्तकात आख्यायिका आणि दंतकथांची सुंदर पखरण आहे. त्यामुळे ते बोधपद असुनही रंजक झाले आहे. ‘या सुखांनो’ हे केवळ पुस्तकच नाही, तर ती सुखाची किल्ली पण आहे. ही गुरुकिल्ली सर्वांनी बाळगावी असे मना मनोमन वाटते. असेच लेखनकार्य चालू ठेवावे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. ...Read more

  • Rating Starशांता मरगूर, सोलापूर

    माझी मुलगी सौ. अनुप्रिता महेश अंदेली हिच्याकडून `या सुखांनो` हे पुस्तक वाचायला मिळाले. बघताच मी मुखपृष्ठाच्या मोहात पडले. हिरव्या गर्द झाडाला उलटा लटकलेला खोपा आणि पिलांच्या सुखासाठी आटापिटा करणारी सुगरण पाहून त्या जगन्नियंत्याचे स्मरण झाले. पुस्तकातल प्रत्येक लेख लेखकाच्या विचारवैभवाची साक्ष देतो. सुखी जीवन कोणाला नको आहे? सगळेच सुखाची अपेक्षा करतात़ परंतु कोणत्या मार्गाने गेल्यास शाश्वत सुख मिळेल याची निश्चित पाऊलवाट मिळते. सुखाच्या कल्पनेमागे चाचपडत असणाऱ्या वाचकाला हमरस्ता सापडतो. तो सुखाच्या लक्षदिव्यांनी उजळलेला असतो. प्रत्येक लेखात जीवनाचे मर्म शोधून ते लालित्यपूर्ण शैलीत मांडले आहेत. वाचकांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी लेखकाची आंतरिक तगमग दिसून येते. सर्वच लेख मनाला भावतात. त्यातल्या त्यात सबुरी, राग मनाची आग, सुखाचा सखा विवेक, कामाची किमया, विसर्जन - सगळेच लेख अंतर्मुख करणारे आहेत. ...Read more

  • Rating StarSAHITYA SUCHI - SEPT 2004

    आत्ताची पिढी ही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विषयी अधिकच ‘सजग’ झालेली आढळते. आणि ते योग्यही आहेच. या पिढीची ही मानसिकता लक्षात घेऊन अनेक लेखकांनी त्यांना मार्गदर्शक ठरणारी पुस्तके लिहिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ‘यश तुमच्या हातात’ ‘व्यक्तिमत्त्वाचा विकस’ किंवा ‘यशस्वी जीवनाची वाटचाल’ वगैरे अशी पुस्तके खरोखरीच फार चांगले मार्गदर्शन करतात. तसेच हे ‘या सुखांनो’ हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य सांगता येईल की, सहजसुलभ शैलीतल्या या पुस्तकात जे दुष्टान्त किंवा दाखले दिलेले आहेत. ते पुराणकाळातील तर आहेतच पण अगदी वर्तमानकालीनही आणि त्यामुळे पुस्तक वाचताना हे ‘आपलं’ आपल्यासाठी आहे हे वाटत राहतं. लेखकाने अत्यंत संयमित, संतुलितपणे लेखन केलेले आहेच. पण ते वाचताना, लेखकाचे माहितीपूर्ण वाचनही वाचकाच्या लक्षात येते. आपल्या संग्रही हवेच असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य सांगता येईल की, सहजसुलभ शैलीतल्या या पुस्तकात जे दृष्टान्त किंवा दाखले दिलेले आहेत ते पुराणकाळातील तर आहेतच पण अगदी वर्तमानकालीनही आहेत आणि त्यामुळे पुस्तक वाचताना ते ‘आपलं’ आपल्यासाठी आहे हे वाटत राहतं. लेखकाने अत्यंत संयमित, संतुलितपणे लेखन केलेले आहेच. पण ते वाचताना, लेखकाचे माहितीपूर्ण वाचकाच्या लक्षात येते. आपल्या संग्रही हवेच असे हे पुस्तक आहे. नवीन पिढीने कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ या पुस्तकातून मिळत जातो. त्याप्रमाणे जुन्या पिढीनेही कसं वागावं याबद्दलचं चिंतनही यात केलेलं आहे. ‘पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेची जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगेल’ हे पुलचं भाष्य अधिक बोलकं करून सांगणारं हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more