* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHADOWS IN CAGES
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668681
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 238
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE STORIES ARE TOTALLY DIFFERENT THAN WHAT WE READ USUALLY. THESE ARE THE STORIES OF MOTHERS AND THEIR OFFSPRINGS, WHICH ARE IMPRISONED. THESE ARE THE STORIES OF THEIR ANGUISH AND THEIR AGONIES. THE AUTHOR HAS PERSONALLY VISITED MANY OF THE JAILS IN INDIA. HE HAS INTERVIEWED THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN. THE INTERVIEWS WITH THE JAIL OFFICERS, SOCIAL WORKERS AND THE ADVOCATES ARE ALSO VERY THRILLING. THIS BOOK BRINGS THE CLEAR PICTURE OF THE JAIL WITH ITS CONDITIONS, ITS INSECURITY, THE EFFORTS OF THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN, THEIR HAPPINESS, THEIR SORROWS, THEIR DREAMS, EVERYTHING THAT A NORMAL HUMAN MIND FEELS. THE AUTHOR TOUCHES HIS WRITING WITH A MILD HUMOUR IN BETWEEN, WITH A GENUINE CONCERN FOR THEM. THIS JOURNEY TO THE DEEP CORES OF THE PRISON WILL SURELY BRING TEARS IN OUR EYES AND SOFT FEELINGS IN THE CORE OF OUR HEART.
तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TURUNGATILSAVLYA #SHADOWSINCAGES #तुरुंगातीलसावल्या #LITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #RUZBEHBHARUCHA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) APRIL 2007

    कोवळ्या ‘सावल्या’चे अंतरंग… सामान्यत: ‘कैदी स्त्री’ म्हटली की, आपल्या डोळ्यांपुढं उभी राहते ती एखादी ‘दुष्ट प्रवृत्तीची स्त्री’! अनेकांना वाटते की, अशा स्त्रियांची जागा ही तुरूंगातच असायला हवी. त्यांच्याविषयी विचार करण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? विनाारण वृथा वेळ तरी का रखडायचा? मात्र, या कैदेत असलेल्या स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या बळी ठरलेल्या असतात. ‘तुरूंगातील सावल्या’ हे रुझबेह भरुचा यांच्या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘मराठी अनुवादित’ पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तर नक्कीच प्रत्येकाला आपणही त्यांच्यासाठी काही करावं... अशी इच्छा होईल. वाचकाला अंर्तबाह्य हेलावून टाकणाऱ्या अशा संवेदनाक्षम शैलीत त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. तुरुंगातील कैदी माता आणि त्यांच्या येथे केले आहे. ‘माता’ व ‘मूल’ यांना नेहमीच प्रेम, करूणेचे प्रतीक मानलं गेलं आहे. माता आपल्या बाळासाठी कितीही मोठा त्याग करू शकते. तिला सदैव आपले बाळ आपल्या जवळचं असावे, असे वाटते. कारण तो तिच्या हाडा-मांसाचा अंश असते. त्याच्यापासून दुरावा ती कधीही ही सहन करू शकत नाही. तिच्या जगण्याचा उद्देशच मुळातच तिचं ते ‘अस्तित्व’ असतं. मात्र, ही अवस्था कैदी मातांच्या अंगावर बेतते, तेव्हा तिच्या मनावर किती मोठा घाला पडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा! कायद्याने पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला आपल्या मातेबरोबर तुरूंगात राहण्याचा अधिकार आहे. या दरम्यान ते सतत आईभोवती राहते. मात्र, पाच वर्षांनंतर त्याला अचानक दूर ठेवण्यात येते. ‘पाच वर्षे सतत सावलीसारखे असणारे ते मूल अचानक एक दिवस तिला सोडून जाणार...’ या विचाराने तिच्या मनाची काय अवस्था होते? त्याचे अत्यंत हृदय हेलवणारे वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. कैदी मातांच्या या मन:स्थितीचे अनुभव टिपण्यासाठी त्यांनी अनेक तुरूंगांना भेटी दिल्या. नियतीच्या हातातलं बाहुलं बनून राहिलेल्या या मुलांचा सांभाळ करणाऱ्या उत्तम दर्जाच्या, विश्वसनीय अशा संस्था आपल्याकडे फारशा उपलब्ध नाहीत. या मुलांच्या ‘आर्त हका’ अजून कोणाच्या कानांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. कदाचित त्या खूप क्षीण आहेत, म्हणून त्या कुणाला ऐकूही येत नाहीत, असे लेखकाने येथे दाखवून दिले आहे. रूझबेह भरूचा यांनी येरवडा (महाराष्ट्र), तिहार (दिल्ली), गुरगाव-जेल (हरियाणा), श्रीनगर (सेंट्रल जेल) (जम्मू व काश्मीर) आदी तुरूंगाना भेटी दिल्या. समाजाच्या नजरेपासून दूर असलेल्या या वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्णन त्यांनी केलेले हे वर्णन त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. ज्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत, अशांनाही जागं करून कार्यप्रवृत्त करण्याची ताकद या पुस्तकात आहे. महिलांच्या समस्या तर यात आहेतच, शिवाय अनेक ठिकाणी पंखा, स्वच्छता, स्वच्छतागृहे, तरूंगातील गर्दी या समस्याही त्यांनी येथे स्पष्ट केल्या आहेत. अशा परिस्थितीत राहिल्यानं कैदी सुधारण्याऐवजी त्यांची मने रागानं, संतापानं आणि तिरस्कारानं व्यापली असतील. त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन अधिकच नकारात्मक बनणार आहे. कदाचित हे कैदी पूर्वीपेक्षाही अधिक निर्ढावलेले होऊन बाहेर पडतील, अशी लेखकाला भीती वाटते आणि ते खरेही आहे. तसेच लहान-लहान बालकांच्या मनावर आपल्या आईला कोंडून ठेवल्याने काय परिणाम होत असेल, याचेही वर्णन यात केले आहे. कारण अशा मुलांना वकिलांची व न्यायाधीशांची नावे, कोर्टच्या तारखा व तपशील अगदी तोंडपाठ असतो. या गोष्टी त्यांच्या गप्पातून दिसतात; त्याही पुढे जाऊन, कोर्टात हजेरी लावणे हेही त्यांना माहीत असते. आपल्या आईने केलेला गुन्हा ते रंगवून सांगतात. याबाबतीत ‘इंडिया व्हिजन फाउंडेशन’ या सारख्या संस्था तुरूंगात आईबरोबर राहणाऱ्या मुलांसाठी चांगल्या तऱ्हेनं काम पाहात आहे. यासारख्या इतर संस्थांनाही या कामी मदतीची अपेक्षा आहे. मातेच्या उदरात बाळाचा जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी त्याला आईच्या प्रेमाची व वात्सल्याची गरज असते. या कोवळ्या जीवांना आई नावाच्या सावलीचा आधार हवा आहे. किंबहुना तो त्याचा मूलभूत हक्क आहे. त्या मातेला तुरूंगवासाची शिक्षा झाली तरी त्या मुलाची वाढकोणत्याही परिस्थितीत खुंटता कामा नये. लहान मुलालाही एक माणूस म्हणून ‘मुल्य’ आहे. घटनेने दिलेले अधिकार त्याला मिळायला हवेत. त्याची आई जेलमध्ये आहे हे त्याचं दुर्भाग्य; हे लक्षात घेऊन ते अधिकार त्या मुलाला मिळाले पाहिजेत, हाच लेखकाचा या लिखाणाचा मागचा हेतू येथे स्पष्ट दिसून येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more