* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE WHITE TIGER
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788184980257
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 288
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NARRATED BY BALRAM, A SELF-STYLED "ENTREPRENEUR" WHO HAS MURDERED HIS EMPLOYER, THE BOOK FOLLOWS HIS PROGRESS FROM CHILD LABOURER, VIA HUMILIATION AS A SERVANT AND DRIVER, TO A MYSTERIOUS NEW LIFE IN BANGALORE. BALRAM HIMSELF IS AN ENTICING FIGURE, WHOSE REASONS FOR MURDER BECOME COMPLETELY UNDERSTANDABLE BY THE END, BUT EVEN MORE IMPRESSIVE IS THE NITTY-GRITTY OF INDIAN LIFE THAT ADIGA UNEARTHS: THE CORRUPTION, THE CLASS SYSTEM, THE SHEER PETTY VICIOUSNESS.
बलराम हलवाई, - ’द व्हाईट टायगर’ भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणार्‍याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला! अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट अनुवादासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार २०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEWHITETIGER #THEWHITETIGER #दव्हाईटटायगर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #ARAVINDADIGA "
Customer Reviews
  • Rating Starदैनिक ऐक्य, सातारा, रविवार २६-४-२००९

    पूर्वीच्या काळी भारतात हजारो जाती आणि तेवढीच नशिबं होती; पण आजकाल मात्र फक्त दोनच जाती आहेत- मोठ्या पोटाची माणसं आणि लहान, खंगलेल्या पोटाची माणसं. आणि नशिबं पण दोनच- एक तर कुणालातरी खायचं, नाहीतर कुणाचा तरी घास व्हायचं.

  • Rating Starप्रभात, १०-५-२००९

    एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना ‘बलराम’ला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतीच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात, तरीही त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं, याची हृदयंगम कहाणी.

  • Rating Starमोहसीन हमीद , द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट`चे लेखक

    जबरदस्त ताकदीचे, संतप्त आणि उपरोधाची धार असलेले हे लेखन... द व्हाईट टायगर. खरं तर ही कादंबरी म्हणजे एक प्रवास आहे, वाचकाला आधुनिक भारताकडे घेऊन जाणारा प्रवास... श्री. अरिंवद अडिगा या असामान्य प्रतिभेच्या तरुण लेखकावर नव्या भारताच्या आशा केंद्रित आहे. ...Read more

  • Rating Starनील मुखर्जी, द संडे टेलिग्राफ

    दाहक आणि जळजळीत, प्रखर बुद्धिमान, सद्याqस्थतीवर निष्ठुरपणे कोरडे ओढणारी एक साहित्यकृती... इंडिया रायिंझगचा बुरखा उतरवणारी... त्या भूमिकेमागची राजकारण्यांची सडलेली मनोवृत्ती उघडकीस आणणारी... अडिगा यांचा साहित्यातील भविष्यकाल नक्कीच उज्ज्वल आहे यात शंक नाही. आपण त्यांच्या पावलांचा मागोवा नक्कीच घेत राहिला पाहिजे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more