* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LOST SYMBOL
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184985580
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 692
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS STUNNING FOLLOW-UP TO THE GLOBAL PHENOMENON THE DA VINCI CODE, DAN BROWN DEMONSTRATES ONCE AGAIN WHY HE IS THE WORLD’S MOST POPULAR THRILLER WRITER. THE LOST SYMBOL IS A MASTERSTROKE OF STORYTELLING THAT FINDS FAMED SYMBOLOGIST ROBERT LANGDON IN A DEADLY RACE THROUGH A REAL-WORLD LABYRINTH OF CODES, SECRETS, AND UNSEEN TRUTHS . . . ALL UNDER THE WATCHFUL EYE OF BROWN’S MOST TERRIFYING VILLAIN TO DATE. SET WITHIN THE HIDDEN CHAMBERS, TUNNELS, AND TEMPLES OF WASHINGTON, D.C., THE LOST SYMBOL IS AN INTELLIGENT, LIGHTNING-PACED STORY WITH SURPRISES AT EVERY TURN. THIS IS DAN BROWN’S MOST EXCITING NOVEL YET.
फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा , छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले... रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले... सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या... शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?.... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंब-यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES # DIGITAL FORTRESS #THE LOST SYMBOL #ASHOK PADHYE #द लॉस्टसिम्बॉल #डॅनब्राउन #
Customer Reviews
  • Rating StarSandeep Patil

    रॉबर्ट लॅन्गडन नावाचा अमेरिकी चिन्हशास्त्रज्ञ असतो, त्याला अचानक त्याचा मित्र पीटर सोलमान याचा वॉशिंग्टन येथे व्याखानासाठी फोन येतो, जेंव्हा तो इप्सित स्थी पोहचतो, तेंव्हा त्याला समजते की, त्याला फसवले गेले आहे. एका चालाख गुन्हेगाराने हे सर्व केलेले असते. त्याला वॉशिंग्टन मधील पुरलेला गुप्त खजिना पाहिजे असतो आणि त्याद्वारे तो माणसाचे परमेश्वरात रूपांतर करणार असतो. ह्या गुप्त रहस्याचा शोध घेण्यासाठी रॉबर्ट लॅन्गडन, कॅथरीन नावाची नोएटिक वैज्ञानिक, सीआयए आणि मालख असे चौघे जण करत असतात परंतु त्यांचे हेतू वेगवेगळे असतात. द लॉस्ट सिम्बॉल नावाची डॅन ब्राउन ची कांदबरी माणसाला अशी खिळवून ठेवते. तो खजिना शेवटी काय आहे , याचा उलगडा पूर्णपणे तत्त्व नामक पद्धतीने करते. लेखकाने वापरलेली कल्पना अत्यंत अद्भुतकारक आहे, यात अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांचे, वस्तूंचे, `मेसॉन` पंथांचे रहस्य सांगितलें आहे आणि सत्य किती साधे असते, याची प्रचीती या कादंबरीतून येते. कितीतरी वैज्ञानिक शोध लागले, परंतु या वैज्ञानिक शोधानी माणसाच्या मनाचा शोध मात्र घेतला नाही, असे लेखकाचे मत, मात्र प्राचीन संतांनी, महात्म्यांनी माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांना त्यानी धर्म म्हणून संबोधले. पण काही बाबू आणि बापड्यानी या धर्माचे रूपांतर अधर्मात केले. शेवटी परमेश्वर माणसाने स्वतः च्या देहात शोधायला हवा असा प्रामाणिक संदेश या कंदाबरीतून लेखकाने दिला आहे.तत्त्वज्ञान, विज्ञान, पुराणकथा, रहस्य, मिथ्थक, प्रतीके , चिन्ह, यांचा वापर लेखकाने इतका अप्रतिम केला आहे, की 700 पाने कधी संपली हे कळेलच नाही. सर्वं बाजूनी प्रकाश टाकणारी ही कांदबरी नक्कीच वाचावी. ...Read more

  • Rating StarRavindra Chavan

    डॅन ब्राऊन भन्नाट च आणि त्यात अनुवाद केलाय अशोक पाध्ये हा मणिकांचन योग... सुरुवात च अंगावर काटा येणारी आहे... कवटीपात्रातुन वाईन पीऊन लागलाय तो पुढे कथा मार्गस्थ...

  • Rating StarSunil Deshmukh

    हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की वाचा.

  • Rating StarEknath Marathe

    खूप छान कादंबरी आहे. अगदी उत्कंठावर्धक ! अगदी वाचायला घेतली की खाली ठेवताच येत नाही. हे सर्व गूढ उलगडताना लेखकाने केलेले परिश्रम, संशोधन, अभ्यास लक्षात येतो. मराठी भाषांतर सुद्धा छान जमले आहे, अगदी ओघवते आहे. अनेक तांत्रिक गोष्टी अगदी सोप्या करून सांितल्या आहेत. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more