* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS THROUGH DIFFERENT STORIES THAT ALL SORT OF PEOPLE COME TO MEET US, PEOPLE WHOM WE WON`T BE MEETING OTHERWISE IN OUR LIFE. THESE ARE RIGHT FROM THE KINGS AND QUEENS, PRINCES AND PRINCESSES, THEIR PALACES, THE MISERS, THE POOREST OF ALL, THE WISEST OF ALL, THE WITTIEST OF ALL, THE STUPIDEST OF ALL, MYSTERIOUS PEOPLE TO THE MAJESTIC EXPERIENCES. IN ONE STORY WE MEET A VERY INTELLIGENT PRINCESS WHO WANTS A MORE INTELLIGENT HUSBAND, SO SHE ALLOWS THE EAGER WOULD BE HUSBANDS TO ASK HER 9 QUESTIONS EACH, AT THE END SHE MEETS SOMEONE WHO IS DASHING AND MORE INTELLIGENT THAN HER. IN ANOTHER STORY, AN ORPHAN CHILD PUNISHES HIS WICKED UNCLE; IN ONE STORY A DRUM HELPS THE OLD COUPLE TO COME OUT OF A DISASTER. SOME OF THESE STORIES WERE TOLD TO SUDHA MURTHY, BY HER GRANDPARENTS WHEN SHE HERSELF WAS A KID, SOME OF THE STORIES WERE HEARD DURING HER VOYAGES AROUND THE WORLD AND SOME OF THE STORIES ARE THE RESULT OF HER INNOVATIVE MIND. FOR AGES, ALL THESE STORIES WERE LINGERING IN HER MIND. SHE HAD BEEN TELLING THEM TO ALL THE YOUNG MINDS WHO HAD COME IN HER LIFE. THIS IS FOR THE FIRST TIME THAT SHE HAS PENNED THEM DOWN AND MADE THEM AVAILABLE TO ALL.
राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.
आपटे वाचन मंदिराचा उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार २००८

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarManali Powar

    Mast..Sudha Murtinchi pustke khupch chan astat...tyanchya थैलीभर गोष्टी पण छान आहेत.

  • Rating StarDAINIK PUDHARI 16-12-2007

    किशोरवयीन मुलांसाठी रोचक, वेगळ्या कथा... संवेदनशील मनाने टिपलेले जीवनानुभव अत्यंत प्रांजळपणे रसाळ वाणीने कथन करणाऱ्या सिद्धहस्त लेखिका सुधामूर्ती यांनी जाणीवपूर्वक काही कथा किशोरवयीन मुलांसाठी लिहिल्या आहेत. ‘थैलीभर गोष्टी’ आणि ‘सुकेशिनी आणि इतर कथा या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट आहेत. बालवयातच नैतिकतेचे संस्कार होणे गरजेचे असते. ही संस्कारांची शिदोरी जन्मभर पुरते असे सुधातार्इंना वाटते म्हणूनच त्यांनी बाल्यावस्था संपवून किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला-मुलींसाठी या वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत. या कथांसाठी सुधातार्इंनी मुद्दामच राजा-राणी अशी पौराणिक पार्श्वभूमी निवडली आहे, ज्यामुळे आपली संस्कृती आणि आपण लहानपणी ऐकलेल्या कथांचे पुर्नकथन स्वत:च्या शैलीत करणे त्यांना सुलभ झाले आहे. ‘थैलीभर गोष्टी’ या पुस्तकातील बेचाळीस कथा माणसाने श्रद्धेने कष्ट करावे, सत्याबद्दल, ज्ञानाबद्दल आवड असावी, ज्ञानाचा कधीही गर्व करू नये, अज्ञानी भोळ्या माणसांना लोक फसवतात, रूढी पाळतानासुद्धा बुद्धीचा वापर करावा, अनुभवाने समृद्ध असणाऱ्या वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीच्या चतुराईने वापर करून अडचणीतून मार्ग काढावा. बुद्धी आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठीच वापरावी, असे अनेकविध संस्कार या कथा देतात. मात्र, त्यासाठी लेखिकेने कुठेही भाष्य करून तत्त्वज्ञान सांगितलेले नाही. कथेतील पात्रांच्या वागण्या-बोलण्याचा सहजस्वाभाविक परिणामच त्या प्रकारचा होतो, हेच या कथांचे यश आहे. संग्रहातल्या वीसेक कथा बुद्धिमान मुलांच्या कल्पकतेच्या आहेत. ‘अलकावतीचा सम्राट’ या पहिल्या कथेतील सुमंत सामान्य माणसांना फसवून युक्ती-प्रयुक्तीने सुवर्णमुद्रा, घोडा, मिठाई, हत्ती असं बरंच काही मिळवतो. ‘कृष्णकांत’ हा राजदरबारातला हुशार मंत्री चलाख कामेशची चोरी पकडून गरीब व प्रामाणिक रामचंद्रला न्याय मिळवून देतो (साक्षीदार) ‘चतुर निरंजन’ आपल्या गरीब मित्राला चतुराईने काम करून भरपूर पैसे मिळवून देतो. सुशेनने आपल्या हुशारीने आणि प्रसंगावधानाने स्वत:सकट सर्वांची खुनाच्या आरोपातून कशी सुटका केली याची मनोरंजक कथा ‘चतुर व्यापारी’मध्ये आहे. सुखासीन आयुष्यासाठी लागणारं धन कष्ट करूनच मिळवलं पाहिजे. ऐषारामाने माणूस उद्धट आणि आळशी होतो हा बोध ‘धैर्यवन धीरेंद्र’च्या वागण्यातून सहजच होतो. स्वत:च्या हितापेक्षा भावाचे कल्याण देवाकडे मागणारा मुलगा ‘जादूचं झाड’मध्ये भेटतो. लोभीपणा, हावरटपणा सर्वनाशाला कारणीभूत होतो असा संस्कार ‘लोभ, जादूच्या खडावा, सोन्याचा पाऊस, कनवाळू सावत्र आई’ इ. कथा देतात. ‘केळीतली राजकन्या’ ‘तांदळाचे तीन दाणे’ अश कल्पनारम्य कथाही या संग्रहात आहेत तसेच ‘फणस’ सारखी खुमासदार फजिती कथा आहे. कंजुष माणसांच्या फजितीच्या गोष्टी आहेत. एकंदरीत, किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या या कथा आबालवृद्धांना आनंद देणाऱ्या, मनोरंजनाबरोबरच मनाचे उद् बोधन करणाऱ्या, रसाळ वाणीच्या छान गोष्टी आहेत. त्यातील घटनांची मांडणी वेधक असून मानवी स्वभावाचे नमुने अचूकपणे टिपून कथांची रचना केलेली आहे. अनेक कथापात्रांचे तर्कशुद्ध बोलणे, गणिती बुद्धी मनाला भावते. काहीत आलेली शेवटची कलाटणी सुंदर वाटते. सर्वच कथा सुंदर आहेत. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-06-2008

    कथांची मेजवानी… `थैलीभर गोष्टी` हा बेचाळीस गोष्टींचा १८२ पानांचा संग्रह ही किशोरवाचकांना सुधा मूर्ती यांनी दिलेली एक गोड, चविष्ट मीजवानी आहे. लहान वयाच्या वाचकांसाठी मराठीत साहित्य, साहित्यिक वा प्रकाशक नाहीत, असे नाही परंतु `बोक्या सातबंडे` सारखे अवाद सोडले तर शिशु - बाल - कुमार वाचकांसाठी प्रसिध्द होणारे साहित्य तसे बेतास बेत असते. सुधा मूर्ती यांनी कुमारवाचकांना सादर केलेला संग्रह खुपच समाधानकारक आहे आणि लीना सोहोनी यांनी अनुवादही चांगला केला आहे. सुधा मूर्ती यांनी `थैलीभर गोष्टी` मध्ये मौखिक परंपरेने संक्रमित झालेल्या कथा दिल्या आहेत. काही गोष्टी थोड्या बदलून दिल्या आणि मंगोल, रशियन, चिनी लोककथाही धुंडाळल्या आहेत. जावईबापूंची एखादी गोष्ट, एखादा परिचित किस्सा हेही थोडेफार बदल करुन त्यांनी कुमारवाचकांसाठी पेश केले आहेत. या गोष्टी सुरस आहेत, कालातीत आहेत आणि दिशांचीही मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत. म्हणजेच अमेरीकेत मुलाकडे गेल्यावर तिथे गोष्टींचा हट्ट धरणाऱ्या नातवंडाला भाषांतर करुन यातल्या गोष्टी सांगितल्या तरी तो `वॉव, वॉट ए स्टोरी, थँक्यू ग्रँड पॉ` म्हणेल. दंतकथा - कल्पकथा - कहाण्या - चातुर्यकथा - फेबल्स अँड पॅराबल्स सर्वांना ऐकाव्याशा वाटतात. जगात सर्व देशात, सर्व भाषांत गोष्टी आहेत. अगदी वेद - भारत - भागवत - पुराणे - बायबल - बुध्द व जैन धर्मातील ग्रंथ - महानुभाव साहित्य यातूनही गोष्टी भेटतात. वि. कृ. श्रोत्रीय यांनी वेदातील सुंदर गोष्टी सांगितल्या, त्या तेव्हा वाचकप्रिय झाल्या होत्या. इसाप - बिरबल - तेनालीराम यांच्या चातुर्यकथा काय किंवा पंचतंत्रातील गोष्टी काय, त्या वाचकप्रिय ठरतात. गुणाढ्याचे कथासरित्सागर, विक्रम वेताळ कथा, सिंहासनबत्तीशी यातील गोष्टी अजून कालबाह्य झालेल्या नाहीत. या गोष्टीची निवड करताना सुधा मूर्ती यांनी मनाशी काही निकश पक्के केलेले आहेत. कुमारवाचकांवर ज्या गोष्टी त्यांचे मनोरंजन करताना नितिमूल्यांचे संस्कार करतील, अशा गोष्टी मूर्तींनी निवडल्या आहेत. त्यांनी भक्तांच्या उध्दारासाठी, त्याला संकटमुक्त करण्यासाठी ईश्वराला धावत यायला लावलेले नाही. म्हणूनच या गोष्टीतून चमत्कार, शाप, उ:शाप, आशीर्वाद, वरदान, स्वर्गप्राप्ती, नरकाची शिक्षा यांचा वापर मूर्तींनी केलेला नाही. या गोष्टींच वास्तवाशी नातं आहे. यात अद्भुतता नाही. अतिशयोक्ती टाळली आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचा खऱ्या खुऱ्या मानवी भावभावनांशी संबंध थेटपणे येतो. माणसाचे गुणदोष, त्याचे स्वभावदोष यांच्याशी संबंध येतो. कंजूषपणा, असूया - मत्सर - लोभीपणा - परोपकारी वृत्ती, भामटेगिरी - हावरटपणा - दयाळूपणा, न्यायी वृत्ती यांच्याशी गोष्टींची नाळ जोडली आहे. कथा, परकीय असली तरी त्याला भारतीय पाश्र्वभूमी दिली आहे. सुधा मूर्तींनी काळ मात्र राजेराण्यांचा निवडला आहे. त्याकाळी आजचे तंत्रज्ञान नव्हते. एक आवर्जुन सांगितले पाहिजे की, या गोष्टी खऱ्या अर्थाने गोष्टी आहेत. त्यात कथानक आहेत आणि त्याचे निवेदक आकर्षक आहे. बोध आणि उपदेश गोष्टीच्या अंगाने येतात आणि त्यांचा योग्य तेवढाच उपयोग केलेला आहे. गोष्टीचे गोष्ट हे रुपडे हरवणार नाही याबद्दल मूर्ती दक्षता घेतात. एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. राजेराण्यांचा कालखंड घेतलेला असल्यामुळे या गोष्टीत पुरुषप्रधान आहे. कारण तेव्हाची स्त्री आजच्या सारखी स्वतंत्र नव्हती. प्राण्यांवर सुधा मूर्ती मानवी भावना लादत नाहीत. गरीब मनाने चांगले असतात तर श्रीमंत लोक स्वभावाने चांगले नसतात, व्यापारी गिऱ्हाईकांना नेहमी लबाडीने वागवतात असेही येथे गृहीत धरलेले आहे. ते तितकेसे खरे नाही, हे आपण जाणतो. `थैलीभर गोष्टी` या अखेर गोष्टी आहेत. वाचनीयता, श्रवणीयता, हा त्यांचा मुख्य गुण, या विना अधिक उच्च अपेक्षा त्यापासून करायची नसते. गोष्ट म्हणजे फावल्या वेळेची करमणूक एवढेच. सुधा मूर्ती या आता प्रतिथयश लेखिका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हे दोन्ही संग्रह आवर्जून वाचले जातील. करमणुकीची वाचकांची अपेक्षा ह्या गोष्टी नक्की पूर्ण करु शकतात. बायप्रॉडक्ट म्हणून यात वाचकावर कळतनकळत सुसंस्कार घडावेत, म्हणून गोष्टींचे सार, मूलतत्व सांगितले आहे. सरळसरळ उपदेश करण्यापेक्षा हे चांगले. - अनंत मनोहर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more