* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
So often, it`s the simplest acts of courage that touch the lives of others. Sudha Murty-through the exceptional work of the Infosys Foundation as well as through her own youth, family life and travels-encounters many such stories... And she tells them here in her characteristically clear-eyed, warm-hearted way. She talks candidly about the meaningful impact of her work in the devadasi community, her trials and tribulations as the only female student in her engineering college and the unexpected and inspiring consequences of her father`s kindness. From the quiet joy of discovering the reach of Indian cinema and the origins of Indian vegetables to the shallowness of judging others based on appearances, these are everyday struggles and victories, large and small. Unmasking both the beauty and ugliness of human nature, each of the real-life stories in this collection is reflective of a life lived with grace.
लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली. ‘मुलांवर मात’या लेखातून लेखिकेने त्यांच्या काळातील शैक्षणिक परिस्थितीत मुली इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून कशा दूर होत्या, त्यामुळे त्या कॉलेजमध्ये त्या एकट्याच असल्याने, मुले प्रथम कशी त्यांच्या खोड्या काढायची याविषयी लिहिले आहे. पण नंतर इंजिनिअरिंग हे पुरुषांचं क्षेत्र आहे, हे साफ खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. लेखिकेनं सगळा अभ्यास व्यवस्थित समजून केला, व त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून त्यांच्यावर कशी मात केली, त्याविषयी वर्णन केले आहे. लेखिका एकदा सहजच मैत्रिणीच्या घरी गेली असता, फक्त मूळ भारतीय असलेल्या अन्नपदार्थांपासूनच श्राद्धाचा स्वयंपाक केला जातो, असं त्यांना कळलं. आपण ज्या गोष्टींना ‘भारतीय’ म्हणतो, त्यांपैकी अनेक गोष्टी भारतीय नाहीत. मिरची, ढबू मिरची, मका, शेंगदाणे, काजू, विविध प्रकारच्या शेंगा, बटाटा, पपई, अननस, सीताफळ, पेरू, चिकू या सर्व भाज्या आणि फळं दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आल्याचं त्यांच्या मैत्रिणीच्या वनस्पतिशास्त्रज्ञ वडिलांनी त्यांना सांगितलं. त्याबद्दलच्या विस्मयकारक पौराणिक व वैज्ञानिक गोष्टीही त्यांनी लेखिकेस सांगितल्या. अशा तऱ्हेने जेवायला गेल्या असता वैचारिक खाद्यही त्यांना लाभले. ‘तीन ओंजळी पाणी’ या लेखात लहानपणी आजीबरोबर लेखिका गंगापूजनाला गेली असता, त्याविषयीची माहिती- ते का करतात, कसं करतात हे कळतं. काही वर्षांनी प्रत्यक्ष काशी-बनारसला गेल्यावर त्याविषयीचा तिचा अनुभव काय, याविषयी लेखिकेने या लेखात लिहिले आहे. ‘घरासारखं दुसरं काही नाही’ या लेखात लेखिकेला मध्यपूर्वेत महिला संघटनांच्या आमंत्रणावरून गेल्या असता, स्वतःजवळचे सर्व पैसे घालवून, अधिक पैसे मिळतात, या आशेने गेलेल्या महिलांवर तेथे गेल्यावर काय परिस्थिती ओढवते, व परत मायदेशी येणे किती मुश्किल होते, याविषयी लेखिका सजग करते. ‘खरा राजदूत’ या लेखात परदेशी गेल्यावर आपली हिंदी सिनेसृष्टी इतर देशांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी कशी उत्सुकता निर्माण करते, तेथील लोकांशी जोडले जाण्याचा अनुभव देते, याची झलक दिसल्यावर चकित होते, त्याविषयी लिहिते. ‘रसीला आणि पोहोण्याचा तलाव’ या लेखात कर्नाटकातील हरिकथेत सांगितल्या जाणाऱ्या कृष्णाच्या आणि गोपिकांच्या रासलीलांच्या गोष्टी आपल्या परदेशातल्या नातींना लेखिका सांगते. याच गोष्टी परदेशी वातावरणाशी जुळवून त्यांच्या नाती त्यांना कशा मार्मिक रीतीने सांगतात, हे वाचणे खूपच रंजक आहे. ‘इन्फोसिस फाउंडेशनमधील एक दिवस’ या लेखात लेखिकेची मैत्रीण ‘तिला लेखिका निवांत भेटत नाही’ अशी तक्रार करते, तेव्हा त्या मैत्रिणीलाच आपल्या कामाच्या ठिकाणी बोलवते, व तिचा दिनक्रम कसा व्यस्त आहे, याचा अनुभव दिवसभर देते. ‘मला जमणार नाही; आपल्याला जमेल’ या लेखातून लेखिकेचा अचानकच व्यसनाधीनांच्या व्यसनांपासून सुटकेसाठी काम करणाऱ्या ‘अल्कोहोलिक अॅपनॉनिमस’ या संस्थेच्या संपर्कात आली. त्यांचे काम कसे चालते, याविषयीच्या मीटिंगला उपस्थित राहण्याची संधीही लेखिकेस मिळाली. त्याविषयीची समस्या सोडवण्यासाठी वाचकास जागृत करणारा, अंगावर शहारा आणणारा अनुभव लेखिकेने आपल्यासमोर ठेवला आहे. एकूणच समाजातील समस्या, माहिती, ज्ञान, चालीरीती अशा सगळ्या कंगोऱ्यांना स्पर्श करणारे रंजक पण विचार करायला भाग पाडणारे विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत.
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 10-06-2018

    ‘इन्फोसिस फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेचे काम करताना सुधा मूर्ती यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. तसेच त्यांच्या तरुणपणी त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी ‘तीन हजार टाके’मधून लिहिले आहेत. फाउंडेशनचा पहिलाच प्रकल्प हाती घेतला तो देवदासींच्या समस्या सोडविण्ाचा. त्यासाठी त्या उत्तर कर्नाटकातील विशिष्ट भागात गेल्या. तेथील देवदासींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कामात बदल केल्यावर मात्र त्यांना सकारात्मक बदल दिसला. देवदासींच्या त्या आवडत्या अक्का बनल्या. त्यांनी अक्काला भरतकाम केलेली गोधडी भेट दिली. त्यावर शरीरविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या तीन हजार देवदासींनी मिळून तीन हजार टाके घातले होते. ही अमूल्य भेट व देवदासींचे अनुभव यात आहेत. ‘मुलांवर मात’ या प्रकरणात हुबळीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना झालेला त्रास व नंतर मुलांपेक्षा जास्त गुण मिळविल्यानंतर सहकारी विद्यार्थ्यांशी झालेली मैत्री, मैत्रिणीच्या वडिलांनी दिलेले वनस्पतींविषयीचे ज्ञान, आजीच्या इच्छापूर्तीसाठी काशीला दिलेली भेट, असे त्यांच्या आयुष्यातील समृद्ध अनुभव वाचताना प्रेरणाही मिळते. –मंजूषा कुलकर्णी ...Read more

  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स १८/२/२०१८

    आयुष्य म्हणजे विविध प्रसंगांचा, अनुभवांचा संचयच खरेतर. अशाच एका संध्याकाळी निवांत चांदण्यांच्या प्रकाशात बसल्यावर मनाला भिडलेले आणि जीवनाला खऱ्या अर्थाने नवे वळण देऊन गेलेले अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून झर्रकन सरकतात. यात वेळ कसा जातो, ते कळतच नाही. म्हूनच वर्तमान, भविष्याकडे लक्ष द्यायला हवे, असे सांगतिले जात असले तरी आठवणींची दुनिया निराळीच. अक्षरशः आयुष्याचा पट या आठवणींत दडलेला असते. लेखिका सुधा मूर्ती यांचे `तीन हजार टाके` हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अशाच आठवणींची, प्रसंगांची कथामालाच. त्यांच्या सोप्या, सरळ लेखनशैलीमुळे त्या कथा अधिक खुलल्या आहेत. म्हणूनच त्या थेट मनाला भिडतात. यातील काही कथा अगदी सामान्य किंबहुना समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित व्यक्तींभोवती फिरतात, परंतु त्याचबरोबर त्यांचे असमान्य जीवनही उलगडवतात. माणसाचं माणूसपण दाखवताना त्याच्यातील दुष्ट प्रवृत्तीही समोर आणतात. थोडक्यात, मानवी जीवनाचे विविध पैलू या कथांद्वारे समोर येतात. लेखिका `इन्फोसिस फाऊंडेशन`मध्ये काम करत असताना विविध प्रकारच्या घटकांसोबत त्यांचा परिचय आला. यातून त्यांना दुर्लक्षित घटकांचे जगणे समजून घेता आले आणि त्या माणसांच्या प्रेमाची पुंजी जमा होत गेली. या प्रवासात आलेले खाचखळगेही लेखिकेने मांडले आहेत. तीन हजार टाके या कथेत देवदासींसाठी काम करण्याचा लेखिकेचा अनुभव समोर येतो. सुरुवातीला हा प्रवास खडतर होता. पण मदत करण्याचा लेखिकेचा निर्धार इतका पक्का होत गेला की, हळूहळू त्यांचा मार्ग मोकळा झाला आणि देवदासींना सन्मानाने जगणे शक्य झाले. आणखी एका कथेत लेखिकेने आपला इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा प्रवास मांडला आहे. हे आव्हानही सोपे नव्हते. संपूर्ण कॉलेजमध्ये एकटीच मुलगी असल्याने क्षणोक्षणी त्यांच्यासमोर प्रश्न उभे राहत होते. पण शिक्षकांची साथ आणि शिक्षणाचे ध्येय या जोरावर त्यांनी असंख्य मुलींना इंजिनीअरिंग कॉलेजची कवाडे खुली करून दिली. मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्यासारख्या प्राथमिक अडचणींनाही त्या सामोरे गेल्या. हा प्रवास स्तब्ध करतो. लेखिकेचे चित्रपटाचे प्रेम, बॉलिवूडसंदर्भात आलेले अनुभव, त्यांच्या नातींनी आजच्या काळाची सांगड घालून सांगितलेल्या पौराणिक गोष्टी, विविध भाज्यांविषयी माहिती, या कथा गंमत आणतात. यात लेखिकेने आपल्या वडिलांच्या आयुष्यातील एक कथाही मांडली आहे. एका चित्रपटात शोभेल अशी कथा त्यांच्या वडिलांच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित करते. आपल्या मदतीची समोरचा जाणीव ठेवत नाहीत, असे आजकाल सर्रास म्हटले जात असले तर लेखिकेच्या वडिलांनी त्यांच्याही नकळत एका तरुणीला केलेल्या मदतीने तिचे सारे आयुष्य कसे पालटले, हे वाचून अक्षरशः अवाक व्हायला होते. काही हलक्याफुलक्या, काही माणसांच्या वेदना सांगणाऱ्या, तर काही त्यांचे संघर्ष सांगणाऱ्या या कथा म्हणजे एक परिपाठच आहे. ...Read more

  • Rating Starसकाळ दि. ४/२/२०१८

    सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या या कथा. त्यांना आलेले अनुभव, एखादा प्रसंग, भेटलेली एखादी व्यक्ती यांच्यातून कथाबीज घेऊन सुधा मूर्ती त्याचं छानशा कथेत रूपांतर करतात. या पुस्तकातल्या बहुतेक कथा या सत्य घटनांवर आधारित आहेत. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या खासशैलीत, त्यांचं निरीक्षण नेमक्या पद्धतीनं मांडत आणि सकारात्मक प्रेरणा देत या कथा लिहिल्या आहेत. समकालीन अनुभवांकडं वेगळ्या पद्धतीनं बघायला लावणाNया या कथा. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

THE FAKIR
THE FAKIR by Ruzbeh Bharucha Rating Star
स. राठी

नुकतेच ‘द फकीर’ मराठीतून वाचले. उत्कृष्ट भाषांतराबद्दल मनस्वी अभिनंदन. अध्यात्मिक विषयाचे भाषिक रूपांतर करणे खूप कठिण असते, ते एक अध्यात्मिक कामच आहे. मी जरी मारवाडी असलो तरी, मराठी माझी मानसिक भाषा आहे. दीर्घ कालानंतर आवडीचा प्रसाद चवीचवीने हळूहळू खतो, तसे १९० पानाचे ‘द फकीर’ आठ दिवस निवांत पचेल त्या वेगात वाचत होतो. मी मागील ५५ वर्षापासून पुस्तक, स्टेशनरी वितरण व्यवसायात आहे. ...Read more

RADHEYA
RADHEYA by Ranjeet Desai Rating Star
Sagar Dokhe

आयुष्यभर ज्याला सुतपुत्र सुतपुत्र म्हण्यात आले अशा कौंतेयाची ही कहाणी. रणजित देसाई यांनी खुप सोप्या शब्दात लिहलेली ही कादंबरी.वाक्यरचना सोपी असल्याने पुस्तक सारखे वाचावेसे वाटते. ही लेखकाच्या लेखनीची कमाल आहे.या कादंबरीतून खुप काही शिकलो. योध्याने य पराजयाची चिंता करायची नसते.त्याने फक्त लढायच.त्याच प्रमाणे आपणही प्रयत्न करत राहयचे पराजयाची चिंता करायची नाही. ...Read more