* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE PELICAN BRIEF
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663208
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 360
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :JOHN GRISHAM COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A KILLER’S SNEAKERS WHISPER ACROSS THE FLOOR OF A FANCY HOME IN SUBURBAN GEORGETOWN. FAR AWAY IN A GAY MOVIE THEATER IN WASHINGTON, D.C., A PATRON IS STRANGLED TO DEATH. THE BREAKING NEWS ACROSS AMERICA THE NEXT DAY IS THAT OF THE SHOCKING ASSASSINATION OF TWO OF THE COUNTRY’S SUPREME COURT JUSTICES. DARBY SHAW, A YOUNG LAW STUDENT IN NEW ORLEANS DRAFTS A LEGAL BRIEF. TO HER, IT IS JUST A BRILLIANT GUESS, BUT IN THE CORRIDORS OF POWER AT THE WASHINGTON ESTABLISHMENT IT IS CONSIDERED A POLITICAL DYNAMITE. SOON, SHE FINDS HERSELF A WITNESS TO A MURDER THAT WAS ACTUALLY INTENDED FOR HER. GOING INTO HIDING, SHE REALIZES THAT THERE IS JUST ONE TRUSTWORTHY PERSON WHO HAPPENS TO BE AN AMBITIOUS REPORTER. THE REPORTER IS THE ONLY PERSON WHO CAN HELP DARBY FIT THE PIECES OF THE DEADLY JIGSAW PUZZLE. A COVER-UP THAT IS VERY VIOLENT IS BEING STAGED BETWEEN LOUISIANA AND THE INNER SANCTUMS OF THE WHITE HOUSE. SOMEONE HAS STUMBLED UPON DARBY’S SHOT-IN-THE-DARK LEGAL BRIEF AND WILL STOP AT NOTHING TO DESTROY THE EVIDENCE OF THIS HEINOUS CRIME AND PRESERVE THE SECRETS OF THE PELICAN BRIEF. PUBLISHED IN THE YEAR 1992, THE PELICAN BRIEF’S FILM ADAPTATION WAS RELEASED IN THE FOLLOWING YEAR. IT STARRED JULIA ROBERTS AND DENZEL WASHINGTON AS THE MAIN PROTAGONISTS.
वॉशिंग्टनमध्ये, एका अंधा-या पोर्नो चित्रपटगृहात एका प्रेक्षकाचा गळा घोटून रहस्यमय खून होतो.... सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश जगातून नाहीसे होतात.... आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनं डार्बी शॉ या घटनांच्या खोलाशी जाऊन, गुन्ह्याची संभाव्य उकल आपल्या संशोधनपर निबंधात करते. डार्बी शॉच्या दृष्टीनं तो अंधारात मारलेला एक वकिली तीर होता... परंतु, वॉशिंग्टनच्या राज्यव्यवस्थेला त्यामुळे सुरुंग लागण्याचा धोका निर्माण होतो. अनपेक्षितपणे, डार्बी एका हत्येची साक्षीदार होते.... वास्ताविक, तिथे तिचा बळी जाणं अपेक्षित असतं.... व्हाईट हाऊसच्या अंतर्गत गोटातून ही बातमी दडपून टाकण्यासाठी होणा-या दबावाला न जुमानता डार्बीनं लिहिलेलं ब्रीफ कोणा कर्दनकाळांच्या हाती पडलं होतं? आपल्या असामान्य प्रतिभेचा वापर त्या दुर्दैवी कारस्थानासाठी कोणी केला? एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने डार्बीने त्या भीषण रहस्याचा घेतलेला शोध— सत्य जगापुढं आणण्यासाठी केलेला जीवघेणा संघर्ष ! पुरावे नष्ट करणारी दुष्ट शक्ती आणि पुरावे गोळा करणारी सुष्ट शक्ती यांच्यातील घनघोर संग्राम... द पेलिकन ब्रीफ जॉन ग्रिशॅम यांच्या तर्वÂशुद्ध, कायदेशीर लेखणीतून उतरलेले एक अद्वितीय थरारनाट्य...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #THE RAINMAKER #THE STREET LAWYER # THE PARTNER #THE CHAMBER #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THE FIRM #THE ASSOCIATE #THE LAST JUROR #JOHNGRISHAM #RAVINDRAGURJAR #THECLIENT #THE TESTAMENT #THEPELICANBRIEF #MADHAVKARVE #
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अमेरिकेच्या राजकारणावर आणि न्यायव्यवस्थेवर महत्त्वाकांक्षी स्वार्थी धनिकांचा प्रचंड प्रभाव... जॉन ग्रिशॅम या बेस्टसेलर लेखकाची दि पेलिकन ब्रीफ ही तिसरी कादंबरी. १९९२ मध्ये ती प्रथम प्रसिद्ध झाली. वाचकांना स्तिमित करणाऱ्या या चित्तथरारक कादंबरीवर चितरपटही निघाला; आणि तोही गाजला. वॉटरगेट सारखेच एक अमेरिका हादरवून टाकणारे प्रकरण या कादंबरीद्वारे वाचकांपुढे खुले होते. या कादंबरीचे कथानक ‘दि पेलिकन ब्रीफ’ भोवती गुंफलेले आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांची हत्या होते; त्या हत्येमागे कोणाचा हात असावा याबद्दलचे एक टिपण डार्बी शॉ ही तरूणी तयार करते. ती लॉ कॉलेजमध्ये वकिलीचा अभ्यास करीत असते; आणि थॉमस कॅलहान या घटनातज्ज्ञ प्राध्यापकाची ती आवडती विद्यार्थिनी असते. समकालीन खटल्यांची उदाहरणे घेऊन आपल्या विद्यार्थ्यांचा त्यामधील कायद्याच्या गुंतागुंतीच्या बाबी समजावून देण्यात थॉमस कॅलहानचा हातखंडा असतो; आणि डार्बी शॉ त्याच्या प्रेमात पडलेली असते. ज्या दोन न्यायाधीशांची हत्या झालेली असते, त्यांनी गेल्या काही वर्षात दिलेले निर्णय विशिष्ट वर्गाला प्रोत्साहन व संरक्षण देणारे असतात. पर्यावरणवादी, समलिंग संबंधवादी, इंडियन्स, कृष्णवर्णीय, स्त्रीवादी, वृक्षप्रेमी, गर्भपातविरोधी, निरीसरवादी, अपंग इत्यादी वर्गांची बाजू उचलून धरणाऱ्या निकालांमुळे काही गट या न्यायाधीशांवर नाराज असतात. अमेरिकन घटने नुसार सुप्रीम कोर्टाचे नऊ न्यायाधीशांवर नाराज असतात. अमेरिकन घटनेनुसार सुप्रीम कोर्टाचे नऊ न्यायाधीश हे नेमणुकीनंतर तहह्यात असतात; एखाद्याचा मृत्यू झाला तरच त्याच्या जागी दुसऱ्या न्यायाधीशाची नेमणूक होते. खून झालेल्या दोघा न्यायमूर्तींपैकी रोझेन बर्ग हा तर नव्वदी पार केलेला असतो; आणि दुसरा न्यायाधीश जेसन हा कधी पुरोगामी तर कधी प्रतिगामी भूमिका घेत असल्याने बेभरवशाचा मानला जातो. वादग्रस्त निर्णयामुळे न्यायाधीशांना सतत खुनाच्या धमक्या येत असतात आणि त्यांना सतत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राहावे लागते. तरीही जोसन हा सुरक्षा अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन रात्री करमणुकीसाठी कुठे ना कुठे जात असतो. रोझेन बर्गचा खून त्याच्या घरातच तो झोपलेला असताना होतो; आणि सत्तरवर्षाच्या जेसनचा खून एका भिकार क्लबमध्ये एक सवंग चित्रपट पाहताना होतो. हत्या करणारा मारेकरी हा व्यावसायिक असतो कसलाही पुरावा तो मागे ठेवत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला त्या दोघांच्या खुनाची चौकशी करण्यासाठी तसेच त्यांच्या जागी नव्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी सूत्रे हलवावी लागतात. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचा खून होण्याची घटना अमेरिकेत प्रथमच घडलेली असते. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजणार हे उघडच असते. डार्बी शॉ आणि थॉमस कॅलनहान हे साहजिकच या दोन खुनांबद्दल चर्चा करतात; आणि संभाव्य खुनी कोण असेल या बद्दलचे तर्क एकमेकांना ऐकवतात. डार्बी शॉ कॉलेज लायब्ररीत असून रोझेनबर्गने दिलेल्या निकालांवरून संभाव्य संशयितांची यादी तयार करते. पण ती यादी कुचकामी आहे असे तिलाच समजून येते. कारण त्या यादीतली नावे सर्वांनाच ठाऊक असतात. तरीही ती आपली हेरगिरी चालूच ठेवते. चार दिवस त्या प्रकरणाचा पिच्छा पुरवते. संगणकावर त्याबद्दलचे अहवालवजा टिपण करून, संभाव्य खुनी माणसाबद्दलचा आपला तर्क ती समर्पक युक्तिवादासह मांडते. या तेरा पानांच्या टिपणाची एक प्रत कॅलनहान वाचण्यासाठी घेतो व ती प्रत तो सरकारी वकील गेविन वेरहीक या आपल्या मित्राला चाळण्यासाठी देतो. गेविन हा मुख्य न्यायाधीशाच्या विश्वासातला असतो. तो ते ब्रीफ वाचतो. संशयिताचे तिने सुचवलेले नाव त्याने कधी ऐकलेले नसते. तो ते ब्रीफ एरिक ईस्ट या एफबीआय मधल्या अधिकाऱ्यांकडे पाठवतो. त्या ब्रीफमध्ये अध्यक्षांचा उल्लेख असल्याने एरिक ते ब्रीफ अध्यक्षांचा वैयक्तिक सहाय्यक कोल याच्याकडे पाठवतो. कोल लगेच अध्यक्षांना त्या ब्रीफची माहिती देतो. त्याचे टिपणाचे नामकरण मग दि पेलिकन ब्रीफ असे होते. कोल अध्यक्षांना सांगतो, ‘‘एफबीआयचा वॉयल्स आणि त्याचे बगलबच्चे यांना योगायोगानं एक संशयित आढळला आहे. आतापर्यंत कोणी त्याचा उल्लेख केला नव्हता. एक अत्यंत गूढ आणि अशक्य कोटीतील संशयित. ‘तुलने’ येथील लॉ कॉलेजच्या एका अतिउत्साही हायद्याच्या विद्यार्थिनीनं ही भिकार गोष्ट लहिली आहे. कशीतरी प्रवास करत ती वॉयल्सपर्यंत गेली. त्यानं मोठ्या उत्साहानं खुनी माणसाचा तपास लावायचं ठरवलं आहे. शिवाय प्रेस त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.’’ तुम्ही सीआयएला ताबडतोब याचा तपास करायला सांगा. वॉयल्स ने खणायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला त्याची सगळी माहिती मिळायला हवी. हे घरगुती प्रकरण आहे. सीआयएने त्यात ढवळाढवळ करू नये. ते बहुतेक बेकायदेशीरपण आहे. असेही तो सांगतो. ‘‘आपल्या ओळखीचं त्यात कुणी आहे का?’’ या अध्यक्षांच्या प्रश्नावर कोलचे उत्तर होकारार्थी असते. ...त्याच वेळी वॉशिंग्टन पोस्टच्या ग्रे ग्रँथॅम या वार्ताहराला एक फोन येतो, ‘‘मी काल तुमची बातमी वाचली. व्हाइट हाऊस आणि उमेदवारांबद्दल ... मी फार घाबरलेला आणि गोंधळलेला आहे. त्या न्यायाधीशांना कोणी ठार केलं हे मला ठाऊक आहे. पण ते उघड केले तर माझा खून होऊ शकेल. माझा कोणीतरी पाठलाग करीत आहेत. मी एक वकील आहे. माझं नाव गार्सिया.. मी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही काय कराल? ...मी नंतर फोन करीन.’’ ग्रे त्याला आश्वासन देतो, ‘‘मी तुमच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण शोध घेईन. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या खुनांबद्दल आपण कोणावर आरोप करणार असलो तर ती बातमी फार नाजूकपणे हाताळावी लागेल.’’ पण ग्रेला काही सांगण्याआधीच गार्सियाचीही हत्या होऊन जाते. आणि त्यानंतर कॅलहान व डार्बी शा रात्री जेवून हॉटेलमधून बाहेर पडतात. पार्किंग लॉटमधून कार बाहेर काढत असताना एकदम स्फोट होऊन कॅलहान मरण पावतो. डार्बी दूर उभी असल्याने वाचते... त्याचवेळी दोन पोलीस तिच्याजवळ येऊन तिला आपल्या गाडीत बसवून तिचं नाव विचारतात...तेवढ्यात पोलिसांची दुसरी गाडी येते आणि आपली कार तेथेच सोडून ते दोघे पोलीस पळ काढतात. खरे पोलीस त्या गाडीबद्दल डार्बीकडे चौकशी करतात...ते बनावट पोलीस कोण असतात ? डार्बीला कळून चुकते - आपण नशिबाने वाचलो. ती गेविनला फोन करून आपल्या ब्रीफबद्दल विचारते. ते कोणी कोणी वाचले याची चौकशी करते. एफबीआयच्या बाहेर ते कोणी वाचलेय का या तिच्या प्रश्नावर तो अस्वस्थ होतो. कारमध्ये आमच्या दोघांसाठी बाँब ठेवला होता. पण मी वाचले. आताही माझ्या पाठलागावर कोणीतरी आहे...’’ गेविन तिला सांगतो, ‘‘तू धोकादायक परिस्थितीत आहेस.. काळजी घे.’’ गेविन त्या ब्रीफबद्दल एफबीआयच्या डायरेक्टरशी बोलतो. पण डायरेक्टर ते ब्रीफ विसरून जा असे म्हणून त्याला कटवतो. तेव्हा डार्बी फोनवरुन त्याला म्हणते, ‘‘ तुम्हाला ब्रीफ दिले, आणि ते कुठे कुठे गेले. ४८ तासाच्या आत आम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे हत्या ब्रीफमुळे झाली; जर तसे असेल तर थॉमसचा खुनी कोण आहे हे आपल्याला माहीत आहे. आता न्यायमूर्तींना कोणी मारले हेही आपल्याला ठाऊक होईल. बरोबर?’’... पहिल्या सव्वाशे पृष्ठत हे कथानक इथवर येते. आणि पुढे ते वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगाने दौडत राहते. पुढचे काम त्या संशयित खुन्यापर्यंत पोचणे आणि पुराव्यासह ते प्रकरण उघडकीस आणते हे उरते. पण हे काम सोपे नसते. त्याला अनेकविध फाटे फुटलेले असतात. एक - डार्बी शॉ आपला पाठलाग होत असल्याचे बघून स्वत:ला वाचवण्यासाठी वेषांतर करून सारख्या जागा बदलत राहते. एफबीआय हे प्रकरण दडपू पाहतेय हे लक्षात आल्यावर आधी गेविनच्या व नंतर पत्रकार ग्रेच्या मदतीने खुनाचा तपास करण्याची कामगिरी स्वत:कडे घेते. सतत पाठलाग होत असूनही मारेकऱ्यांना हुलकावणी देण्यात ती यशस्वी ठरते. दोन - खळबळजनक बातमी, मिळूनही, वादातीत पुरावा हाती असल्याशिवाय ती प्रसिद्ध करायची नाही हे पथ्य जबाबदार वृत्तपत्रे पाळतात. हा वादातीत पुरावा वॉशिंग्टन पोस्टच्या हाती आल्यावर ही बातमी प्रसिद्ध करताना राष्ट्राध्यक्षांसह संबंधितांच्या प्रतिक्रियाही घेण्याची दक्षता घेतली जाते... ते वृत्तपत्राच्या कचेरीतले नाट्य या कादंबरीत आपल्यापुढे समर्थपणे येते. प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांच्या हाती काय लागले आहे याचेही दडपण सतत संबंधितांवर असते. तीन - प्रचंड व्यावसायिक आणि आर्थिक सत्ता काबीज करणारे लोक कुठल्याही मार्गाचा अवलंब करून, भाडोत्री मारेकरी आणि गुंड यांचा वापर करून, आपले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्राध्यक्ष, न्यायाधीश, संसद सदस्य, पोलीस यंत्रणा या सर्वांना ते मिंधे करून आपले वर्चस्व गाजवत राहतात. पर्यावरण, मानवी हक्क वगैरे गोष्टींची पर्वा त्यांना नसते. त्यांचे हात दूरवर पोचलेले असतात. देशोदेशी त्यांचे हस्तक विखुरलेले असतात आणि त्यांची कामे बिनबोभाट चालू असतात. राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक निधीला चाळीस लाख डॉलर्स देणगी देणाऱ्या उद्योगपतीला संरक्षण देण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष करणारच! चार - शासनयंत्रणेतही विविध अधिकारी आणि विभाग यांच्यात सुप्त वा उघड स्पर्धा चालू असते. परस्परांना शह देणे ही चालू असते. कर्तव्य आणि देशहित याबाबत वेगवेगळ्या संकल्पना असतात. दुर्जन आणि सज्जन यांचा संघर्ष चालू असतो. पण कुठेतरी मानवी न्यायबुद्धी आणि शहाणपण यांची सरशी होते खरी! पाच - गुप्तहेर यंत्रणा, सीआयए, एफबीआय, मोठ्या सॉलिसिटर्सच्या फर्म्स - यांचे कामकाज अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालते. त्यांचे नेटवर्क सर्वदूर पसरलेले असते. तपशील मिळवण्याचे त्यांचे मार्ग, त्यातील गोपनीयता, वृत्तपत्रांना दूर ठेवण्याच्या त्यांच्या क्ऌप्त्या यांचेही एक शास्त्र विकसित झालेले आहे. जॉन ग्रिशॅम हा स्वत: एका वकिली फर्ममध्ये काम करीत होता आणि मिसिसिपीच्या विधानसभेचाही सदस्य होता. त्यामुळे कायद्यातील पळवाटा, न्यायालयांची कार्यपद्धती, शासनयंत्रणेचे व विधानसभांचे कामकाज, वकिली फर्म्समधील व्यवहारांचे स्वरूप यांचे तपशील त्याच्या कादंबऱ्यांमध्ये अचूक येणे हे स्वाभाविकच आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या नेमणूका तहहयात असल्याने वाढत्या उतार वयात काही न्यायाधीश लोकेषणा व प्रसिद्धी यामागे लागून निकाल देण्याच्या मोहात पडतात; त्यातून अनेक दुष्प्रवृत्तींना खतपाणी मिळते. रोझेनबर्ग हा अशा न्यायाधीशांचा प्रतिनिधी आहे; आणि ग्रिशॅमला त्याच्याबद्दल काहीसा तिटकाराच आहे. या न्यायमूर्तींच्या शहाणपणावर किंवा न्यायबुद्धीवर त्याचा विश्वास नाही. न्यायदानही त्यांच्या लहरीपणावर चालते आणि न्यायाधीशांची निवड करताना त्याच्या विचारसरणीचा व पूर्ववृत्तान्त्ताचा विचार राष्ट्राध्यक्ष करतात. या सर्व गोष्टींवर जॉन ग्रिशॅम प्रकाश टाकतो. रोझेन बर्ग आणि जेसन यांच्यासारखे न्यायाधीश असल्यावर शासन व्यवस्था, घटना आणि न्याय यांची कशी गळचेपी होऊ शकते हे ही तो सूचित करतो. ‘ए पेलिकन ब्रीफ’ मधील घटनांचा कालावधी साधारण एक महिन्याचा आहे; आणि त्यात अमेरिकेतील विविध यंत्रणांचा सहभाग आहे. राष्ट्राध्यक्षाचे कार्यालय, सुप्रीम कोर्ट, एफबीआय, सीआयए, सॉलिसिटर फर्म्स, लॉ कॉलेजेस, वॉशिंग्टन पोस्टसारखे वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स, क्रेडीट कार्ड व फोन यामुळे कुणाचाही माग लावण्याची सुलभ सुविधा, विमानतळावरील कामकाजाची पद्धत, पर्यावरणवादी, दहशतवादी संघटना, भाडोत्री मारेकरी, गुप्तहेरांचे जाळे पन्नाससाठ व्यक्तिरेखांद्वारे हे सर्व समावेशक कथानक सतत उत्कंठा वाढेल अशा प्रकारे गुंफण्यातील ग्रिशॅमचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या व माहिती युगाच्या झपाट्यात साध्या साध्या गोष्टींमागेही किती गुंतागुंतीच्या यंत्रणेचे हितसंबंध दडलेले असतात - याचे थोडेफार दर्शन या कादंबरीत घडते; आणि ते आपल्या पायाखालची जमीन हिरावून घेण्याला पुरेसे ठरते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, (NASHIK) 11-05-2003

    एक खडतर आणि कंटाळवाणा प्रवास... ‘पेलिकन ब्रीफ’ ही शोध पत्रकारितेवर आधारित कादंबरी आहे. ३६५ पानांची. चांगली जाडजूड कादंबरीत असंख्य पात्रे आहेत. त्यांचा एकमेकांशी संदर्भ लावताना नाकी दम येतो. त्यांच्या नुसत्या नामावळीत बरीच जागा खर्ची पडेल. तेव्हा त्य भानगडीत न पडता कादंबरीचे अगदी थोडक्यात कथानक पुढीलप्रमाणे - पर्यावरणासंदर्भात अमेरिकेतील सुप्रीम कोर्टात खटला चालू असतो. खटला अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. ज्या खंडपीठासमोर हा खटला चालू आहे. त्यातील दोन न्यायाधीश पर्यावरणवादी आहेत. त्यांची नावे ‘रोझेनबर्ग’ आणि ‘जेन्सन’ त्यांच्यामुळे निकाल आपल्याविरोधात जाईल. अशी संबंधित पार्टीला भीती असते. त्यामुळे त्यांचे पद्धतशीरपणे खून केले जातात. पुराव्याचा मागमूसही उरत नाही. देशभर ही बातमी प्रसारमाध्यमांतून वाऱ्यासारखी पसरते. मोठा गोंधळ माजतो. हे खून कुणी केले असावते? शोध सुरू होतो. या खटल्याची पार्श्वभूमी अशी : अमेरिकेतील ‘लुउदीझियाना’ राज्यात सातव्या दशकाच्या उत्तरार्धात फ्लोरिडातून पेलिकन पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आली. आपल्याकडे त्याला सारस पक्षी म्हणतात. मासे हे त्यांचे एकमेव अन्न, पण जास्त पिके येण्यासाठी जे विविध उपाय योजले त्यात नवनवीन खतांबरोबर कीटकनाशकेही आलीच. पावसामुळे ते क्षारयुक्त पाणी नद्यामध्ये वाहून जात असे. ते माशांच्या पोटात जाई आणि ते मासे खाल्ल्यामुळे पेलिकन पक्षी मरत. अशा रितीने त्या पक्ष्यांची संख्या कमालीची रोडावत गेली. तिथे फक्त काही डझन पक्षी उरले. त्यात पुन्हा शेकडो एकर दलदल. या दलदलीखाली अमाप तेलसाठे असावेत. याचा अंदाज कारण काही ठिकाणी ते सापडलेही होते. म्हणून तो भूप्रदेश ताब्यात घ्यावा, ही ‘मॅटीस’ नावाच्या उद्योगपतीची महत्त्वाकांक्षा. त्यासाठी साम-दाम-दंड ही सर्व आयुधे वापरण्यात तो वाकबगार. त्यासाठी राजकाराण्यांना हाताशी धरणे आले. त्यातही तो वाकबगार असतो. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अध्यक्षांना त्याने बेचाळीस लाख डॉलर दिलेले असतात. अगदी पांढऱ्या पैशातून. पर्यावरणवादी न्यायालयात जातात. पण मॅटीस मोठा कावेबाज आणि धूर्त. तो उघडपणी कुठल्याच व्यवहारात नसतो. त्याला प्रत्यक्षात फारच थोडे लोक ओळखत असतात. अगदी त्याच्या व्यवहाराशी संबंधित असे निकटवर्ती. डझनवारी बेनामी कंपन्या त्याच्या असतात. सॉलीसिटर्सच्या मोठमोठ्या फर्म त्याच्यासाठी काम करीत असतात. मॅटीसचे नखही कुणाच्या दृष्टीस पडत नाही. तर अशा या मॅटीसने आपल्या हस्तकांकरवी वर उल्लेख केलेल्या न्यायाधीशांचा खून केलेला असावा. असा दाट संशय असतो पण पुरावा काय? ‘डॉर्बी शॉ’ या नावाची कायद्याची विद्यार्थिनी असते. तिला उत्सुकता निर्माण होते. हाताला लागतील ती संबंधित कागदपत्रे चाळून ती एक छोटासा अहवाल तयार करते. तेच हे ‘पेलिकन ब्रीफ’ त्यामागील सूत्रधाराचा छडा लावण्याचा ती प्रयत्न करते. तिला तो ध्यासच लागतो. ते ब्रीफ ‘व्हाईट हाऊस’पर्यंत पोहोचते. पण अध्यक्षांचे मन त्यांना खात असते. कारण त्यांनी मॅटीसकडून पैसे घेतलेले असतात. म्हणून ते ब्रीफ व्हाईट हाऊसच्या बाहेर जात नाही. तिथेच ते कडीकुलपात बंद होते. पण त्याची कुणकुण संबंधिताना लागतेच. संबंधित लोक तिच्या मागावर राहतात, कारण मूळ प्रत तिच्याजवळ असते. त्यामुळे येनकेन प्रकारेण तिला संपवले पाहिजे. हा ध्यास त्यांनी घेतलेला असतो. ती सतत वेश बदलते. जागा बदलते. केस कापून त्यांना रंगवून आपले रूपही बदलते. या धावपळीत तिची दमछाक होते. पण ती धीर सोडीत नाही. या धामधुमीत आणखीनही काही संशयितांचे खून पडतात. या धावपळीत ती आणखीनही पुरावे गोळा करते. या धावपळीत ग्रे ग्रॅथॅम नावाचा शोधपत्रकार तिला सतत साथ देतो. जणू तिची सावलीच. पुरावे गोळा करण्यात त्याची मोलाची मदत झालेली असते. त्याच्याच मदतीने ते ब्रीफ सर्व पुराव्यानिशी वॉशिग्टन पोस्ट या प्रमुख दैनिकाला देते. या दैनिकात ती बातमी ठळकपणे संबंधितांच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध होते. डार्वी शाली या जीवघेण्या धावपळीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा आलेला असतो. पण तिने आपले काम पूर्ण आणि चोखपणे केलेले असते. परंतु तिच्या जिवाला धोका असतोच. ती अज्ञातस्थळी निघून जाते. इथे कादंबरी संपते. अध्यक्षांना निवडणुकीसाठी अधिकृतपणे पैसे मिळालेले असतात. त्यामुळे त्यांना तूर्त तरी काहीच झळ पोहोचत नाही. पुढच्या निवडणुकीच्या वेळी बघत येईल. मॅटीस तर कुठेच अधिकृतपणे वावरत नाही. खून नेमके कुणी केले. हेही उलगडत नाही. कारण त्या माणसांचाही खून झालेला असावा. फक्त या सर्व प्रकरणात मॅटीसचा हात असावा. या अंदाजाला पुष्टी मिळते. शोध पत्रकारितेत विलक्षण धावपळ करावी लागते. प्रसंगी जीवही धोक्यात घालावा लागतो हे ‘तहलका’ प्रकरणात आपल्यालाही आता माहीत झाले आहे. शोध पत्रकारितेचे महत्त्व पटविणे हाच या कादंबरीचा प्रधान किंबहुना एकमेव हेतू आहे. कादंबरी विलक्षण कंटाळवाणी आहे. तीत असंख्य पात्रे आहेत. त्यांचे एकमेकाशी संबंध जुळवताना नाकी दम येतो, हे वर सांगितलेच आहे. त्यामुळे साहजिकच कथानकाचा ओघ कुंठीत होतो. कादंबरी घटनाप्रधान आहे. घटनाप्रधान कादंबरीत लेखनशैली वगैरे प्रकार बघायचे नसतात. जशी कादंबरी, तसा अनुवाद खरे तर हो अनुवाद नव्हेच. हे सरळसरळ शब्दश: भाषांतर वाटते. डोक्याला किंचितही ताण न देता अनुवादकाने ती जशीच्या तशी भाषांतरित केली असावी. त्यामुळे ते भाषांतर निरस आणि रटाळ वाटते. कधी संपूच नये असे वाटते ते चांगले लिखाण आणि कधी एकदाचे संपेल असे वाटते. ते रटाळ लिखाण. ही कादंबरी दुसऱ्या प्रकारात मोडते. थोडक्यात ‘पेलिकन ब्रीफ’ म्हणजे एक खडतर आणि कंटाळवाणा प्रवास आहे. -वसंत जहागिरदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-03-2003

    एक तर्कशुद्ध रहस्यकथा... जॉन ग्रिशॅम यांची कादंबरी म्हणजे मोठमोठ्या फर्म्स, तेथील कृष्णकारस्थाने, अचाट बुद्धिकौशल्य, गुन्हेगारी व न्यायालयातील खळबळजनक खटले असतात. ‘द पेलिकन ब्रीफ’ ही त्यांची कादंबरीही याला अपवाद नाही. वॉशिग्टनमधील एका चित्रपटगृहात एा प्रेक्षकाचा खून होतो, सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश नाहीसे होतात आणि नायिका या घटनांच्या खोलाशी जाऊन गुन्ह्याची उकल करते. पण त्यामुळे सत्तेलाच आव्हान निर्माण होते आणि पुढे कथा वळण घेते. नायिकेच्या शोधाचा वापर कुणीतरी करून घेते. मग एका पत्रकाराच्या मदतीने ती सत्याचा शोध घेऊ पाहते. मग सुरू होतो संघर्ष ग्रिशॅमची आणखी एक तर्कशुद्ध कादंबरी वाचनाचा आनंद ‘पेलिकन’ देते. रवींद्र गुर्जर यांनी आपल्या नेहमीच्या सहजशैलीत कादंबरीचा सुरेख अनुवाद हाती दिला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more