* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PRECIOUS RAMOTSWE, THE ESTEEMED PROPRIETOR OF THE NO. 1 LADIES’ DETECTIVE AGENCY, NOW FACES HER GREATEST CHALLENGE YET: A VACATION! BUSINESS IS SLOW AT THE AGENCY—SO SLOW IN FACT THAT, FOR THE FIRST TIME IN HER DISTINGUISHED CAREER, MMA RAMOTSWE HAS RELUCTANTLY AGREED TO TAKE A HOLIDAY. THE WEEK OF UNINTERRUPTED PEACE IS CUT SHORT, HOWEVER, WHEN SHE MEETS SAMUEL, A WAYWARD YOUNG BOY WITH A TROUBLED PAST. MOREOVER, MMA RAMOTSWE CAN’T HELP BUT WONDER HOW THE AGENCY IS FARING IN HER ABSENCE. HER WORRIES GROW WHEN SHE DISCOVERS THAT MMA MAKUTSI IS HANDLING A RATHER DELICATE CASE. ULTIMATELY, THE SITUATION WILL REQUIRE MMA RAMOTSWE TO DRAW UPON HER KINDNESS, GENEROSITY, AND GOOD SENSE, AND WILL SERVE TO REMIND THEM ALL THAT ORDINARY HUMAN FAILINGS SHOULD BE TREATED WITH A LARGE HELPING OF CHARITY AND COMPASSION.
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THENO.1LADIESDETECTIVEAGENCY #THENO.1LADIESDETECTIVEAGENCY #दनंबवनलेडिजडिटेक्टिव्हएजन्सी #FICTIONTRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #ALEXANDERMCCALLSMITH #अलेक्झांडरमॅक्कॉल स्मिथ "
Customer Reviews
  • Rating Starकुसुमताई

    तू अनुवादित केलेले `द नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी` हे पुस्तक वाचले. आफ्रिकेतील बोटस्वानातील एका कृष्णवर्णीय महिलेची ही कथा. कथा मूळ इंग्लिशमधून आहे पण वाचताना आपण भाषांतर वाचतो आहोत असं मुळीसुद्धा जाणवत नाही. मूळ भाषा नीट आत्मसात झाल्याशिवायअनुवाद उत्तम उतरणार नाही. त्याबद्दल अभिनंदन! नायिकेचं नाव, गाव, प्रदेश, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती आफ्रिकेतील असूनही भाषांतरात कुठेही बोजडपणा जाणवत नाही. काम फत्ते होणं, दूधखूळ्या समजणे, काळजीने मेंदूचा भुगा होणे असे शब्दप्रयोग सहजरीत्या येतात. कोणत्याही देशात जा, स्त्रियांची परिस्थिती थोड्याफार फरकाने तीच. पण स्त्री जाग येऊन उठली की तिचे कर्तृत्व कसे नेत्रदीपक ठरते हे प्रेश्यसच्या कहाणीवरून कळून येते. आफ्रिकेतील खाण मजुरांची दु:खे, गोऱ्यांची अरेरावी पण त्यातही एखादा सहृदयी निघतो. प्रेश्यसचे आईविना वाढणे, वडिलांचे प्रेम, प्रेम-विवाह,लग्नबंधन त्रासदायक पण वडिलांचे सहाय्य. या सर्व घटना छान मांडली आहेत. तुझ्या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेक शुभेच्छा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more