* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`MINDGYM` TRANSLATION IN MARATHI `MANACHI VYAYAMSHALA` BY SHYAM BHURKE. IN MUCH OF OUR LIVES, OUR MIND OPERATE ON AUTOPILOT. RATHER LIKE THE TOURIST WHO REPEATS THE SAME WORLDS LOUDER EACH TIME THE LOCAL DOES NOT UNDERSTAND, WE TEND TO CONTINNUE THINKING AND BEHAVING IN SIMILOR WAYS, EVEN IF THIS IS NOT GETING US WHAT WE WANT. HOWEVER ONCE WE CAN SPOT THESE HABBITS WE CAN CHANGE THEM. AS A RESULT, WE ARE WORK LIKELY TO - ACHIVE MORE IN LESS TIME. - GAIN ENERGY AND HAVE LESS NEGATIVE STRESS. - RESOLVE DIFFICULT CHALLENGES. - ENJOY LIFE. HARE ARE HUNDRED OF PRACTICAL TIPS AND TECHNIQUES BASED ON APPLIED PSYCHOLOGY ARE PACKED INTO THIS BOOK.
इथे सांगितलेल्या प्रयोगांचा सराव करा! आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत राहतो; ठरविल्याप्रमाणेच वागत राहतो. आपल्याला जे हवं ते साध्य होत नसतानाही त्याच चाकोरीतील आपली वागणूक सोडायला आपण तयार होत नाही. मनाच्या ह्या सवयीवर एकदा का आपण लक्ष केंद्रित केलं की मग आपल्याला हवे ते बदल दिसू लागतील. मग चांगले परिणाम दिसतील - * थोड्या वेळात मोठी कामे होतील. * तणाव नाहीसे होतील. उत्साह वाटेल. * कठीण आव्हाने पेलाल. * आपल्या मताशी सभोवतालचे लोक सहमत होतील. * जीवन आनंदी होईल. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी या मनाच्या कार्यशाळेतील अर्थात माइंड जिममधील प्रयोग केलेत आणि मग इतरांना ते करण्याची शिफारस केलीय. मानसशास्त्रावर आधारित अशा शेकडो युक्त्या प्रथमच इथे आपणासाठी मांडल्यात. तसंच आपण `द माइंड जिम` ऑनलाइनचा लाभ आपल्या वैयक्तिक मोफत सदस्यत्व क्रमांकात घेऊ शकता - THE MIND GYM ONLINE
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEMINDGYM #SHYAMBHURKE #द माइंड जिम #
Customer Reviews
  • Rating Starमोहन बापट

    व्यायामशाळा मनाची हे पुस्तक अलीकडेच वाचायला मिळाले. पुस्तक कसे वाचावे- कशाकरीता वाचावे व का वाचावे यांचे सुंदर मार्गदर्शन या पुस्तकात आहे. इथं मानसशास्त्र आहे आणि सोप्या शब्दांत त्याचे विवरण केले गेले आहे. व्यवहारी जीवनात येणारी अनेक प्रकारची संकटे प्रश्न, ताणतणाव यांचे निराकरण कसे करावे व आनंदी जीवन कसे अनुभवावे याचे पाठ दिले आहेत. प्रश्न व त्यावरील उत्तरे या पुस्तकात सापडतात. व्यवहारवाद, चातुर्य, विज्ञानवाद, सकारात्मक दृष्टिकोन याची आजच्या धावपळीच्या जीवनात अतिशय गरज आहे. या पुस्तकातून ते साध्य होईल. चौकटीबाहेरचे विचार व निर्णय अंतीम यश संपादन करण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी व भाषा दर्जेदार आहे. समारोपाचे शब्द वाचकमंडळींनी आत्मसात करावे व पुस्तकाचा आनंद घ्यावा. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    प्रकृती उत्तम ठेवण्यात मनाची भूमिका महत्त्वाची… ‘‘प्रकृती उत्तम ठेवण्यात मानवी मनाची भूमिका महत्त्वाची असते. मानवाला व्यक्तिगत आणि सामाजिक अशी दोन मने असतात. समर्पण, करुणा, त्याग, प्रेम या भावनेतून व्यक्तिगत मनाची, तर सहकारातून सामाजिक उन्नती होते. ा दोन्ही मनांची उन्नती साधता आली पाहिजे.’’ असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी आज येथे व्यक्त केले. मेहता पब्लिकेशनतर्फे श्याम भुर्के अनुवादित ‘द मार्इंड जिम’या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे संपादक (साहित्य, कला, संस्कृती) सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. श्याम भुर्के आणि मेहता पब्लिकेशनचे सुनील मेहता या प्रसंगी उपस्थित होते. विविध प्रकारची दुखणी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात. पण त्यातील ८५ टक्के आजारांचे मूळ मानसिक अस्वस्थतेत असते,’’ असे सांगून डॉ. सरदेसाई यांनी मनाचे स्वास्थ्य याबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात दरी निर्माण झाल्यास मन अस्वस्थ होते. माणसाला विचार करायला लावणारे मन हे इंद्रिय आहे, तर विचार हा एक तरंग आहे. तरंग स्थल आणि कालबद्ध असतात. तरंग माणसाच्या प्रज्ञेवर अवलंबून असतात. प्रत्येक विचाराला आयुष्य आहे. जो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार आणि व्यक्तीही मोठी होते.’’ पाध्ये म्हणाले, ‘‘मानवास अहंकारामुळे अपयश येते. तो सोडून आवश्यक तिथे तडजोड, बुद्धीचा वापर केला पाहिजे. वास्तवाचा नेमकेपणाने विचार करण्याची गरज आहे.’’ असे सांगून आपल्याकडे ज्ञान आहे, पण निर्णयापर्यंत जाण्याची क्षमता नाही. मनाच्या तालमीसाठी जेवढे कष्ट घ्याल, तेवढे बुद्धीसाठी ही आवश्यक आहेत.’’ असेही ते म्हणाले. भुर्के यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘‘व्यायाम हा शरीराशी संबंधिक आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण या पुस्तकामध्ये मनाच्या व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.’’ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book