* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALWAYS AIM FOR HIGH THINGS AND TRY TO ACHIEVE MORE THAN THAT. MILLIONS OF PEOPLE HAVE IMPROVED THEIR LIVES AFTER READING THIS BOOK, `THE MAGIC OF THINKING BIG`. DR. SCHWARTZ WHO IS A LEADING EXPERT IN THE FIELD OF `MOTIVATION`; WILL HELP YOU TO INCREASE YOUR SELL, IMPROVE YOUR ADMINISTRATION, EARN MORE MONEY AND BEST OF ALL, GAIN MORE SATISFACTION AND PEACE OF MIND THROUGH YOUR WORK. THIS BOOK `THE MAGIC OF THINKING BIG` IS NOT FULL WITH FOUL PROMISES; ON THE CONTRARY IT EXPLORES THE PRACTICAL APPROACHES WHICH ARE EASY TO TRY AND WHICH GIVE 100% RESULT. ONE OF THE BEST PARTS OF THE BOOK IS EACH AND EVERY IDEA AND TECHNIQUE IS NEW AND INDEPENDENT. THE AUTHOR HAS CREATED A WHOLE SET OF NEW WORDS RELATED TO THIS BOOK. DR. SCHWARTZ PRESENTS BEFORE US A WELL-PLANNED PROGRAMME TO MANAGE OUR SERVICE, BUSINESS, MARRIED LIFE, FAMILY LIFE, SOCIAL LIFE AND CULTURAL LIFE. FOR ACHIEVING THIS, YOU NEED NOT HAVE EXTRAORDINARY INTELLIGENCE OR A VERY INNOVATIVE MIND. WHAT YOU REALLY NEED IS THE WAY TO THINK ABOUT HOW TO ACHIEVE SUCCESS AND LATER PRACTICE IT. HE HAS ALREADY PROVED IT AND THROUGH THIS BOOK HE HAS REVEALED THE SECRETS OF THIS SUCCESS FOR YOU TO PRACTICE.
उच्चीची ध्येयं आपल्यासमोर ठेवा... आणि मग त्याहीपेक्षा अधिक साध्य करा! ‘द मॅजिक ऑफ थिंकींग बिग’ हे पुस्तक वाचून जगभरातल्या लक्षावधी लोकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणलेली आहे. प्रेरणा (स्दूग्न्Aूग्दह) या विषयावरचे एक आघाडीचे तज्ज्ञ म्हणून मान्यता असलेले डॉ. श्वात्र्झ, तुम्हाला अधिक चांगली विक्री करण्यासाठी, अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यात, अधिक पैसा मिळवण्यात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अधिक समाधान आणि मन:शांती मिळवण्यामध्ये, या पुस्तकाद्वारे मदत करतात. ‘द मॅजिक ऑफ थिंकींग बिग’ या पुस्तकात तुम्हाला निव्वळ पोकळ आश्वासनं नाही, तर व्यवहार्य, प्रत्यक्ष करून पाहण्याजोग्या पद्धती सापडतात. यातल्या कल्पना आणि तंत्रं इतकी स्वतंत्र प्रज्ञेची आहेत, की त्या समजावून सांगण्याकरता लेखकाला एक संपूर्णपणे नवा शब्दसंग्रहच निर्माण करण्याची गरज पडलेली आहे. नोकरी वा उद्योग, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच बाबतीत भव्य प्रमाणात जगण्याचा एक सुनियोजित कार्यक्रमच डॉ. श्वात्र्झ आपल्यासमोर सादर करतात. आपल्या आसपासच्या इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुमच्याजवळ अफाट बुद्धिमत्ता विंÂवा महान प्रतिभा असण्याची गरज नाही. गरज आहे ती यश मिळवून देणाऱ्या पद्धतीनं विचार आणि आचार करण्याची, हे ते सिद्ध करून दाखवतात. आणि हे कसं साध्य करायचं, याची गुपितं हे पुस्तक तुम्हाला पुरवतं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THE MAGIC OF THINKINGBIG #PRASHANTTALANIKAR#DAVID.SCHWARTZ
Customer Reviews
  • Rating StarPrashant Chaudhari

    सकारात्मक ऊर्जा; एक नवा विश्वास.

  • Rating StarAtul Pahurkar

    What i learn from this book लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. या बाबतीत चुकारपणा केल्यास, तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे इतरांना वाटू शकेल. २. तुमच्या सहवासात कुणावर ताण येणार नाही अशी सुखद व्यक्ती बना. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा ाणूस बना. ३. शांतपणा आणि गडबडून न जाणं, हे गुण आत्मसात करा म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही. ४. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं, अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध राहा. ५. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगलं मिळेल, अशी गुणसंपन्न व्यक्ती बना. ६. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांचा अभ्यास करा. ७. तुमच्यात पूर्वी वा आता असलेला एकूणएक गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला खुपत असतील वा जखमांसारख्या ठसठसत असतील, त्यांचं निराकरण करा. ८. लोकांची खरी आवड निर्माण होईपर्यंत, त्यांना आवडून घेण्याचा सराव करा. ९. कुणीही काहीही साध्य केलं किंवा त्याला वा तिला कुठल्याही प्रकारचं यश मिळालं, तर त्यांचं अभिनंदन करण्याची संधी सोडू नका. तसेच, कुणाच्याही दुःखाच्या वा निराशेच्या प्रसंगी त्याचं सांत्वन करायला, त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करायला विसरू नका. १०. लोकांना आत्मिक बळ द्या म्हणजे त्यांचं सच्चं प्रेम तुम्हाला मिळेल. ...Read more

  • Rating Starजयंत कोल्हटकर, बंगलोर

    आपण बऱ्याच गोष्टी, आपल्या स्वत:च्या नैसर्गिकतेनुसार आचरणांत आणत असतो. व्यक्ती म्हणून मोठ्ठं होण्याचा सकारात्मक प्रयत्न करत असतो. उच्च ठिकाणी आत्मविश्वासाने प्रयत्न करून पोहोचतो, असे घडले आहे. पण या दीर्घ प्रयत्नांचे योग्य शब्दांकन, आपण अनुवादित केलेलया `द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग` या अभ्यासपूर्ण पुस्तकात आहे. वाचलेली पाने पुन:पुन्हा वाचून, अनेक मुद्द्यांचं कोंदण केले. दहा दिवस अनेक उदाहरण व्यक्तींच्या जीवनांत डोकावल्याने अवर्णनीय आनंद झाला. पुन:प्रत्यय आला. एकूणच, `चिकटला (नोकरीत) आणि लटकला` ह्या मराठी बाण्याला आपण मार्ग दाखविला आहे. माझ्या अमूल्य ग्रंथांमध्ये एक असाधारण ग्रंथ सामील झाला. २५ ते ४० वयोगटातील व्यक्तींना मी हे पुस्तक अवश्य वाचावयास देईन. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 12-02-2006

    यशस्वितेचा राजमार्ग... दि मॅजिक ऑफ द थिंकिंग बिग (भव्य विचार करण्याची जादू) हे डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ यांचे बेस्ट सेलर पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद प्रशांत तळणीकर यांनी केला आहे. पुस्तकाच्या शीर्षकातच आपले विचार, आपल्या कल्पना भव्य हव्या हे सूचित ेले आहे. अशा विशाल, भव्य, व्यापक, विचार कल्पनांमुळे मोठी किमया घडून येते. त्यामध्ये अद्भूत, विलक्षण शक्ती किंवा जादू असते. त्यामुळे मोठे परिवर्तन घडून येऊ शकते, याकडे हे शीर्षक लक्ष वेधते. हा भव्य विचार आपण प्रत्येक बाबतीत करू शकतो. करावा. आपली आत्मप्रतिमा आपण उन्नत स्तरावर न्यावी; आपले ध्येय व उद्दिष्ट भव्य असावे, आपला आत्मविश्वास वाढावा, आपली कार्यप्रवणता वाढावी, उत्तम कृती घडून यावी आणि इतरांपेक्षा अधिक काहीतरी आपण करून दाखवावे, यशस्वी व्हावे... याला प्रेरक ठरणारे एकूण वातावरण आपण निर्माण करावे, हे या पुस्तकाद्वारे अधोरेखित केले जाते. नो फेल्युअर बट लो एम इज क्राईम - अपयश हा गुन्हा नव्हे, अल्प वा क्षुल्लक आकांक्षा हा गुन्हा नव्हे, ध्येय नेहमी उच्च आणि उदात्त हवे. जगात चांगलं किंवा वाईट असं काहीही नसतं. आपण ज्या प्रकारे विचार करतो. त्यावरून एखाद्या गोष्टीवर आपण चांगल्या वाईटपणाचा शिक्का मारत असतो. असे शेक्सपिअर म्हणतो, तेव्हा आपणास आश्चर्य वाटते. आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या, यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकला, त्या यशाला पायाभूत ठरलेल्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षात येते? डेव्हीड श्वार्त्झ यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना भव्य विचार करण्याची क्षमता, मोठं यश मिळवण्याची जिद्द ते भव्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य त्या साधनांचा किंवा मार्गाचा अवलंब करण्याची क्षमता याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. हे संपूर्ण पुस्तक या सूत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरवते. त्यासाठी सोप्या पद्धती सुचवते. या सोप्या पद्धती जगात कुठेही आणि केव्हाही काम करतात. जादूसारख्या चमत्कार करून दाखवतात, असा लेखकाचा आत्मविश्वास आहे. ‘भव्य विचार कराल तर भव्य जीवन जगाल. अधिक आनंद मिळवाल. पैसा, मित्र, मान-सन्मान, यश यादृष्टीने समृद्ध जीवन जगाल, अशी धारणा लेखक व्यक्त करतो. या पुस्तकातील प्रकरणांच्या मांडणीतून या सर्व सोप्या पद्धती स्पष्ट होत जातात. एकापुढे एक तर्कसंगत असा युक्तिवाद त्यातून समोर येतो. १. आपण यशस्वी होणार, असा आत्मविश्वास बाळगा. २. कारणेरिया (अपयशाबद्दल इतरांना दोष देत बसणे, कारणे सांगत बसणे) या रोगापासून सोडवणूक करून घ्या. ३. आत्मविश्वास वाढवा. भयाला हद्दपार करा. ४. भव्य विचार करा. तो करण्यासाठी पाळावयाची पथ्ये कोणती? ५. सृजनात्मक विचार करा. सर्जनशील स्वप्ने बघा. ६. तुमची आत्मप्रतिमा जी असेल, ती प्रत्येक बाबतीत निर्णायक ठरते. तुम्ही स्वत:ला जे समजता, तेच तुम्ही असता; तेच तुम्ही बनता. ७. तुमच्या भोवतालच्या वातावरणाचं योग्य व्यवस्थापन करा. ते करताना उच्च दर्जाची कास धरा. ८. तुमच्या मनोभूमिकेचा विधायक उपयोग करून घ्या. ९. इतर लोकांबद्दल विचार करताना तो सकारात्मक राहील, अशी काळजी घ्या. १०. कृतिशील रहा. ११. पराजयाचे रूपांतर विजयात करणे शक्य असते. ते कसे होऊ शकते? १२. स्वत:ची प्रगती साधण्यासाठी ध्येयांचा उपयोग करा. १३. नेत्यासारखा विचार करा. नेतृत्वगुणांचा वापर करा. भव्य विचार, भव्य उद्दिष्ट, भव्य प्रयत्न आणि भव्य यश यांचा ध्यास घेतला तर त्यात तुम्ही सफल होऊ शकता. यश म्हणजे सुंदर, चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट. यश म्हणजे सुंदर घर, भरपूर सुखसोयी, भरपूर प्रवाह, नवनव्या वस्तू. यश म्हणजे मुलाबाळांना विकासासाठी उत्तम वातावरण. यश म्हणजे नेतृत्व. व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान. यश म्हणजे स्वातंत्र्य, आत्मसन्मान, आनंद, समाधान. यश म्हणजे सिद्धी, विजय, पराक्रम. तुमचं मन म्हणजे विचारांचा कारखाना. भव्य विचार करा. संकुचित विचार टाका असे लेखक सुचवतो. तेव्हा आपण त्यादृष्टीने आरंभ कसा करावा, असा प्रश्न पडला तर तो स्वाभाविकच होय. त्यासाठी काही सोपे मार्ग चोखाळता येतात. आपण विचार करताना सकारात्मक असतो की नकारात्मक हे प्रथम जाणवून घ्या. म्हणजेच स्वत:ला जाणून घ्या. स्वत:चीच अशी चाचपणी करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यातील पाच मुख्य चांगल्या गोष्टी शोधून काढा. चांगल्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक पात्रता, कार्यानुभव, तांत्रिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, सुखी कौटुंबिक जीवन, नेतृत्वगुण, विधायक मानसिकता, मित्रमंडळी, आत्मविश्वास इत्यादी आणि त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीखाली ज्याची अंगी तुमच्याएवढ्या प्रमाणात त्या नाहीत, पण तरं ज्यांनी सश मिळवलेलं आहे अशा तुमच्या माहितीतल्या किमान तीन-तीन अत्यंत सशस्वी म्हणता येईल अशा व्यक्तींची नावे लिहा. या प्रक्रियेतून तुमच्या लक्षात एक गोष्ट नक्की येईल की अनेक यशस्वी लोकापेक्षा किमान एखाद्या बाबतीत तरी वरचढ आहात तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात. तेव्हा तुमचे विचार तुमच्या मोठेपण जुळवून घ्या. तुम्ही जितके मोठे आहात, तेव्हा भव्य विचार करा. आपली स्वत:ची आत्मप्रतिमा विशाल, सकारात्मक करणे; समोर उच्च, भव्य ध्येय ठेवणे, आपली प्रतिमा लोकांना आवडेल अशा प्रकारे तयार करणे, मित्र व सहकारी यांच्या सकारात्मक दृष्टीने बघणे आणि आपल्या भव्य विचारांना कृतीत आणण्यासाठी आत या क्षणापासून आरंभ करणे असा हा मार्ग या पुस्तकाद्वारे आपल्यासाठी खुला होत आहे लेखकाने विवेचन करताना अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातून मानवी स्वभावाचे, वृत्ती वेगवेगळे नमुने पेश केले आहेत. निरनिराळ्या संस्थांच्या अडचणींचे व त्यातून त्यांनी काढलेल्या उत्तराचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे हे पुस्तक तुमच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊ शकेल. आसपासच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुम्ही फार प्रतिभावंत, बुद्धिमान आणि उपजत हुशार असायला हवे, असे नाही. यश मिळवून देणे, भव्य विचारांना कृतीची जोड देऊन, त्याचा सुनियोजित कार्यक्रमच या पुस्तकाद्वारे तुम्हा आत्मसात करता येईल. त्यायोगे आपल्या भावी आयुष्याला एक यशस्वी, सकारात्मक सुंदर आकृतिबंध देता येईल. -संदीप अडनाईक ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more