THE GOLDEN RENDEZVOUS by Alistair MacLean

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE GOLDEN RENDEZVOUS
 • Availability : Available
 • Translators : Ashok Padhye
 • ISBN : 9788177664911
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 308
 • Language : Translated into Marathi
 • Category : Fiction
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE PLAY
Quantity
It was a cargo ship, but some of its space was reserved for the very rich people. There were spacious cabins, bars full of variety of drinks, dance hall, and also the facility of wireless services for their share business. All of a sudden, one by one the mariners start dying, mysteriously. No one is able to find out the mystery, the captain is terrified, but one of his colleagues comes across a clue, he gets alert. This cargo ship was intending to meet another cargo ship in the midst of the ocean, there was a treasure hidden on that other cargo ship. One scientist has run away with a self made nuclear bomb along with the missile. There is a co-relation between all these incidents. There is some plot, some conspiracy. Only one officer amongst all wants to tear it open, he takes his first step towards it and... There was a drama unfolding on the vast stage of the ocean, there was a love story taking place along with. A novel presenting the adventurous but secluded life on a ship, full of mystery and emotions, raising your yearning.
ते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. .... अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला... पण त्याच्या हाताखालचा एक अधिकारी सावध होता. शेवटी ते जहाज दुस-या एका मालवाहू जहाजाच्या मार्गाला भिडू पाहत होते. त्या जहाजावर खजिना होता... ....एक शास्त्रज्ञ आपणच बनवलेल्या एका अणुबॉम्बसहीत क्षेपणास्त्राला घेऊन पळून गेला... या सर्वांचा एकमेकांशी संबंध येत होता. एक फार मोठा कट राबवला जात होता. फक्त एक अधिकारी तो कट उधळून टाकण्याच्या दिशेने पावले टाकू लागला आणि अचानक... त्या समुद्राच्या पाण्यावर एक नाट्य घडत होते. त्या नाट्यात एक प्रेमप्रकरणही फुलत होते. बोटीवरील जीवनाचे दर्शन घडवणा-या रहस्यमय, उत्कंठावर्धक, कादंबरीचा खिळवून ठेवणारा अनुवाद.
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAMANA 11-03-2005

  अ‍ॅलिस्टर मॅक्लिन या इंग्रजी लेखकाच्या ‘फिअर इज द की’ व ‘द गोल्डन गेट’ या दोन प्रसिद्ध कादंबऱ्यांच्या अनुवादानंतर त्यांच्या ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या तिसऱ्या कादंबरीचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. सकस अनुवादित साहित्य देण्याच्या आप्या परंपरेत मेहता प्रकाशनने घातलेली ही नवी भर वाचकांचे मन खिळवून ठेवणारी अशीच आहे. प्रस्तुत अनुवादामुळे बोटीवरचे अद्भुतरम्य विश्व आणि समुद्राच्या पाण्यावर घडणारे एक थरारनाट्य उलगडत गेले आहे. ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबरीत फक्त एका बोटीवर एका आठवड्यात घडणाऱ्या घटना दाखविल्या आहेत. खलनायकाच्या चातुर्याचे वारंवार दर्शन होत असले तरी त्याच्या चालबाज कारवायांना पुरून उरणारा आणि आपल्या चातुर्यबळाने खलनायकावर मात करणारा नायक इथे आढळतो. नायक-खलनायक यांच्यात घडलेली बौद्धिक झुंज विलक्षण वेग धारण करून वाचकांच्या मनातील उत्कंठा सतत ताणून ठेवते. हळूहळू तर वाचकालाही आपण त्याच बोटीवरचे एक सहप्रवासी असून ते थरारनाट्य प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होऊ लागतो. असे सामर्थ्य लेखकात आणि अर्थातच अनुवादकातही आढळते. अशोक पाध्ये यांच्या सशक्त अनुवादामुळे मराठी वाचकांना हा सुखद अनुभव घेता आला आहे. स्कॉटलंडमधील एका धर्मगुरूच्या पोटी जन्माला आलेल्या अ‍ॅलिस्टर मॅक्लिनने तरुण वयात नौदलात प्रवेश केला तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. अ‍ॅलिस्टरने या जहाजावरील जगाचे खूप बारकाईने निरीक्षण केले व पुढे ते आपल्या कादंबऱ्यांतून रसरशीतपणे सादर केले. आपल्या लेखनकलेच्या गुणवत्तेमुळे अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या कादंबऱ्यांनी तुफान यश मिळविले आणि आता त्या गाजलेल्या कादंबऱ्या मराठी भाषेत तेवढ्याच ताकदीने आणणारे अनुवादक अशोक पाध्ये दोन भाषांमधला हा पूल समर्थपणे बांधू शकले आहेत. कादंबरीच्या प्रारंभास ‘सुरुवात करण्यापूर्वी’ हे पहिलेच प्रकरण खूप महत्त्वाचे ठरते. या पहिल्याच प्रकरणातून ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ ही ‘सोनेरी संकेत स्थळ’ याअर्थी असलेली कादंबरी वाचण्यापूर्वी अ‍ॅफ्ट, ऑल्डिस मेसेज, आय, आय सर, बॅफल, बोट, बोट्समन, बो, ब्रिज, कॅम्पनिअन वे, डिटोनेटर, गँग वे, मेट, मास्टर पर्सर, पोर्टसाइड, एस.ओ.एस., स्टार बोर्ड, स्ट्युअर्ड, विंच ऑपरेटर इत्यादी शब्दांशी आपली ओळख करून दिली जाते व तिथेच वाचकाला आपण एका वेगळ्या विश्वाला सामोरे जात असल्याची खूण पटायला लागते. कॅप्टन ब्युलन, डॉ. स्लिग्न्जबी कॅरोलिन, बेरिस फोर्ड, सुसान, मॅकडोनल्ड, मिग्वेल करेरा, डॉ. मास्र्टन, टॉमी विल्सन सिन्योर करेरा आणि मिस्टर कार्टर या व्यक्तिरेखांच्या झटापटीचे, बौद्धिक लढाईचे तसेच कम्पारी बोट आणि टिकॉण्डरोगा ही एक अजस्त्र मालवाहू बोट या बोटींदरम्यान प्रत्यही घडणाऱ्या नाट्यरंगातही वाचकाचे मन प्रथमपासूनच बुडू लागले असते. सरकारी सोन्याचा प्रचंड साठा हलविण्याचे कटकारस्थान हा कथानकाचा मुख्य भाग असला तरी त्यामागच्या हाताळणींची सारी सूत्रे व चरित्ररेखा अतिशय ताकदीने रंगविण्यात आली आहेत. तसेच एका प्रेमकथेचे नाजूक विणकामही याच धुनश्चक्रीत सुरू झालेले असते. ‘अ‍ॅलिस्टर मॅक्लिन’च्या ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या अत्युत्तम कादंबरीचा तेवढाच रसाळ अनुवाद पाध्ये यांनी करून मराठी वाचकांसाठी समुद्रीसफर, सफरीतले जीवन यांची उत्तम शैलीत ओळख करून देत समुद्राच्या पाण्यावर रंगणाऱ्या थरारनाट्याच्या नानाविध रंगांचे दर्शन घडविले आहे. -डॉ. शुभा चिटणीस ...Read more

 • Rating StarDAINIK LOKSATTA 16-10-2005

  साहसाचा रोमांचक अनुभव... वाचकांना आवडणाऱ्या लेखकांमध्ये अ‍ॅलिस्टर मॅक्लीन याचे नाव आवर्जून घ्यावे असे आहे. वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर होईल, शिवाय त्यांना वेगळ्याच प्रकारच्या विषयाचा, जीवनाचा परिचयही होईल अशा प्रकारे मॅक्लीनच्या कादंबऱ्यांची घडण असत. मनोरंजनासाठी वाचन करणाऱ्यांना दोन प्रकारच्या कादंबऱ्यांत विशेष रस असतो. रहस्यमय आणि देमार म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना, हाणामाऱ्यांचे प्रसंग, द्वंद्वांची चटकदार, थरारून टाकणारी वर्णने त्यांना पसंत असतात. यातला खलनायक सुरवातीपासूनच वाचकांना माहीत असतो. तरीही कथानायक कशा प्रकारे त्याच्यावर मात करणार याचा अंदाज वाचकाला सहजी येत नाही. जेम्स बाँड या नायकाच्या कादंबऱ्या या प्रकारच्या रहस्यमय कादंबऱ्यात नायकाप्रमाणेच वाचकाही खलनायक वा क्रूरकर्मा, निदर्य पण चतुर आणि अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीची शोध घेतात. तो लागतो तेव्हा वाचकांना काहीसा धक्का बसतो. कारण त्यांची त्या व्यक्तीबाबतची अपेक्षा वेगळीच असते. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या दोन्ही प्रकारांचे चटकदार मिश्रण तयार करतो. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ या न्यायाने वाचकांना दुहेरी समाधान मिळते. शिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबऱ्यातील प्रतिस्पर्धी जास्त करून बुद्धिमत्तेच्या आधारावर डावप्रतिडाव रचत असतात. त्यामुळे त्यातील बारकावे वेळीच लक्षात आले, तर खलनायकाची ओळख थोडी लवकर पटते, असे असले तरी कथानायक त्या खलपुरुषाचे खरे रूप कसे उघड करतो, हे कुतूहल कायम राहतेच. अनुवादकार अशोक पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या मॅक्लीनच्या ‘द डार्क क्रूसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील मनोगतात पाध्ये यांनीही मॅक्लीनच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते म्हणतात : सुष्ट आणि दुष्ट हा जो अनादिकाळापासूनचा संघर्ष आहे. तोच त्यांच्या (मॅक्लीनच्या) कादंबऱ्यात दाखविलेला असतो. तसे हे नेहमीचेच आहे. कादंबरीतील दुष्ट खलनायक हा प्रस्थापित यंत्रणेवरती अत्यंत चातुर्याने व हुशारीने कब्जा करतो. सरकार, पोलीस, सुरक्षाव्यवस्था या सर्वांना भारी ठरतो. नीतिवान माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा, शौर्य इ. वर तो अशी काही मात करतो की, प्रस्थापित यंत्रणा हतबल होते, सरकार नमते व हळूहळू त्याच्याकडे विजयश्री माळ घेऊन येते. केवळ एकटा माणूस अक्कलहुशारीने सर्वांचा ताबा घेतो. त्याच्यावर मात करायची, तर तुम्हाला तीच प्रस्थापित यंत्रणा वापरणे भाग आहे. मग ते सरकार असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल, नाहीतर सामाजिक व्यवस्था असेल. अन् इथून पुढे मॅक्लीनचे खरे कौशल्य आहे. ज्या यंत्रणेचा ताबा घेतला, त्याच यंत्रणेच्या शस्त्राने त्या खलनायकाशी संघर्ष करायचा ही एक अतिअवघड गोष्ट सच्छिल नायकापुढे असते. मॅक्लीनचे नायक नेहमी आदर्श, सदाचारी असतात. ते लोभाला बळी पडत नाहीत. उराशी बाळगलेल्या नीतितत्त्वांना ते घट्ट धरून असतात. जी माणसे काही नीतिबंधने मानतात, त्यांच्यावर संघर्ष करण्याची पाळी येते, तेव्हा त्यांची खरी कसोटी असते. कारण कसलीही बंधने न पाळणाऱ्या खलनायकाला सर्व शस्त्रे (मार्ग) वापरता येतात, तर नायकाला मात्र ठराविक बंधनाच्या चौकटीत राहून तुटपुंजी शस्त्रे वापरावी लागतात. परंतु अ‍ॅलिस्टरचा नायक हा नेहमीच खलनायकाच्या चातुर्यावरही मात करणारा तीव्र बुद्धिमान असा असतो. बुद्धी हेच त्याचे खरे शस्त्र असते. त्यामुळे या लेखकाच्या कादंबरीत निम्म्या भागापर्यत खलनायकाची चलती असते. त्याच्याविरुद्ध नुकताच कुठे नायक उभा राहत असतो. तराजूचे पारडे पूर्णपणे खलनायकाकडे झुकलेले असते. पण नंतर ते हळूहळू नायकाकडे कलू लागते. या दोघांची खरी बौद्धिक झुंज ही कादंबरीच्या शेवटच्या तीन प्रकरणांत होते. त्या वेळी मात्र दोन्ही पारडी सतत खाली-वर होत असतात. शेवटी विजयश्री नायकाला माळ घालते. तोपर्यंत सततच्या उत्कंठेने वाचकाचा दम उखडत आलेला असतो. ‘नंतर काय झाले असेल’ या उत्सुकतेपोटी तो भराभर पुढे वाचतच जातो आणि पुस्तक संपवून टाकतो. हेच मॅक्लीनचे मोठे यश आहे. कादंबरीत (बहुधा हवी म्हणून) नायिका असते. पण तसे साधे प्रेमप्रसंगही नसतात. प्रणय तर दूरच. कारण सारे महत्त्व खलनायकाचा डाव उधळून टाकण्याला असते. ‘द गोल्डन रॉन्देव्हू’चे कथानक अतिश्रीमंतांसाठी बनविण्यात आलेल्या खास आरामदायी, सर्व सुखसोयींनी युक्त अशा ‘आनंदयात्रा’ घडविणाऱ्या बोटीवर घडते. ‘‘एस. एस. कंपारी’ हे नावही सूचक आहे. कादंबरीच्या नावाचा अर्थ साधारण ‘सोनेरी संकेतस्थळ’ असा आहे. त्याचा उलगडाही कादंबरीअखेर होतो. या अब्जाधीश प्रवाशांना नेणाऱ्या ‘कंपारी’चाच ताबा घेतला जातो. त्या बोटीचा वापर करून अमेरिकेच्या सोन्याचा साठा युरोपमधून पुन्हा फोर्ट नॉक्सकडे नेणाऱ्या अमेरिकन बोटीवर कब्जा करण्याचा खलनायकाचा बेत असतो. नंतर प्रवाशांना त्या अमेरिकन बोटीवर धाडायचे, नंतर ती बोट स्फोटकांच्या साहाय्याने भर समुद्रात नष्ट करायची आणि पुढे कंपारीतून सोने दुसऱ्या ‘आपल्या’ बोटीत न्यायचे व सहकाऱ्यांसह त्या बोटीत सुस्थित झाल्यावर कंपारी बोटही समुद्रापर्ण करायची. जेणेकरून आपल्या या कुटिल कारस्थानाचा एकही साक्षीदार जिवंत राहू नये आणि बड्या राष्ट्रांचा रोष ओढवू नये. अशी त्याची योजना असते. पण नायक कोणती क्ऌप्ती वापरून ती फोल करतो याची कहाणी म्हणजे ही कादंबरी. यात नायिकेला ‘क्रुसेडर’पेक्षा थोडी मोठी भूमिका आहे. अनुवादकाराने सुरुवात करण्यापूर्वी मध्ये वेगवेगळ्या बोटी, त्यावरील विशिष्ट जागा, कर्मचारी, सांकेतिक नावे, शब्द याबाबत माहिती दिली आहे. त्यात ‘एसओएस’बाबत हा संदेश मदत मागण्यासाठी धाडला जातो हे खरे, पण तो म्हणजे ‘सेव्ह अवर सोल्स’चे संक्षिप्त रूप आहे, ही गैरसमजूत कशी आहे आणि हे कट्ट कडकट्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या बिनतारी संदेशातील अक्षरांचे संकेत आहेत. अशी उपयुक्त माहिती अन्यत्रही गरज वाटेल तेथे दिली गेली आहे. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अ‍ॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा! पण म्हणूनच तो सर्वांना आवडतो. प्रिय होतो. कारण तसे बनणे हेच तर बहुतेकांचे अंतरात दडवून ठेवलेले स्वप्न असते ना... -आ. श्री. केतकर ...Read more

 • Rating StarDAINIK LOKMAT 01-05-2005

  उत्कंठा वाढविणारी कादंबरी… अ‍ॅलिस्टर मॅक्लिन या इंग्रजी लेखकाच्या ‘द गोल्डन राँदेव्हू’ या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. एका बोटीवर एकाच आठवड्यात घडणाऱ्या घटनांचे चित्रण पाहायला मिळते. रोजनिशीचा भास निर्माण करणारी १२ प्रकरणे याम्ये आहेत. यामधून कादंबरीचा नायक सर्व घटना-प्रसंगांचे वर्णन करतो. या कादंबरीतील घटना ‘एस. एस. कंपारी’ या बोटीवर घडतात. गर्भश्रीमंतांसाठी खास राखीव जागा असणाऱ्या या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांचे अचानक होणारे गूढ मृत्यू, एका शास्त्रज्ञाचे त्यानेच बनविलेल्या क्षेपणास्त्रासहित पलायन, एस.एस. कंपारीचे दुसऱ्या एका १५ कोटी डॉलरचे सोने असलेल्या मालवाहू जहाजाला भिडणे अन् बोटीवर रचले जाणारे कारस्थान व चाचेरिगी, अशा विविध कथाबीजांनी युक्त अशी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या सुरुवातीच्या निम्म्या भागापर्यंत खलनायकाचे वर्चस्व आहे; पण पुढे ते कमी कमी होत जाते आणि नायकाची सरशी व्हायला लागते. खलनायकाचा पराजय निश्चित होत असतानाच विजयश्री नायकाकडे पाठ फिरवते आणि वाचकाच्या मनावर प्रचंड दडपण येते. या बौद्धिक झुंजीमध्ये अर्थातच नायकाचा विजय होतो; पण तोपर्यंत वाचकाला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. कादंबरी वाचताना पुढे काय होणार, हा प्रश्न वाचकाला अस्वस्थ करतो आणि पुस्तक खाली ठेवणे अशक्य होते. पाध्ये यांच्या गतिशील भाषाशैलीमुळे हा अनुवाद वाचकाला खिळवून ठेवतो. या उत्कंठावर्धक, रहस्यमय अशी अनुवादित कादंबरीतून बोटीवरील जीवनाचे दर्शन घडते. ‘द गोल्डन राँदेव्हू’च्या वाचनामुळे मराठी वाचकाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील. अन् एका सकस वाङ्मयीन मेजवानीचा आस्वाद त्याला घेता येईल. -गौरी परचुरे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

DHANA
DHANA by Ganesh Maanugade Rating Star
DAINIK SAKAL 19-08-2018

उत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more

SANVADU ANUVADU
SANVADU ANUVADU by Uma Kulkarni Rating Star
MAHARASHTRA TIMES १९-८-१८

अनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, "आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला." पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल! ... ...Read more