* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEEN SAMELANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616701
  • Edition : 3
  • Publishing Year : 1947
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS HUMAN LIFE? IT IS A UNION OF THREE BEAUTIFUL FEELINGS. THE FIRST IS OUR OWN HAPPINESS AND PROGRESS. THE SECOND FELLING IS TOWARDS OUR FAMILY, THE OBLIGATIONS, THE INDEBTNESS. ONE HAS TO TRY TO REPAY IT TO THE BEST OF HIS/HER ABILITY. THE THIRD IS THE UNSEEN FLOW, TO HELP THE SOCIETY PROGRESS, THE SOCIETY OF WHICH WE ARE MEMBERS. ONES LIFE CAN BE SAID FULFILLED ONLY WHEN THE INDEBTEDNESS OF OURSELVES, THAT OF THE FAMILY AND OF THE SOCIETY IS SATISFIED AT THE SAME TIME. IF THERE IS NO CONFLICT BETWEEN THESE THREE THEN WE CAN SAY THAT THE PERSON IS SUCCESSFUL IN HIS LIFE. V. S. KHANDEKAR`S BOOK REVEALS THESE SECRETS OF HUMAN LIFE IN HIS NOVEL. THERE ARE MANY CHARACTERS IN THIS NOVEL OF THEM, ANAND BELIEVES ONLY IN SACRIFICE, THE TRADITIONAL BELIEF; APPA AND BHAYYA ARE THOSE INCOMPETENT PEOPLE WHO SHADE OFF THEIR RESPONSIBLITIES AND JUSTIFY THEMSELVES BY MAKING A SINGLE PERSON SHOULDER IT. MANIK IS HOPELESS, LITERATE GIRL BUT HAS ALWAYS FAILED IN RECOGNISING A GOOD MIND, USHA IS YET ANOTHER CHARACTER WHO HAS BEEN ALOOF, NEVER EXPRESSING FEELINGS, GOOD OR BAD. WHAT ARE THESE CHARACTERS EILLING US? THEY TELL US THAT FOLLOWING THE CUSTOMS AND TRADITIONS BLINDLESSLY IS HARMFUL NOT ONLY TO THE PERSON FOLLOWING THEM BUT ALSO TO THE SOCIETY AT LARGE. IT WAS IN 1939 THAT THE AUTHOR STATED HIS VIEWS AS FOLLOWS, "WHEN WE TALK ABOUT THE VALUES IN A MAN`S LIFE THEN SACRIFICE IS ALWAY HIGHLY REGARDED THAN ENDURING. BUT THE SACRIFICE SHOULD ALWAYS BE FOR A NOBLE CAUSE.` DO NOT YOU THINK THAT THIS VIEW IS TRUE EVEN TODAY?
श्री. वि. स. खांडेकरांच्या तीन साहित्यविषयक व्याख्यांनाचा हा संग्रह आहे. या व्याख्यानांचे वैशिष्ट्य असे की, यांपैकी फक्त एकच श्रोत्यांनी एकलेले आहे आणि उरलेली दोन व्यासपीठावर न झाल्यामुळे रातल्या घरात केलेली आहेत. प्रत्यक्षात ही न झालेली व्याख्याने उज्जैन आणि मिरज येथील नियोजित संमेलनांसाठी आधीच लिहून सिद्ध ठेवलेली होती; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उज्जैनला जाता आले नाही आणि मिरजेचे संमेलनच रद्द झाले. वरवर पाहता ही व्याख्याने असली, तरी श्री. खांडेकरांनी त्या काळच्या मराठी ललित वाडंमयाचे आत्मनिरीक्षणात्मक परीक्षण करून, त्यातील उणिवा जाणकार साहित्यप्रेमींपुढे धीटपणे मांडलेल्या आहेत. या तीनही व्यख्यानांतून व्यक्त झालेले चिंतनगर्भ विचार आजच्या मराठी साहित्याच्या वाचकाला निश्चितच अंतर्मुख करतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #तीन संमेलने
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वाचकाला अंतर्मुख करणारे पुस्तक… वि. स. खांडकेर यांच्या साहित्यविषयक व्याख्यानांचा हा संग्रह आहे. सोलापूर येथे झालेल्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यावेळचे व्याख्यान या संग्रहात अंतर्भूत केलेले आहे. बाकीची दोन व्याखयाने ही काही कारणांमुळे प्रत्यक्षात व्यासपीठावर न झाल्याने घरातल्या घरात झालेली आहेत. तीनही व्याख्यानांतून खांडेकरांचे तत्कालीन ललित वाङ्मयविषयक विचार चिंतनरूपात प्रकट झले आहेत. पहिल्याच व्याख्यानात १९२० ते ४१ या साधारण २१ वर्षांच्या काळात मराठी वाङ्मयाच्या काही भागांची आश्चर्य वाटावे इतकी प्रगती केली आहे. लघुकथा, लघुनिबंध, बोलपट हे वाङ्मयप्रकार दृढमूल झाले आहेत. मराठी वाङ्मय घोडदौडीने प्रगती करत आहे. भाषासौंदर्य, कलाविलास, तंत्रशुद्धता इत्यादी वाङ्मयीन मुल्यांची कसोटी लावली तर टीकाकारांनाही स्तुतीच करावी लागेल; परंतु या ललित वाङ्मयाचे सौंदर्य अद्ययावत वेशभूषा व केशभूषा केलेल्या एखाद्या फिक्कट तरुणींच्या सौंदर्यासारखे आहे. नियतकालिके, काव्य, लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी, नाटक या सर्वच वाङ्मयप्रकारांचा तपशिलवार उदाहरणे देत देत खरमरीत परामर्श घेतला आहे. शृंगार, हास्य, विनोद, करुण इत्यादी रसांच्या निर्मितीबाबतही भाष्य केले आहे. आमच्यात आज प्रतिभेची उणीव नाही. उणीव आहे ती जीवनाच्या व्यापक जाणिवेची, असा खेद व्यक्त केला आहे. ललित लेखक हा नुसता भुतकाळाचा इतिहासकार किंवा वर्तमानकाळाचा चित्रकार नाही तर तो भविष्यकाळाचा शिल्पकार आहे, असे मत व्यक्त केले आहे. दुसरे व्याख्याने दे दक्षिणी संस्थान पत्रकार संमेलन - मिरज - याचे अध्यक्षस्थाने स्वीकारण्याचे ठरल्यानंतरचे आहे. हे संमेलन भरले नाही. पत्रकार व साहित्यिक यांच्यातील वर्गयुद्ध, भेदभाव याविषयी लिहिले आहे. पत्रकार व साहित्यिक हे दोघेही सरस्वतीचे निष्ठावंत उपासक आहेत, परंतु त्यांच्या आत्मशक्तीचा उगम एकच असला तरी आविष्कार करण्याच्या पद्धतीत प्रकृती व परिस्थिती यांच्या भिन्नत्वांमुळे अतिशय अंतर पडते. महालक्ष्मी व महाकालीचे उदाहरण हे मत व्यक्त करताना दिल आहे. पत्रकारांच्या कठोर कर्तव्याविषयी विचार मांडले आहेत. तिसरे भाषण हे महाराष्ट्र मंडळ उज्जयिनी येथे व्हायचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खांडेकर तेथे जाऊ शकले नाहीत. अध्यक्षपद स्वीकारण्याचे कारण लहानपणपासून अध्यक्षमहाराजांना मिळणारी प्रशस्त खुर्ची, टाळ्यांचा कडकडाट, मिळणारा लांबलचक हार याचे आकर्षण - त्यातून मग बाळपणातील अनेक महत्त्वाकांक्षापैकी सभेचा अध्यक्ष होण्याची आकांक्षा काहीशा विनोदी ढंगाने सुरुवात केली आहे. अनुवादित वाङ्मयाला लग्नातील अहेराची उपमा दिली आहे. दरवर्षी मराठीत प्रसिद्ध होणारी पुस्तके चाळणाऱ्याला एखाद्या गायन शाळेत जाऊन पाच-पंचवीस गोड गळ्याच्या मुलामुलींचे गायन ऐकल्याचा भास होतो. नामांकित गवयांच्या मैफलीत बसल्यावर मनाला होणारा आनंद मात्र लाभत नाही. टीकाकारांच्या गुण-अवगुणांविषयी सविस्तर विवेचन आहे. ललित वाङ्मयातील संकुचितपणा व उथळपणा उदाहरणे देऊन दाखवून दिला आहे. या व्याख्यानातून तत्कालीन साहित्यविषयीची मते खांडेकरांनी अतिशय परखडपणे व्यक्त केली आहेत. ती व्यक्त करताना लेखक व त्यांच्या कलाकृती, त्यातील व्यक्तिरेखा यांची उदाहारणे दिली आहेत. तत्कालीन समाजस्थिती, जीवनदर्शन वाङ्मयातून व्यक्त होणे आवश्यक आहे. ते व्हावे तसे होत नाही हे उदाहरणातून दाखवून दिले आहे. खांडेकरांच्या खास शैलीची चुणूक या व्याख्यानांमधूनही दिसते जसे ‘‘विविध कथांतील प्रेमाची स्थिती कशी, तर आइस्क्रीमची चव जशी एकच फरक काय तो आइस्क्रीम कमी अधिक घट्ट असण्यात.’’ या पुस्तकात व्यक्त झालेले खांडेकरांचे तत्कालीन साहित्याविषयीचे चिंतनगर्भ स्पष्ट विचार साहित्याच्या वाचकाला अंतर्मूख करणारे तर आहेतच; परंतु साहित्याच्या अभ्यासकालाही मार्गदर्शक ठरणारे आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book