* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TARPHULA
 • Availability : Available
 • ISBN : 9788177668292
 • Edition : 10
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 300
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET OF 21 BOOKS
Quantity
Tarphula pictures the transformation of a village. This novel has questioned the uniformity of the traditional Marathi novels. This novel possesses the quality of giving an allegorical meaning to the society through the anarchy of a village, through the questioned security of this village. Actually, the country itself was passing through this phase in 1964 and this novel represents it. So, it inclines towards the ethical details living out the boundaries of the place. This novel reveals the fact that the community always needs a strong ruler with his strict rules. His being alive runs everything smoothly whereas his death gives rise to anarchy. The author has made use of different techniques to picturize this. Aaba Kulkarni is unable to take proper care of the disintegrated societal life. Shankar Patil has penned this down very effectively creating an environment around an unstable and weak family. He has succeeded in bringing back the year 1964 truly. The family life of many in the village, the relationship between many couples, their dialogues, the rowdy people has been very skillfully presented by him. His restraint on showing the need for a powerful leadership through each and every detail, places his writing at the top. This novel is complete in its own sense as it starts with the simple routine life of the worried and diffident villagers and covers the efforts of the new `Patil` to establish himself properly.
‘‘...टारफुला एका खेड्यातील परिवर्तनाचे चक्र चित्रित करते. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देते. एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य या कादंबरीत आहे. हे खरे तर १९६४च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नैतिक तपशील ह्या कादंबरीत आहेत. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजजीवन सांभाळता येत नाही, हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते १९६४ साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवराबायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशैलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपर्यंतचे चिरेबंद रूप मांडते...’’ – भालचंद्र नेमाडे
Keywords
TARPHULA, SHANKAR PATIL
Customer Reviews
 • Rating StarRajesh Rankhamb

  1966मध्ये लहीलेलं पुस्तक 3 महिन्यात एकही पुस्तक वाचलं नाही शेवटी नेट पॅक बंद केला आणि 7,8 पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण सुरुवातीचे 1,2भाग वाचून बंद केले पण काल शंकर पाटलांचे पुस्तक मिळाले आणि एका दमात पुर्ण झाले वाचत असताना 1पान मनाला टोचून गेले आण तोंडातुन आपसूकच व्हा... रे...पाटील. तरी कसली भीती? मृत्यू काय दु:ख देणार? दु:ख देणारा तर जन्म आहे! ...जन्म दु:खाचा अंकु र । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर ।...हा जन्म, हा संसार, हे आयुष्य हेच चिंतेचा आगर आहे! यात कसला आलाय लोभ? कसलं सुख! सुखाचा िवसर म्हणजे हा जन्म! मोह या वाटेवरचा हा अडथळा... हे विश्व आहे! हा भोग आहे. हे विश्व मृत्यूणेच दूर होणार. हा भोग मृत्यूणेच टळणार! सर्व दु:खांचा नाश म्हणजे हा मृत्यू! आपल्या जन्माला लागलेली सगळी चिंता, काळजी, वेदना, यातना, नाना व्यधि आिण नाना उपाधी यांचा हा होम आहे! त्याला का भय? का भव्य आणि का काष्टी व्हव? कटकटीनं कटकटींनय भरलेल्या या संसाराचा कसला लोभ धरायचा? स्वतःच्या जीवाचा? म्हणून हे लोभाचं कमळ सोडवत नाही? अरे कसला हा जीव आिण कसला हा जन्म!...जन्म हा अति कुडाळ । नरक पतन ।...पाहतां शरीराचे मूळ । या ऐसे नाही अमंगळ । राजस्वलेचा जो िवटाळ ।त्या मध्ये जन्म यासी ।। अत्यन्त दोष ज्या वि िवटाळा । त्या िवटाळाचा िच पुतळा । तेथे नियम वितालपणाचा सोहळा । केवी घडे ।। राजस्वलेचा जो िवटाळ । त्याचा आळोन जाला गाळ । त्या गाळाचेच के वळ । शरीर हे ।।...आळोन जाला गाळ...गाळ... त्या गाळाचेच...! ...गाळ!.... ..... ...Read more

 • Rating StarDAINIK AIKYA 22-07-2007

  खेड्यातील सत्ताचक्राचे आवर्तन... टारफुला ही ग्रामीण कथा-पटकथाकार शंकर पाटील यांची एकुलती एक कादंबरी १९६४ मध्ये प्रसिद्धी झाली. तिचे लेखन १९६२-६३ मध्ये झालेले असावे. एक वर्षभर त्यांनी केवळ या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. १९४७ पासून पाटील यांचे कथालेखनचालू होते. १९६२ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने कादंबरीसारख्या लेखनप्रकल्पासाठी एक अभ्यासवृत्ती देऊ केली होती. पाटील यांनी पाठवलेली कादंबरीची रुपरेखा संबंधित समितीला आकर्षक वाटली आणि दरमहा मिळणाऱ्या विशिष्ट रकमेमुळे वर्षभर त्यांनी या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. परीक्षक समितीचे अध्यक्ष अनंत काणेकर यांनी ‘टारफुला’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यावेळी नमूद केले आहे. या कादंबरीचे तीन भाग आहेत. त्यामुळे काही समीक्षकांनी तीन लघुकादंबऱ्यांचा संग्रह असेही तिचे स्वरूप जाणवल्याचे म्हटले आहे; तर काही जणांनी या तीन स्वतंत्र कथा आहेत असे म्हटले. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यातील सत्ताचक्राचे एक आवर्तन ही कादंबरी प्रकट करते. कादंबरीच्या पहिल्या भागात गावचे सुभानराव पाटील अचानक मृत्यू पावतात. गावकऱ्यांवर आणि आजूबाजूला दरोडेखोरी करणाऱ्या चोर-दरोडखोरांच्या टोळ्यांवर त्यांचा चांगला वचक असतो. त्यामुळे खिंडीपलीकडे चोऱ्याचपाट्या होत असल्या तरी गावात कधी घडफोडी झालेली नसते किंवा रानातल्या पिकाला धक्का लागलेला नसतो. डोंगरावरचा फरारी माणूस या गावात कधी येत नसे; जर कधीमधी अगतिकपणे आलाच तर पाटील त्याची नड भागवत; त्याला खाऊपिऊ घालत. पोलिसापर्यंत तक्रार कधी जात नसे. सुभानराव पाटलांना हे गुन्हेगारही मान देत. मुजरा करीत. सुभानरावांना मुलबाळ नसते. दत्तक घेण्याचा त्यांचा विचार असतो. परंतु तो घेण्याआधीच त्यांना मरण येते. पाटलीणबाई हताश होतात. भाऊबंद आपलेच पोर दत्तक घ्यावे म्हणून डावपेच खेळत राहतात. गायकवाड आणि केरुनाना पवार हे पिढीजात वैरी-पाटीलकी मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करू पाहतात. ‘गायकवाड घराण्यातलाच दत्तक आला पायजे, नाहीतर खेळ झाला म्हणून समजा. सगळाच इस्फोट होतोय बघा असे पाटलांचे विश्वासू दफ्तरदार आबा कुलकर्णी यांना आडदांड पिऱ्या सांगतो. या पिऱ्याच्या नावावर पाचसहा खून आणि दहाबारा दरोडे होते. गेली पाच-सात वर्षे तो फरारीच असतो. पाटलीणबार्इंच्या कानावर हे प्रकरण टाकल्यावर पाटलीणबाई म्हणतात, ‘‘माझ्या मनात तर भावाच्या पोराला दत्तक घ्यावं असा विचार आहे.’’ शंभर आखणी चिरेबंदी वाडा, काळा करंद, मऊ लोण्यासारखी मातीची दोन अडीचशे एकर जमीन, बांधीव विहिरी, तळाला झरे... कोणालाही ह्याचा मोह पडणारच. गावातले वातावरण थोडे निवळावे, तोवर सहा महिने तीर्थयात्रा करावी असं पाटलीणबाई ठरवतात; त्यावेळी धुरपा म्हारणीच्या लेकीला रातोरात पळवल्याची बातमी येते. ते प्रकरण हाताळणे ही पाटलीणबाईच्या अखत्यारीतली गोष्ट नसते. त्या तशाच तीर्थयात्रेला जातात. आबा कुलकर्णीकडे सर्व लोक न्यायासाठी बघतात. पण ते स्वत: वचकून असतात. त्यांची बायको लक्ष्मीबाई आणि दोन मुले - आपल्या जीवाला धोका आहे म्हणून हवालदिल होतात. तशातच खिंडीत लूटमार सुरू होते. शिवा कुंभार आणि त्याचा लेक बाजारहाट करून परत येत असताना त्यांना खिंडीत लुटण्यात येते. गाडीच्या बैलाला पळवण्यात आले. त्या दोघा बापलेकांना भरपूर मारपीट केली जाते. इकडे देसाई अण्णाच्या रानातला एक आराभर मकाच कुणी काढून नेतो. पाटील होते तेव्हा असे काही घडत नव्हते. गावात पोलीस येतात. ते शंभर अंडी, दहा कोंबड्या, दोन पोती गहू, एक जळणाची गाडी साहेबांसाठी मागतात. जमवाजमव करताना आबांची दमछाक होते. लक्ष्मीबाई म्हणते. आज गावची शिरकाई माझ्या स्वप्नात आली... म्हणाली. अंग माझी खणानारळानं ओटी भर... कधी भरू या?’ पाटलीणबाई आबा कुलकर्णी यांना सांगतात, ‘मी उद्या सकाळीच भावाकडं जाते... दत्तक घ्यायचा विचार केलाय... दत्तकविधान कोल्हापुरलाच करायचा बेत आहे,’ बाई गाव सोडून जातात. आबांनाही ते गाव सोडून जावंसं वाटतं. तिथे आपल्या जीवाला धोका आहे. पण आपण गाव सोडलं तर पाटलाची जमीन, शेत लोक बळकवून बघतील अशी भीतीही त्यांना वाटते. बंदूकधारी पोलिसांना घेऊन फौजदार मंडलिक गावात येतात, आबांना फ़ैलावर घेतात, कुलकर्णी गावात बसून काय हजाम ती करता, की गोल्फ खेळता?’ आबा कुलकर्णी यांच्याशी अशा गुर्मीत किंवा अशा तिरसट भाषेत आजवर कोणी बोललेले नसते.... त्या अपमानाने ते अस्वस्थ होतात... आपला आत्मविश्वास गमावून बसतात... आजारी पडतात. विरक्त होतात. गावाची चिंता... आपल्या मागे गावचे काय होणार? पुढं हे ओझं कोण घेणार असा प्रश्न त्यांना पडतो. सुभानराव पाटील आणि आबा कुलकर्णी या दोघांच्या निर्वाणाने गावातील दरार संपतो. जो तो आपलाच हेका पुढे चालवतो. पाटलांच्या शेतातला काही भाग दाजीबा गायकवाड तर काही भाग केरुनाना पवार बळकावतात. इनामकीची जमीन खाणारे सनदीही चावडीत बसेनासे होतात. गावातील सत्तासंघर्ष तीव्र होतो. गावचे हेडमास्तर म्हणतात, नवी विटी नवं राज्य. येतील ते दिवस बघत राहयचे. दादा चव्हाण आल्या आल्या घोड्यावर बसून गावचा फेरफटका करतात. एकेकाला फ़ैलावर घेतात. शिवलिंग तेल्याला म्हणतात लिंगाडी हैस की मांग? बैलाऐवजी घाण्याला म्हस जुंपतोय? ती म्हस सोड आधी... त्या तेल्यालाच घाण्याला जुंपून घाणा चालवायला लावतात. त्याच्या पाठीवर चाबूक ओढतात. तो आई आई म्हणून ओरडतो. दादा चव्हाण म्हणतात, मग. म्हाद्या कोळ्याला दादा चव्हाण चाबकानं बडवून विचारतात, पिऱ्या कुठं हाय? त्या दाजीबा गायकवाडाचं आन तुझं लई गळतयं व्हय रे? पाटलाच्या रानात घुसला होतास नाही का? म्हाद्या वठणीवर येतो, मला वचन द्या... खरं सांगतो... आज खोताचं वऱ्हाड जाणार आहे. त्ये लुटायचा घाट घातलाय पिऱ्यानं. तो ऐतवारी तानूकडं येणार हाय. पाटलाचा खूनबी करायचं ठरलंय. मंडलिक फौजदारांना ही बातमी कळवण्यात येते. अशाप्रकारे दादा चव्हाण गावावर आपला दरारा प्रस्थापित करतात. एक दिवस त्यांचा धाकटा मुलगा संभाजी वाड्यावर ओरडत ओरडत येतो. दादा, आबांचा खून झाला हो. गाव पुन्हा एकदा भरडून निघतं. केरुनाना व दाजीबा पुन्हा आरोपी म्हणून तुरुंगात जातात. तालमीतली पोरं ढाण्या वाघागत गावात फिरू लागतात, दादा निर्धास्त होतात. दसऱ्याला पाटलीणबाई वाड्यात येतात. दत्तक मुलगाही बरोबर असतो. वाड्याला नवी कळा येते. दादा पाटील हे आपले स्थान टिकवण्यासाठी गावातील ज्या पोरांना पैलवानकी करायला लावतात, ती पोरेच त्यांच्या विरोधी संघटित होतात असे तिसऱ्या भागात दाखवले आहे. दाजीबा गायकवाड आणि केरुनाना पवार या पिढीजात वैऱ्यांना पाटील एकत्र आणू पाहतात. परंतु ते शक्य नसते. या दोहोंना एकत्र आणण्याचा प्रयत्नात दादा पाटील हे सर्वांच्याच मर्जीतून उतरतात. केरुनानाचा खून होतो. दाजीबा फरार होतो. ही तरुण पोरे दादा पाटलांनाच त्यांच्या घोड्याचा कान कापून डोकेबाज माणसाने कसे वागावे हे सांगायची गरज नाही असा इशारा देतात. एका परीने संपूर्ण गावच कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. सुभानराव पाटील, आबा कुलकर्णी, दाजीबा गायकवाद, केरुनाना पवार, राऊनाना, हिंदुराव गायकवाड या व्यक्ती प्राधान्याने समोर येतात. इतरही व्यक्तींना आपले व्यक्तिमत्त्व प्रकट व्हावे अशाप्रकारे चितारण्यात आले आहे. कादंबरीचा दुसरा व तिसरा विभागच तेवढा लक्षात घेतला तर बदली पाटील म्हणून आलेल्या दादा चव्हाणांनी आपला दरारा प्रस्थापित करणे आणि त्यांच्या सत्तेला तडे जाणाऱ्या घटनांमुळेही त्याचे आसनही डळमळीत होणे असे सूत्र सांगता येईल. सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या बळावर आपणच निर्माण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून आपल्या सत्तेला आव्हान मिळणे, असा हा प्रवास आहे. संघर्षाचे स्वरूप बदलत जाते. आजचे शत्रू उद्या मित्र होतात. मित्र असतात ते विरोधात जातात. प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे असतात. एका खेड्याच्या संदर्भात हे सत्ताचक्र कसे काम करते हे शंकर पाटील हे या कादंबरीत दाखवतात. टारफुला हे प्रतीक सत्तेला आव्हान देणाऱ्या तरुण मंडळीचे आहे तसेच ते गावाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या सत्तासंघर्षाचेही प्रतीक आहे असे म्हणता येईल. सत्तासंघर्षात आबा कुलकर्णी किंवा राऊनाना यांच्यासारख्या सत्प्रवृत्त नीतिमान व्यक्तींना मृत्यूमुखी पडावे लागते; तर सत्तेसाठी हवे ते करण्याची तयारी असणाऱ्यांना मात्र खून-दंगे करूनही आपले वर्चस्व दाखवण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत राहते व तग धरून राहता येते असे वास्तव टारफुलामध्ये बघायला मिळते. ‘टारफुला’ची चाळीस वर्षांनंतर निघालेली ही नवी आवृत्ती ग्रामीण जीवनातल्या परिवर्तनाची एक अस्सल झलक प्रकट करते. तिच्यातली पटकथेसारखी दृश्यवार मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

MAZE TALIBANI DIWAS
MAZE TALIBANI DIWAS by ABDUL SALAM ZAEEF Rating Star
DAINIK LOKSATTA (LOKRANG) 20-01-2019

तालिबानचे अंतरंग... अफगाणिस्तान हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा देश. असंख्य समस्यांनी ग्रासलेला. राजेशाहीपासून साम्यवादी एकाधिकारशाहीपर्यंत सर्व प्रकारच्या राजवटींचे दशावतार पाहिलेला. या ना त्या कारणाने गेली तीन ते चार दशके सतत आंतरराष्ट्रीय स्तरार चर्चेत राहिलेला. अशा या देशातून सोव्हिएत आक्रमक फौजेला परतवून लावण्याच्या इराद्याने उभी राहिलेली कट्टर मुजाहिदीनांची संघटना- ‘तालिबान’! इस्लाममधील ‘जिहाद’च्या संकल्पनेची झिंग चढलेल्या या फौजेला अमेरिकेने पोसले नसते तरच नवल मानावे लागले असते. रशियन कैद्यांच्या शरीराची सालडी ते जिवंत असताना सोलणाऱ्या आणि त्या सैनिकांच्या आक्रोशात आसुरी आनंद मानणाऱ्या या तालिबान्यांना एके काळी अमेरिकेने गौरवलेदेखील. तथापि, एकदा सोव्हिएत फौजा माघारी परतल्यानंतर या मुजाहिदीनांना जाणीव झाली ती अमेरिका तिच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानात करत असलेल्या घुसखोरीची. मग ते अमेरिकेच्या साम्राज्यवादाविरुद्धही त्याच त्वेषाने लढू लागले. अमेरिकेने लष्कर पाठवून आणि आपल्या मर्जीनुसार राज्य चालवायला तयार असणाऱ्या नेत्यांना सत्तास्थानांवर बसवून तालिबानचे आव्हान मोडून काढायचा बरीच वर्षे प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. त्या देशातून बाहेर कसे पडायचे, हा अमेरिकी प्रशासनाला भेडसावणारा एक मुख्य प्रश्न आहे. अफगाणिस्तानच्या ७० टक्के प्रदेशावर तालिबानची हुकमत तरी आहे किंवा धोक्याचे सावट तरी आहे. अशी ही संघटना, तिची ध्येयधोरणे, तिची अंतर्गत रचना आणि सत्तासंघर्षांबद्दल आपल्याला पुरेशी माहितीच नसते. विशेषत: पाकिस्तानबरोबर या संघटनेचे नेमके संबंध कसे आहेत, याबद्दल भले भले राजकीय नेतेही अंधारात चाचपडताना दिसतात. त्या दृष्टीने अब्दुल सलाम झैफ या तालिबानी राजनैतिक अधिकाऱ्याचे आत्मकथन- ‘माझे तालिबानी दिवस!’ हे अनुवादित स्वरूपात का होईना, मराठी वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. ‘माय लाइफ विथ द तालिबान’ हे मूळ इंग्रजी पुस्तक २०१० सालीच प्रसिद्ध झाले होते आणि चर्चेतही होते. पुस्तकाच्या प्रारंभीच झैफची अवघ्या सात ओळींची, परंतु ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांच्या व्यावहारिक आविष्कारातील प्रचंड अंतर्विरोधांवर अत्यंत तीव्र, बोचरी टीका करणारी कविता वाचायला मिळते. ग्वान्टानामो तुरुंगात असताना झैफने लिहिलेल्या या कवितेचा प्रमोद जोगळेकरांनी केलेला उत्कृष्ट भावानुवाद झैफबद्दल आस्था निर्माण करतो. पुढे मूळ पुस्तकाच्या संपादकांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचयपर लेख आहे. त्यात झैफचे कंदहार शहराशी, त्या शहराचे अफगाण इतिहासाशी, त्या शहरात जन्मलेल्या तालिबान चळवळीच्या मूळच्या व नंतर बदलत गेलेल्या स्वरूपाचे त्या अभागी देशातल्या रक्तरंजित संघर्षांशी असणारे जवळचे नाते उलगडून सांगितले आहे. त्यापाठोपाठ असलेली पुस्तकातील पात्रांची यादी वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रा’तील एक तज्ज्ञ बार्नेट रुबिन यांची प्रस्तावना थोडक्यात झैफच्या या आत्मकथनाचे महत्त्व स्पष्ट करते. पाठोपाठ वाचायला मिळते खुद्द झैफची भूमिका. या नऊ पानी निवेदनात ज्या चार कारणांसाठी तो हे आत्मकथन लिहायला तयार झाला, त्या कारणांचे स्पष्टीकरण मिळते. यापुढील मुख्य पुस्तकाच्या २२ प्रकरणांमध्ये झैफने अफगाणिस्तानातील संघर्षांचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवले आहेत. त्या निवेदनात त्याच्या वैयक्तिक जीवनाचे उभे-आडवे धागे असे विणले गेले आहेत, की हे पुस्तक एकाच वेळी दोन स्तरांवरील घटनाचक्राचे बहुमिती चित्रण करते आहे असे आपल्याला जाणवते. आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो. असंख्य प्रसंगांतले थरारनाटय़ पोहचवण्यात अनुवादक चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रत्येक पानावरील मजकुराशी संबंधित संपादकीय टिपा त्याच पानावर तळटिपांच्या स्वरूपात वाचायला मिळत असल्यानेही वाचकांची बरीच सोय झाली आहे. अफगाणिस्तानच्या भू-सामरिक महत्त्वामुळे गेली कित्येक दशके तो देश बडय़ा देशांच्या सत्तासंघर्षांत तर पिसला गेला आहेच; परंतु प्रत्येक सत्तांतरानंतर सत्ताधारी अफगाण नेत्यांच्या विरोधात काही अफगाण नेते उभे राहिलेच आहेत. या अंतर्गत यादवीमुळे त्या देशात निर्माण झालेली विदारक स्थिती पुस्तकभर एखाद्या पार्श्वभूमीप्रमाणे सतत आपल्याला जाणवत राहते. अफगाणिस्तानातील परस्पर विरोधी गटांपैकी कुणाला तरी हाताशी धरून आपापले राष्ट्रीय स्वार्थाचे घोडे पुढे दामटू पाहणारे अन्य देशांचे नेते झैफच्या संतापाचे लक्ष्य बनावेत यात नवल नाही. परंतु पाकिस्तानचे लष्करशाह जनरल मुशर्रफ यांच्याबद्दल झैफने या पुस्तकात लिहिले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. झैफ पाकिस्तानमध्ये तालिबानचा वकील म्हणून काम करत होता, तेव्हा त्याची मुशर्रफ यांच्याशी एकूण चार वेळा भेट झाली होती. त्या चारही भेटींचे अगदी थोडक्यात वर्णन करून झाल्यावर झैफने अवघ्या एका परिच्छेदात मुशर्रफ यांच्या हिडीस राजवटीबद्दल जी आगपाखड केली आहे, ती मुळातूनच वाचण्याजोगी आहे. ‘पाकिस्तान बीफोर एव्हरीथिंग’ या आत्मकथनपर पुस्तकात मुशर्रफ यांनी तालिबान्यांना व इतरही काही मुसलमानांना आपण कसे निर्दयपणाने वागवले, याची कबुली दिली होती. मुशर्रफ यांनी पैशाच्या मोबदल्यात अनेक अफगाण मुजाहिदीनांना अमेरिकेला विकले होते. ते लोक ग्वान्टानामोत खितपत पडले होते. त्या यमयातना भोगाव्या लागलेल्या अफगाणी कैद्यांमध्ये खुद्द अब्दुल झैफचाही समावेश होता आणि तब्बल चार वर्षांच्या तशा तुरुंगवासातून काही मित्रांच्या प्रयत्नांमुळे २००५ साली तो सुटला. हा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे २०१० साली लिहिलेल्या या आत्मकथनात झैफने ‘मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाला लागलेला काळा डाग आहे’ असे म्हटल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. मुशर्रफना ‘इस्लामशी गद्दारी करणारा ढोंगी, क्रूर नेता’ असे म्हणणारा झैफ अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्याबद्दल चुकूनही पश्चात्ताप व्यक्त करत नाही, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. इस्लामचा नारा देत पुढे सरसावणारे सर्व जण एकाच झेंडय़ाखाली एकत्र उभे ठाकत नाहीत. त्या झुंडीत अनेक जण आपापले स्वतंत्र झेंडे मिरवत पुढे घुसण्याच्या प्रयत्नात असतात, हे वास्तव झैफच्या आत्मकथनामुळेही पुन्हा प्रकर्षांने पुढे येते. असे अनेक मुद्दे विचारासाठी समोर येत जातात आणि तालिबान हे प्रकरण कसे आणि का जगावेगळे आहे, हे हळूहळू समजू लागते. हे या आत्मकथनाचे यश आहे. -आनंद हर्डीकर ...Read more

VANSHVRUKSHA
VANSHVRUKSHA by S. L. Bhairappa Rating Star
Smita Pawar

Vachla ahe...nice book👌