* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SURYAKAMLE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613502
  • Edition : 5
  • Publishing Year : 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORIES IN THIS BOOK WERE WRITTEN 15-20 YEARS BACK BEFORE THEY WERE PUBLISHED. WHEN THE AUTHOR WENT THROUGH THEM BEFORE PUBLISHING HE WAS ASTONISHED WITH THEM. HIS MINDSEET WAS VERY MUCH DIFFERENT THAN THAT EARLIER. HE WANTED TO ALTER THE STORIES, BUT STOPPED HIMSELF FROM DOING SO. HE HAD A STRANGE MIXTURE OF FEELINGS. HE FELT THAT THOSE WERE HIS STORY BUT YET HE DIDN`T KNOW THEM. HE REALISED THAT TIME CHANGES A PERSON INSIDE-OUTSIDE. AT MOMENTS, HE THOUGHT THAT THE AUTHOR OF THE STORIES. I.E. HE HIMSELF THEN WAS A DIFFERENT PERSON FROM WHAT HE WAS NOW. HIS MINDSET HAD CHANGED COMPLETELY. HE FELT A PITY AS HE COULD NOT X-RAYED HIS MIND THEN AND NOW. HIS STYLE DURING HIS EARLY YEARS AS A STORY WRITER WAS SIMILAR TO RAM GANESH GADKARI. AT SOME PLACES, HIS STORIES EXAGERRATE A LOT. STILL THE AUTHOR DID NOT MAKE ANY CHANGES IN HIS STORIES AFTER 10 YEARS, BECAUSE HE BELIEVED THAT AFTER A LONG TIME THE CHANGES THAT TAKE PLACE INSIDE ONE`S MIND WILL HARM THE CORE OF THE STORY AND HE ALSO REALISED THAT FOR AN AUTHOR ALSO IT WILL BE DIFFICULT TO EXPERIENCE THE SAME FEELING WHICH PREVAILED HIS MIND WHILE ORIGINALLY WRITING THE STORY. THAT ILLUSION WHICH CREATES A STORY IS NOT A SLAVE. SO CORRECTING OR CHANGING THE STORY TO MAKE IT BETTER MIGHT DAMAGE IT ACTUALLY. HENCE, THE AUTHOR DID NOT CHANGE ANY OF THE STORIES WHILE PUBLISHING THEM 15-20 YEARS AFTER WRITING THEM.
ती आम्रवृक्षाला म्हणाली.... "मी वठलेल्या झाडावर बसले, तर तो सुद्धा मोहरून जाईल!" ती वसंताला म्हणाली.... "मी वाळवंटात गाऊ लागले, तर तिथं सुद्धा नंदनवन निर्माण होईल!" ती उषेला म्हणाली.... "मी संध्याकाळी नुसते कुहू... कुहू केले, तर मावळलेला सूर्य पुन्हा परत येईल!" ती वल्लभ वल्लभांना म्हणाली.... "मी जर दूर देशी गेले, तर तुमचे प्रेमही माझ्याबरोबर उडून जाईल." वर्षाकाळ आला... आंब्याचा मोहर अदृश्य झाला... आभाळातून मुसळधार पाऊस पडू लागला... मेघांच्या पांघरुणातून उषा कधी तरी बाहेर डोकावून पाही; पण ते क्षणभरच!... चांदणी रात्र विझून गेलेल्या यज्ञकुंडासारखी दिसू लागली.कोकिळा पूर्वीप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करू लागली; पण तिच्या कंठातून सूरच बाहेर पडेनात....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #सूर्यकमळे
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    १९४१ साली प्रथमप्रसिद्ध झालेल्या या कथासंग्रहात १९२५-३० च्या दरम्यान लिहिलेल्या अकरा कथा आल्या आहेत. वद्य अष्टा, धरण, दीपस्तंभ, कोकिळा, तीन मने, वधू परीक्षा, जहागिरदाराचा जावई, विजय कोणाचा, कवीचे लग्न, परीक्षकांच्या अपेक्षा इ. या कथा म्हणजे पिकलेले आबे नव्हे, त्या कैऱ्या आहेत. कैऱ्या आंबट असल्या तरी त्या मिठाला लावून आवडीने खाणारे लोक असतातच. कैऱ्यांचे पन्हे केले तर प्रसंगी त्यातला आंबटगोडपणा नुसत्या गोडपणापेक्षाही अवीट असू शकतो, असे त्यांच्याबद्दल खुद्द खांडेकरांनीच म्हटले आहे. या कथा लिहिताना राम गणेश गडकरी यांच्या भाषाशैलीचा प्रभाव जास्त होता. अनुप्रास, कोट्या आणि कल्पनाविलास यांचा त्यावेळी मनमुराद वापर होई. कथा परिणामकारक आणि रसपरिपोषक होण्यासाठी कथानकात अतिरंजनाच्या छटा येत. ‘विजय कोणाचा’ या कथेतील मद्यपी माणूस स्वत:चे मूल विहिरीत टाकायला निघतो यासारखी घटनाही त्यामुळे सहजपणे येते. कवीचे लग्नामधील तुंगाचे माहेरचे आडनावच कवी असल्याने ती कविकन्या जन्मत:च असते. तिचे लग्न कवीशी होणे मग अपरिहार्यच ! लग्नानंतर भाई तेथील मोफत वाचनालयाला हजार काव्यसंग्रह भेट देतात. घरी साक्षात काव्य आल्याने त्या नकली काव्याची अडगळ हवी कशाला - असा त्यांचा सवाल असतो. समुद्रस्नानाला गेल्यावर पत्नी लाटेबरोबर वाहून जाते, पती सैरभैर होतो. सहा महिन्यांनी गावचा भिक्षुक त्याला सांगतो, ‘‘रावसाहेब, दुसरं लग्न केलं की नाही ?... वहिनीबाई मूल व्हावं म्हणून किती तळमळत असत... अर्चा-अनुष्ठानं किती करीत.’’ पती अपराधभावनेने आपले जीवनही संपवायला निघतो. (दीपस्तंभ) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more