* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO HAVE A BEAUTIFUL MIND
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788177668438
  • Edition : 5
  • Publishing Year : JUNE 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE SPEND A FORTUNE ON THEIR BODIES, THEIR FACES, THEIR HAIR, THEIR CLOTHES. COSMETICS, PLASTIC SURGERY, DIETS, GYM MEMBERSHIP - EVERYONE`S TRYING TO BE MORE ATTRACTIVE. BUT THERE`S AN EASIER WAY TO BECOME A BEAUTIFUL PERSON. IT DOESN`T HAVE TO BE PHYSICAL. NO MATTER HOW YOU LOOK, IF YOU HAVE A MIND THAT`S FASCINATING, CREATIVE, EXCITING - IF YOU`RE A GOOD THINKER - YOU CAN BE BEAUTIFUL. AND BEING ATTRACTIVE DOESN`T NECESSARILY COME FROM BEING INTELLIGENT OR HIGHLY-EDUCATED. IT ISN`T ABOUT HAVING A GREAT PERSONALITY. IT`S ABOUT USING YOUR IMAGINATION AND EXPANDING YOUR CREATIVITY. AND IT`S WHEN TALKING WITH PEOPLE THAT WE MAKE THE GREATEST IMPACT. A PERSON MAY BE PHYSICALLY BEAUTIFUL, BUT WHEN SPEAKING TO OTHERS A DULL OR UGLY OR UNCREATIVE MIND WILL DEFINITELY TURN THEM OFF. IN CLEAR, PRACTICAL LANGUAGE, DE BONO SHOWS HOW BY APPLYING LATERAL AND PARALLEL THINKING SKILLS TO YOUR CONVERSATION YOU CAN IMPROVE YOUR MIND. BY LEARNING HOW TO LISTEN, MAKE A POINT, AND MANOEUVRE A DISCUSSION, YOU CAN BECOME CREATIVE AND MORE APPEALING - MORE BEAUTIFUL.
आपण स्वत:ला आकर्षक करण्यासाठी कपड्यांवर, सौंदर्यप्रसाधनांवर, आहारावर, व्यायामावर अमाप पैसा खर्च करतो. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या, बिनखर्चाच्या एका गोष्टीकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो. ते घडवायला फारसा वेळही लागत नाही. ते आहे सुंदर मन. मन घडवायला ढीगभर ज्ञानाची गरज नाही किंवा उत्तम व्यक्तिमत्त्वाचाहीR गरज नाही. फक्त तुमच्यापाशी सर्जनशीलता, कल्पकता व स्पष्टपणा असला म्हणजे झालं. लोकांची विचारप्रक्रिया बदलू शकणारे जगप्रसिद्ध, EDWARD DE BONO यांनी आपल्या संभाषणकौशल्यांनी लोकांना कसं प्रभावित करायचं ते सरळसोप्या भाषेत पुस्तकात मांडलं आहे. हे पुस्तक वाचून संपेपर्यंत तुमचं आयुष्य कसं बदलून गेलं आहे, हे तुमच्या लक्षातही येणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#EDWARD DE BONO #PERSONAL DEVELOPMENT #एडवर्ड बोनो #व्यक्तिमत्व विकसन #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 23-03-2008

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे मंत्र... आपलं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक करण्यासाठी, केवळ बाह्यरंग चांगलं दिसण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो त्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा खर्च करण्याचीही आपली तयारी असते. पण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मुलाधार असलेल्या मनाचंकाय? मन घडवायला, ते सुंदर करायला खरं तर ना पैशाची गरज असते, ना ढीगभर ज्ञानाची, ना त्यासाठी फार वेळ लागतो, थोडंसं मनाकडे लक्ष दिलं, त्याला वळण लावलं तर आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वातच आमूलाग्र बदल होऊ शकतो. बाह्यरूप कसंही असलं तरी मनाच्या या सौंदर्यानं आपण लोकांना मोहित करून टाकू शकतो. इतरांचं जाऊ द्या, पण स्वत:साठी ते अधिक महत्त्वाचं आहे. ‘सुंदर मन’ या पुस्तकात सकारात्मक, सुंदर मनासाठी काय करता येईल याचं सुंदर विवेचन केलेलं आहे. एडवर्ड डी बोनो यांनी लिहिलेल्या या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सुभाष जोशी यांनी नेटका अनुवाद केला आहे. संभाषणाच्या माध्यमातून इतरांना प्रभावित करण्याचं तंत्रही यात विशद केलं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-03-2008

    प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे मंत्र... आपलं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक करण्यासाठी, केवळ बाह्यरंग चांगलं दिसण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो त्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा खर्च करण्याचीही आपली तयारी असते. पण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मुलाधार असलेल्या मनाचंकाय? मन घडवायला, ते सुंदर करायला खरं तर ना पैशाची गरज असते, ना ढीगभर ज्ञानाची, ना त्यासाठी फार वेळ लागतो, थोडंसं मनाकडे लक्ष दिलं, त्याला वळण लावलं तर आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वातच आमूलाग्र बदल होऊ शकतो. बाह्यरूप कसंही असलं तरी मनाच्या या सौंदर्यानं आपण लोकांना मोहित करून टाकू शकतो. इतरांचं जाऊ द्या, पण स्वत:साठी ते अधिक महत्त्वाचं आहे. ‘सुंदर मन’ या पुस्तकात सकारात्मक, सुंदर मनासाठी काय करता येईल याचं सुंदर विवेचन केलेलं आहे. एडवर्ड डी बोनो यांनी लिहिलेल्या या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सुभाष जोशी यांनी नेटका अनुवाद केला आहे. संभाषणाच्या माध्यमातून इतरांना प्रभावित करण्याचं तंत्रही यात विशद केलं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2007

    मन सुंदर करणारं पुस्तक… शरीर नुसतंच बलदंड असून उपयोग नाही, तर त्यासाठी मन सुंदर ताजतवानं आणि प्रसन्न असायला हवं. एखाद्या कॉकटेल पार्टीत सुंदर तरुणी वावरत आहे. पण ती एकाकी आहे. लोक तिच्याजवळ येतात. पण पटकन दूर जातात. या उलट पलीकडे बसलेला डोक्यावरचे कस विरळ झालेला, स्थूल बुटका इसम हातवार करत गप्पा मारतो आहे. त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडलेला आहे. याचं कारण त्या पार्टीतल्या सुंदरीचा वावर निरूत्साही होता तर स्थूल माणसाचं मन आकर्षक होतं. त्यामुळेच लोक त्या सुंदरीपेक्षा त्या स्थूल माणसाकडे आकर्षित झाले. आपण स्वत:ला आकर्षक करण्यासाठी कपड्यांवर, सौदर्यप्रसाधनांवर, आहारावर, व्यायामावर अमाप पैसा खर्च करतो. पण सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या बिनखर्चाच्या एका गोष्टीकडे मात्र साफ दुर्लक्ष करतो. ते घडवायला फारसा वेळ लागत नाही. ते आहे सुंदर मन. मन घडवायला ढीगभर ज्ञानाची गरज नाही किंवा उत्तम व्यक्तिमत्त्वाचाही गरज नाही. फक्त सर्जनशीलता, कल्पकता व स्पष्टपणा असला म्हणजे झालं. लोकांची गरज प्रक्रिया बदलून टाकणारे जगप्रसिद्ध लेखक एडवर्ड डी बोनो यांनी आपल्या संभाषण कौशल्यांनी लोकांना कसं प्रभावित करायचं ते सरळ सोप्या भाषेत आपल्या ‘हाऊ टू हॅव अ ब्युटिफूल मार्इंड’ या पुस्तकात सांगितलं आहे. या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद सुभाष जोशी यांना ‘सुंदर मन’ या शीर्षकाखाली केला आहे. आपला स्वभाव हा स्वत:च्या प्रतिमेशी संबंधित असतो. मनाच्या पर्याय शोधण्याच्या क्षमतेवर सुंदर मनाचं मोजमाप ठरतं. मनाची ओळख आपण साधत असलेल्या संवादातून होते. लोक जसे एखाद्याच्या शारीरिक सौंदर्यावर भाळतात तसे त्याच्या बौद्धिक सौंदर्याकडेही आकर्षित होतात. मनाचा परिणामकारकपणे वापर केल्यास विचारसरणी सुंदर होऊ शकते. बोनो यांनी आपल्या या पुस्तकामध्ये मन सुंदर करण्यासाठी काय करावं. संभाषण, भाषण कसं करावं, संवाद कसा साधावा, मतं कशी मांडावीत, याविषयी उदाहरणे देऊन व्यक्तिमत्त्व विकासाचे सुंदर विवेचन केलेल आहे. ते म्हणतात, संशोधक वृत्तीचा माणूस नेहमी काहीतरी भरीव, नवीन कल्पना सुचवण्यासाठी संधी शोधत असतो, तर कंटाळवाणा माणूस कंटाळवाणं करून सोडतो, व जे काही ऐकतो ते सगळं जुनंच आहे असं म्हणतो. हारजीतची भावना लढाऊवृत्तीत असते. अहंकाराने केलेल्या संभाषणात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देश असतो. उत्तम वादविवादपटू कुठल्याही विषयावर बोलून त्यात रंगत आणू शकतो. सुंदर मन मात्र वयानुसार म्हातारं होत नाही तर ते अधिकाधिक सुंदर होत जातं. सुंदर मनाशिवाय सुंदर शरीर चेहरा हे कंटाळवाणे असतात पण त्याच्या उलट सुंदर मन हे सुंदर तनमनशिवाय आकर्षक असतं. बोनो यांचे सुंदर मनावरील विचार चिंतनीय आहेत. म्हणूनच जगाच्या इतिहासात आतापर्यंत मानवतेवर प्रभाव पाडणाऱ्या २५० व्यक्तिंच्या यादीत दक्षिण यादीत दक्षिण आफ्रिकन विचारवंतानी डॉ. बोनोंचं नाव समाविष्ट केलंय. बोनो यांनी ६७ पुस्तके लिहिली असून ३७ भाषांतून ती भाषांतरीत झालेली आहेत. ‘हाऊ टु हॅव अ ब्युटीफूल मार्इंड’ हे पुस्तक खरोखरच मन प्रसन्न, सुंदर करणारे आहे. मन उदास असलेल्यांनी, खचलेल्यांनी आणि इतरांनीही ते जरुर वाचावं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book