* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMEEPA
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA LELE
  • ISBN : 9788184988758
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH KINGDOM HAS A SUBCULTURE. IT IS THIS SUBCULTURE THAT PRODUCES LITERATURE. THE BOOK SAMIPAA REFLECTS THE DISTRESS OF AN INDIAN WOMAN FROM GUJARATI SUBCULTURE. IT SPEAKS ABOUT HER HONOUR AND PAIN. IT WILL SURELY HELP US TO UNDERSTAND LIFE FROM DIFFERENT PERSPECTIVE, LEAVING US PONDERING OVER THE TRUTHS.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते, त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAMEEPA #SAMEEPA #समीपा #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMALELE #UNKNOWN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-03-2016

    स्त्रीजाणिवेच्या प्रातिनिधिक गुजराती कथांचे संकलन ‘समीपा’ हे सुषमा लेले यांनी अनुवादित केलेले पुस्तक. या पुस्तकाला दिलेला डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अभिप्राय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आढळतो. ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्ृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील.’’ पुस्तकाचे मुखपृष्ठ गुजराती कठपुतळ्यांच्या खेळाचे आहे; परंतु बाईची कठपुतळी होणे यातील वेदना पोचवण्याचे काम त्या करतात का, हा कळीचा प्रश्न आहे. लेखिकेने मनोगतामध्ये गुजराती भाषा आणि वडोदरा हे कधी परके वाटले नाही असे म्हटले आहे. दोन्ही भाषांवर समान प्रेम आणि आपुलकी असल्याने लेखिकेने हा प्रकल्प आत्मीयतेने राबविला आहे. मनोगतामध्ये त्यांनी गुजराती-मराठी साम्य-भेद सांगितले आहेत. अनुवाद करताना केलेली तारेवरची कसरत त्यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यांनी गुजरातीतला गोडवा व माधुर्य अनुवादात टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या शब्दांच्या आत दडलेला अर्थ मराठीत आणण्याचा आणि दोन्ही भाषांमधील लिंगभेदाचा फरक अधोरेखित करून मांडण्याचा प्रयत्नही दिसतो. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे आणि मराठी स्त्री-साहित्यामध्ये चांगली भरही पडली आहे. मात्र प्रश्न आहे तो असा, की सर्व स्त्रियांमध्ये समान स्त्रीत्व असते असे मानून मनोगतात लेखिका असे म्हणते की,‘भाषेच्या याच लयीत, याच तालात स्त्रीकडे पाहिलं असता बसं दिसून येतं की स्त्री-मग ती शहरी-ग्रामीण, दलित-दलितेतर, गरीब-श्रीमंत किंवा कुठल्याही धर्मगटातील किंवा प्रांतातील असो; तिची मानसिकता, शरीररचना, शारीर अनुभव, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.’ स्त्रीवादी अभ्यासातून आम्हाला असे जाणवले आहे की, ‘सर्व स्त्रिया’,‘आम्ही स्त्रिया’ असे म्हणून सर्व स्त्रियांना एकसाची बनवून बाईपणाचे एकच एक सत्त्व असते असे जेव्हा मांडले जाते, तेव्हा भिन्न प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या भिन्न मार्गानी सोसण्याच्या तपशिलांवरच बोळा फिरवला जातो. इतकेच नव्हे, तर ‘सर्व स्त्रिया’ असे म्हणणाऱ्यांसमोर उच्चवर्गीय स्त्रियांच प्राधान्याने असल्यास नवल नाही. आजही महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीत उच्च जातिवर्गातील स्त्रियांचा पुढाकार दिसतो. जर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबार्इंच्या पुढे जायचे तर दलित, कष्टकरी स्त्रियांचे अनुभव, नेतृत्व आणि त्यांचा कुटुंब, समाजजीवन याविषयीचा विचार व्यक्त व्हायला हवा असे वाटते. यातून भारतीय स्त्री-चळवळीची कुंठितता संपण्याची शक्यता आहे. भारतातील जातीय व वर्गीय विषमतेच्या अगदी गाभ्यापाशी स्त्रीप्रश्न आहे. त्याची तड लावायची तर जातीयवादी राजकारणाचे विश्लेषण करणे, स्त्रियांनी राजकारणात सहभाग घेणे आणि त्यातील पुरुषसत्ताकता उघडकीस आणणे याला पर्याय नाही. स्वायत्त स्त्री-संघटनांचे योगदान मान्य करूनही अनेक अभ्यासक आता भारतातील स्त्री-चळवळीने दलित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आपले स्त्री - पुरुष विषमतेविषयीचे विचार मांडावे, कृती करावी असे म्हणू लागले आहेत. असा महाराष्ट्राचा जो सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा वारसा आहे तो वारसा गुजराती साहित्यामध्ये आढळतो का, हा शोध घेतला गेला पाहिजे आणि अनुवादासाठी तशा कथा निवडल्या गेल्या पाहिजेत. अनुवादित कथांचा एक सामाजिक इतिहास व त्या कथा लिहिणाऱ्या लेखकांचा त्यादृष्टिने परिचय देणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर हे अनुवाद दुपारच्या फावल्यावेळात झोप येण्यापूर्वी वाचून विसरून जाण्याच्या स्वरूपाचे राहणार नाहीत आणि स्त्रीत्वाचे गुजरातसारख्या जवळच्या प्रांतातून आलेले आविष्कार फक्त सोहळ्याच्या रूपात कौतुकस्वरूपात मांडले जाणार नाहीत. लेखिका स्वत: मराठी व गुजराती साहित्याची अभ्यासक आहे. परंतु एकूणच साहित्याच्या अभ्यासात सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला जात नाही. साहित्याचे वाचन कलावादी पद्धतीने केले जाते. परंतु त्याला चिकित्सक सामाजिक इतिहासाची जोड दिली जात नाही याबद्दल खंत वाटते. असे झाल्यामुळे साहित्याचा अभ्यास हा सभोवती घडणाऱ्या इतर घटनांशी जोडला जात नाही आणि मग साहित्य संमेलनेसुद्धा समारंभाच्या रूपात लाखो रुपये खर्च करून साजरी केली जातात. परंतु खऱ्या प्रश्नांना तोंड फुटत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्या परित्यक्ता, विधवा असूनही कोणताही पाठिंबा नसताना झगडतात आणि संघर्षमय जगत आपले आयुष्य उभारतात. त्याला तोंड फोडण्याचे काम अशा स्त्री-जाणिवेच्या लेखनामधून झाले पाहिजे. आजच्या घडीला विवाहांत हुंड्याचे वाढते प्रमाण, लग्न मोडणे, लग्नांमध्ये थोडीही जातीय तफावत असली तर विरोध, इतकेच नाही तर हिंसाचाराचे वाढते प्रमाण असे सगळे आजूबाजूला घडत असताना या अनुवादाचे स्वरूप मात्र एखाद्या निर्लेप तरंगणाऱ्या बेटासारखे वाटते असे खेदाने नोंदवावे लागते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book