* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SALT AND HONEY
  • Availability : Notify Me
     
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9788184982558
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN A SOUTHERN AFRICA VIOLENTLY SPLIT DURING APARTHEID, KOBA IS TAKEN AWAY FROM HER KALAHARI DESERT-TRIBE AFTER WITHNESSING HER PARENTS BEING MURDERED BY A PARTY OF WHITE HUNTERS. SHE SLOWLY LEARNS TO ADAPT AND SURVIVE IN A DANGEROUS BUT BEAUTIFUL ENVIRONMENT. HOWEVER, SHE IS PLAGUED BY THE KNOWLEDGE THAT UNLESS SHE LEAVES THOSE WHO HAVE GROW TO LOVE HER, SHE FACES EXILE FROM HER OWN PEOPLE. THE ONLY ANSWER MAY BE TO RISK ALL THROUGH THE BRUTAL LAWS THAT CONDEMN HER. OFFERING A RARE GLIMPSE INTO AN ENDANGERED CULTURE,SALT & HONEY IS AN EPIC, MOVING AND FASCINATING STORY OF ENDURANCE AND UNDERSTAINDING. ""CANDI MILLER`S ACHIEVEMENT IS TO HAVE WRITTEN A SMALL BOOK WITH TRULY BIG THEMES. IT`S AN AMBITIOUS NOVEL WITH IMPRESSIVE RANGE AND A VERY AUTHENTIC FEEL.`` BARBARA TRAPIDO
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोऱ्या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गोऱ्यांच्या जगात नेलं जातं. त्यांच्या त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे जर तिला स्वत:च्या जमातीकडून बहिष्कृत व्हायचे असेल, त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल. अखेर तिलाच दोषी ठरवणाऱ्या गोऱ्यांच्या त्या अत्याग्य कायद्यांच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावणे हाच कदाचित त्यावर उपाय असू शकतो. एका नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीच्या जीवनशैलीच्या अंतरंगाची दुर्मिळ झलक दाखवणारी ही कादंबरी हे महाकाव्यच आहे सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे. वँÂडी मिलरचं श्रेय हेच आहे की एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तिला मातीचा स्पर्श आहे. – बार्बरा ट्राजिडो

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SALTANDHONEY(MARATHI) #सॉल्ट अ‍ॅण्ड हनी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VAIJYANTIPENDSE #CANDI MILLER #कॅंडी मिलर "
Customer Reviews
  • Rating StarRavindra Chavan

    सॉल्ट अॅंड हनी... कॅंडी मिलर.. अनुवाद :वैजयंती पेंडसे. लॉकडाऊन काळात अचानक हाती लागलेले रत्न.. दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातील भटक्या आदिवासी आणि वर्णद्वेषी (तथाकथित शहरी) घुसखोरी संघर्षांतील भीषण कॅनव्हासवर उभी राहिलेली एक सुंदर प्रेमकथा.. आपल्या जमातीपासुन तोडल्या गेलेल्या "कोबा" या लहानग्या मुली विषयीच हे पुस्तक. एका विलक्षण सौंदर्याने नटलेल्या आणि त्याचवेळी भीतीदायक क्रौयाने भरलेल्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले. कोबा!वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमाती पैकी एक लहानगी.! गोर्‍या लोकांच्या एका शिकारी चमुकडून आपल्या आईवडिलांची झालेली निघृण हत्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वतःच्या जगापासून दूर, त्या गोर्‍यांच्या जगात नेलं जात. नंतर सुरु होतो एक संघर्ष त्या जगाशी जुळवून घेण्यासाठी आणि आपली संस्कृती आपल्याला बहिष्कृत करणार नाही ना ह्याची टोचणारी जाणीव... संघर्षांतच फुलणारे प्रेम... ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तिच्याशी च मैत्री करावी. ह्या अनुबंधावर हेलकावे खात असणारी "कोबा"..! अनुवाद एवढा समरसून झालाय कि कुठेही प्रवाही कथेला बांध नाहीच.. नुसते खळखळुन वाहतोय प्रवाह.. धाडसी विधानं पण कथेला वेगळीच खुमारी देतात.. पुरूष तर नेहमीच स्वतः ला कोणताही त्रास करून न घेता लैंगिक सुख मिळवत असतात, नाही का? हळुवार फुलणारी प्रेमकथा आणि अंगावर गोड शहारे आणणारे प्रसंग नसतील अस होईल का ?त्या चोरट्या प्रणय प्रसंगांची एक वेगळीच हुरहुर आहे.! प्रेम आले म्हणजे व्हिलन आले. एक मस्त मसालापट बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे दूर्लक्षित महाकाव्य नक्की वाचा. सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे. कॅंडी मिलरचे श्रेय हेच आहे कि एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तीला ओघवत्या अनुवादाने मातीचा स्पर्श आलेला आहे.. आपलाच RC. 😊. ११/०५/२०२०. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more