* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
"Swami (Master) The Maratha (non Muslim) empire established in Maharashtra by Chhatrapati Shivaji Maharaj (d. 1680) against all odds later passed into the hands of the Peshwas (prime minister) who became the supreme lords. The Maratha Empire which stretched across a sizeable portion of Western, Central and Northern India suffered a severe setback when the Marathas lost the (Third) Battle of Panipat in 1761. It was an immense loss of men, money, and material. The then Peshwa Nanasaheb could not bear the brunt of the casualties which included his eldest son and younger brother, and soon passed away. For the sixteen year old Madhavrao who succeeded Nanasaheb, it was not a piece of cake. The coffers were empty, the royal court was fraught with internal dissensions. Madhavrao could not go along with his uncle, Raghunathrao, who wanted to be the Peshwa, and went to any extent including looting his own subjects. The Nizam, Hyder, and the British had set their eyes on the Maratha empire. Swami is based on the life and character of Madhavrao who resurrected the Maratha empire. He revived the lost glory and pride. The extent of the empire was now wider than before. He contained the enemy. Swami sketches the personal life of the Peshwa and specially poignant are the parts covering the discomfort he feels when Raghunathrao is a thorn in his flesh, and his untimely death. The novel throws light on the political, social and cultural history of the mid Peshwa era. The portrayal of the bond between Madhavrao and his wife, Ramabai, is a special feature. Ranjit Desai (1928-1992) tackled the genre of novels with such ease that his collection includes all types of novels: historical, social, mythological, and biographical. He was also a playwright and has to his credit short stories. "
"""महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी. "" "
Keywords
SWAMI, THEUR, SHRIMANT, SHANIWARVADA, DELHI DARVAJA, GANESH-MAHAL, PESHAVE, MADHAVRAO, RAMABAI, GOPIKABAI, RAGHOBADADA, ANANDIBAI, NARAYANRAO, VISHWAS, PANIPAT, PARVATI, KAKA, ‘DH’ CHA ‘MA’, MARATHESHAHI
Customer Reviews
 • Rating StarKumud Nafrey

  Swami khupch Sundar aahe.

 • Rating StarManohar Khairnar

  स्वामी रणजित देसाई यांच अप्रतिम अस ऐतिहासीक पुस्तक ..थोरले माधवराव पेशवा व त्यांची पत्नी रमा यांची अप्रतिम अशी प्रेमकहाणी आज काल जे प्रेम दिसत नाही त्यावर त्यचबरोबर पानिपतानंतर मराठाशाहीच वैभव परत प्राप्त करुन देण्यात सर्वात मोठ योगदान त्याचबरोबर काक पुतण्या यातील संघर्ष घरातच सत्तासंघर्षाचा कसा प्रयत्न होता याच वर्णन पुढे हेच प्रकरण मराठाशाही जाण्यास कारणीभुत ठरल त्याचबरोबर माधवराव पेशवाचा पराक्रम ते लढ्यामध्ये इतके व्यस्त होते की त्यांच्या जिवनात रमाची फक्त चेहराच हातात घेण्याच भाग्य लाभल निजामाबरोबर सघर्ष अश्या अनेक पराक्रमाची गाथा त्याचबरोबर थोर इतिहासकार ग्रॅड डफ याच माधवराव पेशव्याबदल उद्गगार पानिपताच्या युध्दात जितके मराठे हुतात्मे झाले त्यापेक्षा एकट्या माधवराव पेशव्याच्या निधनाने जे नुकसान झाले ते कधीच भरुन निघणार नाही...नक्की वाचा.. ...Read more

 • Rating StarParag Jagtap

  रमा माधवाचे जिथे चित्त लागे । जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे।। पानिपत युद्ध संपले आणि विश्वासराव गेले आणि त्या धक्क्याने नानासाहेब पेशवे ही गेले छत्रपतिंच्या पंतप्रधान जागी माधवराव पेशवा बनला त्यांच्या या जीवनपटावर नवीन प्रकाश टाकणारी रणजित देसाई लिित सुंदर कांदबरी म्हणजे स्वामी.. माधवरावाचे जीवनकाळ तसा लहान आहे पण मराठा सत्ते चा विस्तार त्यावर पानिपत युद्धा नंतर विस्कटलेली मराठा सत्ते ची घडी माधवरावांनी जी बसवली ती वाचण्याजोगी आहे.स्वकीय व परकीय शत्रू यांना शह देऊन आपला राजकारण पाया मजबूत करणे .स्वामी मध्ये शनिवारवाड्याचे अंतरंग आपण अनुभवतो आपण राघोबादादा ,आनंदी बाई , रामशास्त्री यांसारख्या पात्राशी आपण एकरूप होतो. अजून काय लिहू आपण वाचली असेलच. नसेल वाचली तर नक्की वाचा ।। स्वामी ।। ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 05-02-2017

  मराठी साहित्य विश्वात गाजलेल्या काही पुस्तकांचा रसास्वाद या सदरातून आपण घेणार आहोत. विशेषत: नव्या पिढीला हा अमूल्य ठेवा समजावा म्हणून हा प्रयत्न. श्रीमंत माधवराव पेशवे यांची कर्तृत्वगाथा अतिशय प्रभावीपणे रणजित देसाई यांनी ‘स्वामी’ या कादंबरीत चितारलीआहे. या कादंबरीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचा संघर्ष इतका जिवंत आहे की, वाचक त्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडतात. असं म्हणतात... ज्या माणसांवर खूप लहान वयात घराची जबाबदारी पडते. त्याच्याकडे एक वेगळीच परिपक्वता आढळते. भोवतालच्या संकटांशी सामना करण्याची जिद्द आणि त्यासाठी आवश्यक तो कठोरपणा नैसर्गिकरित्या त्यांच्या स्वभावात येतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीवर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राज्याची धुरा येऊन पडली तर... बरं राज्याची परिस्थिती एवढी बिकट की, तंजावरपासून अटकेपर्यंत दरारा असलेली मराठी दौलत चारी बाजूने खिळखिळी झालेली, निजाम, हैदर सारखे शत्रू बदला घेण्यासाठी सज्ज झालेले, सरदारात एकी नाही, राज्यावर कर्जाचा डोंगर अशा परिस्थितीला तोड द्यायचे कसे?... राजकीय आणि आर्थिक कोंडीतून मार्ग काढायचा कसा?... अर्थात समोर आदर्श होता शिवरायांचा. वयाच्या सोळाव्या वर्षीच तोरणा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली होती. आणि... हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा! बस्स हा आदर्शच मोठा आधार होता. या बळावरच त्या तरुणाने परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिले. ही कर्तृत्व गाथा आहे श्रीमंत माधवराव पेशवे यांची. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मनाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख होते. मोरोपंत पिंगळे. या अष्टप्रधान मंडळाच्या प्रमुखाचा उल्लेख दख्खनचे मुस्लीम शासक ‘पेशवा’ असा करीत. पेशवा हा मूळ पर्शियन शब्द. पुढे पेशवा हेच नाव रुढ झाले. १७१४ साली श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्याचे बाळाजी विश्वनाथ पेशवे झाले आणि इथून पेशवाईची सुरुवात झाली, असे मानले जाते. पेशवाईचा कालखंड १८१८ पर्यंत म्हणजेच १०४ वर्षांचा हा इतिहास आहे. या काळात अनेक चढउतार या राजवटीने पाहिले. बाजीराव पेशव्यांचा पराक्रम पाहिला. मराठेशाहीचे अटकेपार लागलेले झेंडे पाहिले. तसेच पानिपतचा दारुण मानहानीकारक पराभव देखील पाहिला असं म्हणतात... जिथून राजकारण खेळलं जातं. त्या प्रत्येक वास्तूच्या उदरात काही रहस्ये दडलेली असतात. शनिवारवाडादेखील त्याला अपवाद नाही. पानिपतच्या फसलेल्या मोहिमेपासून ते आनंदीबाईने केलेल्या ध च्या मा पर्यंत (?) अनेक गोष्टी बद्दल उत्सुकता आज देखील आहे. मुळात प्रश्न पडतो की, भल्या मोठ्या पराभवानंतर राज्ये सावरतात कशी?... राज्यकर्ते मार्ग काढतात कसा?... पानिपतच्या आघातानंतर खिळखिळ्या झालेल्या पेशवाईला आपल्या कर्तबगारीने सावरले ते माधवराव पेशव्यांनी. अतिशय कमी आयुष्य लाभलेल्या या कर्तबगार पेशव्यांची कर्तृत्वगाथा अतिशय प्रभावीपणे रणजित देसाई यांनी ‘स्वामी’ या कादंबरीत चितारली आहे. या कादंबरीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचा संघर्ष इतका जिवंत आहे की, वाचक त्या व्यक्तिरेखाच्या प्रेमात पडतात. या कादंबरी वर आधारित दूरदर्शन मालिका देखील यशस्वी ठरली होती. माधवराव, राघोबादादा आणि रमाबाई या तीन प्रमुख व्यक्तिरेखा भोवती कथानक फिरते. कादंबरीची सुरुवातच एका नाट्यपूर्ण घटनेने होते. नानासाहेब पेशव्यांच्या निधनानंतर प्रश्न पडतो की, पेशवाईला वारसा कोण? नाना साहेबांचा मोठा मुलगा विश्वासराव तर पानिपतात मारला गेला. आता वारसा धाकटा भाऊ रघुनाथराव उर्फ राघोबादादा याला मिळणार की, दुसरा पोर वयाचा मुलगा माधव पेशवा होणार?... माधवास गादी वर बसवून रघुनाथरावाने कारभार हाकावा असं ठरतं. अवघ्या सोळाव्या वर्षी माधवराव गादीवर बसल्यानंतर मात्र दरबाराला वक्तशीरपणा आणि नियमांचे पालन याची जाणव करून देतात. अंमलबजावणी करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही. ‘ही पेशव्याची मसनद तिचा अपमान कोणी करू धजेल, तर तेथे वयाचा मानाचा, मुलाहिजा ठेवला जाणार नाही. खुद्द पेशवे देखील घालून दिलेल्या नियमांना अपवाद नसतील.’ ही गोष्ट माधवराव निक्षून सांगतात. अर्थात... नियम-पोटनियम, कायदा- उप कायदा, यांचा गुंता सगळीकडेच असतो. परंतु तरीही... ‘ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल’ हाच जगाचा मुख्य नियम. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, तर नियमांचं काय?... माधवराव मात्र अपवाद ठरतात. ते नियमांचं कठोरपणे पालन करायला लावतात. अगदी राघोबादादा देखील त्यातून सुटत नाहीत. शिस्त, जरब आणि एकाधिकारशाही याच्यातील फरक माधवराव जाणतात. म्हणूनच सुरुवातीला देवपूजा आणि होमहवन यामध्ये माधवाचा अधिक वेळ जातो आहे हे लक्षात येताच रामशास्त्री त्यांना स्पष्टपणे तशी कल्पना देतात.’ आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे. प्रजा पालन हे आपले प्रथम कर्तव्य आहे. किंबहुंना तोच आपला धर्म आहे. पूजा, होमहवन आपण करा पण ते मसनदीवर बसून नव्हे. आपल्या कर्मकांडामुळे दरबारचे मानकरी तिष्ठत बसतात. ज्या शनिवार वाड्यात अटकेपार जाण्याच्या मसलती झडल्या तेथे आता होमहवन होते आहे. हे गैर आहे. माधवरावांना या स्पष्टवक्तेपणाचा राग येत नाही. ते आपली चूक सुधारतात. शनिवारवाड्यावर होमहवनासाठी चक्क राघोबा दादांना परवानगी नाकारली जाते. राघोबादादांचा पारा चढतो. एकवेळ निजाम परवडला. परंतु स्वकीयाच्या विरोधाचा दाब अधिक. राघोबा जेव्हा तक्रार करतात, तेव्हा माधवराव त्यांना ठणकावून सांगतात, हा शनिवारवाडा आहे. दख्खनच्या दौलतीची सूत्र हलवण्याचे ठिकाण आहे. हे वीरांचे विश्रामस्थान आहे. ही होमाची जागा नाही. त्यासाठी देवालये आहेत. अखेर धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न.’ माधवराव पेशव्यांचे हे विचार आजदेखील आदर्श आहेत. अर्थात मनात प्रश्न येतो की, धर्मसत्ता राज्यसत्तेवर आपल प्रभाव का टाकते?... खरं म्हणजे प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल त्या धर्माचे पालन करावे आणि दुसऱ्या धर्माचा आदर करावा. मुळात ‘राजधर्म’ हा देखील एका धर्मच आहे. याचाच विसर पडला आहे, त्याचं काय? ‘राज्यकर्त्यांना इच्छा नसतात. नुसती कर्तव्य असतात.’ ही त्या राजधर्मांची शिकवण माधवरावांनी आयुष्यभर पाळली. माधवरावांचा लढा तीन आघाड्यांवर होता. पहिला निजाम, दुसरा हैदर आणि तिसरे खुद्द रघुनाथराव. रघुनाथराव हलक्या कानाचे आणि सल्लागारांवर अवलंबून असलेले. अशी माणसं सद्सद् विवेकबुद्धी नेहमीच हरवून बसतात. यांच्याकडे दूरदृष्टी नसते. राज्य कारभारासाठी यांचा उपयोग कमी आणि त्रास जास्त. माधवरावांची पकड राज्यावर घट्ट बसू लागते. रघुनाथराव निजामांना जाऊन मिळतात. माधवराव स्वत:कडे कमीपणा घेतात. ‘आपासातील कलहामुळे निजामासारख्या परंपरागत शत्रूचे फावते.’ हा विचार त्या मागे असतो आलेगाव येथे माधवरावांना नजर कैदेत ठेवले जाते. जवकरच निजाम आपले रंग दाखवतो. राघोबा अडचणीत सापडतात. आता मार्ग काढायचा कसा?... संकटात सापडलेली दौलत सांभाळायची कशी?... नेतृत्व पुन्हा माधवरावांकडे येतं... अखेर हा बुद्धिबळाचा डाव. इथे नेतृत्वगुणाची कसोटी लागते. वृद्ध जेवढे जमिनीवर खेळले जाते त्यापेक्षा अधिक डोक्याने खेळले जाते. तिथे मुत्सद्दीपणाचा कस लागतो. अर्थात कठीण परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचा आदर्श शिवाजी महाराजांनी घालून दिलाच आहे. त्या राजाने हे देखील सांगितले आहे की, मराठी रक्त आज नाहीतर उद्या मराठी राज्याच्या उपयोगी पडणारच. निजामाचे मराठी राजवटीवरील सावट दूर करण्यासाठी माधवराव शिवरायांनी दाखवलेला मार्ग अनुसरतात. गनिमी काव्याचा वापर करतात. निजामाला प्रत्यक्ष तोंड न देता, निजामाच्या राज्यात जाळपोळ करत सुटतात. हा सारा रोमहर्षक इतिहास खूप रंजकतेने येतो. रणजित देसाईचे लेखनसामर्थ्य वाचकाला इतिहासाच्या मोहात टाकते. कर्नाटकच्या चौथ्या मोहिमेत माधवराव जेव्हा निघतात. तेव्हाच त्याची प्रकृती ठीक नसते. पुढे ती खूपच ढासळते आणि त्यात त्यांची जीवनज्योत मावळते. त्यांचं अल्पायुष्य बरंच काही सांगून जातं. इतिहासकार ग्रांट डफच्या मते माधवरावांच्या अकाली निधनाने मराठी राजवटीचे जेवढे नुकसान झाले, ते पानिपत पेक्षा अधिक होते. स्वामी कादंबरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीला रमा माधवच्या प्रीतीची खूप विलोभनीय किनार आहे. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठीही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. राजकारणातले गंभीर आणि बिकट संघर्ष वाचकाला दिग्मूढ करतात. धकाधकीच्या आयुष्यामुळे माधवची प्रकृती ढासळत गेली... तरी ते लढाया मारतच होते आणि या साऱ्या जीवनसंघर्षात रमा त्यांची सोबत करत होती. रमा हाच माधवरावांच्या जीवनाचा प्रेरणास्त्रोत होता. त्या दोघांचा नर्म प्रणय आणि त्यातली तरलता रणजित देसार्इंनी अतिशय नाजूकपणे खुलवली आहे. रणजित देसाई यांनी रेखाटलेले राजकीय संघर्ष देखील अतिशय रोमांचक आहेत. इतिहास आणि साहित्य याचे रोमहर्षक रसायन असलेली ही साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी मराठी भाषेचा मोलाचा ठेवा आहे, हे निश्चित! -डी. व्ही. कुलकर्णी ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

BONOBO : EK SHANTODOOT
BONOBO : EK SHANTODOOT by Vanessa Woods Rating Star
DAINIK SAKAL 17-06-2018

आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे. ...Read more

And The Mountains Echoed
And The Mountains Echoed by Khaled Hosseini Rating Star
DAINIK LOKMAT 17-06-2018

दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more