* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SURVANTA
  • Availability : Upcoming
  • ISBN : 9789353172053
  • Edition : 2
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Survanta is the wife of Malhari, a sugar-cane cutter. She is recently married to him. She sets out with him during the first harvest of sugar-cane. Thus, we get to know the terribly difficult life of these workers. The atrocities by the agent sets her mind on fire. One such day, the agent seeks an opportunity and rapes Survanta which leads to abortion. She is now set to come out of the exploitation. During this period, she comes in the company of Tejram. She gets attracted to him and agrees to stay on his farm with her husband Malhari. Very soon, Malhari comes to know about her relation with Tejram. This changes everything. How? To know, read Survanta.
सुर्वंता या एका देखण्या ऊसतोडणी कामगाराची ’सुर्वंता’ ही कहाणी आहे. नवीन लग्न झालेली सुर्वंता तिच्या नवर्याबरोबर, मल्हारीबरोबर पहिल्यांदाच ऊसतोडणीच्या सीझनला जाते. तिथे गेल्यावर ऊसतोडणी कामगारांचं जीवन किती कष्टमय आणि अस्थिर आहे, याची तिला कल्पना येते. मुकादमाकडून ऊसतोडणी कामगारांचं होणारं शोषण पाहून तर ती प्रचंड अस्वस्थ होते. त्यात मुकादम एकदा संधी साधून तिच्यावर बलात्कार करतो. त्यामुळे तिचा गर्भपात होतो. मग तर ती या शोषणातून बाहेर पडायचा मार्ग शोधायला लागते. त्याच वेळी तेजराम नावाचा एक जमीनदार तरुण तिच्यावर जाळं टाकू पाहत असतो. त्याच्या रुबाबाला ती भुलते आणि त्याला वश होते. त्याच्या शेतावर काम करण्यासाठी ती मल्हारीला राजी करते. मल्हारीचा मोठा भाऊ, मल्हारी आणि सुर्वंताला तेजरामच्या शेतावर न जाण्याविषयी समजावून सांगतो; पण ते दोघं हट्टाला पेटलेले असतात. ते तेजरामच्या शेतावर राहायला जातात आणि त्याच्या शेतावर काम करायला लागतात. तेजराम सुर्वंतावर फिदा असल्यामुळे तिला झुकतं माप देत असतो; मात्र तेजरामचे आणि आपले चोरटे संबंध मल्हारीला कळले तर काय होईल, या काळजीने सुर्वंताला व्यापलेलं असतं. शिवाय तेजरामशी प्रतारणा करत असल्यामुळे तिला अपराधीही वाटत असतं. शेवटी जे घडू नये ते घडतं आणि सुर्वंताचं जीवन पार उद्ध्वस्त होतं. तर सुर्वंतांची ही करुण कहाणी अशी मनाला चटका लावणारी आहे. ऊसतोडणी कामगारांच्या जीवनाचं वास्तव दर्शन घडविणारी ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.
Keywords
#suvanta#B.G. Keskar#malhari#karbhari#shalan#gadya#karkhana# kopi# mukadam# tejram#bajari# kapus# jondhala # #सुर्वंता# बा.ग. केसकर# मल्हारी# कारभारी# शालन#गाड्या# कारखाना# कोपी# ऊस# मुकादम# तेजराम#बाजरी#कापूस# जोंधळा#
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

VADALFUL
VADALFUL by REI KIMURA Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

एका राजकन्येची अचंबित करणारी कहाणी... रेई किमुरा हे नाव अपरिचित नाही. किमुरांच्या कादंबऱ्या अतिशय वाचकप्रिय आहे. The Princess and The Spy मेहता प्रकाशनाने ‘वादळफूल’ या शीर्षकाने वाचकांसाठी आणले आहे. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि अगदी नेमका ब्लर्ब यासह. मांचुरिया हा विस्मृत चीनचा एक भाग. इथेही राजेशाही होती. वजकुमार स्यू काय किंवा चिनी सम्राट काय सगळे एका माळेचे मणी होते. ‘दी किंग कॅन डू नो राँग’ मानणारे. जनतेची पर्वा नसणारे. उपभोगात रमलेले, कोणाच्या जनान्यात किती भोगस्त्रिया आहेत, यावर मोठेपणा मानणारे, एकप्रकारे सत्तेच्या, भोगाच्या, सुखलोलुपतेच्या कैफात असलेले, मांचुरियाचे राजकुमार स्यू त्याच परंपरेतले. स्यूंच्या एका ‘जनानी’ची बंडखोर, मनस्वी, संस्कारशून्य मुलगी म्हणजे आयसिन सिओरो. ही सुधारणेच्या पलीकडे आहे हे जाणून राजकुमार स्यू त्यांच्या सावत्र भावाला ही कन्या दत्तक देतो. तिची जपानमध्ये पाठवणी करतो. ‘योशिको कावाशिमा’ या नावाने इथून पुढे ती ओळखली जाते. तिची आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘वादळफूल’. Know thy self ही आज्ञा ती पाळते. ती स्वत:ला पूर्ण ओळखते. साहसी, संकटांनी भरलेले दुहेरी आयुष्य जगणारी. एक निरुपयोगी मुलगी असा वडिलांनी शिक्का मारलेली, खेद-खंत नसलेली, वडिलांवरही हेरगिरी करणारी, मुलांसारखा पोशाख करणारी, अन्नावर तुटून पडणारी, स्त्री-पुरुष संबंध याबद्दल लहान वयात जाण आलेली, त्यात कसलेही पाप न मानणारी, स्वयंकेद्रित, टीकेची पर्वा न करणारी, देहसुख घेण्यात कसलाही टॅबू न मानणारी, मिलिटरी ऑफिसर यमागासह सातआठ मित्र असलेली, अनेकांशी निकटचे संबंध असले तरी एक सैल व स्वैर आयुष्य जगणारी मुलगी. वासंती घोसपूरकर यांनी हा अनुवाद एवढा चांगला केला आहे, की हा अनुवाद वाटत नाही. आपण मराठीतून रेई किमुरा यांनी कादंबरी लिहिली व मेहता प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली याचे समाधान देणारा हा छान अनुवाद आहे. ज्यांना दुसऱ्या महायुद्धात, त्यातल्या जपानी सहभागात व गुन्हेगारी विश्वात रस आहे. त्यानी ‘वादळफूल’ वाचायलाच हवे, एवढ्या तोलामोलाचे हे पुस्तक आहे. –अनंत मनोहर ...Read more

ADAM
ADAM by RATNAKAR MATKARI Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

रत्नाकर मतकरी शोध घेत आहेत. माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अ‍ॅड्म आणि इव्ह’ यांच्या न संपणाऱ्या गोष्टींचा. काळानुसार कथानकात बदल होत असला तरी प्रवृत्ती तीच आहे. स्त्रीचा नेमका कोणता गुण पुरुषांना आकर्षित करतो, ज्यासाठी ते शरणागती पत्करतात?... स्त्रीच्ा देहाचं आकर्षण, तिच्या विषयी वाटणारी वैषयीक भावना, तिच्यामधले कला गुण की तिची बुद्धिमत्ता? आपल्या ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीत मराठीतील नामांकित साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या नाजूक विषयावर कुठेही बीभत्स न होता भाष्य केले आहे. ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीचा नायक वरदाचा हा जीवनप्रवास! निव्वळ लैंगिक भावनांचा विचार केला, तर सुरुवातीचा प्रवास तरी बहुसंख्य पुरुषांचा सारखाच असतो. मुख्य म्हणजे लहानपणी स्त्री देहाविषयी वाटणारं कुतूहल काहीच्या बाबतीत मात्र पौंगंडावस्थेतच असमाधानी स्त्रीकडून वापरलं जाणं नशीबात असता. वरदाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. उमलत्या वयात त्याला उफाड्याच्या नवनीतमचे आकर्षण वाटते. ही ओढ अतिशय नैसर्गिक आहे. नवीनतम तिशीची आहे. तिचे लग्न झालेले आहे. तिचा नवरा म्हातारा आहे. ती वरदाकडे घरकामाला असून कामक्रीडेत प्रवीण आहे. ती वरदाला प्रतिसाद देते आणि या खेळाचे शिक्षण देखील. वरदा तिला लग्न करशील का असे विचारतो तेव्हा ती उत्तर देते. ‘कामवालीशी कोणी लग्न करतात का?’ एकुणच अतृप्त स्त्रीच्या कामुकतेचे आणि ती पुरी करण्याकरता साधलेल्या संधीचे वास्तव चित्रण अ‍ॅड्म या कादंबरीत रत्नाकर मतकरींनी केले आहे. एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात एक नवा प्रवाह निर्माण करते आहे, हे निश्चित! – डी. व्ही. कुलकर्णी ...Read more