* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONVERSATIONS WITH GOD PART - II
  • Availability : Available
  • Translators : VRUSHALI PATWARDHAN
  • ISBN : 9788184989564
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : PHILOSOPHY
  • Available in Combos :NEALE DONALD WALSCH COMBO SET - 2 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN NEALE DONALD WALSCH WAS EXPERIENCING A LOW POINT IN HIS LIFE, HE DECIDED TO WRITE A LETTER TO GOD. WHAT HE DID NOT EXPECT WAS A RESPONSE AND THE RESULT WAS CONVERSATIONS WITH GOD BOOK 1. IN BOOK 2, THE DIALOGUE EXPANDS TO DEAL WITH THE MORE GLOBAL TOPICS OF GEOPOLITICAL AND METAPHYSICAL LIFE ON THE PLANET, AND THE CHALLENGES NOW FACING THE WORLD. THIS INCREDIBLE SERIES CONTAINS ANSWERS THAT WILL CHANGE YOU, YOUR LIFE, AND THE WAY YOU VIEW OTHER BEINGS.
माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ – ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’.ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचालीवर विशेष भर दिलेला आहे.इथंआपल्या पुढे एक आव्हान आहे.आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फार संयोग्य नाही; ते संकुच कामीआहे, असंयापुस्तकात म्हटलं आहे.काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशा जनकस्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही.आपणच तो निर्माण करू शकतो.जुन्या कालबाह्यधारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही.त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलचा नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटायां कडे खुल्यादिलानं बघायला हवं.या नव्या वाटागोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायलाहवा.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANVADPARMESHWARASHIPART-2 #CONVERSATIONSWITHGODPART-II #संवादपरमेश्वराशीभाग२: #PHILOSOPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VRUSHALIPATWARDHAN #वृषालीपटवर्धन #NEALEDONALDWALSCH "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 17-04-2016

    मानव जातीच्या कल्याणासाठी केलेले विचारमंथन... लेखक दक्षिण ओरॅगॉन प्रांतात नॅन्सी इथं राहतात. माणसांना स्वत:ची ओळख व्हावी, या उद्देशाने ना नफा तत्त्वांवर एक प्रतिष्ठान सुरू केले आहे. माणसांची वैयक्तिक प्रगती होऊन आध्यात्मिक समज निर्माण करण्याच्या दृषटीने हे प्रतिष्ठान काम करते. स्वत: वॉल्श अमेरिकेत फिरून व्याख्यानं देतात आणि कार्यशाळा आयोजि करून ‘संवाद परमेश्वराशी’ या पुस्तकातील संदेशाचा प्रचार-प्रसारही करतात. माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ ही वाटचाल सगळ्या मानवजातीची आहे. सगळ्या मानवजातीच्या एकत्रित, संयुक्त वाटचालीवर या पुस्तक मालीकेतल्या ‘संवाद परमेश्वराशी’ या दुसऱ्या पुस्तकात विशेष भर दिला आहे. इथे आपल्या पुढे एक आव्हान दिलेलं आहे. या पृथ्वीवर आपण पद्धतीने जगत आहोत ते फारसं योग्य नाही, तसं ते कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे, पण तो शोधून सापडणार नाही, तो आपण निर्माणच करू शकतो आणि जुन्या कालबाह्य कल्पनांना, विवादांना बसलो तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या कल्पना देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या आयुष्याच्या नव्या धारणा याकडे खुल्या मनाने बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनाने विचार करायला हवा. अशा नवीन कल्पनांचं हे पुस्तक आहे. ते तुम्हाला वेगळी दृष्टी देऊ करतं आणि हे कमी महत्त्वाचं नाही. एखाद्या नुसत्या बौद्धिक प्रयोगापेक्षा हे मोठं आहे. कारण तुमच्या दृष्टिकोनांतून तुमची आकलनशक्ती निर्माण होते. आकलनातून आशा धारणा निर्माण होतात. धारणांतून तुमचं वर्तन व्यक्त होतं. वर्तनातून अनुभव आणि अनुभवातून आपलं वास्तव निर्माण होतं. हे एक चक्र आहे. घड्याळाच्या दिशेनं त्याचे काटे फिरतात आणि तुमची धारणा हा यातला, बाराचा सर्वोच्च काटा आहे. माणसाची धारणा बदलण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे याखेरीज आणखी एखादा मार्ग आहे, असा आभास निर्माण करणं, असं दाखवणं ‘एखाद्या गोष्टीबद्दलची आपली धारणा, आपला दृष्टिकोन हाच एकमेव आहे. निदान एकमेव योग्य मार्ग आहे.’ असंच अनेकांना वाटत असतं. जग बदलायचं असेल, तर माणसांच्या विचारांना नवी दिशा द्यायला हवी. लाखो वर्षांत माणसांच्या वागण्यात फरक पडलेला नाही. आजही आपण अश्मयुगीन माणसासारखेच हिंसक वागतोय. जीवनापासून आपण फारकत घेतली आहे. असंच आजही आपण खरंच कोण आहोत आणि भोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी, चराचराशी आपले नेमकं खरं नाव काय आहे, याची आपल्याला कल्पनाच नसते. वर्तनाच्या पातळीवर बदल घडवण्याचं आव्हान आपण घेत राहणार असू तर विशिष्ट वागणं रोखण्यासाठी काहीतरी करणारच. पण ते क्षणभरच. तेसुद्धा सक्ती करून! पण ही जुलूम, जबरदस्ती थांबली की जुना स्वभाव, धरणा आणि त्यामुळे तसं वागणं पुन्हा डोके वर काढू शकतं. परमेश्वराचा जगाला संदेश आहे- ‘माझ्याबद्दल तुमचा चुकीचा समज आहे.’ हा संदेश जग बदलू शकेल असे लेखकाला वाटते. त्यांच्या मते हे पुस्तक खूपच परिणामकारक आहे. यातलं ज्ञान स्वयंभू आहे. मन लगेच शांत होते. मनावर हळुवार फुंकर घालणारं असं हे पुस्तक आहे. ‘प्रिय परमेश्वरा, तू सतत आमच्याबरोबर असतोस. हे ठाऊक आहे. तुझ्याशी आम्ही एकरुप आहोत. कसलंच द्वैत नाही. हाच अद्वैतानुभव घेण्यासाठी आम्हाला मदत कर. हरघडीला या सत्याचा प्रत्यय येतो. आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला स्वत:च्या अस्तित्वाबद्दल पूर्णत्व आणि श्रीमंती समृद्धीचा अनुभव घ्यायला हवा. ही श्रीमंती, परिपूर्णता, चमत्कार आणि चातुर्य, शांती आणि काटेकोरपणा हीच आपली खरी ओळख आहे. त्यातूनच आपलं आयुष्य सुखकर आणि आपलं जग सुखद होणार आहे.’ आमेन, आमेन (लेखकाचा उदात्त विचार) माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाळी म्हणजे हा, ‘संवाद परमेश्वराशी.’ ही वाटचाल तुमची सगळ्या मानवजातीची आहे. या मालिकेतील या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानव जातीच्या एकत्रित वाटचालींवर भर दिलेला आहे. इथे आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीने आपण जगत आहोत, ते योग्य नाही. ते कुचकामी आहे. काही बाबतीत अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही. तो आपणच निर्माण करू शकतो. जुन्या धारणांना कवटाळून हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा खुल्या दिलानं बघायला हव्या. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनान विचार करायला हवा. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्वकाही म्हणजे हा संवाद परमेश्वराशी ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’. ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे. ‘कॉव्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचलीवर विशेष भर दिलेला आहे. इथं आपल्यापुढे एक आव्हान आहे. आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फारसं योग्य नाही; ते तसं कुचकामी आहे, असं या पुस्तकात म्हटलं आहे. काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशाजनक स्थिती आहे. अजूनही एक मार्ग आहे : पण तो शोधून सापडणार नाही. आपणच तो निर्माण करू शकतो. जुन्या कालबाह्य धारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही. त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलच्या नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटा यांकडे खुल्या दिलानं बघायला हवं. या नव्या गोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायला हवा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more