* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184987683
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HIGH-TECH LIFELINE HAS UNDERTAKEN THE TASK OF COMMUNICATING DEVELOPMENTS IN MEDICINE TO THE COMMON MAN. THE FINAL CHAPTER, `VISION 2050` IS ABSOLUTELY FASCINATING. DR. RAGHUNATH MASHELKAR. THE `FANTASTIC MACHINE` IS AN APT TERM FOR THE WONDERFUL CREATION OF NATURE-THE HUMAN BODY. MEDICINE HAS FOUND SOLUTION FOR INSURMOUNTABLE PROBLEMS OF DEAF-MUTISM AND BLINDNESS WITH BIONIC EAR AND EYE. VITAL ORGANS ARE BEING REPLACED WHEN THAY FAIL. FLYING HTESKY AND STEPPING ONTO THE MOON WERE FANTASIZED BY THE HUMAN MIND BUT DETECTING AND REPAIRING DEFECTS IN THE FETUS WERE NEITHER DREAMED OF NOR FANTASIZED. THIS IS A REALITY TODAY. MOLECULAR BIOLOGY AND GENETIC ENGINEERING HAVE TAKEN GIANT ENGINEERING HAVE TAKEN GIANT STRIDES. IN THE NEAR FUTURE YOU MAY GIVE A SPERM AND A OVUM OR AN EMBRYONIC STEM CELL ALONG WITH SPECIFICATIONS FOR A BODY AND COLLECT YOUR BODY AT A STIPULATED TIME FROM THE RESEARCH LAB. THESE ARE JUST FEW OF THE TOPICS DISCUSSED IN THIS BOOK.
या पुस्तकामुळे सामान्य वाचकांच्या आरोग्यविषयक सामान्य ज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. पुस्तकातील ‘भविष्यातील आरोग्य व तंत्रज्ञान वेध २०५०’ हे प्रकरण तर अफलातून आहे.मानवी शरीर हे निसर्गाने निर्माण केलेले अजब यंत्र आहे. या यंत्रातील सर्व घटक चपखलपणे रचलेले आहेत, त्यांचे कार्य एकमेकांना पूरक आहे. पण काही वेळा त्यांच्या कार्यात अंतर्गत किंवा बाह्य कारणांनी विसंवाद – म्हणजेच आजार किंवा रोग – निर्माण होतो. पण त्यावरही माणसाचा मेंदू सतत उपाय शोधत असतो. पूर्वी जन्मजात अंधत्व किंवा मूकबधिर असणं हे प्रारब्ध म्हणून निमूटपणे स्वीकारले जायचे. आता त्यावरही शास्त्रज्ञांनी समाधानकारक तोडगा काढलेला आहे. तसेच हृदय, फुफुस, मूत्रपिंड, स्वादुपिंड किंवा यकृत या अवयवांना जेव्हा कमालीचे अपयश येते, तेव्हा एखाद्या गाडीचे सुटे भाग बदलावेत तसे अवयव-बदल करून मनुष्यास नवसंजीवनी बहाल केली जाते आहे. आता तर बुद्धिमान मानवाने मातेच्या उदरातील अर्भकामधील दोष पाहण्याची किंवा ते दोष शस्त्रक्रियेने दूर करण्याची स्वप्नवत कल्पनाही सत्यात उतरवली आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटाव्यात अशा अनेक गोष्टी, आज मॉलेक्युअर बायॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, रोबॉटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रातील प्रगतीच्या जोरावर मानवाने साध्य केल्या आहेत, आणि भविष्यातही यात उत्तरोत्तर प्रगती होतच जाणार आहे. अशा आश्चर्यचकित करणा-या अनेक अनेक शास्त्रीय शक्यतांचा धांडोळा सहजसोप्या भाषेत या पुस्तकात घेतला आहे. उच्च तंत्रज्ञानाची ही नवसंजीवनी तुम्हाला अचंबित तर करेलच, पण विचारप्रवृत्त करायलाही भाग पाडेल!
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार- कै.सौ.लक्ष्मीबाई बेंद्रे परितोषिक २०१६. * मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या वतीने उल्लेखनीय ग्रंथ पुरस्कार.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANJIVANIUCCHATANTRANYANACHI #SANJIVANIUCCHATANTRANYANACHI #संजीवनीउच्चतंत्रज्ञानाची #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #ANILGANDHI #अनिलगांधी "
Customer Reviews
  • Rating StarATHARVA SANJIVANI 02-2016

    संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची... मनुष्य प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे! त्याच्या उत्क्रांतीपासून ते आजपर्यंत त्याची प्रगती झाली त्या त्याच्या प्रगतीच्या टप्प्यावर मानवाने अगणित असे शोध लावले! किंबहुंना त्याची प्रगती ही त्याने लावलल्या अगणित अशा शोधांमुळेच झालेली आहे! मनुष्यप्राण्याला अनादिकाळापासून पृथ्वी, समुद्र, निसर्ग, पर्वत, ग्रह, तारे नक्षत्र, अवकाश या सर्वांबद्दल तसेच स्वत:बद्दल कुतूहल होते, आजही आहे आणि ते सतत राहणार आहे! हे कुतूहलच खरं तर त्याच्या शोधाची जननी आहे! कधी त्याला गरज वाटली म्हणून, कधी कुतूहलापोटी तर केव्हा त्याच्यासमोर निर्माण झालेल्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी तर कधी जगणं अधिकाधिक सुसह्य व्हावे म्हणून या आणि अशा असंख्य कारणांनी त्याला सर्व शोध लावण्यास भाग पाडले! त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा शोध म्हणजे लिहिण्याची कला, त्यानंतर कागदाचा शोध आणि मग लिहिलेलं कागदावर छापण्याचं तंत्र! मनुष्याच्या या शोधाने प्राचीन काळापासून अगणित अशी माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेली आणि होत राहिल! या लिखित स्वरुपाला सर्वसाधारणपणे ‘पुस्तक’ असं संबोधलं जातं. पुस्तकांची महती आणि महत्त्व आपण सर्वजण जाणताच. ‘पुस्तकं हेच आपले गुरू!’ ‘पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार!’ ‘पुस्तकं म्हणजे ज्ञानाची गंगा!’ ‘पुस्तकं म्हणजे जीवनाचे सोबती!’ ‘पुस्तकं म्हणजे दिशादर्शक!’ ‘पुस्तकं म्हणजे...’ अशी अनेक विचारांनी पुस्तकांचं महत्त्व अधोरेखित केलं गेलंय. त्यामुळे प्रत्येकाने सतत काहीतरी वाचलं पाहिजे, ‘वाचाल तर वाचाल!’ असं उगाच का म्हटलंय? आजचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं आहे. आज पुस्तकाचं स्वरुप देखील ‘ई-बुक’ म्हणून पुढे येते. पण तरीदेखील छापील पुस्तकांचं महत्त्व नक्कीच वादातीत आहे! अशाच एका आजच्या प्रगत तंत्रज्ञानातल्या पुस्तकांची आपण ओळख करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक किस्सा सांगतो- काही दिवसांपूर्वी आम्ही मित्र गप्पा मारत होतो. गप्पांसाठी विषयाचे बंधन नसतं. तसंच ते आम्हालांही नव्हतं. अनेक विषयांवर आपआपली मतं, माहिती गोष्टी असं सर्व काही व्यक्त करीत गप्पांची गाडी शेवटी हार्ट अ‍ॅटॅकवर कधी आणि कशी आली ते कळलचं नाही. हार्ट अ‍ॅटॅक म्हटल्याबरोबर वातावरण किंचित का होईना पण गंभीर झालं. मग हार्ट अ‍ॅटॅकमुळे प्रत्येकाच्या ओळखीतला, जवळचा कोण कसा गेला किंवा कशी गेली तिथपासून हार्ट अ‍ॅटॅक टाळण्यासाठी काय करायला हवं काय करू नये यावर बोलणं झालं. हे सर्व झाल्यानंतर माझा एक मित्र म्हणाला, ‘‘यार, अशा एखाद्या गोष्टीचा वस्तूचा शोध लागायला हवा की ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक येण्याअगोदर आपल्याला सिग्नल मिळेल. मग आपा लगेच हॉस्पिटलमध्ये. साला लफडा नाय कसला टेंशन नाय की प्रॉब्लेम नाय!’’ त्याचं बोलणं ऐकून थोडी गंमत वाटली. मग दोघांचे मोबाईल वाजले. बायकोचे फोन होते. त्यामुळे गप्पांचा फड तिथेच संपला. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या या सदरासाठी ‘संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची’ हे डॉ. अनिल गांधी यांचं पुस्तक माझ्याकडे आलं. पुस्तक वाचताना एका मजकुराने माझं लक्ष वेधून घेतलं आणि त्याच क्षणी मला त्या मित्राची आठवण झाली आणि हार्ट अ‍ॅटॅक सांगणाऱ्या त्या वस्तूची! पुस्तकातल्या ‘स्मार्ट मेडिसीन’ या प्रकरणात डॉक्टर सांगतात. हार्ट अ‍ॅटॅक? मोबाईलवर मिळेल आगाऊ सूचना! विशिष्ट प्रकारचे नॅनो-सेन्सर्स बनवण्यात आता संशोधकांना यश आले आहे. हार्ट अ‍ॅटक येण्याआधी शरीरात जे बदल होतात, ते हे सेन्सर्स जाणतात आणि रुग्णांच्या/नातेवाईकांच्या/डॉक्टरांच्या मोबाईवर काही दिवस किंवा काही तास आगाऊ सूचना देतात. डिफिब्रिलेटर बसवा, निर्धास्त जगा! हार्ट अ‍ॅटकची भीती आहे? मग डिफिब्रिलेटर हे छोटेसे चपटे उपकरण शरीरात बसवायचे. जेव्हा हृदयाची स्पंदने घातक गतीवर जाऊ लागतात तेव्हा हे डिफिब्रिलेटर ते जाणते आणि हृदयाला विशिष्ट तऱ्हेने ‘थेराप्युटिक शॉक’ (हृदयगती नियमित करणाऱ्या विद्युत लहरी) होते. त्यामुळे हृदय नियमित स्थितीला येते आणि धोका टळतो! परदेशात असे डिफिब्रिलेटर वापरणे सुरू झाले आहे! विश्वासच बसत नाही ना? सगळं कल्पनेपलीकडले! पण वैद्यकीय क्षेत्रातील अशा अनेक गोष्टींचा शोध लागलेला आहे! वैद्यकीय क्षेत्रातील उच्च आणि प्रगत तंत्रज्ञानाचा घांटोळा घेणाऱ्या डॉ. अनिल गांधी यांच्या ‘संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची’ या पुस्तकाचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. डॉ. अनिल गांधी यांचा जन्म माढा (सोलापूर) येथे झाला. १९६३ साली ते एम.बी.बी.एस. झाले. त्यानंतर पुण्यात त्यांनी फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षे प्रॅक्टीस केली. १९७१ साली ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. १९६६ ते १९८६ अशी तीस वर्षे त्यांनी ग्रामीण भागातील पेशंटवर उपचार केले. औषधांपासून ते ऑपरेशनपर्यंत सुविधा देण्यासाठी ते खेड्यापाड्यात जात होते. तिथपासून त्यांनी आजपर्यंत हजारो ऑपरेशन्स केली. त्याद्वारे एक ‘कुशल सर्जन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सेंट मार्क्स हॉस्पिटल, लंडन येथून १९७४ ला कोलोरेक्टल सर्जरीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले. नंतर १९८४ पर्यंत परदेशात अनेक ठिकाणी शोधनिबंध सादर केले. बी.जे. मेडिकल कॉलेज, भारती विद्यापीठ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. १९७० साली त्यांनी गांधी हॉस्पिटल सुरू केले. याचबरोबर सामाजिक तळमळीतून त्यांनी लोणावळ्याजवळील पांगलोळी या आदिवासी वस्तीत आरोग्य, शिक्षण व विकासकार्य सुरू केले. ‘मना सर्जना’ हे त्यांचं आत्मकथनही प्रसिद्ध झाले आहे. आपल्या मनोगतात डॉक्टर लिहितात- सर्व शास्त्रांची व आरोग्यशास्त्री प्रगती, संशोधन, उच्च, तंत्रज्ञान यामुळे मानवी जीवन सुंदर झाले आहे. मानवाची आयुमर्यादा वाढते आहे. उच्च तंत्रज्ञानाने मानवाची जीवनयात्रा सुकर, संपन्न व दीर्घ होत आहे. या उच्च तंत्राच्या (हायटेक) साह्याने मानवी जीवन संपन्न झाले आहे. त्याचा अल्पसा मागोवा घेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तो वाचकांच्या उपयोगी पडावा, ही इच्छा. माणसाचं शरीर म्हणजे एक अजब यंत्र! अशी सुरुवात होणाऱ्या प्रकरणापासून एकूण ४५ प्रकरणे पुस्तकात आहेत. या सर्व प्रकरणांत त्यांनी अनेक आजारांबद्दल प्राथमिक उपचार ते उच्च तांत्रिक उपचार यावर साध्या सोप्या सहज समजेल अशा भाषेत माहितीपूर्ण विवेचन आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या उच्च तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे एक अद्भुत अनुभव आहे! ती सारी माहिती वाचून आपण चक्रावून जातो. मती गुंग होते. जादुच्या पुस्तकातली जणु जादूच! पुस्तकातलं ४५ वे प्रकरण ‘भविष्यातील आरोग्य व तंत्रज्ञान २०५०’ (Vision 2050 Health and Technology Scenario) हे आहे. हे प्रकरण तर अफलातून! पण तो अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. पुस्तकातला आदरणीय डॉ. रघुनाथ माशेलकर, यांची प्रस्तावना आहे. शिवाय माननीय कुमार केतकर, अच्युत गोडबोले, अविनाश धर्माधिकारी यांच्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया लिहितात- डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे पुस्तकाविषयी हृदगत आहे. आपल्या प्रस्तावनेत डॉ. रघुनाथ माशेलकर लिहितात- डॉ. अनिल गांधींनी ‘संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या त्यांच्या पुस्तकातून आरोग्याविषयी माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर- ‘‘या पुस्तकाचे प्रयोजन सामान्य माणसांना शिक्षित करणे हे आहे.’’ माझ्यामते, ते त्यांच्या उद्दिष्टपूर्तीत सफल झालेले आहेत. त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन की, सामान्य माणूसच काय, पण माझ्यासारख्या शास्त्रज्ञालाही या पुस्तकातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. हे पुस्तक खरोखरीच अप्रतिम आहे. आपल्या हृदगतात डॉ. ह. वि. सरदेसाई म्हणतात-‘संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची’ या पुस्तकात डॉ. अनिल गांधी यांनी ज्ञानाची पाणपोई उघडलेली आहे. ज्ञानाच्या तृष्णेने तृष्णात झालेल्याची तृष्णा येथे शमेल. झपाट्याने प्रगत होत असणाऱ्या वैद्यकीय ज्ञानाच्या आघाडीवर घडत असणाऱ्या घटनांचा येथे आढावा घेतलेला आहे. कुमार केतकर लिहितात, ‘डॉ. अनिल गांधी यांनी अवयवोपण या ज्वलंत विषयावरील प्रगतीचा आढावा पुस्तकात कौशल्याने घेतला आहे. इतक्या सहज सोप्या भाषेत त्यांनी ते निवेदन केले आहे की, वाचकाला वाटावे- आपणही सर्जरी करू शकू’ आणि अवश्य वाचावे. शरीराला जडणाऱ्या व्याधींना उच्च तांत्रिक तपासण्या व उपचार यांनी संजीवनी देणे कसे शक्य आहे याचे उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात केलेले आहे.’ अविनाश धर्माधिकारी सांगतात, ‘विविध आजारांवरील तपासण्या व उच्च तांत्रिक उपचार यावरील या पुस्तकातील माहिती आपल्या ज्ञानात मोलाची भर टाकणारी आणि आपल्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारी आहे. या पुस्तकाच्या वाचनाने सामान्य वाचकांचे आरोग्यविषयीचे विचार आत्मविश्वासवर्धक होण्यास मदत होणार आहे.’ वरील सर्व मान्यवरांनी सदर पुस्तकाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यावरून सदर पुस्तकाचं महत्त्व आणि उपयुक्तता आपल्या लक्षात यावी. पुस्तकाला चंद्रमोहन कुलकर्णी यांचे साधं सोपं आणि विषयी मांडणी करणारे मुखपृष्ठ आहे. मुंबईत बसून गावातल्या रुग्णावर टेलीमेडिसीन या तंत्राद्वारे उपयार होऊ शकतो? अंतराळवीरांना पृथ्वीवरील नियंत्रणकक्षातून स्पेस मेडिसीन द्वारे उपचार होतात? मातेच्या उदरातील अर्भकामधील दोष शस्त्रक्रियेने दूर केले जाऊ शकतात? हार्ट अ‍ॅटकची आगाऊ सूचना लवकरच मोबाईवर मिळायला लागेल? या आणि अशा अनेक गोष्टी आज वैद्यकीय शास्त्रातल्या उच्च तंत्रज्ञानाच्या शोधामुळे शक्य झाल्यात! आणि या सर्व गोष्टी समस्त मानवाचं जीवन सुसह्य करतायत! अशा या वैद्यकीय शस्त्रातील उच्च तंत्रज्ञानाची माहिती देणारं डॉ. अनिल गांधी यांचे ‘संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची’’ हे पुस्तक आपण प्रत्येकाने एकदातरी अवश्य वाचलेच पाहिजे. आदरणीय डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘मला खात्री वाटते, घरोघरी असणाऱ्या ग्रंथ संग्रहात या पुस्तकामुळे मोलाची भर पडणार आहे. हेच तर त्याचे उद्दिष्ट आहे.’ मला माहित आहे. तुमचेही उद्दिष्ट तेच आहे! ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 09-08-2015

    वैद्यकशास्त्राच्या प्रगतीचा थक्क करणारा वेध... वैद्यकशास्त्रामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे जी क्रांती घडून आली आहे त्याला खरंच तोड नाही. यापूर्वीचे वैद्यकशास्त्र हे बऱ्याच अंशी ठोकताळे आणि अनुभवाने आलेली समज यावर अवलंबून होते. त्यात टप्प्याटप्प्याने वकास होत गेला, परंतु वैद्यकशास्त्रातील मुलभूत गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि सारे चित्रच बदलून गेले. आजचे वैद्यकशास्त्र हे प्रयोगाने सिद्ध झालेले निर्णय व संशोधनावर आधारित सत्यच मानते, त्यामुळे असाध्य वाटणारे रोगही बरे करण्याची क्षमता नव्या तंत्रज्ञानाने मिळवून दिली आहे. माणसाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याची क्षमता असते संजीवनीमध्ये. आजच्या उच्च तंत्रज्ञानामध्ये ती क्षमता पुरेपूर असल्याने व ती येणाऱ्या काळात अशीच वृद्धिंगत होत जाणार असल्याने ‘उच्च तंत्रज्ञानाची संजीवनी’ हे पुस्तक खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरावे असे आहे. उच्च तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने वैद्यकशास्त्रात झालेल्या प्रगतीची सारी वाटचाल डॉ. गांधी यांच्या पुस्तकातून समर्थपणे उलगडते. मानवी जीवन सुकर होण्याला कारणीभूत ठरणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाची ओळख सामान्यापर्यत पोहोचावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. एरवी अतिशय तांत्रिक वाटेल म्हणून ज्या विषयाकडे दुर्लक्ष होते त्या वैद्यकातील तंत्रज्ञानाविषयी नेमक्या शब्दात आणि सहज समजेल अशा शैलीत लेखकाने मांडला आहे. अवयवदान, अवयव बॅकिंग, अवयवरोपण, वेदना व्यवस्थापन अशा विविध विषयांवर भाष्य करतानाच शरीरातील जवळपास सर्व अवयवांच्या व्याधीविषयी माहिती देण्यात आली आहे. विविध आजार आणि त्यावरील वेगवेगळया प्रकारच्या उपचारपद्धती यांचे उत्तम संकलन त्यात आहे. सामान्य माणसाला आरोग्यविषयक गोष्टीबाबत ठरावीक व बऱ्याचदा जुजबी माहिती असते, पण या पुस्तकामुळे या माहितीत नक्कीच भर पडेल. हा सारा पट त्यांनी ५ विभागात मांडला असून भविष्यातील आरोग्य व तंत्रज्ञान वेध २०५० या प्रकरणात आरोग्य क्षेत्राबाबतच्या भविष्यावर भाष्य केलेले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. ह. वि. सरदेसाई यांची प्रस्तावना व मनोगत या पुस्तकाला लाभले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-08-2015

    वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक सुविधांचा वेध डॉ. अनिल गांधी यांनी या पुस्तकातून घेतला आहे. शरीरातल्या अवयवबदलांची पद्धत कशी आहे, ते त्यांनी सांगितलं आहे. दंतरोपण, केशरोपण, यकृतबदलाची किमया, तसेच ‘इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी’च्या व्यापक आणि क्रांतिारी सुविधेसारख्या थक्क करणाऱ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more