* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANDHA BADALTANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669473
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE WERE MORE THAN SIX HUNDRED AND FIFTY PRINCELY STATES IN INDIA AT THE TIME OF INDEPENDENCE. THESE WERE NOT UNDER THE DIRECT RULE OF BRITISH. THEY WERE ALL INDEPENDENT RULERS. A FEW OF THEM HAD EVEN STARTED THEIR OWN RAILWAYS. BARODA WAS ONE SUCH STATE. THE FIRST RAILWAY TRACK IN INDIA WAS BUILT IN 1853 FROM BORIBANDAR (NOW NAMED AS CHHATRAPATI SHIVAJI TERMINUS OR CST) TO THANE BY A BRITISH COMPANY UNDER THE BRITISH SUPERVISION. THIS IN TURN HELPED IN FAST PROGRESS OF OUR NATION. RAILWAY HELPED IN BUSINESS AS TRANSPORTATION BECAME EASIER. SEEING THE GOOD RESULTS OF RAILWAY, THE STATESMEN WERE NATURALLY INCLINED TO BUILD THEIR OWN RAIL TRACKS. THE FIRST RAIL TRACK WAS THUS BUILT BY THE STATE OF BARODA IN 1862. BUT OWING TO SOME TECHNICAL DIFFICULTIES A TRAM PULLED BY BULLOCK CART WAS ALL THAT COULD RUN INSTEAD OF THE STEAM ENGINE DRIVEN RAILWAY. FINALLY, AFTER
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात सुमारे साडेसहाशे संस्थानं होती. ही संस्थानं ब्रिटिश अमलाखाली नव्हती. त्यांची स्वत:ची स्वतंत्र राज्यव्यवस्था होती. त्यांच्यापैकी काहींनी स्वत:ची रेल्वेही सुरू केली होती. बडोदा हे अशा संस्थानांपैकी पहिलं. भारतातला पहिला रूळमार्ग (रेल्वे) ब्रिटिश अमलाखालच्या भागात बोरीबंदर (आताचं सी.एस.टी. – छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे असा १८५३ साली बांधला गेला आणि देशात वेगाचं युग सुरू झालं. हे काम एका ब्रिटिश वंÂपनीनं केलं होतं. रेल्वेमुळे व्यापार जोमानं वाढू लागला आणि दळणवळण सुलभ झालं. त्या अनुभवावरून संस्थानिकांनाही आपल्या राज्यात रेल्वेसेवा सुरू करण्याची इच्छा झाली नसती तरच नवल. सर्वांत पहिला संस्थानी रूळमार्ग सुरू करण्याचा मान बडोदा संस्थानाकडे जातो. ते काम १८६२ साली सुरू झालं, पण तांत्रिक त्रुटींमुळे वापेÂच्या इंजिनानं ओढल्या जाणाNया आगगाडीऐवजी बैलांनी ओढली जाणारी ट्रॅम सुरू झाली. अखेर १८७३ साली डभोई ते करजण-मियागाम हा साधारण २० मैलांचा (३१-३२ कि.मी.) रूळमार्ग सुरू झाला. तेव्हा बडोद्यावर मल्हारराव गायकवाड राज्य करत होते. हा मार्ग सुरू होण्याच्या काळात बडोद्यात बरीच राजकीय उलथापालथ होत होती आणि त्यामुळे समाजजीवन ढवळून निघत होतं. बडोद्यातील ब्रिटिश रेसिडेंट आणि मल्हारराव यांच्या संघर्षाचा तो काळ होता. ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाचा काळ होता. अखेरीस ब्रिटिशांनी मल्हाररावांना पदच्युत केलं आणि सयाजीराव गायकवाड राज्यावर आले. १८७५ पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. या काळातल्या बडोद्यातील धामधुमीचं आणि बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचं चित्रण करणारी शुभदा गोगटे यांची ही कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SANDHA BADALTANA #SHUBHADA GOGATE #NARAYAN #LAXMI #DURGA #VISHWNATH #KAVERI #RAMABAI #KHANDERAO #BARODA #MUMBAI #ENGINE #STATION #1853 #MALLHARRAO GAIKWAD
Customer Reviews
  • Rating StarLOKSATTA 12-04-2009

    `संस्थानी कारभाराचा सांधा बदलताना`… आपल्या देशामध्ये पूर्वापार राजेरजवाड्यांची सत्ता चालत आली आहे. या राजेरजवाड्यांच्या मनमानी आणि एककल्ली कारभारामुळे परकियांना आपली वसाहत येथे स्थापन करण्यास वेळ लागला नाही. समाजातील जाती-पोटजातीचे फुकाचे मोठेपण आणिसत्ताधीशांचे एककल्ली राजकारण यातूनच ब्रिटिशांना आपल्या देशात पाय रोवण्याची संधी मिळाली, पण समाजापासून आणि जनतेपासून फटकून राहणाऱ्या संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये काही अपवाद होते. त्या अपवादात्मक संस्थानिकांमध्ये एक होते बडोद्याचे संस्थानिक! त्याकाळी म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या खंडप्राय देशातील प्रगत संस्थानांपैकी एक होते बडोदा संस्थान आणि त्याचे संस्थानिक गायकवाड घराणे. सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि अनेक सामाजिक बदलांची नांदी घडवून आणली, पण सयाजीराव गायकवाडांनी ही नांदी घडवली ती त्या संस्थानाच्या सुधारणावादी संस्कृतीचा कळस होता असे मानायला हरकत नाही. बडोदे संस्थानला लाभलेले गायकवाड घराणे हे अन्य संस्थानिकांपेक्षा वेगळे होते. घराण्यात अंतर्गत वाद, कलह होते पण समाज जागतिक स्तरावर किती पुढारलेला आहे, याची नोंद वेळोवेळी घेत, नव्या बदलांचे स्वागत या घराण्याने केले आहे. इतकेच नाही तर प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या साधनांचा उपयोग आपल्या राज्यात कसा करता येईल, याबाबतही विचार होत असे. ब्रिटीशांनी १८५३ मध्ये भायखळा म्हणजे मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे सुरू केली. ती प्रामुख्याने दळणवळण अधिक गतीने व सुलभ व्हावे यासाठी! पण यामुळेच या शहराच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला गती मिळाली. ब्रिटीशांचा अंमल सर्व संस्थानांवर नव्हता. ब्रिटीशांनी रेल्वे सुरू केली आणि त्यातून साधली जाणारी प्रगती पाहून बडोदा संस्थाननेही स्वत:च्या संस्थानात रेल्वे सुरू केली. अर्थात तांत्रिक कारणामुळे ही रेल्वे सुरू न होता ट्राम सुरू झाली. सयाजीराव गायकवाड दत्तक म्हणून या संस्थानाच्या राजेपदी बसण्यापूर्वीचा काळ हा संस्थांनी राजकारणाच्या धामधुमीचा काळ होता. खंडेराव गायकवाड आणि मल्हारराव गायकवाड या भावंडांमध्ये धुसफूस सुरू होती. खंडेराव पोटाच्या विकाराने आजारी होते तर मल्हाररावांना तुरूंगात ठेवण्यात आले होते. या दन भावंडांच्या वादात दरबारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित जनता यांच्यातही दोन भाग पडले होते. खंडेरावांच्या निधनानंतर मल्हारराव सत्तेवर आले. खंडेरावांच्या काळात तेथे असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांचे वर्चस्व दरबारावर होते, ते काही प्रमाणात कमी झाले. ब्रिटिशांच्याच मदतीने बडोदा संस्थानात रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न कूर्मगतीने सुरू होता विंâबहुना तो थांबलाच होता. अशा वेळी या कामी `नारायण` संस्थानच्या मदतीला आला. शुभदा गोगटे यांची `सांधा बदलताना` ही कादंबरी या बडोदा संस्थानच्या एकूण सामाजिक-राजकीय परिस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी आहे. १८६० ते १८७५ या संपूर्ण कालावधीतील बडोदा संस्थानमधील सामाजिक चित्र उभे करतानाच सरकारी पातळीवर कोणतीही योजना कशी राबवली जाते, त्यात कोणकोणते अडथळे येतात, ते अडथळे कसे दूर होतात याचेही बारकावे वाचायला मिळतात. डभोई ते करजण हा २० मैलांचा रेल्वेमार्ग सुरू व्हावा यासाठी बडोदे संस्थान `नारायण` च्या मदतीने प्रयत्न करत असतानाच काही विघ्नसंतोषी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कसा अडसर आणतात, हेही वाचायला मिळते. नारायण हा सर्वसामान्य मराठी कुटूंबातला मुलगा. रेल्वे इंजिनांच्या आवडीमुळे तो रेल्वेत कामाला लागतो. घरच्या पातळीवर तत्कालीन संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे पत्नीचा झालेला छळ तो सहन करू शकत नाही आणि तो विभक्त होतो. पण बऱ्याच वर्षांनी तो घरी येतो तेव्हा घराचे बदललेले रूप पाहून तो अचंबित होतो, पण नंतर पुन्हा आपल्या प्रपंचाकडे वळतो आणि एक नवे आव्हान त्याला बडोदे संस्थानमध्ये रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने मिळते. या कादंबरीत नारायणचे घर आणि नंतर बडोदे संस्थानमधील त्यांची कामगिरी याचा सांधा साधताना लेखिकेची लेखनगती वेगवेगळ्या पातळीवर होते आणि मध्ये सांधा बदलताना नाही तर निखळलेला वाटतो, पण ओघवत्या लेखनशैलीमुळे हे वाचकांच्या विशेष लक्षात येणार नाही. कादंबरीतील सर्वच पात्रे बदलत्या परिस्थितीत स्वत:मध्ये बदल करताना आढळतात. म्हणजेच ते त्यांच्या जीवनाचा सांधा बदलतात. सरळमार्गी जीवन जगताना अनेकदा असा सांधा बदलणे अपरिहार्य असते. त्यातूनच जीवन प्रगतीकडे नेता येते. संस्थानिक आणि ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील तो संघर्षाचा काळ होता. १८५७ मध्ये झालेल्या उठावामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला होता. मल्हारराव गायकवाड यांच्या काहीशा छंदीफ़ंदी स्वभावामुळे वैतागलेल्या रेसिडेंटने अखेर मल्हाररावांना सत्ताभ्रष्ट केले आणि दत्तक विधानाच्या माध्यमातून सयाजीरान गायकवाड सत्तेवर आले. या सवे प्रकारात डभोईकरजण रेल्वे सुरू झाली खरी, पण नारायणला पुन्हा आपल्या जागी परतावे लागले. मोठ्या उत्साहाने संपूर्ण कुटूंबासहित बडोद्याला आलेल्या नारायणला तसेच त्याच्या कुटूंबाला परतावे लागते. आपल्या संयुक्त कुटुंबापासून दूर जाताना नारायणने सांधा बदलला, बडोदे संस्थानची नोकरी पत्करताना त्याने दुसऱ्यांदा सांधा बदलला आणि शेवे सत्तसंघर्षातून आपल्याच गावी परतताना त्याला पुन्हा सांधा बदलावा लागला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर असा नारायणचा सांधा बदलला, त्याचीच ही कहाणी! - प्रसाद मोकाशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book