* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RIVANAVYALI MUNGI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661927
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RAJAN GAVAS COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE SELECTED STORIES BY RAJAN GAVAS. THEY ARE VERY UNIQUE IN THEIR STYLE AND PRESENTATION. THEY REVEAL THE SINCERITY AND SENSITIVITY OF THE AUTHOR. ALL THESE STORIES ARE WRAPPED IN THE TRADITIONAL SETTINGS OF LITERATURE. THE FOLK TALES ALSO MAINTAIN THEIR CULTURAL CHARACTERISTICS. MANY OF THE STORIES HAVE THE POTENTIALS OF UNFORGETTABLE MASTER PIECES. THIS COLLECTION IS SURE TO ADD A FEATHER IN THE CAP OF MARATHI LITERATURE.
राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या ह्या कथा वेगळ्या असून, लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणाया आहेत. कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे ह्या कथा बाळगतात, तसेच, लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’, ‘रिवणावायली मुंगी’, ‘बाई’, ‘एक होता कावळा’ यांसारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांच्या पंगतीला बसण्याची क्षमता प्रकट करतात. विविधांगी वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हा कथासंग्रह कथावाङ्मयात मोलाची भर घालेल, याची खात्री वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarB Poorva

    #पुस्तक_ओळख #आपण_माणसात_जमा_नाही #रिवणावायली_मुंगी #राजन_गवस कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन. आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असाची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात. हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात. राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात. -©पूर्वा बडवे ...Read more

  • Rating StarManasi Lad- Gudhate

    मनाला अत्यंत अस्वस्थ करून जाणार्‍या आणि अंतर्मुख करणार्‍या कथा. समाज म्हणून आपली लायकी काय? संस्कृती म्हणून ज्याला यथेच्छ मिरवावे त्याचे खरे रूप काय? नात्यांमधला जिव्हाळा वगैरे, धार्मिकतेचा आधार वगैरे, व्यभिचार आणि अनैकता वगैरे.... सगळ्या सगळ्याचीमूळ जातकुळी काय? सगळा निव्वळ चिखल आहे. फक्त अन्याय आहे. दडपणूक आहे. - सारे केवळ वाचल्याने अस्वस्थता येत नाही. खरी अस्वस्थता येते ती या भिववणार्‍या विचाराने की - ’हो. हाच माझा समाज आहे!’ आपल्याला आपले खरे स्वरूप समजत जाणे भयावह आहे! पण आवश्यकही आहेच. समाजरचनेच्या संपूर्ण डोलार्‍यात नि:शब्द गाडल्या गेलेल्या एका वेगळ्याच मानल्या जाव्या अश्या ’रिवणावायल्या’ व्यक्तिरेखांची गुदमरवणारी कथामालिका म्हणजे हा कथासंग्रह आहे! या कथा एका अंतापाशी पोचून संपत नाहीत. तशा तर त्या सुरूही एका निश्चित प्रसंगातून होत नाहीत. पण जे सारे आपल्या डोळ्यांसमोर मांडले जाते ते आपला सारा अनादी अनंत अवकाश व्यापून राहते. ...Read more

  • Rating Star‎Nitiraj Jagadale

    एक वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह समाजातील भयानक वास्तवता मांडून याला तश्याच भयानक पद्धतीने प्रतिकार करताना कथानायकांची होणारी ससेहोलपट त्यांची मानसिकता अंतरंगाचे विविध पदर उलघडनारे राजन सर खरोखर ग्रेट आहेत आता ठरवलंय संपूर्ण राजन गवस वाचायचेच.....

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 10-02-2002

    शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या स्त्रियांची कहाणी... ज्याच्या नावावर ‘चौंडक’, ‘भंडारभोग’, ‘धिंगाणा’, ‘कळप’ नावाच्या कादंबऱ्या जमा आहेत ज्याला ‘तणकट’ कादंबरीसाठी नुकताच ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळालाय आणि जो महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कृत केलेल्या ‘बोल’च्या प्रकल्पावर सध्या काम करतोय तो लेखक म्हणजे डॉ. राजन गवस! १९८० नंतर मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी कथासंग्रह वाङ्मयातील इतर (विशेषत: कादंबरी) प्रकार हाताळायला सुरुवात करत आपलं नाव वाचकांसमोर आणलं त्या गवस यांचा एक निवडक कथांचा संग्रह ‘रिवणावायली मुंगी’ संग्रहात एकूण १३ कथा आहेत. या कथासंबंधी आणि एकूणच आपल्या लिखाणासंबंधी गवस म्हणतात, ‘रिवणावायली मुंगी’ या संग्रहातील स्त्रिया शोषणविरुद्ध बंड करणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज काढणाऱ्या आहेत याचं कारण वास्तवातील बदल हेच आहे. खेड्यापाड्यातल्या मुली शिकू लागल्या, परंपरेच्या चौकटीने जाच सैल होत गेले, विविध चळवळी, शहरांशी येणारा संपर्क यामुळे वातावरण बदलत गेलं. त्यामुळे परिस्थतीच्या रेट्यातून बदललेल्या वास्तव स्त्रीचं या कथांमधून येते. ती लेखकिय मनातील नाही हे निश्चित.’’ तर १९७५ पासून डॉ. गवस हे देवदासी चळवळीचा तसा सहप्रवासी चळवळीतला हा कार्यकर्ता आणि अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं जवळून पाहत अनुभवांती लिखाण करणारा हा लेखक जेव्हा स्त्रीविषयक लिखाण करतो तेव्हा तिची व्यथा, तिची जगण्याची धडपड आणि तिचा तो एकूणच अन्यायाविरुद्धचा लढा हा मनाला खूप भिडतो. ‘रिवणावायली मुंगी’ ही कथा बघूया. २५ वर्षांची ती दहावी झालेली मुलगी जेव्हा आपल्या जातीबांधवांसाठी परिवर्तनवादी चळवळीत आपणहून उतरते आणि मनापासून त्यात काम करते तेव्हा सुरुवातीला ती चळवळ, ते कार्यकर्ते आणि एकूणच ती ‘बंडखोरी’ भावते, पण त्यातील भंपकपणा जेव्हा तिला जाणवतो तेव्हा ती पुन्हा ‘घरा’ का परतते. निमूटपणे परिस्थितीला/चालीरितींना ‘शरण’ जाते. लग्न करते. सुखी संसाराचं स्वप्न पाहू लागते. पण नवरा जेव्हा बाहेरख्यालीपणा करत तिला ‘दासी’ ठरवू पाहतो तेव्हा ती त्याला भर बाजारात ‘उघडं’ करते आणि आपल्यातली ‘कार्यकर्ती’ अजूनही जिवंत आहे हे दाखवून देते बंडखोरी करते. ‘बाई’ ही कथा नवऱ्याने फसवल्यामुळे धंद्याला लागलेली आणि दोन माणसांनी (एकाचवेळी) ठेचलेल्या एका कमळी नावाच्या बार्इंची. कुठेही गेलं तरी बाईला शेवटी उपभोग्य वस्तू म्हणूनच गणलं जातं आणि त्याच एका नजरेनं बघत वागवलं जातं याचं ज्ञान जेव्हा कमळीला होतं तेव्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांचा संसार कशाला उधळायचा, असा सुज्ञ विचार करत ती पुढे निघते. ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ म्हणत आहे त्याचं समाधान मानत ‘कुणाच्या तरी वळचणीला जगू’ म्हणते. संग्रहातील ती बंडखोर मुलगी म्हणा, कमळा म्हणा वा इतर स्त्रिया म्हणा त्या जेव्हा अन्यायाविरुद्ध बंड करून उठतात. परिस्थितीचं भान राखत जेव्हा आवाज उठवतात वा आहे त्या परिस्थितीशी सामना करत स्वत:चं अस्तित्व दाखवून देतात, तेव्हा त्याचं ‘अस्तित्व’ त्याचं वागणं/बोलणं, त्यांचं ‘बंड’ हे मनाला भावून जातं. त्यामुळे लेखक म्हणतो त्याप्रमाणे ‘परिस्थितीच्या रेट्यातून बदललेली वास्तव स्त्रीचं या कथांमधून समोर येते. संग्रहात ‘एक होता कावळा’ नामक वेगळ्या विषयावरची एक कथा आहे. हौदात पडलेल्या एका कावळ्याला एक शाळामास्तर बाहेर काढतो. पुढे त्या कावळ्याला बाकीचे कावळे टोचा मारून हैराण करतात. पुरता ठार मारतात. ‘कावळा माणसावर डूक धरतो का हो?’ ही शंका मनात धरून बसलेल्या त्या मास्तरामागे पुढे कावळ्यांची जमात लागते. ते कावळे त्याला पार सतावून सोडतात. मास्तरांसह सर्व घर ‘कावळेमय’ होत चिडतं. मास्तराची अन्नावरची वासना उडते. इकडे शाळेतील मुलांना कावळ्यांचा त्रास होईल. ही शंका बोलून दाखवत पालक, शिक्षक त्यांना रजा घ्यायला, घरी बसायला सांगतात. मास्तर घरी बसतो. पुढे तो तापाने फणफणतो. अख्खं घर अस्वस्थ होतं. शेवटी तो गावी जातो. मास्तराची आई त्याला बरं करते आणि ‘जा रं शाळेला, कुठला कावळा येतोय बघतो. म्हणत धीर देते आणि त्यानंतर कावळे त्रास देणं सोडतात. ‘एक होता कावळा’ प्रमाणेच एका राजकारणी कावळ्याची गोष्ट आहे ती ‘दादा कोतोलीकर’ नामक कथेत. संग्रहातील ‘संप, ‘झळ’, ‘उचकी’, ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ या कथादेखील उल्लेखनीय आहेत. लेखक ज्या सीमाभागालगत राहतो, ज्या परिसरात कन्नड-मराठी मिश्रित बोली बोलली जाते आणि जिथल्या प्रथा परंपरा तसेच ‘गाव उचापती’ लेखकाला अस्सलपणे ज्ञात आहेत, त्यातलं मर्म त्याला कळलंय त्या सर्व गोष्टींचा ‘ठसा’ या कथांवर व्यवस्थितरित्या उमटलाय. तर माणसामाणसातील संबंध, संघर्ष, ताणतणाव, जगण्याची जीवघेणी धडपड आणि स्त्रियांची शोषणविरुद्ध ‘बंड’ करून उठण्याची, लढा देण्याची प्रवृत्ती याचं समग्रदर्शन या ‘रिवणावायली मुंगी’ कथासंग्रहात घडतं. -चंद्रा जळगावकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book