* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: RED TAPE
 • Availability : Available
 • ISBN : 9789353170233
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 268
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE PLAY
Quantity
This is a story about a dynamic IAS officer who is strict and doesn’t function under anyone’s pressure. That is the reason he faces lot of problems in his day to day functioning. When functioning as a collector of Bandra, he notices some corruption activities and multi crore scams. Many big politicians, senior officers and powerful builders have their vested interests in these activities. The brave collector is pressurized by the whole lobby at administrative level. But he is firm on his duties , responsibilities & decisions. The collector shakes hands with media to stop these kinds of corruption activities. This sensational book ‘Red Tape’ portrays his hard struggle of fighting against a corrupt system in an exciting way.
सरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर ते ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. कारण, कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय जाते सरकारकडे आणि काम बिघडले तर खापर मात्र फोडले जाते प्रशासनावर. संबंधित निर्णय किंवा योजना चांगली होती, पण प्रशासन कुचकामी ठरल्याने त्याची वाट लागली असा सर्वसाधारण मतप्रवाह असतो. अशी टिप्पणी करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या दबावांना, राजकारणाला, हितसंबंधियांच्या कट-कारस्थानांना तोंड देत आणि अनेकविध लाभांना तसेच आमिषांना दूर लोटत निर्णयाची अंमलबजावणी करणे महामुष्किल काम. शिवाय हे करताना सतत प्रशासनाच्या मजबूत पोलादी चौकटीचे भानही बाळगावे लागते. साहजिकच बहुतेकजण प्रवाहप्रतीत होत सत्ताधाऱ्यांचे वा वरिष्ठांचे ‘होयबा’ होणे पसंत करतात आणि स्वत:चे उखळही पांढरे करून घेतात. मात्र काही जिगरबाज अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहूनच या अ-व्यवस्थेविरोधात झगडा पुकारतात. व्यापक जनहीत डोळ्यासमोर ठेवून न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या अशा मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासनाचा गाडा पुढे सरकत असतो. दोन दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेत या सगळ्याची जवळून झालेली ओळख आणि सुमारे पावणेदोन वर्षे मंत्रालयात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करताना ‘आतून’ घेतलेला प्रत्यक्ष अनुभव याची गुंफण करत एका वेगळ्या विषयाची केलेली ही मांडणी..
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDainik DivyaMarathi

  एक अस्वस्थ करणारी अनुभूती... मंत्रालयीन निर्णयाच्या भोवती पिंगा घालणारे अनेक हितसंबंधी गट आणि त्यातील ताणतणाव या समकालीन वास्तवावर स्पष्ट भाष्य करणारी कादंबरी म्हणजे पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी साकारलेली ‘रेड टेप` होय... मंत्रालय म्हणजे प्रत्ेक राज्याचं सर्वशक्तिमान शक्तिस्थळ! लोकहिताच्या अनेक निर्णयांचं हे जसं उगमस्थान तसंच लालफितीने विकासाची वाट अडवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचे आश्रयस्थानसुद्धा. संवेदनशीलता आणि संवेदनशून्यता इथं एकाच वेळी गुण्यागोविंदाने नांदताना दिसते. जी. आर किंवा अध्यादेशाच्या एका फटकाऱ्याने समाजाच्या शेवटच्या घटकाला या वास्तूमुळे दिलासा मिळतो, तर लालफितीची पोलादी चौकट लोकहिताच्या चांगल्या कायद्याचीसुद्धा वाट लावू शकते, ती इथल्याच वास्तुदोषामुळेच. लोकशाहीतील चार प्रमुख स्तंभांपैकी प्रभावशाली असलेला हा स्तंभ अंगीभूत शक्तिसामर्थ्यामुळे अनेकांना विशेषत: चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधींना नेहमीच आव्हानात्मक वाटतो. मंत्रालयीन निर्णयाच्याभोवती पिंगा घालणारे अनेक हितसंबंधी गट आणि त्यातील ताण-तणाव या समकालीन वास्तवावर स्पष्ट भाष्य करणारी कादंबरी म्हणजे पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी साकारलेली ‘रेड टेप` होय. पत्रकारितेतील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे दोन वर्षे अधिकारी पदावर बजावलेली सेवा आणि त्यानंतर शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पुन्हा पत्रकारिता, असा दोन्ही बाजूंचा अनुभव गाठीशी असल्याने कादंबरीत निवडण्यात आलेले प्रसंग आणि पात्र वाचकांना शेवटचे पान वाचेपर्यंत खिळवून ठेवतात. व्यवस्थेविरुद्ध उभे राहणे हे सोपे काम नाही. फार थोडे अधिकारी आणि सरळ मार्गी नेते आपल्या कारकीर्दीमध्ये ही जोखीम स्वीकारतात. वांद्रे शासकीय वसाहत विकसनाच्या प्रकरणात वांद्रे जिल्हाधिकारी महेश राऊत यांना कोणकोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांना या मिशनमध्ये जया – अभी ही पत्रकारांची जोडगोळी कशी साथ देते याची उत्कंठावर्धक कथा आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळते. कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्याला समाज आणि प्रसिद्धी माध्यमे तेवढ्यापुरते डोक्यावर घेतात परंतु नंतर त्यांचे काय होते हा पुन्हा अभ्यासाचा एक वेगळा विषय आहे. वांद्रे वसाहत विकास प्रक्रियेत लोकहितासाठी ठामपणे लढत आपली नोकरी पणास लावणारे वांद्रे जिल्हाधिकारी महेश यांना वरिष्ठ अधिकारी, ‘वर्षा` नामक ‘हितचिंतक’ बॅचमेट, बिल्डर लॉबी, सामाजिक कार्यकर्ते कसे समजावण्याचा खरे तर ‘घेरण्याचा` प्रयत्न करतात, ते वास्तव अभिजित यांनी फारच मार्मिकपणे चितारले आहे. कादंबरीत या संदर्भातील प्रसंग जिवंत करतांना त्यांनी शासकीय सेवेत असतांनाचे आपले निरीक्षण आणि चिंतन यांचा खुबीने वापर केला आहे. मुख्य सचिव हे महेश यांना त्यांच्या ठाम भूमिकेसंदर्भात समजावताना म्हणतात, ‘चढते सूरज को सलाम करना हमारे लोग बहुत अच्छे तरह से जानते है, लेकिन जब वह ढलने लगता हे तो यही लोग दोनो हाथों से तालिया पिटकर उसे अलविदा कर देते है!’प्रसिद्धी माध्यमांबाबत विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत देखील अभिजित काही प्रसंगांच्या माध्यमातून नेमकेपणाने भाष्य करतात. ‘Television is a Democracy at its ugliest’ हे एका प्रसिद्ध अमेरिकन लेखक, कादंबरीकाराचे वाक्य ही कादंबरी वाचताना वेगळ्या अंगाने आपल्याला सतत आठवल्या वाचून राहत नाही. नीर-गाठ-उकल जितकी योग्य तितकी कादंबरी यशस्वी असे म्हटले जाते. मंत्रालयात लागलेल्या आगीच्या घटनेचा कादंबरीकाराने नेमकेपणाने वापर करून कादंबरीचा परमोच्च बिंदूवर शेवट केला आहे. साहित्य निर्मितीत ‘सत्य’, ‘प्रत्यक्ष’ आणि ‘कल्पित’ याचे बेमालूम मिश्रण असायला हवे जे या कादंबरीत निश्चितच जाणवते. ठाशीव व्यक्तिरेखा असल्याशिवाय कोणतीही कलाकृती मग तो चित्रपट असो अथवा कादंबरी वा नाटक, रसिकांच्या मन:पटलावर ठसा उमटवू शकत नाही. त्या दृष्टीने महेशची व्यक्तिरेखा उठावदार असली तरी आणखी काही व्यक्तिरेखा अधिक ठाशीव करता आल्या असत्या असे वाटते. कादंबरीची रंजकता वाढवण्यासाठी वाचकांच्या मनात विस्मय आणि हुरहूर सतत सुरू ठेवणे आवश्यक असते, त्याची पुरेपूर काळजी लेखकाने घेतली असली तरी काही लांबलेले तपशील टाळता येऊ शकले असते. या कादंबरीच्या माध्यमातून एका चांगल्या कथासूत्राची म्हणजे ‘प्लॉट`ची हाताळणी माजी अधिकारी तथा पत्रकार-लेखकाने केली आहे. त्यायोगे, वास्तवावर कल्पिताचे झालेले खुमासदार लेपन, या दृष्टीने सामान्य वाचकांबरोबरच पत्रकार, राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, सर्व स्तरांवरील अधिकारी यांनी आपल्या भवतालावर आपल्यातल्याच एकाने टाकलेला हा प्रकाशझोत अनुभवायलाच हवा. कारण पदोपदी माफियाशाहीचे अडथळे ओलांडत जिणं पुढं ढकलत असलेले लोकशाहीतले सामान्यजन ‘गॉडफादर’ कादंबरीचं ब्रीद असलेल्या Behind every great fortune, there is a crime ची दाहक अनुभूती रोजच घेत असतात -नीलेश मदाने ...Read more

 • Rating StarSuresh Patill

  दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी रविवारी, दि.2 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण दिवसात वाचून काढली. 264 पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिसिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. ाल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर काल्पनिक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते. बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे. या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे. कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. शेवटी जाता-जाता ऐवढेच म्हणावे वाटते की, ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या अरूण साधूंच्या मराठी कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एका पत्रकाराने लिहलेली दर्जेदार मराठी कादंबरी वाचण्यात आली ती म्हणजे ‘रेडटेप !’ ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

CHEAPER BY THE DOZEN
CHEAPER BY THE DOZEN by Frank Bunker Gilbreth, Ernestine Gilbreth Carey Rating Star
Ravji Lute

डझनाच्या भावात स्वस्त पडते”(चीपर बाय दी डझन) असं म्हणणारे फ्रँक गिलब्रेथ (१८६८-१९२४) हे ‘टाईम अँड मोशन स्टडीज’ या संकल्पनेचे जनक म्हणून प्रसिद्ध पावलेले अमेरिकी इंजिनियर होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात त्यांचे काळ आणि वेळ विषयक नियम त्यांच्या स्पेलिंची अक्षरे Gilbreth उलट्या क्रमाने घेतल्यास होणाऱ्या Therbligs (१८ प्रकारच्या हालचाली) या शब्दाने ओळखले जातात. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामे कशी करावीत याबद्दल औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना, दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकी सैन्याला मार्गदर्शन करणारे गिलब्रेथ आपल्या डझनभर मुलांवर असे शैक्षणिक प्रयोग करत असत. त्यांच्या बारा मुलांपैकी(६मुली,६मुले) एका मुलाने व एका मुलीने (मूळ लेखक) मिळून गिलब्रेथ यांनी केलेले बहुतांश प्रयोग ‘चीपर बाय दी डझन’ या पुस्तकात मांडले आहेत. बारा मुलांना स्वावलंबी होण्यासाठी, वेगवेगळ्या भाषा येण्यासाठी, गणित, भूगोल, खगोलशास्त्र समजण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांनी त्यांच्या घरी, सहलीला गेल्यावर, अंघोळ करताना, अगदी जेवतानासुद्धा मुलांवर विविध प्रयोग केले. मानसशास्त्र पदवीधर असलेल्या त्यांच्या पत्नीने (लिलीयन गिलब्रेथ) त्यांना या कामात कशाप्रकारे साथ दिली. त्याचप्रमाणे बारा मुलांच्या गमतीजमती. इत्यादी माहिती पुस्तकातून वाचावयास मिळते. चीपर बाय दी डझन हे पुस्तक जवळपास शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्यातील काही गोष्टी आज कालबाह्य वाटत असल्या तरी सर्वच पालकांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. आजच्या घडीला एवढ्या मोठ्या संख्येने मुलं जन्माला घातली जात नाहीत. एक किंवा दोन मुलं असणाऱ्या नॅनो आवृत्तीमधील कुटुंबात मुलांच्या ‘फ्युचरची’ अति काळजी करून कायमच मुलावर चिडणाऱ्या/ डाफरणाऱ्या आणि त्यांना तणावाखाली ठेवणाऱ्या तरुण पालक वर्गाला ‘चीपर बाय दी डझन’ मधून नक्कीच काही शिकता येईल. 【फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचे काय झाले? असा प्रश्न माझ्या मनात पडल्याने मी या कुटुंबाबद्दल गुगुलवर शोध घेतला. त्यावेळी "बेलेज ऑन देअर टोज" या पुस्तकाबद्दल थोडी माहिती वाचली. ही माहिती इंग्रजीमधून आहे, सदर माहिती मराठीतुन वाचायला मिळाली नाही. फ्रँक गिलब्रेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी लिलीयन गिलब्रेथ मोठ्या हिमतीने त्याचा व्यवसाय कसा सांभाळते, तिला काय अडचणी येयात, आणि आपल्या अपत्यांना ती कसे सांभाळते हा उत्तरार्ध असलेले पुस्तक "बेलेज ऑन देअर टोज" फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे याच दोन मुलांनी लिहिले आहे.】 ...Read more

AMRUTVEL
AMRUTVEL by V. S. Khandekar Rating Star
Rahul Deshmukh

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्णून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं! ...Read more