* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I AM ANOTHER YOU
  • Availability : Upcoming
  • Translators : SWATI KALE
  • ISBN : 9789353171452
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
I Am Another You is a story of breakthroughs. Powerful, Life changing breakthroughs. You start this journey with the author, years ago trying to escape from a world that did not feel right. You travel with her in this magical journey to the Netherlands, where she learns the greatest lessons of her life by taking part in some amazing processes in the tradition of the ancient spiritual masters and healders who help her realize that the only place where wrong is `rightened` is within. There is nothing wrong with the world outside if we sort out the world inside. There are some stories that everyone relates to, because they involve you through thoughts and feelings that are universal, this is such a story. A life purpose for example is something each of us is looking for. A desire to achieve more from life and live at a higher self, is something everyone wants. A spiritual inclination to seek deeper, beyond material fulfillment each of us pursues sooner or later. There are numerous places in the book where you find yourself stopping, drawing paralles to your own life and finding answers. In an honest narrative extracted from real life experience, the book takes you through struggle, overcoming and victory over self. The book deals with breakthroughs that can be used by anyone to achieve personal success in the true sense of the word. Priya, who is a corporate trainer by profession, weaves learnings into each chapter, subtly, observing the meaning behind every experience, pointing it out to the reader without being obvious and leading you to think and find meaning and purpose in your own life situation as it is now and where you desire to take it from here. A book of many lessons, many insights and many truths, it has the power to awaken you to your best self. This book will urge you to take that path you always knew was right but never had the courage to follow. It will guide you, humour you, inspire you, touch you and above all lead you to your life`s calling.
‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तक म्हणजे पारंपरिक पद्धतीचे "self help" पुस्तक नाही. हे पुस्तक म्हणजे असंख्य मानसिक, आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करीत मिळवलेल्या विजयाची गोष्ट आहे. नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वारे सर्व शक्यतांचे ज्ञान मात्र होऊ शकते. जर आपले अंतर्मन योग्य दिशेने नेले, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही. लेखिका महिनाभर नेदरलँडच्या रहिवाशांबरोबर तसेच चौथ्या पिढीतील शमन्सबरोबर होती. शमन्स ही प्राचीन जमात आहे, जी आध्यात्मिक उत्क्रांती आणि मुक्तीसाठी काही आध्यात्मिक क्रिया करते. भौतिक आणि आध्यात्मिक जगातील दुवा म्हणून शमन्सकडे पाहिले जाते. ‘शमनीझम’ हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे म्हणतात की, शमन्स आत्म्यावर उपचार करतात. उपचार करून तुमच्यातून नष्ट झालेली ऊर्जा ते परत मिळवून देतात. लेखिकेच्या वैयाqक्तक पातळीवरील प्रवासात आपण पुस्तकरूपाने सहभागी होतो; पण आपल्या लगेच लक्षात येते की, हा फक्त लेखिकेचा वैयाqक्तक प्रवास नाही; लेखिकेच्या प्रवासात आपण सर्वच सहभागी आहोत. ‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तकाचे नाव या दृष्टीने सार्थ ठरते. या पुस्तकातून अनेक सनातन मूल्यांचा शोध लागतो. आपल्या नियतीला आपणच आकार देऊ शकतो. गुरू आपल्यातच असतो. निराश होणे अथवा आनंदी राहणे हे पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचक आणि गुरू यामध्ये फरक नसतो. फरक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीचा असतो. आपणच गुरू असतो आणि शिष्यही! आयुष्य आपणास दोन्ही बाजूंनी शिकवते. अशी अनेक सनातन मूल्ये आपणास जागोजागी भेटतात. अनेक लहानसहान रोचक प्रसंग लेखिकेने शब्दरूपाने फुलवले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचकाला नवीन अनुभव देऊन जाते. प्रत्येक वेळी नवीनच सत्य समोर येते. मानवधर्म हा वौqश्वक आहे. प्रत्येक मनुष्य सारखाच आहे आणि वैयाqक्तक पातळीवर त्याचा झगडाही सारखाच आहे. या सर्व झगड्यांतून जात असताना हाती येणारे वौqश्वक सत्य चिरंतन असते आणि हाच धागा पकडून लेखिकेने आपल्या समर्थ शैलीने फार नाजूकपणे विणला आहे.
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

NATH HA MAZA
NATH HA MAZA by Kanchan Ghanekar Rating Star
Yashashri Rahalkar‎

आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर " ... ची चर्चा ऐकतांनाच आठवले ते "नाथ हा माझा" नावाचं कांचन घाणेकरांनी लिहिलेल आठवण रूपी पुस्तक .... अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं हे पुस्तक अजूनही स्मृतींच्या कप्प्यात ताजं आहे . माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकातील एक ..पुन्हा वातांना तितकेच ताजे कोरे वाटले.... वयातील टोकाच्या अंतरापलिकडे जात प्रेमाची, स्वीकाराची आणि समर्पणाची आगळी परीभाषा कांचन ताईंनी मांडलीये. अश्या प्रकारच्या वागण्याच किंवा अजब प्रेमाच समर्थन कुठेही त्या पुस्तकात करीत नाहीत ... स्वतःच्या पतीविषयी लिहितांना कोठेही प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न नाही किंवा काळी बाजू अधिक गडद करणेही नाही. अतिशय जश्यास तसे सामर्थ्यवान लेखन . हे पुस्तक मी १२ वर्षांची होते तेव्हा पहिल्यांदा वाचल... तेव्हा मला कांचन घाणेकरांनी एव्हढ झपाटून टाकलं की माझ्या जोडीदाराला मी `नाथ` म्हणणार हे ठरवून टाकले .. तसे पुढे म्हटलेही . पुढे अनेक वेळा ते पुस्तक मी पुन्हापुन्हा वाचत गेली ... अनेकदा `नाथ` चा अर्थ नव्याने उलगडत ... सगळ्या गुण दोषांसह जश्याच्या तसा स्विकारलेला सर्वस्वाचा स्वामी नाथ .जरूर वाचा. ...Read more

MARI MARI JAY SARIR
MARI MARI JAY SARIR by Yojana Yadav Rating Star
DAINIK TARUN BHARAT 04-11-2018

वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या कविता... योजना यादव यांची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते, तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण- संघर् सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंब कवितेमध्ये उमटत राहतात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते. या काव्य संग्रहात एकूण ७४ कविता समाविष्ट आहेत. लहानलहान असल्या तरी कविता अर्थपूर्ण व आशयघन आहेत. शब्दांचे जंजाळ किंवा अवडंबर कुठेच नाही जसे पहिलीच कविता ‘जोहार’– ‘केवळ स्पर्शाचं भान आहे आपल्यात त्या साठीच शरीराच्या, मशाली पेटल्यात जगण्याचा अट्टाहास, एवढ्यापुरताच, आणि माझा जोहार, तेवढ्यापुरता.’ ‘गुलाम कवितेत – ‘सरावलो साशंक मनाला, तरच होऊ शकतो बेफिकीर मावळत्या सूर्याच्या साक्षीनं. नात उजळवू शकतो एखादा क्षण.’ अशी ही योजना यादव यांची कविता यथार्थतेचे दर्शन घडविणारी, काळजाला भिडणारी आहे. –डॉ. शैलजा यादवाड ...Read more