* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRATIKSHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663341
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOUNG MILIND SETS OUT IN SEARCH OF SOMETHING. WHAT IS IT? HE DOES NOT KNOW WHAT IS HE LOOKING FOR TILL HE COMES ACROSS IT. "PRATIKSHA` IS A NOVEL BASED ON THE WAITING. "MILIND, EVERY SINGLE HUMAN BEING IS SCARED OF BEING INTROSPECTIVE. WE CAN LOOK AT THE SORROW IN OTHERS LIFE WITHOUT ANY CONCERN, WE CAN REMAIN ALOOF WHILE DOING SO, BUT WHEN WE ARE ASKED TO JUDGE OURSELVES, TO EXAMINE OUR FEELINGS, THEN WE ARE TREMENDOUSLY HURT. WE ARE AGONIZED BY OUR OWN SORROW. WE CAN VERY EASILY HURT OTHERS, BUT WE ARE EVER TENDER TOWARDS OURSELVES. WHY SO? JUST ONE REASON... WE HAVE NO FAITH IN OUR LIVES. ALL THESE YEARS WHEN WE LIVE, WE DO IT UNFAITHFULLY. EVERYTHING WE DO IS WITH ONE SOLE PURPOSE, TREMENDOUS SELFISHNESS. WE COME ALONE AND PASS ALONE, STILL THROUGHOUT OUR LIVES WE CONTINUOUSLY NEED COMPANY, THOUGH WE KNOW THAT NOTHING LASTS FOREVER WE COUNT ON COMPANY. WE SEARCH FOR IT. THOUGH LIFE IS TRANSIENT WE LOOK FOR EVERLASTING COMPANY TRYING TO KEEP US SAFE. YOU GAIN SOMETHING ONLY WHEN YOU OFFER SOMETHING. SOMETIMES, YOU HAVE TO OFFER YOURSELF TO FIND SOMETHING WHICH IS ETERNAL. UNLESS, THIS IS DONE YOU CANNOT FIND TRANQUILITY AND EACH ONE HAS TO FIND ON HIS OWN...`
लहानपणापासूनच आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला, पोरका मिलिंद प्रेमाच्या, मनःशांतीच्या ओलाव्याचा शोध घेत प्रवासी म्हणून निसर्गाच्या अंगा-खांद्यावर भटकत जंगलानं वेढलेल्या राधेकृष्ण मंदिराच्या आसऱ्याला क्षणिक विसाव्यासाठी येतो. तिथं त्याला ऋषितुल्य बाबा, त्यांच्या मुलीसारखी असणारी, त्यांच्यासोबत राहून मंदिरात सेवा देणारी नंदिनी व तिचा ७-८ वर्षांचा मुलगा भेटतात. विसाव्याच्या काही क्षणांसाठी आलेला मिलिंद या तिघांच्या सहवासात चार-सहा दिवस घालवतो. नंदिनीही आपल्या आयुष्यात जवळच्या माणसांना पारखी झालेली असते. आपल्या मुलाची जबाबदारी तिच्यावर असते. बाबांच्या प्रेमळ संरक्षक कवचात ती क्वचित येणाऱ्या वाटसरूंचीही बाबांबरोबर सेवा करत असते. तिच्या सात्त्विक, सुंदर व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण मिलिंदला भुरळ पाडतं. तशात बाबा परिसरातील गावकऱ्यावर निसर्गातील जडीबुटींचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत करत असल्यानं, २-३ दिवस मिलिंदकडे नंदिनी-राहुलला सोपवून जातात; पण आधीच दुःखानं पोळलेली नंदिनी त्याला प्रतिसाद देण्यास घाबरते. पुन्हा एकदा वैवाहिक आयुष्याचा डाव मांडावा की नाही, याबद्दल तिची द्विधा अवस्था होते. अखेर मिलिंद तिची मनोवस्था जाणून, आपल्या पुढच्या वाटचालीकरता एकटाच निघण्याची तयारी करतो. ...पण बाबा येईपर्यंत त्याला थांबावे लागते. काय होते बाबा परत आल्यावर? बाबा त्या दोघांच्या मनाची उलघाल ओळखतात आणि सांगतात- ‘‘परिचय अल्प आणि दीर्घ नसतोच मुळी! दोन मनांची पुरी ओळख जिथं होते, तिथं मी एकमेकांकडे आकर्षिली जातातच मुळी! ही शक्ती अफाट सामर्थ्यदायी आहे. नदी सागराला मिळते, ती कोणत्या परिचयानं? वीस वर्षांपूर्वी मी इथं फिरत फिरत आलो. या मूर्तीपेक्षा अनेक सुंदर मूर्ती, अनेक सुंदर जागा मी पाहिल्या; पण तिथं माझं मन रमलं नाही. ही मूर्ती पाहिली आणि मी जिंकलो गेलो. हे का घडलं?`` अखेर बाबांच्या आशीर्वादानं दोघांची एकत्र वाटचाल सुरू होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarSmita Narayan

    प्रतीक्षा - रणजित देसाई ग्रुप वर मी प्रथमच पोस्ट करत आहे म्हणून माझ्या आवडत्या लेखकाचे पुस्तक निवडले, पण सर्वात प्रथम याच लघुकादंबरी बद्दल लिहावेसे वाटले..देसाईंच्या अनेक पुस्तक पैकी हे मला खूप जवळचे आहे, देसाईंची जी ठराविक लिखाण शैली आहे त्याहून हीमला थोडी वेगळी वाटली थोडी अनपेक्षित अशी ही कथा आहे, परंतु बाज तोच.. व्यक्त न झालेल्या भावना, पात्रांची दुःखे त्यांचा भूतकाळ या बद्दल ते असे लिहतात की डोळयांत सहज पाणी उभे राहते, त्यांच्या कथा ह्रदयाचा ठाव घेतात.. ही एक प्रेमकथा म्हणण्यापेक्षा भावकथा म्हणू शकता.कमी शब्दात ही कादंबरी त्यांनी मांडली आहे. कथेतील मिलिंद दुःखी आहे, प्रवासी आहे कशाच्या तरी शोधात तो एक हिमालयतील आश्रमात येतो. तिथे त्याची भेट बाबा, नंदिनीं, लहान राहुल यांच्याशी होते. त्यांच्या प्रेमळ वागण्याने तो सुखावून जातो आणि काही दिवस तिथे राहतो, नंदिनी ला पाहताक्षणी दोघांनाही एकमेकां बदल ओढ जाणवते, बाबांना या सर्व गोष्टी जाणवतात पुढे काय होते ते तुम्हाला कादंबरी वाचूनच कळेल..मला असे वाटते या कथेचा शेवट काय आहे यापेक्षा त्यांनी पुस्तकातून जीवना बदल, प्रेमबद्दल जे काही विचार मांडले आहेत ते खूप काही देऊन जातात मला या कथेत जर कोणते पात्र आवडले असेल तर ते आहेत बाबा..बाबा संन्यासी आहेत, परंतु त्यांच्या गतायुष्यात ते देखील प्रेम ,वैवाहिक जीवन यातून गेले आहेत..ते नंदिनी वर मुलीसारखे प्रेम करतात. स्वतःच्या वयाचा विचार न करता रुग्ण सेवा करतात. ते खूप प्रेमळ करुण आहेत. भटकलेल्या मिलिंद ला समजावून घेतात, त्यांच्यात आणि मिलिंद मधले सवांद म्हणजे कथेतला आत्मा आहेत आवर्जून सारखे सारखे वाचावे असे. निस्वार्थी प्रेम, वैवाहिक सुख, ईश्वर भक्ती, श्रद्धा, मृत्यू या बद्दल बाबा खूप भरभरून बोलतात. प्रेमाचा विशुद्ध ,सात्विक, तरल भाव या कथेत आहे जो मला खूप प्रिय आहे, असाच "अभोगी" मध्ये जाणवतो आणि खांडेकरांच्या `अमृतवेल` मध्ये पण...For me it`s a philosophical feast, we are looking for something and I hope we will find that someday.. मला आवडलेला एक परिच्छेद खाली देत आहे तुम्ही वाचा आणि तुम्हाला यामधील कोणता संवाद आवडला किंवा कोणत्या ओळी आवडल्या ते नक्की सांगा.. धन्यवाद. "ही बघ ना गौरंगी! कसल्या ओढीनं ती या पर्वतकड्यावरून झेप घेते आहे? ज्या ओढीननं ती या प्रचंड नगाधिराजाच्या मस्तकावरून झेपावत आहे, ती सागरतृष्णा खरोखरच एवढी श्रेष्ठ आहे का? जेव्हा ती सागराला मिळेल, तेव्हा या तपश्चर्येचं सार्थक होईल का? ह्यालाच का आपण प्रेम म्हणतो? हे प्रेम नव्हे. हे वासनेचं प्रतीक आहे. वासना प्रबळ आहे; पण त्याहीपेक्षा प्रेमाचा ओघ शतपटीनं प्रबळ असूनही त्यात रौद्रता नाही. त्यात समाधान आहे. सुख आहे आणि आज प्रमत्त्त होऊन पर्वतशिखरावरून झेपावणारी कर्पूरगंगा तन्वंगी प्रेमाचा अर्थ कळू लागल्यावर पुढे अधिक शांत, गंभीर होत असावी... ...Read more

  • Rating StarTushar Kute

    #पुस्तक_परीक्षण 📖 प्रतीक्षा ✍️ रणजित देसाई 📚 मेहता पब्लिशिंग हाऊस `पाहिलंस, मिलिंद, माणूस अंतर्मुख होण्याला केवढा भितो, ते ? दुसर्याच्या दुःखाकडे तो निर्विकारपणे पाहू शकतो. त्याच्या दुःखाची छाननी करू शकतो; पण स्वत:चं परीक्षण करताना मात्र तो वयाकूळ होतो. दुसऱ्याच्या जखमेवरची पट्टी चारचौघात त्याला बेदरकारपणे काढता येते; पण स्वत:च्या जखमेवरची पट्टी दूर करण्याच्या कल्पनेनंही तो कासावीस होतो... `याचं कारण?` कारण एकच... जीवनावर श्रद्धा. जीवन जगण्यात असलेला प्रामाणिकपणाचा अभाव. सारेच व्यवहार स्वार्थप्रेरित. मानव एकटाच जन्माला येतो आणि त्याला शेवटी एकटाच जावं लागतं, तरीही त्याला आयुष्यभर सोबतीची आवश्यकता असते ही सोबत तो शोधीत असतो. आयुष्य क्षणभंगुर आहे, हे माहीत असूनही, चिरंतन, शाश्वत प्रेमाचे ठिकाण त्याला हवं असतं; पण हे सारं स्वत:ला सुरक्षित राखून.... `दिल्याखेरीज काहीच मिळू शकत नाही. स्वतः हरवल्याखेरीज काही गवसत नाही. हे हरवण जो शिकला, त्यालाच ती शांती, ते समाधान मिळू शकेल. मात्र ते ठिकाण प्रत्येकानं शोधायला हवं... हिमालयाच्या कुशीमध्ये एक प्रवासी भटकत चालला आहे. वाटेत त्याची भेट एका संन्याशाची होते. तो एका तरुण स्त्री व तिच्या मुलासोबत राहत आहे. प्रवासी एका रात्रीसाठी त्याठिकाणी थांबतो. परंतु नंतर मात्र त्याचा पाय तेथून निघत नाही. तो त्या तरुण स्त्रीच्या प्रेमात पडतो. तिचा एक भूतकाळ आहे. त्यालाही तो सहजपणे स्वीकारतो व दोघांचे मिलन घडते. अशी साधी सरळ प्रेमकथा असलेली कादंबरी म्हणजे "प्रतीक्षा" होय. रणजीत देसाईंनी सुटसुटीतपणे घटनांची व प्रसंगांची मांडणी करून ही वाचकांसमोर सादर केलेली आहे. ती वाचत असताना आपण सतत हिमालयाच्या कुशीत वावरत राहतो. शिवाय संवादांची रचना मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्याशी सातत्याने बोलतही राहतो, हे या कादंबरीची वैशिष्ट्ये होय. https://www.tusharkute. net/2021/04/pratiksha-ranjit-desai.html ...Read more

  • Rating StarPrashant Joshi

    अनेक वर्षांपूर्वी वाचली होती ही कादंबरी पण अजूनही सर्व घटना तशाच डोळ्यासमोर आहेत. मिलिंद जेव्हा थकून मठात येतो तेव्हा नंदिनी त्याच्यासाठी जेवणाची थाळी आणते, मात्र तोपर्यंत मिलिंद झोपी गेलेला असतो. त्यावेळचे बाबांचे वाक्य, `थकल्या शरीराला अन्नापेक्षा रामाची जास्त गरज आहे` हे मी अजूनही आचरणात आणतो😀 ...Read more

  • Rating StarPritam Katkar

    आज रणजित देसाई ह्यांची #प्रतीक्षा ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. एक वेगळ्याच विश्वात ही कादंबरी घेऊन गेली.... कथेचा विषय असा... कादंबरीचा नायक मिलिंद अतृप्त आणि असफल प्रेमजीवणातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खऱ्या प्रेमाच्या शोधत तो फिरत फिरत हिालयातील एका मठात येतो. आणि तेथेच त्याची नंदिनी ह्या नायिकेशी गाठ पडते. मिलिंद अतिशय हलक्या व भावपूर्ण अंतःकरणचा आहे. तर नंदिनी सुंदर, सत्वशील, प्रेमळ, संयमी, कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे त्या दोघांनमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. तिसरी व्यक्तिरेखा ह्या कादंबरीतील बाबा (मठातील अध्यात्मिक गुरू) ही आहे. बाबाच्या व्यक्तीरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांसमोर येतात. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. कादंबरी वाचताना आपण देखील हिमालयात वावरत आहोत असा भास होतो. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवणाचेही चित्रण येते आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपुर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे. ©प्रितम र. कातकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more