* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRASTHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980936
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN EVERY MIND ITSELF IS THE GREAT HIMALAYAS AND THE BLUSTERING STORM. THE HAPPINESS AND THE SADNESS BOTH ATTACK YOU LIKE A STORM. THEY SHRED YOUR PERSONALITY INTO PIECES. BUT PRANAV, JUST REMEMBER WELL, WHEN THE SHIP GETS CAUGHT INTO A STORM, IF THE CAPTAIN OF THE SHIP IS IN A DILEMMA THEN HE SEES THE "EYE OF THE STORM`. YOU MAY CALL IT THE FOCUS OF THE STORM. IT IS REALLY VERY PEACEFUL AT THE CENTER OF THE STORM, UNBELIEVABLY. ONCE THE SHIP IS TAKEN TO THE EYE OF THE STORM THEN IT REMAINS SAFE. JUST LIKE THIS, WE HAVE TO CREATE AN EYE OF THE STORM IN A CORNER OF OUR MIND, DEEP WITHIN US, SO STILL, SO UNSPOKEN, SO SAFE, IN CASE OF ANY STORMY SITUATION IN OUR LIFE, WE SHOULD BE ABLE TO EASILY RETREAT TO THIS PORTION OF OUR MIND. SUCH A CORNER CAN BE CREATED, ONLY THING IS WE HAVE TO MAKE EFFORTS FOR IT. WE HAVE TO INVOLVE OURSELVES DEEPLY INTO SOME FORM OF MEDITATION OR SOME WORK, GET ENGROSSED COMPLETELY, FORGETTING THE TRUE SELF. THIS IS ALSO A FORM OF LIFE.
निश्चल उभा हिमालयही असतो. हे सुख-दु:ख अंगावर चालून येतं. वादळासारखं! व्यक्तिमत्त्वाच्या चिंध्या करत, पण एक लक्षात ठेव प्रणव, समुद्री वादळात जेव्हा जहाज अडकतं आणि कॅप्टन गोंधळतो, तेव्हा त्याला `आय ऑफ स्टॉर्म’ दाखवला जातो. त्या वादळाचा मध्यिंबदू म्हण. त्या मध्यिंबदूत नीरव शांतता असते. अगदी आश्चर्यकारकरित्या. जहाजाला त्या `आय ऑफ स्टॉर्म’मध्ये नेलं की जहाज सुरक्षित राहातं. तसंच अंतर्मनात एक कोपरा एवढा निश्चल, निवांत निर्माण करावा लागतो की आयुष्यात कितीही वादळं आली तरी त्या क्षणी मनाला त्या कोप-याचा आसरा घेता यायला हवा. असा कोपरा प्रयत्नानंच निर्माण करता येतो. स्वत:ला विसरून, विखरून, ध्यानात किंवा एखाद्या कामात. हे जीवनाचं रूप आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRASTHAN #PRASTHAN #प्रस्थान #FICTION #MARATHI #REKHABAIJAL #रेखाबैजल "
Customer Reviews
  • Rating StarSAMACHAR MAIFIL 28-02-2010

    अंतःकरणाचा ठाव घेणारी कादंबरी… रेखा बैजल यांची ओळख कादंबरी, कथा, कथाकथन, चित्रपटांच्या लेखिका तसेच कवयित्री म्हणून मराठी वाचकाला आहे. प्रस्थान ही त्यांची नवी कादंबरी. गेल्या दहा वर्षात झालेले सामाजिक बदल, त्यात गुंतून गेलेली तरुण पिढी अनेक सुविधा असानाही मनात असणारी अस्वस्थता एकीकडे चंगळवादी मनोवृत्ती तर दुसरीकडे वेळ मिळत नसल्यामुळे होणारी भावनिक कोंडी या आणि अशा अनेक प्रश्नांसमोर तरुणपिढी हतबल होऊन उभी राहत आहे. विभक्त कुटुंबामुळे सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक, भावनिक दबावाचा निचरा होण्याचे साधन संपुष्टात आले आहे. अशा परिस्थितीत भावनाशून्यता निर्माण होत होत ही पिढी केवळ भौतिकवादी होते आणि सहनशक्ती संपलेल्या या व्यक्ती आयुष्यात घटस्फोटासारख्या दुर्दैवाला सामोरी जावी लागते. काँटॅक्ट मॅरेज, वन पॅरेंटल सिस्टिम, क्रेश, वृद्धाश्रम हे कुटुंबव्यवस्थेत शिरलेले व्हायरस असून कुटुंबव्यवस्था यामुळे संपुष्टात येते. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी तसेच मानसिक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचे चित्रण प्रस्थान या कादंबरीत केले आहे. एकादृष्टीने असफल असली तरी सफल प्रेमाची ही प्रेमकथा आहे. यातील व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांसमोर येत जातात. प्रणव, मेघना, रोहन, वर्षा, मार्था यांच्या जीवनप्रवासाची एकाच वेळी सुस्थिरता आणि भावनिक पातळीवरची भयानकता स्पष्ट करत जातात. कादंबरीचे सार सांगताना मनातल्या घोंगावणाऱ्या वादळाला त्याचबरोबर अचल असणाऱ्या हिमालयाच्या शिखराला आपण कसे स्थान देतो यावरून व्यक्तीची ओळख घडते. सुख-दुःखं अशाच प्रकारे जीवनात चालून येत असतात. समुद्रात जहाज जेव्हा भरकटते तेव्हा कॅप्टन गोंधळतो. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत त्याला आय ऑफ स्टॉर्म दाखवला जातो. हा वादळाचा केंद्रबिंदू त्याला दिसल्यावर एक गोष्ट लक्षात येते. त्या मध्यबिंदूत आश्चर्यकारक शांतता असते आणि तिथे जहाज नेले की ते सुरक्षित राहणार असते. असाच मनाचा एक कोपरा आपण निर्माण केला की, आयुष्यात कितीही वादळे आली तरी त्या कोपऱ्याचा आश्रय घेतला की, आपण ती वादळं समर्थपणे परतून लावू शकतो. परंतु, हा कोपरा प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. रेख बैजल यांनी प्रस्थानमधून हा कोपरा अत्यंत नेटक्या स्वरूपात उभा केला असून जीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहावे असेच आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या कादंबरीस चंद्रमोहन कुलकर्णी यांचे तेवढेच समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे. ...Read more

  • Rating StarAPALA MAHANAGR 02-05-2010

    कुटुंब व्यवस्थेचे व्हायरस… मुलांचं काय करायचं? आई-वडिलांना कुठे ठेवायचं? लाईफ पार्टनर कुठवर साथ देणार? असे प्रश्न आता प्रत्येकाला भेडसावू लागले आहेत. सोबत संपन्नताही आहे. आर्थिक स्थैर्य आहे. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी, मानसक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचं रेखाटन लेखिकेने या कादंबरीत केलेलं आहे. ही एक असफल असूनही सफल प्रेमकथा आहे. ...Read more

  • Rating StarSAKAL 28-03-2010

    गेल्या पिढीला जे आयुष्याच्या शेवटी मिळालं, ते आताच्या पिढीला सुरवातीलाच मिळतं, पण यातून वाढला आहे वेग आणि कमी झाला आहे परस्परांसाठीचा वेळ. यात एखादी तरल मनाची व्यक्ती सापडली, तर काय होईल याचं हे चित्रण केलं आहे रेखा बैजल यांनी.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book