* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PLANCHET
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668803
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A LONG JOURNEY BETWEEN BIRTH AND DEATH; EVERYONE HAS BEEN A VOYAGER DURING THIS JOURNEY. MANY A TIMES, MAN COMES ACROSS SOMETHING MYSTIC DURING THIS JOURNEY. BUT THE REALLY MYSTERY LIES IN THE JOURNEY BEFORE BIRTH AND AFTER DEATH. MAN HAS ALWAYS BEEN FASCINATED BY BOTH THESE JOURNEYS. HE IS TREMENDOUSLY IN LOVE OF THE FUTURE AND THIS MAKES THE FUTURE MORE FASCINATING. ONCE A MIND IS CAPTIVATED WITH THE FUTURE OR WITH THE MYSTERY THEN….THEN TAKES BIRTH A STORY BASED ON IT; MAY BE SUSPENSE, FANTASY OR SOMETHING CLOSE TO IT WITH A DIMENSION OF SOME SUPER POWER. THIS BOOK PRESENTS BEFORE US THE COLLECTION BASED ON SUCH POWERFUL FEELINGS, TRYING TO UNFOLD THE NATURE OF THE MIND; DIFFICULT TO UNDERSTAND.
जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास माणूस करतच असतो. पण या प्रवासातही काही वेळा त्याला गूढत्व जाणवते. पण खरा गूढ आणि अनाकलनीय प्रवास आहे जन्मापूर्वीचा आणि नंतरचा... या गूढाचे माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. त्याला आणखी आकर्षण वाटते ते भविष्याचे. आणि एकदा या गूढाचे किंवा भविष्याचे वेध लागले की... आणि यातूनच जन्म घेतात गूढकथा, संदेहकथा, रहस्यकथा, फॅन्टसीज, कूटकथा आणि भयकथा.... आणि इतर अशाच अनेक... माणसांच्या या मनोव्यापारांचे रहस्य उलगडत टिपलेल्या या कथा... तशा विलक्षण आणि वेगळ्या...

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PLANCHET #PLANCHET #प्लँचेट #HORROR&GHOSTSTORIES #MARATHI SNEHALJOSHI #स्नेहलजोशी "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अनिल डोंगरे गूढकथा म्हटले की, मराठीत हटकून रत्नाकर मतकरी नारायण धारप यांची नावे आठवतात. कोणी काही म्हटलं तरी मराठी गूढकथांवर मतकरींचा ठसा आहेच. मराठी गूढकथांना ज्या ‘नवल’ मासिकाने प्रतिष्ठा मिळवून दिली त्याच ‘नवल’ मासिकात सातत्याने लेखन करून पुढे आलल्या स्नेहल जोशी यांचा ‘प्लँचेट’ हा नवा गूढकथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गूढकथा पुरुष लेखकानेच लिहावी हा तथाकथित समजही स्नेहल जोशी यांनी आपल्या सकस कथांनी चक्क मोडीत काढला आहे. एक स्त्री न भिता मानवी मनाला भोवळ आणणारे, तर्क न ओलांडणारे, गूढ व विलक्षण लिहू शकते याचा प्रत्यय ‘प्लँचेट’मध्ये वारंवार येतो. स्नेहल जोशी यांनी यापूर्वी ‘कॉलगर्ल’ आणि ‘अधांतर’ या कादंबऱ्या व विपुल कथालेखन केलं. पण नंतर त्या प्रामुख्याने गूढकथांमध्ये रमल्या. ‘प्लँचेट’मध्ये एकूण १४ गूढकथा आहेत. त्यापैकी भृगुसंहितेचा बळी, काव.. काव.., सुश्रुत-बी १४, निरोप, मिस्टर राईट, सफर अशा कथात मानवी जीवनातल्या अतक्र्य घटना तर्क कोठेही विस्कटू न देता मनाची पकड घेतात आणि आपण त्या सलग वाचतच जातो. गूढकथांची खरी शक्ती वातावरण निर्मितीची असते व ती इथे पुरेपूर आढळून येते. भीती हा तर माणसाचा स्थायीभाव. चंचल स्वभाव, मनातले द्वंद्व, अद्भुत भास याला जर विचित्र घटनांची मालिका चिकटली, तर माणूस त्यात गरगरत राहतो. हाच अनुभव यातील प्लँचेट, ओझं, निरोप, झपाटलेली, इजा बिजा तिजा, जेथे राघव तेथे सीता अशा कथा देतात. उत्सुकता आणि धक्कादायक शेवट हीही गूढकथांची वैशिष्ट्ये. ती तर स्नेहल जोशी यांची बलस्थाने ठरवीत अशा पद्धतीने एकेक कथा अनुभवांना धक्के देत विलक्षण वेगाने वेगळ्या वाटेने जाते. जन्म आणि मृत्यू याचे कोणत्याही माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. एकदा गूढाचे वा भविष्याचे वेड लागले की, मनोव्यापार कसा बदलत जातो याचे अर्थपूर्ण प्रत्यंतर ‘भृगुसंहितेचा बळी’ कथेत येते. गूढकथालेखिका म्हणून स्नेहल जोशी यांची वाटचाल पक्की होण्यास ‘प्लँचेट’ संग्रह मदतरूप होईल यात वाद नसावा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more