* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PANDHARE DHAG
 • Availability : Available
 • ISBN : 9788177667219
 • Edition : 12
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 200
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO 111 BOOKS
Quantity
The two world wars that took place in this century are two historical major events. Throughout the world they revoked reformation; social as well as cultural. India is not an exception to this, as Maharashtra is a part of India so it is needless to say that Maharashtra is also undergoing drastic reformation. At the time of second world war, there was young generation working around. They were inspired with an aim. They were born at the time of first world war, they were impressed by Tilak`s ideals initially and later on those of Gandhis. They were marching steadily towards their aims. They didn`t give a damn about their domestic or financial grudges. They wanted independence. Abhay is the representative of this young generation. He is stimulated he is all set for revolution when his sensitive mind notices the struggle for remaining alive, when he witnesses the condition of many whose life resembles that of an unclaimed child in a garbage pit. When he sees them wallowing in poverty he makes up his mind to walk towards revolution. Maharashtra in distinctly divided into two parts; one is of those upper middle class people losing their morals, their aims, and the other is of those lower middle class people who are intelligent and have not lost their sentiments. Abhay represents the intelligent and sensitive class. Many of the readers will find Abhay one of them.
या शतकात झालेली दोन महायुद्धे, हे दोन ऐतिहासिक टप्पे आहेत. या दोन टप्प्यांवर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रचंड स्थित्यंतरे घडून आली. ही स्थित्यंतरे भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रातही घडत होती. दुसया महायुद्धाच्या दरम्याने ध्येयप्रवण तरुणांची एक पिढी इथे वावरत होती. पहिल्या महायुद्धाच्या दरम्याने जन्मलेली, सुरुवातीला टिळकांचे आणि नंतर गांधींचे संस्कार घेऊन वाढणारी ही पिढी. आपल्या भोवतालच्या कौटुंबिक आणि आर्थिक पाशांना न जुमानता ही पिढी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती. हे ध्येय केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचे नव्हते... अभय हा अशाच ध्येयप्रवण तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. मानवी जीवनाची जगण्यासाठीची धडपड, उकिरड्यावरच्या बेवारशी पोराप्रमाणे त्यांची असणारी अवस्था पाहून तो क्रांतीच्या दिशेने पावले उचलू लागतो. एका बाजूला सत्त्वशून्य व ध्येयशून्य होत चाललेल्या महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्गाच्या पाश्र्वभूमीवर, कनिष्ठ मध्यमवर्गातल्या बुद्धिमान आणि भावनाशील अशा तरुणांचा प्रतिनिधी म्हणून अभय उभा आहे. हा अभय वाचकांना नक्कीच ओळखीचा वाटेल.
Keywords
#V#S#KHANDEKAR#PANDHARE#DHAG #वि#स#खांडेकर#पांढरे#ढग
Customer Reviews
 • Rating StarDhananjay Deshmukh

  या दोन शतकात झालेली महायुद्धे हे दोन ऐतिहासिक टप्पे आहेत या दोन टप्प्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात स्थित्यंतरे घडून आली ही स्थित्यांतरे भारतात आणि पर्यायी महाराष्ट्र सुद्धा घडत होती दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ध्येय प्रवण तरुणांची एक पिढी वावर होती पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जन्मलेली पिढी टिळकांचे आणि नंतर गांधीजींचे संस्कार घेऊन वाढणारी ही पिढी आपल्या भवताली कशाला न जुमानता ही पिढी आपल्या ध्येयाने वाटचाल करीत होती हे ध्येय केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचे नव्हते...... अभय हा अशाच ध्येय प्रवाह तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे मानवी जीवनाची जगण्याची धडपड उकिरड्यावर च्या बेवारशी पोराप्रमाण त्याची असणारे अवस्था पाहून तो क्रांतीच्या दिशेने पावले उचलू लागतो एका बाजूला सत्व शून्य व ते शून्य होत चाललेल्या महाराष्ट्रातील उच्च मध्यम वर्गाच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ मध्यमवर्गातल्या बुद्धिमान आणि भावनाशील अशा तरुणांचा प्रतिनिधी म्हणून अभय हा उभा आहे अभय वाचताना तुम्हाला नक्की ओळखीचा वाटेल अतिशय सुंदर आणि खांडेकरांचं लेखन याबद्दल तर काय म्हणावं प्रत्येक वळणावर सुवर्ण अलंकार आहे नक्कीच वाचावे अशी कादंबरी आहे ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

VADALFUL
VADALFUL by REI KIMURA Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

एका राजकन्येची अचंबित करणारी कहाणी... रेई किमुरा हे नाव अपरिचित नाही. किमुरांच्या कादंबऱ्या अतिशय वाचकप्रिय आहे. The Princess and The Spy मेहता प्रकाशनाने ‘वादळफूल’ या शीर्षकाने वाचकांसाठी आणले आहे. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि अगदी नेमका ब्लर्ब यासह. मांचुरिया हा विस्मृत चीनचा एक भाग. इथेही राजेशाही होती. वजकुमार स्यू काय किंवा चिनी सम्राट काय सगळे एका माळेचे मणी होते. ‘दी किंग कॅन डू नो राँग’ मानणारे. जनतेची पर्वा नसणारे. उपभोगात रमलेले, कोणाच्या जनान्यात किती भोगस्त्रिया आहेत, यावर मोठेपणा मानणारे, एकप्रकारे सत्तेच्या, भोगाच्या, सुखलोलुपतेच्या कैफात असलेले, मांचुरियाचे राजकुमार स्यू त्याच परंपरेतले. स्यूंच्या एका ‘जनानी’ची बंडखोर, मनस्वी, संस्कारशून्य मुलगी म्हणजे आयसिन सिओरो. ही सुधारणेच्या पलीकडे आहे हे जाणून राजकुमार स्यू त्यांच्या सावत्र भावाला ही कन्या दत्तक देतो. तिची जपानमध्ये पाठवणी करतो. ‘योशिको कावाशिमा’ या नावाने इथून पुढे ती ओळखली जाते. तिची आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘वादळफूल’. Know thy self ही आज्ञा ती पाळते. ती स्वत:ला पूर्ण ओळखते. साहसी, संकटांनी भरलेले दुहेरी आयुष्य जगणारी. एक निरुपयोगी मुलगी असा वडिलांनी शिक्का मारलेली, खेद-खंत नसलेली, वडिलांवरही हेरगिरी करणारी, मुलांसारखा पोशाख करणारी, अन्नावर तुटून पडणारी, स्त्री-पुरुष संबंध याबद्दल लहान वयात जाण आलेली, त्यात कसलेही पाप न मानणारी, स्वयंकेद्रित, टीकेची पर्वा न करणारी, देहसुख घेण्यात कसलाही टॅबू न मानणारी, मिलिटरी ऑफिसर यमागासह सातआठ मित्र असलेली, अनेकांशी निकटचे संबंध असले तरी एक सैल व स्वैर आयुष्य जगणारी मुलगी. वासंती घोसपूरकर यांनी हा अनुवाद एवढा चांगला केला आहे, की हा अनुवाद वाटत नाही. आपण मराठीतून रेई किमुरा यांनी कादंबरी लिहिली व मेहता प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली याचे समाधान देणारा हा छान अनुवाद आहे. ज्यांना दुसऱ्या महायुद्धात, त्यातल्या जपानी सहभागात व गुन्हेगारी विश्वात रस आहे. त्यानी ‘वादळफूल’ वाचायलाच हवे, एवढ्या तोलामोलाचे हे पुस्तक आहे. –अनंत मनोहर ...Read more

ADAM
ADAM by RATNAKAR MATKARI Rating Star
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019

रत्नाकर मतकरी शोध घेत आहेत. माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अ‍ॅड्म आणि इव्ह’ यांच्या न संपणाऱ्या गोष्टींचा. काळानुसार कथानकात बदल होत असला तरी प्रवृत्ती तीच आहे. स्त्रीचा नेमका कोणता गुण पुरुषांना आकर्षित करतो, ज्यासाठी ते शरणागती पत्करतात?... स्त्रीच्ा देहाचं आकर्षण, तिच्या विषयी वाटणारी वैषयीक भावना, तिच्यामधले कला गुण की तिची बुद्धिमत्ता? आपल्या ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीत मराठीतील नामांकित साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या नाजूक विषयावर कुठेही बीभत्स न होता भाष्य केले आहे. ‘अ‍ॅड्म’ या कादंबरीचा नायक वरदाचा हा जीवनप्रवास! निव्वळ लैंगिक भावनांचा विचार केला, तर सुरुवातीचा प्रवास तरी बहुसंख्य पुरुषांचा सारखाच असतो. मुख्य म्हणजे लहानपणी स्त्री देहाविषयी वाटणारं कुतूहल काहीच्या बाबतीत मात्र पौंगंडावस्थेतच असमाधानी स्त्रीकडून वापरलं जाणं नशीबात असता. वरदाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. उमलत्या वयात त्याला उफाड्याच्या नवनीतमचे आकर्षण वाटते. ही ओढ अतिशय नैसर्गिक आहे. नवीनतम तिशीची आहे. तिचे लग्न झालेले आहे. तिचा नवरा म्हातारा आहे. ती वरदाकडे घरकामाला असून कामक्रीडेत प्रवीण आहे. ती वरदाला प्रतिसाद देते आणि या खेळाचे शिक्षण देखील. वरदा तिला लग्न करशील का असे विचारतो तेव्हा ती उत्तर देते. ‘कामवालीशी कोणी लग्न करतात का?’ एकुणच अतृप्त स्त्रीच्या कामुकतेचे आणि ती पुरी करण्याकरता साधलेल्या संधीचे वास्तव चित्रण अ‍ॅड्म या कादंबरीत रत्नाकर मतकरींनी केले आहे. एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात एक नवा प्रवाह निर्माण करते आहे, हे निश्चित! – डी. व्ही. कुलकर्णी ...Read more