* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NISHABDACHE MAUN
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454799
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PAIN & SUFFERING IS PART & PARCEL OF LIFE. IT CAN HELP US TO LEARN IMPORTANT LESSONS IN LIFE. DIPTI JOSHI FOCUSES ON SUCH LESSONS IN HER BOOK ‘NISHABDACHE MAUN’. THOUGH THE WORD ‘MAUN’ REPRESENTS SILENCE , THESE STORIES TALKS ABOUT PHILOSOPHY OF LIFE. DIPTI JOSHI EVEN POINTED OUT VARIOUS SOCIAL PROBLEMS WITH HEARTWARMING WORDS.
‘नि:शब्दाचे मौन’ हा माझा कथासंग्रह म्हणजे नात्यांचे पदर उलगडत जाणारा प्रवास. हा प्रवास कधी, कसा सुरू झाला माहीत नाही; जन्मापासूनच तो मनात सुरू होता. मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु:खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. ‘नि:शब्दाचे मौन’मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी ‘श्यामची आजी’, नवीन वर्षाचं स्वागत करताना, ‘प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.’ असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी ‘विश्वामित्राची तपश्चर्या’ किंवा आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपल्या पेशंटला जगताना पाहून एका प्रथितयश डॉक्टरची होणारी चिडचिड, संताप, डॉक्टर म्हणून कर्तृत्वशाली तरीही अतृप्त प्रवासाचे ‘प्रतिबिंब’! या कथासंग्रहातील प्रत्येक कथा म्हणजे माझं अपत्य, त्यांना सुंदर संस्कार देऊन, तुम्हा वाचकांच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या सुख-दु:खात तुम्हीही नक्कीच सहभागी व्हाल.

No Records Found
No Records Found
Keywords
NISHABD# MOUN# AAJI# VISHVAMITRA# TAPASHCHARYA# AATHVAN# MORPEES# PUNARJANM# KALAKAR# TERE FULOSE BHI PYAR# VYATHA# PRATIBIMB# UDHVAST# SHIKSHA# NAJAR# KHAREDI# COSTUME DESIGNER# PAREEKSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 10-12-2017

    दीप्ती जोशी यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह. वेगवेगळ्या नात्यांचे पदर जोशींनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. बाह्यविश्वातून अंतर्मनाचे चित्रण करत आणि मनातल्या संघर्षांचे विविध कंगोरे टिपत जाणाऱ्या या कथा. पात्रं आणि त्यांच्यामुळं घडलेल्या घटना-प्रंगांची गुंफण यांतून लेखिका कथाबीजं विकसित करते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 12-11-2017

    वेदनेचे विभिन्न पोत... दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे. ‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्नव वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. शिक्षा ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱ्याला ‘शिक्षा’ देणाऱ्या अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱ्या एक माणसांच्या गोतावळ्यात व जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. खरेदीमध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱ्या आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱ्या, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱ्या सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यारी’ मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळ्यात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात. ‘उदध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौन’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे. परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. श्यामची आजी मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीशी नातं सांगते. विश्चामित्राची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, कधी जीवानाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱ्या, मौनाचे गूढ उकलणाऱ्या, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱ्या आणि नजरेचे भान जपणाऱ्या या कथा सौम्य व रंजक आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book