* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIRAMAY YASHASATHI DHYAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662856
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR RICH AND VARIED CULTURE HAS BESTOWED US WITH THE MEDITATION POWER AND YOG VIDYA. MEDITATION IS VERY MUCH ESSENTIAL FOR OUR SPIRITUAL AWAKENING AND UPLIFTING OF OUR SOUL. USUALLY, IT IS BELIEVED THAT MEDITATION IS THE WAY OF PENANCE WHILE REACHING THE ALMIGHTY AND HOW TRUE IT IS! NOW PEOPLE ARE NOTICING THAT MEDITATION IS BENEFICIAL IN ALL POSSIBLE WAYS, IT BENEFITS, MENTALLY, PHYSICALLY AND MATERIALISTICALLY TOO. THIS HAS BEEN PROVED SCIENTIFICALLY. THERE ARE VARIOUS WAYS OF MEDITATION. THIS BOOK ELABORATES SOME OF THE WAYS AND ALSO GUIDES US ABOUT HOW TO MEDITATE IN HOUSE. WHATEVER THE PURPOSE AND THE WAY OF THE MEDITATION IS, IT ALWAYS WILL BE BENEFICIAL AND WILL PURIFY YOUR MIND AND SOUL. IT WILL RAISE YOU PHYSICALLY, MENTALLY AND SPIRITUALLY TOO. WHAT YOU NEED ON THIS PATH IS JUST ONE THING, PERSEVERANCE. IF YOU HAVE IT, THEN YOU WILL SURELY SUCCEED.
ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्यााQत्मक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे, असं आपण सर्वसाधारणपणे समजतो. ते खरंही आहे. त्याचबरोबर ध्यानानं अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात, यशाQस्वतेच्या वाटचालीत ध्यानाची मदत होते असंही आता लक्षात आलं आहे. वैज्ञानिक कसोट्यांवर हे लाभ सिद्ध होऊ लागले आहेत. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. ध्यान कोणत्याही हेतूनं आणि कोणत्याही पद्धतीनं केलं तरी आपोआपच चित्तशुद्धी होत जाते. शारीरिक, मानसिक लाभापलीकडची आध्यात्मिक उन्नतीही होत जाते. आवश्यक असते ती फक्त चिकाटी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #SHUBHADAGOGATE #शुभदागोगटे #निरामययशासाठीध्यान #NIRAMAY YASHASATHI DHYAN
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मन:शांती, आरोग्य, यश, चित्तशुद्धी आणि आध्यात्मिक साधना- यासाठी हवी ध्यानधारणा... आजच्या धावपळीच्या जीवनात आपले स्वास्थ्य आणि मन:शांती टिकवून धरणे अवघड होत चालले आहे. दैनंदिन ताणतणावांमुळे वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा म्हणू ध्यान, मेडिटेशन, विपश्यना, प्राणायाम, योगासने, नामजप वगैरेंचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी शिबिरे घेण्यात येतात. वेगवेगळ्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार केला जातो. आपण कोणत्या ध्यानपद्धतीचा अवलंब करावा असाही प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी शुभदा गोगटे यांचे ‘निरामय यशासाठी ध्यान’ हे छोटे पुस्तक काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरेल. स्वत: शुभदा गोगटे गेली काही वर्षे ध्यानधारणा करीत आहेत आणि त्यामुळे मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपली तंदुरुस्ती टिकून राहिली आहे असे वाटते. ध्यानामुळे बरे वाटते. मन शांत राहते. आरोग्य व यश यासाठी मन शांत आणि तणावरहित असावं लागतं. आणि त्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो असा त्यांचा अनुभव आहे. ध्यानधारणेत आपण फार मोठी मजल मारलेली आहे किंवा कुंडलिनी जागृती वगैरे अवस्था गाठलेली आहे असा त्यांचा दावा नाही. एक साधक म्हणूनच ध्यानाबद्दल सर्वसामान्य वाचकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रथम ध्यान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मेडिटेशन व ध्यान हे शब्द त्या समानार्थी वापरतात. ध्यान, चिंतन, मनन, या सर्वांचा त्यात अंतर्भाव होतो. ध्यानामुळे मन शांत होते, चित्त समतोल व स्थिर राहते, रक्तदाब वगैरे व्याधी काबूत राहतात, त्याशिवाय अन्य काही आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभवही येऊ शकतात. पण त्याकडे अनुषंगिक फायदा म्हणून त्या पाहतात. ध्यानाने मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर जास्त आहे. त्यांचा भर ध्यानाने आपली एकाग्रता वाढते, स्मृती सुधारते, चिकाटी वाढते, चित्ताची समधातता साधते, मेंदूतील विद्युत तरंगांची गती संतुलित राहून मन शांत व सजग राहते. हिंदू धर्मात ध्यानधारणेला महत्त्व आहे. चित्तवृत्तिनिरोध साधणे म्हणजे योग; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे असल्याचे महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात सांगितले आहे. गौतम बुद्ध यांना ध्यानातून ज्ञानप्राप्ती झाली व ‘बौद्धत्व’ लाभले. फालुन गाँग (धर्मचक्राचं पालन करण्यासाठी ध्यान), झेन बुद्धिझम, विपश्यना असे वेगवेगळे ध्यान प्रकार बौद्धधर्मात आढळतात. जैन धर्मातही सामायिक ध्यान पद्धतीला महत्त्व आहे. महर्षी महेश योगी यांनी ट्रॅन्सेंडेंटल मेडिटेशन (टीएम) भावातीत ध्यान या पध्दतीचा पुरस्कार केला. गुरूने शिष्याला बीजमंत्र देणे व मनोमन वा मोठ्याने त्याचा उच्चार करीत मंत्राच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करणे हे याद्वारे रिलॅक्सेक्शन साधते आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक तणाव, जन्मव्याधी यांची तीव्रता कमी होते असे प्रयोगान्ती सिद्ध झाल्याचा त्यांचा दावा आहे. ओशो रजनीश हे ध्यान हाच धर्म मानतात. स्वर्षाप्रकाश ध्यान, विसावा ध्यान हे प्रकार त्यांनी प्रचलित केले, सिल्व्हर माइंड कंट्रोल पद्धत आणि कल्पनाचित्रण पद्धत या विशिष्ट हेतू मनात ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी वापरल्या जातात. डॉ. ऑर्निश हे हृदयरोग्यांसाठी कल्पनाचित्रण पद्धतीचा वापर करतात. ध्यानामुळे मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, निद्रानाश, तोतरेपणा, डोकेदुखी, व्यसनासक्ती यात घट होते. तर शांतपणा, आशावाद, उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन, स्वयंशिस्त, आत्मसन्मानाची भावना यात वाढ होते. ध्यान कुठे करावे, किती वेळ करावे, कसे करावे, ध्यान करताना कोणते आसन घालून बसावे, श्वासोच्छ्वासावर लक्ष कसे केंद्रित करावे, ध्वनी, अंत:प्रतिमा, मूर्ती वा प्रतिमा यावर लक्ष केंद्रित केल्यास काय होते, शरीरांतर्गत षट्चक्रे कोणती, ध्यानाने त्यांच्यातील सुप्त शक्तीला जाग कशी येऊ शकते वगैरे शंकांचेही समाधान पुस्तकात करण्यात आले आहे. ध्यानधारणेच्या प्रसारासाठी आज अनेक संस्था जागतिक पातळीवर कार्यरत असून त्यांचा व्याप प्रचंड वाढलेला आहे. रुग्णालयांमध्येही इतर औषधांबरोबर ध्यानधारणेचाही उपचार आता मान्यता मिळवत आहे. हे पुस्तक ध्यानधारणेची सर्व अंगे वाचकांना स्पष्ट दाखवणारे असल्याने उपयुक्त ठरेल. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-09-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता लाभणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येकजण अस्वस्थतेने पछाडलेले आहे. अशा कंटाळलेल्या परिस्थितीत दोन चार का होईना शांततेचे, आनंदाचे क्षण अनुभवावे असे प्रत्येकालाच वाटते. हे शांततेचे क्षण अनुभवण्याचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. धयानधारणा ही काळाची गरज बनली आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवायचे असेल तर ध्यानधारणा महत्त्वाची आहे. ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे. ‘निरामय यशासाठी ध्यान’ हे शुभदा गोगटे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शहरी जीवनात माणसाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांची मांडणी उदाहरण देऊन स्पष्ट केली आहे. सध्या समाजात दिसणारं एकूण ‘लढा किंवा पळा’ ही यंत्रणा शरीरात कशी कार्यरत होते याबद्दल लेखिकेले सांगितले आहे. हार्मोन्सच्या वाढत्या पातळीमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची जंत्री लेखिकेने दिली आहे. दैनंदिन जीवनात ताणतणाव वाढले आहेत. मात्र ते कमी करणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी ध्यान ही गुरूकिल्ली आहे असे लेखिका म्हणते. नियमितपणे रोज व्यायाम करणं किंवा एखादा खेळ खेळणं याने निश्चितपणे शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात. मनावरचे ताण कमी व्हायला त्यामुळे मदत होते. म्हणूनच सर्वांनी रोज व्यायाम करावा किंवा एखादा खेळ खेळावा हे उत्तम असा सल्ला शुभदा गोगटे यांनी दिला आहे. ध्यानामुळे लक्ष केंद्रित करणे आणि ते एका ठिकाणी अधिक काळ स्थिर ठेवणं यात सुधारणा होते, सततची जुनाट दुखणी हाताळण्यासाठी ध्यानाची मदत होते असे आढळून आले आहे. विविध ध्यानपद्धतीचा उल्लेख करताना नियम आसनं यांचा उल्लेख केला आहे. धारणेबद्दलही लेखिकेने माहिती दिली आहे. त्यामध्ये समाधी, बौद्ध ध्यान, झेन ध्यान, फालुन गाँग, विपध्यना, जैन ध्यान यांची माहिती दिली आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे. काही आधुनिक ध्यानपद्धती आणि पुरस्कर्ते ओशो रजनीश, स्वर्णप्रकाश ध्यान, विसावा ध्यान यांचा उल्लेख लेखिकेने केला आहे. ध्यान करायचं म्हटलं की ते कसं करावं, केव्हा करावं, कशासाठी करावं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतील; परंतु त्यांचीही उत्तरे देवून वाचकाचं समाधान केलं आहे. काळानुरूप बदलताना आपण स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, जप करणं यासारख्या गोष्टी विसरलो. परंतु या गोष्टी मन:शांतीसाठी महत्त्वाच्या आहेत असे लेखिका सांगते. मन:शांती, आरोग्य, त्यातून यश, चित्तशुद्धी, अध्यात्माची ओढ या सगळ्या गोष्टी एका ध्यानामुळे टप्प्या टप्प्यानं साधू शकतात. दुखणं कमी व्हावं किंवा नोकरी-धंद्यात यश मिळावं इतक्या साध्या सांसारिक हेतूनं आपण ध्यान करत राहिलो तरी त्यातूनच त्या पलीकडचं बरंच काही मिळत जातं, जाणवत जातं आणि ध्यान आनंददायी होतं असं लेखिका सांगते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 22-09-2002

    शहरातील स्पर्धेच्या वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीरमनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डायबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी ही समजूत काही वर्षापूर्वीपर्यंत होती. पण ‘मोडेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान ही पर्यांयी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ध्यान म्हटलं की पद्मासन घालून आणि डोळे मिटून बसलेल्या जटाधारी साधूची मूर्ती आपल्या मन:चक्षूंसमोर उभी राहते. ध्यान-धारणा या गोष्टी आध्यात्मिक विकासासाठी करायच्या असतात. आपली सांसारिक कर्तव्ये नीटपणे पार पाडल्यावर मग उतरत्या वयात या गोष्टींकडे लक्ष देत येतं, तोपर्यंत त्यासाठी वेळच नसतो आणि ध्यान करण्याची गरजही नसते अशी आपली समजूत असते. पण, ध्यान हे सर्वसामान्य व्यक्तीनाही लाभदायक असतं हे अनेक प्रयोगांनी दिसून आलेलं आहे. नियमित ध्यानामुळे मानसिक ताण, रक्तदाब, निद्रानाश अशी दुखणी कमी होतात. मन शांत होतं. आशावाद, आत्मविश्वास या गोष्टी वाढीस लागतात. स्वस्थ शरीर आणि शांत मन यांमुळे कार्यक्षमता वाढते, यश सहजसाध्य होतं. आपलं ध्येय कुठलंही असलं तरी ते प्राव्त करून घेण्यासाठी ध्यानाची मदत होते. ध्यानाचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आणि अनेक गुरू आहेत. त्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिलेली आहे. आपल्या धकाधकीच्या आणि व्यस्त अशा दिनक्रमातून थोडासा वेळ काढून ध्यान कसं करावं हेही सांगितलेलं आहे. ध्यानासाठी योग्य अशी जागा, वेळ, आसन यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. निरामय यशासाठी ध्यान शहरातील स्पर्धेच्या, वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीर-मनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डाबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपरांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी. ही समजूत काही वर्षांपूर्वीपर्यंत होती. पण ‘मेडिटेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान हे ही पर्यायी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. ध्यानाची शिबिरे आता फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकही घेण्यात येऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे. ताणतणावमुक्तीसाठी ध्यानधारणेचे महत्त्व ‘ध्यान-मेडिटेशन’ हा आजच्या काळातील सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. गावोगाव ठिकठिकाणी ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या विषयाची ज्यांना जिज्ञासा किंवा उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी सुबोध विवेचन करून या छोट्याशा पुस्तिकेत एकूण पाच प्रकरणात हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या प्रकरणात ‘ध्यान’ की ‘मेडिटेशन’ याची चर्चा केली आहे. ‘ध्यान आणि मेडिटेशन हे शब्द बरेचसे समानार्थी आहेत; पण खरे म्हणजे मेडिटेशन’ या शब्दाला प्रतिशब्द धारणा हा होईल. एखाद्या वस्तूच्या किंवा विषयाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. अशी धारणा नित्यनियमाने करीत गेलो, तर त्यातून ध्यान साधते,’’ असे लेखिकेने म्हटले असले तरी पुढे म्हटले आहे की ‘मेडिटेशन’ या शब्दाला ‘ध्यान’ हा प्रतिशब्द हल्ली सर्रास वारला जातो. त्यामुळे या पुस्तकातही हे दोन शब्द समानार्थी वापरले आहेत. ध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक द्वार आहे. ध्यान हे केवळ आध्यात्मिक पातळीवर न राहता त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, असे अनेकजण म्हणतात. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. भगवान रजनीश, महर्षीमहेश योगी, रविशंकरमहाराज आणि आसारामजीमहाराज आणि साधू संतांनीही आपल्या उपदेशात ध्यानाचे स्थान श्रेष्ठ मानले आहे. स्वामी विवेकानंदापासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. ध्यान करण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख करून त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं ते या पुस्तकात सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग्याची सुखावस्था ज्या साधनाने प्राप्त होते ते म्हणजे ध्यान होय. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासंबंधीचे जे विवेचन ज्ञानेश्वरांनी केले आहे ते म्हणजे ध्यानाचे तत्त्वज्ञानच होय. गुळवणीमहाराजांच्या चरित्रात ते साधना करीत असताना कुंडलिनी जागृतीच्या विविध अवस्थेत भ्रामरी व जमीन सोडून वर उचलले जाणे, असे वेगवेगळे अनुभव त्यांना येत असतं. आणि निर्विकल्प समाधीही लागत असे, असे लिहिलेले आहे. आध्यात्मिक कामासाठीच नव्हे, तर ऐहिक जीवनात यशस्वी झालेल्या अनेक थोर पुरुषांच्या जीवनात ध्यानाला महत्त्व लाभले आहे. उद्योगपती, कारखानदार, राजकारणी, अशा थोरांची आत्मचरित्रे वाचली म्हणजे ध्यानाचे त्यांनी किती महत्त्व मानले आहे हे लक्षात येते. जीवनाच्या वाटचालीत यशासाठी ध्यानाची मदत होते. ध्यान हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. वैज्ञानिक कसोट्यांवरसुद्धा हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच तर मानसिक ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी ध्यानाचा पुरस्कार केला जातो. महाराष्ट्र सरकारने पोलिस अधिकाऱ्यांसाठी ध्यान आवश्यक मानून मुंबईमध्ये तयासाठी खास सोय-सवलत उपलब्ध केली आहे. या पुस्तकात शरीरातील आज्ञाचक्र, आज्ञाहातचक्र, मूलाधारचक्र यांचे स्थान दर्शविणारा वेगवेगळ्या मूर्ती आणि चिन्हे (लक्ष केंद्रित करण्यासाठी) तसेच पद् मासन सिद्धासन, इ. आसने इ. ची चित्रे दिली आहेत. ध्यान केव्हा, कसं करावं, यांच्या तपशीलवार सूचना दिल्या आहेत. अशा तर्हेने सध्याच्या ताण-तणावापासून मुक्त राहण्यासाठी म्हणजेच निरामय यशासाठी ध्यानाचे सुबोध विवेचन करणारे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more