* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIJDHAM
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667400
  • Edition : 8
  • Publishing Year : SEPTEMBER 1972
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A CALL FROM THE FINAL ADOBE, `NIJDHAM`; ALL THESE SHORT MYSTIC STORIES HAVE CREATED A NEW WAY IN THE HISTORY OF MARATHI LITERATURE. THEY HAVE SUCCEEDED IN HAVING A UNIQUE PLACE WITH THEIR ENIGMATIC ENVIRONMENTS, UNFATHOMABLE SURROUNDINGS, THE EXCLUSIVE DESCRIPTIONS AND A VERY UNCANNY END. MANY OF THE STORIES WERE PRESENTED ON THE STAGE, SOME WERE PICTURIZED AS SERIALS, AND SOME WERE TRANSLATED. FOR TWO GENERATIONS, THEY HAVE EMPOWERED ALL MINDS YOUNG AND OLD. ANY READER WHO HAS READ THEM ONCE WILL NEVER FORGET THOSE YEARS LATER. ON THE CONTRARY, THEY ARE ALIVE IN HIS MINDS AND HE SHARES THEM WITH PEOPLE AROUND. THIS COLLECTION IS EXCLUSIVELY FOR THOSE READERS WHO LOVE CRYPTIC THEMES, FOR THE THREE GENERATIONS, YESTERDAY`S, TODAY`S AND TOMORROW`S.
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarVaishnavi Vaidya

    मी स्वत: अत्यंत घाबरट आहे. अंधार, एकटं राहणे, भुताच्या गोष्टी याच्या पासून मी लाहनपणापासूनच चार हात लांब राहिले. आजही मित्र-मंडळी आणि भावंडांच्या गेट टूगेजर मध्ये ज्या क्षणी हाॅरर गप्पा चालू होतात त्या क्षणी मी गाढ झोपून जाते. माझं मला सुद्धा माझ्या िचित्र सवयीचं अनेकदा हसायला येतं पण शेवटी स्वभावधर्म. या सगळ्या पार्श्वभुमिवर प्रचंड बळ आणि हीम्मत एकवटून मतकरींचे पुस्तक वाचायचे एकदा ठरविले आणि ठाण्याच्या पुस्तक प्रदर्शनातून विकतही घेतले! या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, एक प्रकारचं वलय सभोवताली निर्माण होतं आणि आपल्याही नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे किंवा आपल्याच भोवती घडते असं जाणवून देणारा अदृश्य घटक आपल्याच कल्पनाशक्तितून निर्माण होतो. माणसाचे अंतर्मन फार चमत्कारीक असते. त्याचे गुढ आजतागायत कोणाला उलगडलेले नाही. तिथेच तर भिती, रहस्य या सगळ्याचे मुळ दडलेले असते. या पद्धतीच्या साहित्यात मतकरींनी अनन्य साधारण कार्य करून ठेवले आहे. `निजधाम` हा त्यांच्या काही विलक्षण गुढकथांचा संग्रह. सगळ्याच कथा थरकाप उडविणार्या आहेत. विशेष नमुद करावीशी वाटते ती `जेवणावळ` कथा! असं लिखाणं सुचणं हे केवळ महान आहे. प्रत्येक कथा वाचताना शरिरातले सारे इंद्रिय त्या शब्दांच्या ताब्यात असतात. सभोवेतलाच्या खर्या परिस्थितीचा विसर पडतो आणि या कथानकांची भुरळ पडते. भिती हा शब्द या कथांसाठी अतिशय शुल्लक वाटतो. एक महत्त्वाची गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे, आजच्या काळात भुत-प्रेत, पिशाच्छ इत्यादी गोष्टींवरून अनेक लोकांमध्ये असणारे समज, गैरसमज, विचार, मते.... ती ज्याने त्याने ठरवावी पण चांगल्या साहित्याला, साहित्य म्हणूनच पाहावे. मानवी जीवन आणि मन ह्यांच्यात अनेक गोष्टी तर्काच्या पलिकडे आहेत. त्याचा गाभा अजूनही शास्त्रज्ञ पूर्णपणे शोधू शकले नाहीत. या पुस्तकातले एक आवडते वाक्य- `भितीच्या विविध स्वरूपातून मानवी मनाच्या अथांग सागराचा शोध घेणे हेच गुढकथेचे ध्येय असते, मानवी मनाचा शोध हाच साहित्याचा परम उद्देश असतो!` ...Read more

  • Rating Starनितीन जोगळेकर

    श्री रत्नाकर मतकरी हे उत्तम नाट्यलेखक, कथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कथामध्ये गूढ, भीतीदायक असे खास काही असायचेच. १९७७ मध्ये आमच्या शालेय शिक्षकांनी वर्गात सांगितलेली जेवणावळ हि कथा कायमची लक्षात आहे. नंतर २०१७ मध्ये आमच्या ऑफिस लायब्ररी निजधाम या पुस्तकात हि कथा वाचायला मिळाली आणि प्रचंड आनंद झाला. त्यांच्या सर्व कथांमध्ये शेवटी एक जबरदस्त twist असायचा, ज्याची आधी पुसटशी कल्पनाही यायची नाही. वाचकांना खिळवून ठेवणारे हे असले विचार त्यांनाकुठून सुचायचे काय माहित. असा चतुरस्त्र लेखक पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. ...Read more

  • Rating Star Shilpa Datar

    रत्नाकर मतकरी हे माझे आवडते गूढकथा लेखक। कितीतरी दिवसांपासून जेवणावळ ही कथा असलेले त्यांचे पुस्तक शोधत होते, ते मिळाले। शाळेत असताना हे पुस्तक वाचले होते। माझी शेजारीच राहणारी मैत्रीण शलाका आणि राजश्री आम्ही या भयकथांवर चर्चा करत असू। सुदैवाने मला लहनपणी मैत्रिणीहि उत्तम वाचक मिळाल्या। त्यामुळं आम्ही भरपूर वाचलं, शालेय वयात पुस्तकांवर चर्चा केल्या। त्यावेळी आमच्यामध्ये जेवणावळ या कथेविषयी चर्चा झाली होती। वाचताना अंगावर सरसरून काटा येणारी कथा। आमची रात्री 12 वाजता ही कथा वाचण्याची तेव्हा पैजही लागली होती। नुकत्याच परत त्या कथा नव्यानं वाचल्या। नव्यानं त्यातले भय अनुभवलं। आणि एका बैठकीत हे पुस्तक वाचून संपवाल्याने आपली वाचनाची आवड तसूभरही कमी झाली नाही, हे जाणवलं। ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book