* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: NAVI STRI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177662160
 • Edition : 7
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 144
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
 • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO 111 BOOKS
Quantity
This novel is in a true sense "the complete apperception of a woman`. The author has left it incomplete, but it completes itself with the awakening of the mind so we should not consider it as incomplete. The author has written this novel in the year 1950. But even today it is most interesting and readable. Till the publication of this novel the novelist was known to be a weak creative literature writer, but the above said novel brought his strong side in front of the readers, he was revolutinary, pensive writer and had a very sensitive mindset and wanted to help women in their upliftment. The author always felt that the modern lady should know law, especially the section 144. It is true that she is going to get married even after being educated, but after and before marriage her mind should get moulded. The continuous process of moulding, that to of social moulding should take place in her life or is she going to remain a puppet in her husband`s hand even after education? Why does not the society recognise that like the male members of the society she also has a mind, a freedom? Why does not a man consider a woman as a friend? Why is a woman looked upon only and only as a woman? Aren`t these questions equally applicable to today`s woman too? Even in the 21st century?
‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणायांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही.
Keywords
#V#S#KHANDEKAR#NAVI#STRI #वि#स#खांडेकर#नवी#स्त्री
Customer Reviews
 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 07-04-2002

  स्त्री प्रबोधाची गीता... वि. स. खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या मध्यावर लिहिलेली ‘नवी स्त्री’ ही कादंबरी सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहे. १९५० साली वसंत मासिकातून प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही जुनीन वाटता आजच्या नव्या स्त्रीच्या समस्यांचे भावविश्वाचे चित्रण उभे करते. नव्या स्त्रीने कायदा जाणायला हवा, शिकून तिचा विवाह होणारच पण तिने सामाजिक मन घडवायला हवे, तिचं मन मुला-पुरुषांप्रमाणे स्वतंत्र हवे, पुरुषाने तिला मैत्रीण मानायला हवे असे विषय या कादंबरीतून पुढे आले आहेत. खांडेकर हे दुबळे ललित लेखक नव्हते तर क्रांतीदर्शी विचारांचे लेखक होते हे उमजून देणारी ही कादंबरी आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 06-09-2001

  ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना जाऊन यंदा पंचवीस वर्षे पूर्ण झाली. खांडेकरांची असंकलित स्वरूपातील ‘नवी स्त्री’ ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे कोल्हापुरात नुकतीच प्रकाशित झाली. सुमारे तीन हजार छापील पृष्ठे होतील एवढे खांडेकरांचे साहित्य द्याप असंकलित होते. ते सारे यंदाच्या त्यांच्या रजत स्मृती वर्षात प्रसिद्ध करण्याचा संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा, तसेच खांडेकर कुटुंबीयांचा आणि प्रकाशकांचा संकल्प आहे. खांडेकरांसारख्या द्रष्ट्या, प्रज्ञावंत साहित्यिकाने पन्नास वर्षांपूर्वी ‘नव्या स्त्री’ संबंधी काय म्हटले होते, ही आधुनिक शिक्षित स्त्री खऱ्या अर्थाने सबला व्हावी यासाठी त्यांनी कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यांचे दर्शन या कादंबरीत घडते; आणि आजची स्थिती पाहता, त्याच अपेक्षा आजही कायम असल्याचेच चित्र दिसते. अर्धशतकाचा मोठा टप्पा ओलांडून पुढे आल्यावरही स्त्रियांच्या सामाजिक व्यावहारिक जडणघडणीत स्थूलमानाने फारसा फरक पडलेला नाही, हे म्हणूनच खूप चिंताजनक वाटते. खांडेकरांना केवळ आधुनिक व सुशिक्षित नवी स्त्री अभिप्रेत नव्हती, तर आधुनिकतेच्या जडणघडणीत तिचे माणूस म्हणून संस्कारीकरण कसे होईल. याचा त्यांना ध्यास होता. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी वळून किंवा हात उगारून स्त्रीला पेलता येणार नाही; तर सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची आणि अंगाखांद्यावर नवीन जबाबदाऱ्या पेलणारी असावी, असे खांडेकरांना वाटत होते. नव्या स्त्रीला कायद्यापासून इतर अनेक गोष्टींची चांगली जाण आणि माहिती असली पाहिजे, असा खांडेकरांचा आग्रह होता. तत्कालीन परिस्थितीत मांडलेले हे विचार लक्षात घेतले, तर खांडेकरांची ही कादंबरी म्हणजे स्त्री प्रबोध गीता ठरते. कालचक्र वेगाने फिरते आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया नवनवी क्षितिजे जिंकत आहेत. स्पर्धापरीक्षांपासून उद्योग-व्यवसाय, संशोधन अशा अनेकविध ठिकाणी त्यांचे उच्चस्थान दिसतेही आहे; परंतु तेवढ्यावरूनही खांडेकरांच्या मनातील ‘नव्या स्त्री’ची कल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होतो; पण सबळ, ज्ञानी, व्यवहारी होतोच असे सांगता येत नाही. महिलांच्या निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे असे आकडेवारीने सिद्ध करता आले तरी त्या व्यवहारी झाल्या, असे मानता येणार नाही. आपली एकूण सामाजिक रचना पाहता, स्त्रीला आपण पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे दिसत नाही. स्त्रीला कायदा ठाऊक झाला, त्यातून तिच्या हक्कांच्या कर्तव्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, तर ती श्रेष्ठ ठरेल, या भीतीपोटी तसे प्रयत्नही फार कोणी करीत नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली असली, तरी आजही किती तरी स्त्रिया निरक्षरतेच्या अंधकारात चाचपडत आहेत. स्त्रियांच्या विकासाचे हे प्रयत्न पाहिले, तर आजचे चित्र खूप उज्ज्वल व्हावयास हवे होते असे वाटते; पण तसे घडले नाही. स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य आजही काही शृंखलांनी जखडलेलेच आहे. माणूस म्हणून स्त्रीचा जगण्याचा अधिकार तिला पूर्णपणे लाभला आहे, असे म्हणता येणार नाही, अशी स्थिती आहे. जळगाव-साताऱ्यातील घटना, कोठेवाडीसारखी प्रकरणे, कौटुंबिक छळातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या, अनेक ठिकाणी त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ही उदाहरणेच स्त्रीचे समाजातल चित्र स्पष्ट करणारी आहेत. स्त्रीला सबल बनविणारे, तिला पायावर उभे करणारे, तिला हक्कांची जाणीव देणारे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा परिणामही कोठे कोठे जाणवतो आहे; परंतु तेवढ्यावर समाधान मानावे आणि आपण प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे समाधान करून घ्यावे, अशी स्थिती नाही. खांडेकरांना अभिप्रेत असलेली ‘नवी स्त्री’ अर्धशतकानंतरही आज दिसत नाही. हे चित्र झपाट्याने बदलण्यासाठी, स्त्री-पुरुष या उभयतांच्या मानसिकतेतही बदलाची गरज आहे. हा बदलही अत्यंत प्रामाणिक हवा. दिखाऊपणा वेगळा आणि वस्तुस्थिती वेगळी. खांडेकरांची आजवर दडून राहिलेली ‘नवी स्त्री’ यंदाच्या ‘महिला सबलीकरण वर्षा’त अवतरणे, हा खरोखरच योगायोग आहे. आपण तो जाणून घेण्याची गरज आहे. -मल्हार अरणकल्ले ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

  ‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा. १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मनघडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां-पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. ...Read more

 • Rating StarSAKAL 10-02-2002

  खांडेकराची ‘नवी स्त्री’… वि. स. खांडेकर यांच्या ‘नवी स्त्री’ या कादंबरीचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे. ही कादंबरी १९५० च्या दरम्यान ‘वसंत’ मासिकात क्रमश: प्रसिद्ध झाली होती. २००१ हे ‘महिला सबलीकरण’ वर्षाचे निमित्त साधून मेहता प्रकाशनान ही कादंबरी नव्याने प्रकाशित केली आहे. वि. स. खांडेकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांचे खूप लेखन असंकलित आहे. हे ध्यानात आल्यानंतर सुनीलकुमार लवटे यांनी हे ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे निश्चित केले. प्रस्तुत ‘नवी स्त्री’ ही कादंबरी या योजनेचा एक भाग आहे. खांडेकरांना अभिप्रेत असलेली नवी स्त्री केवळ आधुनिक व सुशिक्षित नको होती. नव्या स्त्रीचे संस्कारीकरण, आधुनिकतेच्या जडणघडणीत माणूस म्हणून कसे होईल, याचा त्यांना ध्ययास लागलो असायचा. ‘नवी स्त्री’ कादंबरी-लेखनात ही तळमळ पानोपानी स्पष्ट होते. नव्या युगाचे, बदलाचे आव्हान केवळ मुठी आवळून नि हात उगारून स्त्रीस पेलता येणार नाही. सामाजिक संघर्षात तिची भूमिका सामंजस्याची, अंगाखांद्यावर नवनवीन दायित्व पेलणारी, जबाबदार समाजधुरीण म्हणून खांडेकरांना अभिप्रेत होती.’ ही लवटे यांनी प्रकट केलेली भूमिका प्रस्तुत कादंबरीतून कितपत दिसते ते पाहू. या कादंबरीची नायिका ललिता खेड्यातून पुण्यात जाऊन वसतिगृहात राहून बी. ए. होते. तेथे सुवर्णपदक मिळवते. समाजवादी विचाराचा मित्र दिवाकराशी मैत्री करते, त्याचयाविषयी जवळीक वाटत असूनही केवळ मैत्री करते. काकासाहेब या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी कमलाकरबरोबर पंधरा दिवस गाडीतून फिरते, त्याच्याशी लग्न करावे असा विचारही तिच्या मनात येतो. त्याच वेळी तिचा मित्र दिवाकर तिला भेटतो आणि कमलाकरशी लग्न झाल्यावर ‘कारखाना कामगारांच्या स्वाधीन करण्याची अट तू काकासाहेबांना घाल’ असे सांगतो आणि तसेच वचन ती दिवाकरला देते. येथे कादंबरी संपते. खांडेकरांच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये जसे ध्येयवादी, कर्तव्यनिष्ठ पात्रे असतात, त्याचप्रमाणे याही कादंबरीत ललिता, ललिताचे वडील तात्या, दिवाकर आदी पात्रे आहेत. ललिता ध्येयवादी आहे. हे ललिताचे चित्रण नव्या आधुनिक विचाराच्या स्त्रीचे नाही असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण १९५० चा काळ ध्यानात घेतला तर तसे वाटणार नाही. यासंदर्भात डॉ. सुनीलकुमार लवटे प्रस्तावनेत लिहितात ‘नवी स्त्री’ची नायिका ललिता, तिचे वडील तात्यासाहेब, मित्र दिवाकर, समाजवादी समाजरचना यावी म्हणून काया, वाचा, मने धडपडतात. दुसरीकडे मगनभाई, काकासाहेब नि कमलाकर भांडवलशाही रचनेची मुळं आणखी खोल रुतवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ललिता नव्या स्त्रीचा प्रतिनिधी बनून व्यक्तिगत स्वार्थीपेक्षा समाजहित श्रेष्ठ मानून सर्वस्व त्यागास तयार होते. प्रा. लवटे यांना भाऊसाहेब खांडेकरांविषयी नितांत आदर असल्याने ललिता ही आधुनिक नव्या स्त्रीची प्रतिनिधी वाटते. आज स्त्री अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहत आहे. तिला ‘स्व’ची जाणीव झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रस्तुत कादंबरीतील नायिका ललिता निश्चितच नवी वाटत नाही. खांडेकरांच्या अन्य कादंबरीत जशी ‘टिपिकल’ पात्रे आढळतात, तशी पात्रे या कादंबरीतही आहेत. ललिताचे वडील तात्या, दिवाकर, स्वत: ललिता ही पात्रे ध्येयवादी आहेत, निष्ठावान आहेत. मगनभाई, काकासाहेब, कमलाकर ही पात्रे भांडवलदारी वृत्तीची आहेत. अन्य कादंबरीतील पात्रांप्रमाणे याही कादंबरीत रोमँटिक वृत्तीची पात्रे आहेत; पण असे असूनही ही कादंबरी वाचायला हवी. कारण ही कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. भाऊसाहेब खांडेकर जसे कादंबरीकार होते, तसे ते कथाकार, लघुनिबंधकार, रूपककथाकर आणि उत्तम समीक्षक होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना खूप लेखन असंकलित असूनही खांडेकरांनी ते प्रकाशित का होऊ दिले नसावे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कोणतेही असले तरी भाऊसाहेब खांडेकर मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. त्यांचे सर्व लेखन जपून ठेवायला हवे. आणि ते काम प्रा. लवटे करीत आहे. त्या कामाचा प्रारंभ त्यांनी ‘नवी स्त्री’ या कादंबरीच्या संपादनापासून केला आहे. पुढील कामाची मोठी तयारीही त्यांनी केली आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. उल्का, सुलभा, देवयांनी, र्शिमष्ठा, नंदा, वसू या नायिका ज्यांनी वाचल्या असतील, त्यांनी ललिता समजून घेण्यासाठी ‘नवी स्त्री’ ही कादंबरी वाचायला हवी. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

MAZE TALIBANI DIWAS
MAZE TALIBANI DIWAS by ABDUL SALAM ZAEEF Rating Star
DAINIK LOKSATTA (LOKRANG) 20-01-2019

तालिबानचे अंतरंग... अफगाणिस्तान हा भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा देश. असंख्य समस्यांनी ग्रासलेला. राजेशाहीपासून साम्यवादी एकाधिकारशाहीपर्यंत सर्व प्रकारच्या राजवटींचे दशावतार पाहिलेला. या ना त्या कारणाने गेली तीन ते चार दशके सतत आंतरराष्ट्रीय स्तरार चर्चेत राहिलेला. अशा या देशातून सोव्हिएत आक्रमक फौजेला परतवून लावण्याच्या इराद्याने उभी राहिलेली कट्टर मुजाहिदीनांची संघटना- ‘तालिबान’! इस्लाममधील ‘जिहाद’च्या संकल्पनेची झिंग चढलेल्या या फौजेला अमेरिकेने पोसले नसते तरच नवल मानावे लागले असते. रशियन कैद्यांच्या शरीराची सालडी ते जिवंत असताना सोलणाऱ्या आणि त्या सैनिकांच्या आक्रोशात आसुरी आनंद मानणाऱ्या या तालिबान्यांना एके काळी अमेरिकेने गौरवलेदेखील. तथापि, एकदा सोव्हिएत फौजा माघारी परतल्यानंतर या मुजाहिदीनांना जाणीव झाली ती अमेरिका तिच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानात करत असलेल्या घुसखोरीची. मग ते अमेरिकेच्या साम्राज्यवादाविरुद्धही त्याच त्वेषाने लढू लागले. अमेरिकेने लष्कर पाठवून आणि आपल्या मर्जीनुसार राज्य चालवायला तयार असणाऱ्या नेत्यांना सत्तास्थानांवर बसवून तालिबानचे आव्हान मोडून काढायचा बरीच वर्षे प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. त्या देशातून बाहेर कसे पडायचे, हा अमेरिकी प्रशासनाला भेडसावणारा एक मुख्य प्रश्न आहे. अफगाणिस्तानच्या ७० टक्के प्रदेशावर तालिबानची हुकमत तरी आहे किंवा धोक्याचे सावट तरी आहे. अशी ही संघटना, तिची ध्येयधोरणे, तिची अंतर्गत रचना आणि सत्तासंघर्षांबद्दल आपल्याला पुरेशी माहितीच नसते. विशेषत: पाकिस्तानबरोबर या संघटनेचे नेमके संबंध कसे आहेत, याबद्दल भले भले राजकीय नेतेही अंधारात चाचपडताना दिसतात. त्या दृष्टीने अब्दुल सलाम झैफ या तालिबानी राजनैतिक अधिकाऱ्याचे आत्मकथन- ‘माझे तालिबानी दिवस!’ हे अनुवादित स्वरूपात का होईना, मराठी वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. ‘माय लाइफ विथ द तालिबान’ हे मूळ इंग्रजी पुस्तक २०१० सालीच प्रसिद्ध झाले होते आणि चर्चेतही होते. पुस्तकाच्या प्रारंभीच झैफची अवघ्या सात ओळींची, परंतु ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ या दोन मूल्यांच्या व्यावहारिक आविष्कारातील प्रचंड अंतर्विरोधांवर अत्यंत तीव्र, बोचरी टीका करणारी कविता वाचायला मिळते. ग्वान्टानामो तुरुंगात असताना झैफने लिहिलेल्या या कवितेचा प्रमोद जोगळेकरांनी केलेला उत्कृष्ट भावानुवाद झैफबद्दल आस्था निर्माण करतो. पुढे मूळ पुस्तकाच्या संपादकांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचयपर लेख आहे. त्यात झैफचे कंदहार शहराशी, त्या शहराचे अफगाण इतिहासाशी, त्या शहरात जन्मलेल्या तालिबान चळवळीच्या मूळच्या व नंतर बदलत गेलेल्या स्वरूपाचे त्या अभागी देशातल्या रक्तरंजित संघर्षांशी असणारे जवळचे नाते उलगडून सांगितले आहे. त्यापाठोपाठ असलेली पुस्तकातील पात्रांची यादी वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यानंतर न्यू यॉर्क विद्यापीठातील ‘आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्रा’तील एक तज्ज्ञ बार्नेट रुबिन यांची प्रस्तावना थोडक्यात झैफच्या या आत्मकथनाचे महत्त्व स्पष्ट करते. पाठोपाठ वाचायला मिळते खुद्द झैफची भूमिका. या नऊ पानी निवेदनात ज्या चार कारणांसाठी तो हे आत्मकथन लिहायला तयार झाला, त्या कारणांचे स्पष्टीकरण मिळते. यापुढील मुख्य पुस्तकाच्या २२ प्रकरणांमध्ये झैफने अफगाणिस्तानातील संघर्षांचे असंख्य कंगोरे उलगडून दाखवले आहेत. त्या निवेदनात त्याच्या वैयक्तिक जीवनाचे उभे-आडवे धागे असे विणले गेले आहेत, की हे पुस्तक एकाच वेळी दोन स्तरांवरील घटनाचक्राचे बहुमिती चित्रण करते आहे असे आपल्याला जाणवते. आपण त्यात अधिकाधिक गुंतत जातो. असंख्य प्रसंगांतले थरारनाटय़ पोहचवण्यात अनुवादक चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रत्येक पानावरील मजकुराशी संबंधित संपादकीय टिपा त्याच पानावर तळटिपांच्या स्वरूपात वाचायला मिळत असल्यानेही वाचकांची बरीच सोय झाली आहे. अफगाणिस्तानच्या भू-सामरिक महत्त्वामुळे गेली कित्येक दशके तो देश बडय़ा देशांच्या सत्तासंघर्षांत तर पिसला गेला आहेच; परंतु प्रत्येक सत्तांतरानंतर सत्ताधारी अफगाण नेत्यांच्या विरोधात काही अफगाण नेते उभे राहिलेच आहेत. या अंतर्गत यादवीमुळे त्या देशात निर्माण झालेली विदारक स्थिती पुस्तकभर एखाद्या पार्श्वभूमीप्रमाणे सतत आपल्याला जाणवत राहते. अफगाणिस्तानातील परस्पर विरोधी गटांपैकी कुणाला तरी हाताशी धरून आपापले राष्ट्रीय स्वार्थाचे घोडे पुढे दामटू पाहणारे अन्य देशांचे नेते झैफच्या संतापाचे लक्ष्य बनावेत यात नवल नाही. परंतु पाकिस्तानचे लष्करशाह जनरल मुशर्रफ यांच्याबद्दल झैफने या पुस्तकात लिहिले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. झैफ पाकिस्तानमध्ये तालिबानचा वकील म्हणून काम करत होता, तेव्हा त्याची मुशर्रफ यांच्याशी एकूण चार वेळा भेट झाली होती. त्या चारही भेटींचे अगदी थोडक्यात वर्णन करून झाल्यावर झैफने अवघ्या एका परिच्छेदात मुशर्रफ यांच्या हिडीस राजवटीबद्दल जी आगपाखड केली आहे, ती मुळातूनच वाचण्याजोगी आहे. ‘पाकिस्तान बीफोर एव्हरीथिंग’ या आत्मकथनपर पुस्तकात मुशर्रफ यांनी तालिबान्यांना व इतरही काही मुसलमानांना आपण कसे निर्दयपणाने वागवले, याची कबुली दिली होती. मुशर्रफ यांनी पैशाच्या मोबदल्यात अनेक अफगाण मुजाहिदीनांना अमेरिकेला विकले होते. ते लोक ग्वान्टानामोत खितपत पडले होते. त्या यमयातना भोगाव्या लागलेल्या अफगाणी कैद्यांमध्ये खुद्द अब्दुल झैफचाही समावेश होता आणि तब्बल चार वर्षांच्या तशा तुरुंगवासातून काही मित्रांच्या प्रयत्नांमुळे २००५ साली तो सुटला. हा संदर्भ लक्षात घेतला म्हणजे २०१० साली लिहिलेल्या या आत्मकथनात झैफने ‘मुशर्रफ म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाला लागलेला काळा डाग आहे’ असे म्हटल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. मुशर्रफना ‘इस्लामशी गद्दारी करणारा ढोंगी, क्रूर नेता’ असे म्हणणारा झैफ अमेरिकेवरील विध्वंसक हल्ल्याबद्दल चुकूनही पश्चात्ताप व्यक्त करत नाही, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. इस्लामचा नारा देत पुढे सरसावणारे सर्व जण एकाच झेंडय़ाखाली एकत्र उभे ठाकत नाहीत. त्या झुंडीत अनेक जण आपापले स्वतंत्र झेंडे मिरवत पुढे घुसण्याच्या प्रयत्नात असतात, हे वास्तव झैफच्या आत्मकथनामुळेही पुन्हा प्रकर्षांने पुढे येते. असे अनेक मुद्दे विचारासाठी समोर येत जातात आणि तालिबान हे प्रकरण कसे आणि का जगावेगळे आहे, हे हळूहळू समजू लागते. हे या आत्मकथनाचे यश आहे. -आनंद हर्डीकर ...Read more

VANSHVRUKSHA
VANSHVRUKSHA by S. L. Bhairappa Rating Star
Smita Pawar

Vachla ahe...nice book👌