MAHANAYAK : A NOVEL ON THE LIFE OF SUBHAS CHANDRA BOSE by Vishwas Patil

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Availability : Available
 • ISBN : 9789386454898
 • Edition : 4
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 784
 • Language : ENGLISH
 • Category : BIOGRAPHY
 • e-Book AMAZON
 • e-Book GOOGLE PLAY
Quantity
His struggle for independent India is portrayed in this Historical fiction. It is full of Netaji’s extreme loyalty, patriotism and unbound love for his country. When he had to live his own country then also he continued his freedom struggle. He approached various countries for help. He built INA. He stood fearlessly for the protection of his own country. He was loved by people all over the world. They joined him hand in hand. Women too did not lag behind. They came forward. Not just comforts and money, people sacrificed their lives and homes to achieve freedom. The first ever women battalion was formed under Netaji’s supervision and command. Though Netaji died before India could get freedom, we cannot ever repay the debt he and many others have put us into. A wonderfully portrayed novel, which will bring tears to our eyes. Subhas Chandra Bose will be remembered for ever and ever.
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. `चलो दिल्ली`ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या `रणवाटा`वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.
Keywords
1. Mahanayak, Netaji, Subhas Chandra Bose, Emilie, Janakinath and Prabhavati; Bibhavati, Basanti Devi and Deshbandhu’s sister Urmila Devi, Mejda, 2. Chalo Delli, Netaji Zindabad, Netaji humare hanste hanste jeena, Subhas-Azadi-Vatan-Jai Hind, Azad Hind Fauz, INA Government, Lal Qila, Anushilan Samiti, Ravenshaw Collegiate School, Presidency College in Philosophy, 3. Fourth in the ICS exam, Civil Disobedience Movement, Woodburn Park, Charles Tegart, Police Commissioner of Calcutta, Parallel Government, Azad Hind Sena, Captain Lakshmi, military hospital at Maymyo, 4. General Mutaguchi, Japanese Foreign Minister, Shigemitsu, Sato and Yanagida, Gen. Isoda of the Hikari Kikkan, Lt. Gen. Geoffrey Scoones, Field Marshal Terauchi, Capt. Mohammad Durrani, Maj. Gen. Zaman Kiani, Chief Pilot Lt. Col. Nonogaki, Col. Habib-ur-Rahman, Sergeant Major Aoyagi, Mutsuyama Airport, Taipei, Pilot Takizawa, 5. Tenchosetsu, Chindwin River in Kabaw Valley, River Irrawaddy, Baldwin, Burma, Myanmar, Singapore, Malaya, Japan, Imphal, Kuala Lumpur, Ipoh, Seremban, Mount Popa, 6. Taipei town, Nonmon Military hospital, Dr. T. Yoshimi.
Customer Reviews
 • Rating Starऑल अबाऊट बुक पब्लिशिंग,ऑग, सप्टेंबर 2018

  Vishwas Patil takes readers to accompany the soldiers of Indian National Army and the Imperial Japanese Army through their advances across Myanmar (the Burma), Imphal and Kohima; and to witness the grim battles and the unparalleled sacrifices that th patriots made at the altar of freedom. ...Read more

 • Rating StarGovind Joshi

  लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतुन साकारलेली, भारतीय स्वातंञ्य संग्रामातील सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी. नेतांजींच्या आयुष्याचा संपुर्ण अभ्यास करून... अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन...जागतीक ईतिहासाचा अभ्यास तेच, कोहीमा,इंफाळ,जपान,जर्मनी ई. देशात जाऊन नेताजींशी निगडीत प्रत्येक स्थळाला भेटी देऊन त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आपण पुस्तक वाचत असतानाच त्यांना हे पुस्तक लिहीन्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील याची प्रचीती येते. *नेताजी सुभाषचंद्र बोस* मात्रभुमीच्या स्वातंञ्यासाठी स्वत:च्या आयुष्याचं अग्नीकुंड करून त्यात स्वत:चीच समीध्या अर्पण करनारा हा महानायक.भारतीय स्वातंञ्य संग्रामात स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर ध्रुवासारख अढळ पद प्राप्त करनारा हा धुरंधर सेनानी.त्यांच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं ते म्हणजे या भारतमातेला पारतञ्याच्या श्रंखलातुन मुक्त करणे. या पुस्तकाच्या माध्यमातुन आपण जाणु शकतो की कीती विलक्षण प्रसंगानी आणी संघर्षाने भरलेलं आणी भारलेलं होतं नेताजींच जिवन. साध..सरळ..नीरागस बालपण, जानकीनाथ व प्रभावतीदेवी यांच्यासारखे मायाळु आई वडील, आयुष्यातील प्रत्येक स्थीतीला त्यांची साथ देणारे मेजदा म्हणजेच त्यांचे जेष्ठ बंधु शरदबाबु व विभावती भाभी, व त्यांचे गुरू चित्तरंजन दास ही त्यांची बालपणीची जीवाला जीव लावणारी माणसं. लहाणपना पासुनच स्वातंञ्य व स्वाभीमान या मुल्यांविषयी असणारा आदर...आई वडीलांचे संस्कार...स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव....गुरू चित्तरंजन दास यांचा लाभलेला सहवास...यातुन सुभाषबाबुंच्या जिवनाला आकार येत गेला. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर लंडनमधील ICS ही परीक्षा ते चौथ्या क्रमांकाने पास झाले होते. वडीलांच्या आग्रहास्तव त्यांनी ही परीक्षा दीली होती. त्यांच ध्येय ते नव्हतचं.जर त्यांनी ठरवलं असतं तर खुप आरामाच आणी सुखाच आयुष्य ते जगु शकले असते. पण त्यानी व्रत घेतलं होतं ते या भारतमातेला मुक्त करण्याचं...या देशातील अडतीस कोटी बांधवांना गुलामगीरीतुन मुक्त करण्याचं..त्यासाठी त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला व संघर्षाचा मार्ग पत्करला. त्यानंतर त्यांच भारतात परत येणं, काँग्रेस मध्ये प्रवेश...नेहरूंशी जमलेली मैञी..पुढं या मैञीचं काय होतं...गांधीजी–सुभाषबाबु संघर्ष (दोघांच लक्ष जरी एक असलं तरी त्यानंतर वाटा वेगळ्या झाल्या)...त्याआधी त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भुषविलं होतं त्यांची ती कारकिर्द हे सर्व तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. दुसर्या महायुद्धाचं औचीत्य साधुन शञुचा शञु तो आपला मिञ या नात्यानं रशिया, जर्मनी, ईटली, जपान अशा संपुर्ण जगाची मारलेली गरूडभरारी...हीटलर, मुसोलीनी, जनरल तोजो अशा हुकुमशहांच्या घेतलेल्या प्रत्यक्ष भेटी....त्याचदरम्यान एमीली आणी सुभाषबाबु यांचा प्रेम विवाह...रास बीहारी बोस यांच्यासोबत केलेली आझाद हिंद फौजेची स्थापना...रेडीयो वरील त्यांची ऊत्स्फुर्त व प्रेरक भाषणं....चलो दिल्ली चा नारा....जय हिंद हे अभिवादन...त्याचबरोबर तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा ही ललकारी गर्जुन ऊठली... जपानसारख्या हिशेबी देशाने सुद्धा नेतांजींच व्यक्तीत्व आणी देशप्रेम पाहुन त्यांना एक व्यक्तीचा दर्जा न देता राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला...व त्यांची सर्वतोपरी मदत केली. पण जपानी सैन्यातील अंतर्गत संघर्ष...कोहीमा,इंफाळ याठीकानी अवेळी झालेला पाऊस....त्याचबरोबर हिरोशिमा व नागासाकी या शहरावर झालेले अणुहल्ले...व नेतांजींच अकस्मात निधन यामुळे आझाद हींद फौजेला माघार घ्यावी लागली. 18 आँगस्ट 1945 रोजी जरी नेतांजींच नीधन झालं असलं तरी....त्यांच बलीदान व्यर्थ गेलं नाही.आझाद हिंद फौजेचा आदर्श घेऊन भारतीय नौदल व सैनीक बंड करून ऊठले व ब्रीटीशांच धाबं दनानलं त्यांना कळुन चुकलं की आपले दिवस आता भरले.आणी काही काळातचं भारतीय स्वातंञ्याची घोषणा झाली. ब्रिटींशांनी नेताजींच कार्य किंवा पराक्रम कीतीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याविरूद्ध कितीही हरळ ओकली तरी त्यांच तेज सुर्यासारखं सपुर्ण हिंदुस्थानात पसरलचं...त्यानंतर महाराणा प्रताप व शिवाजी महाराजांच्या शेजारी नेताजींच्या तस्वीरी घराघरात लावल्या जाऊ लागल्या...प्रत्येक आई आपल्या मुलाचं नाव अभिमानानं सुभाष ठेऊ लागल्या. असं हे नेताजींच चित्तथरारक व संघर्षमय जिवनप्रवास अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलचं पाहीजे.... ...Read more

 • Rating StarUmesh Jagtap

  महानायक, सुंदर आहे

 • Rating StarBajrang Mhatre

  नेताजींची देशभक्ती आणि `खरे`गांधी यांचे वास्तवदर्शी चित्रण म्हणजेच `महानायक `!!

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Latest Reviews

JOHAR MAI BAAP JOHAR
JOHAR MAI BAAP JOHAR by Manjushri Gokhale Rating Star
Ujjwala Dharma

आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला। ...Read more

ULKA
ULKA by V. S. Khandekar Rating Star
विश्वास सानप

तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. "उल्का` या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्यातत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते. ...Read more