* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MUGHAL HIGH NOON
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9789353170189
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN THE MID-SEVENTEENTH CENTURY, THE SONS OF AILING MUGHAL EMPEROR, SHAH JAHAN—DARA, SHUJA, AURANGZEB AND MURAD—ARE LOCKED IN A FIERCE STRUGGLE FOR SUCCESSION. AS SHAH JAHAN’S TREATMENT IS KEPT UNDER STRICT SUPERVISION, RUMOURS BEGIN TO SWIRL. IS THE EMPEROR ALIVE? OR IS HIS DEATH BEING KEPT A CLOSELY-GUARDED SECRET? IT’S IMPOSSIBLE TO KNOW FOR CERTAIN, SINCE THE SPIES AND AGENTS OF THE KINGDOM TRADE IN MISINFORMATION AND HALF-TRUTHS AND ONLY HEIGHTEN THE TENSION BETWEEN THE BROTHERS. IN THIS ATMOSPHERE OF PALACE INTRIGUE AND CHICANERY—AS MURAD ACQUIRES A REPUTATION FOR OVERINDULGENCE, DARA FOR SENSITIVITY AND SHUJA FOR IMPULSIVENESS—THE STAGE SEEMS SET FOR A POWER-HUNGRY AURANGZEB TO MAKE HIS ASCENT AS EMPEROR. HOWEVER, WILL AURANGZEB’S QUEST FOR DOMINATION BECOME HIS ULTIMATE UNDOING? THE MUGHAL HIGH NOON, WITH MASTER BRUSHSTROKES, EXPLORES QUESTIONS OF POWER, FAITH AND CONTENTMENT. "
मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज़ मुघल, आणि वासना, वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AURANGJEB#SHAHAJAHAN#MUGHALS#DARA#SHUJA#17THCENTURY
Customer Reviews
  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- मुघल सत्तेचा सारिपाट प्रकार:- अनुवाद प्रकाशक :- मेहता प्रकाशन मूळ पुस्तक :- The Mughal High Noon मूळ लेखक :- श्रीनिवास राव अडिगे अनुवाद :- उदय भिडे मला मुळातच अनुवादित पुस्तके वाचायला आवडतात, त्यातही मेहताच्या पुस्तकांना प्रथम पसंती सते... ह्या अनुवादाचं वैशिष्ट्य असं की कुठेच वाचताना अडथळा जाणवत नाही... अतिशय प्रभावी ओघवती भाषा. पुस्तकातील घटना, बारकावे, प्रसंग चित्रण खूप अभ्यासपूर्ण ... चित्रमयता आणि छोटे छोटे बारकावे विशेष उल्लेखनीय. हे पुस्तक म्हणजे औरंगजेबाचा सत्तारोहणाचा संघर्ष आहे... मुघलसम्राट शहाजहान प्रकृती अस्वास्थ्याने मृत्यूशय्येवर पडला असतांना त्याचे चार मुले दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ह्यांच्यातील सत्तासंघर्षात... औरंगजेब काय काय करतो आणि कसा यशस्वी होतो ह्याचे वर्णन करणारा साधारण 50 वर्षे कालखंडाचे चित्रण करणारा हा कथाप्रवास... कथा कुठेच रेंगाळली किंवा भरकटली नाही. कुठेही कुणालाच नायक किंवा खलनायक म्हणून रंगवले नाही तर सत्तासंघर्ष आणि सत्तालालसा उत्तम चितारली आहे..👍 पुस्तक आवडले नक्की वाचावे असे..👏👏 ✒️ यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 20-03-2020

    सत्तापिपासू राजकारणावर दृष्टिक्षेप... भारताचा राजकीय इतिहास मुघल साम्राज्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. तब्बल ३५० वर्षे दिल्लीच्या तख्तावर मुघलांनी राज्य केले. बाबरपासून सुरू झालेल्या या साम्राज्यात महत्त्वपूर्ण काळ आहे औरंगजेब बादशाहचा. गाबाजी करून आणि आपल्या साऱ्या भावंडांना बाजूला सारून औरंगजेबाने सत्तारोहण केले. ‘मुघल सत्तेचा सारिपाट’ ही कादंबरी औरंगजेब सत्तारूढ होण्यासंदर्भातील घटनांवर सखोल दृष्टिक्षेप टाकते. श्रीनिवास राव अडिगे यांच्या ‘द मुघल हाय नून’ या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद उदय भिडे यांनी केला असून सत्तेच्या लालसेपोटी एकमेकांचा काटा काढणाऱ्या मुघल साम्राज्याविषयी ही कादंबरी माहिती देते. १७व्या शतकाच्या मध्यकाळात प्रकृतिस्वास्थ्य बिघडल्यामुळे मुघल सम्राट शहाजहान मृत्युशय्येवर आहे. मात्र पित्याच्या पश्चात सत्ता कुणी हस्तगत करावी यासाठी शहाजहानची चारही मुले आपापसात झुंजत आहेत. दारा, शुजा, औरंगजेब आणि मुराद ही शहाजहानची चार मुले. या चारही मुलांची स्वभाववैशिष्ट्ये, वागणूक यांचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. शहाजहानचा थोरला मुलगा दार शुकोह त्याच्या अतिसंवेदनशीलतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याची ही अतिसंवेदनशीलताच सत्ता हस्तगत करण्यात त्याच्या आड येते, हे या कादंबरीत दाखवण्यात आले आहे. दिल्लीमध्ये थांबलेला दारा आपल्या पित्याची नीट काळजी घेत आहे. अत्यंत कडक बंदोबस्तात शहाजहानवर उपचार सुरू असताना पित्याबाबत दार शुकोहला वाटत असलेली काळजी या कादंबरीत दाखवण्यात आली आहे. हकिमाच्या औषधांचा गुण येत नसल्याचे दिसताच तो पित्यावर गुपचूप एका हिंदू वैद्याकडून उपचार करून घेतो. हिंदू वैद्यालाही शहाजहानवर कडेकोट बंदोबस्तात उपचार करावे लागले हे सांगत ही कादंबरी तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती आपल्यापुढे उभी करते. मुघल बादशहावर अत्यंत कडक बंदोबस्तात उपचार सुरू असल्याने अफवांचे पीक भरमसाठ फोफावते. त्यामुळे दिल्लीपासून दूर असलेल्या अन्य तीन भावंडांना चुकीची आणि अर्धवट माहिती मिळत राहते आणि त्यामुळे त्यांच्यातील सत्तासंघर्ष वाढत जातो. मुघल साम्राज्यातील गुप्तहेर आणि हस्तकांनी चुकीची माहिती आणि त्याबरोबरच अर्धसत्य गोष्टी पसरवल्याने भावाभावांतील तणाव कसा वाढत जातो याचे वर्णन ही कादंबरी करते. या कादंबरीत प्रत्येक पात्राची गुण वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहेत. शहाजहानचा धाकटा मुलगा मुराद याची अतिभोगलालसा आणि शुजा याच्या आतातायीपणाचे वर्णन कादंबरीत करण्यात आले आहे. दारा, मुराद आणि शुजा यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे सम्राट म्हणून दिल्लीच्या तख्ताचे सत्तारोहण करण्यासाठी औरंगजेबासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, याचे वर्णन या कादंबरीत करण्यात आले आहे. सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांना या कादंबरीत लालित्यपूर्ण पद्धतीने धांडोळा घेण्यात आला आहे. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज मुघल तसेच वासना, नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे चित्रण आहे. शिकारीच्या नावाखाली शुजाकडून निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांना सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णन या कादंबरीत आहे. कादंबरीची भाषा ओघवती असली तरी कादंबरी असल्याने ऐतिहासिक वस्तुस्थितीऐवजी काल्पनिक घटनांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येते. अनेक घटना इतिहासची मोडतोड केलेल्या वाटतात. एखाद्या चित्रपटाप्रमाणे उलगडत जात ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे चांगले चित्रण या कथानकातून करण्यात आले आहे. – संदीप नलावडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-09-2018

    सतराव्या शतकाच्या मध्यकाळात मुघल साम्राज्यात घडलेल्या सत्तेच्या सारिपाटाची ही कहाणी. श्रीनिवास राव अडिगे यांनी लिहिलेल्या ‘द मुघल हाय नून’ या मूळ इंग्लिश कादंबरीचा अनुवाद उदय भिडे यांनी केला आहे. सम्राट शहाजहान आजारी पडल्यानंतर दारा शुको, शुजा, औरंगजब आणि मुराद ही मुलं सत्ता हस्तगत करण्यासाठी आपसांत झुंजतात. या काळात झालेली कारस्थानं, घडामोडी आणि औरंगजेबाचा सत्तेपर्यंतचा प्रवास ही कादंबरी मांडते. एखाद्या चित्रपटासारखी उलगडत जाणारी ही कादंबरी गुंतवून ठेवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book