* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEE MANUS SHODHATOY
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666557
  • Edition : 20
  • Publishing Year : FEBRUARY 1975
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS THE INITIATIVE BEHIND VA PU`S WRITING? TO TELL IN HIS OWN WORDS, IT IS TO FIND THE HUMAN. "I AM IN SEARCH OF HUMAN. MANY TIMES, I CAME ACROSS THE HUMAN, IN MANY FORMS, SOMETIMES IN TRUE, SOMETIMES IN DISGUISE; SOMETIMES CAPTURING IT TOTALLY, SOMETIMES HE MANAGED TO ESCAPE THOUGH. THIS HUMAN HAS BROUGHT SMILES ON MY LIPS AND TEARS IN MY EYES; DEFEATED ME AND LURED ME; GAVE ME ENERGY AND MADE ME TIRED; TAUGHT ME TO BE INTROVERT AND EXTROVERT AT TIMES. STILL, MY SEARCH IS GOING ON. IT HAS NOT COME TO AN END. I HAVE A LOT OF PATIENCE; THE CREDIT GOES TO THE HUMAN ITSELF. THIS VERY HUMAN HAS INCREASED MY PATIENCE TO WAIT MORE, MY STRENGTH TO HOPE MORE. EVERY SEARCH COMES TO A CONCLUSION, A THEOREM AT THE END. MY SEARCH HAS NOT YET COME TO AN END BUT I HAVE FOUND THE CONCLUSION; `THERE ARE MORE GOOD PEOPLE IN THIS WORLD`…….."THE STORIES OF PEOPLE WITH WHOM VA PU HAD INTERACTED; IN HIS OWN WORDS AND STYLE.
वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल? त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर `मी माणूस शोधतोय.` माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला. कधी खया स्वरूपात, कधी खोट्या, तर कधी संपूर्ण स्वरूपात, पुष्कळदा तो निसटलाही. ह्या माणसानं मला कधी रडवलं, कधी हसवलं, कधी भुलवलं, कधी हरवलं, कधी फुलवलं, कधी थकवलं, कधी बेचैन केलं, कधी अंतर्मुख... तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार, माझा पेशन्स दांडगा आहे. ह्याचं श्रेयही पुन्हा माणसांनीच वाढवली आहे. प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो, सिद्धांत असतो. माझा शोध पूर्ण झालेला नाही, पण निष्कर्ष सापडला आहे.` `जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.` वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु स्टाइलमध्ये.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating Starश्री संभाजी सदामते

    मी माणूस शोधतोय.... व.पु काळे यांचा चांगुलपणाचा शोध घेणारा कथासंग्रह... मराठी साहित्यातील चिंतनशील साहित्यिक म्हणजे.. व पु काळे साहित्याला विचारांची जोड व भावनांचा बंद जोडणारा साहित्यिक म्हणून व पु काळे यांच्याकडे पहावे लागेल.. त्यांनी लिहिलेला मीमाणूस शोधतोय.. हा कथासंग्रह नुकताच वाचून पूर्ण झाला या कथा संग्रहा मध्ये व पू नी समाजामध्ये अनेक माणसे छंदानी किंवा वेडानी भारावून गेलेली असतात ..आपले छंद जोपासण्यासाठी अशी माणसे अविरत श्रम करीत असतात.. अनेकांना भेटीत असतात.. चर्चा.. विचारविनिमय.. करीत असतात.. अशाच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या.. वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या.. समाजातील अनेक क्षेत्रात चमकणार्‍या लोकांना शुभेच्छा पत्र लिहिणे त्यांच्यासमवेत फोटो काढणे आणि आपले हे वेड किंबहुना छंद या मित्रांना माहित देखील होऊ न देणे असे आपल्या प्रियजनांना अनाहूतपणे शुभ संदेश रुपी पत्र लिहिणारे कौतुक सप्तर्षी आणि व पुं ची भेट कशी होते.. त्यांचा पत्ता माहीत नसताना.. ते सप्तर्षींना कसे भेटतात.. आणि सप्तर्षीनी जोपासलेला छंद आणि त्यातून लोकांशी झालेला संपर्क आणि त्या लोकांना अनाहूतपणे त्यांनी पाठवलेले शुभ संदेश रुपी भेट कार्ड प्रत्यक्ष न भेटता या भेटकार्डच्या शुभ संदेशाच्या जोरावर त्यांनी अनेकांची जिंकलेली मने. त्यातून त्यांना प्राप्त झालेली नोकरी त्यांचा जीवन प्रवास असे अनाहूतपणे पत्राद्वारे भेटणारे कौतुक सप्तर्षी दोन तप या छंदासाठी त्यांनी कशी घालवली आणि अनेकांच्या मनावरती त्यांनी आपल्या छंदाचा प्रभाव कशारीतीने पाडला व त्यातून त्यांनी अनेकांची मने कशी जिंकली त्यांच्या छंदाचा परीघ कसा वाढत गेला हे सर्व होत असताना ही त्यांनी आपल्या अंगी विनम्र भाव कसा जोपासला आणि शेवटी हा अवलिया अपघाताने कसा निघून गेला हे सहज साध्या शब्दांत त्यांनी मांडले आहे.. अनेक माणसं जन्माला येतात जीवन जगतात आणि नाहीशी होतात.. पण सप्तर्षी सारखी छंद वेडी माणसं मरून सुद्धा त्या छंदाने कायम जिवंत राहतात.. हेच माणसाच्या जगण्यातील मोठेपण आहे.. ही सांगणारी कथा म्हणजे मी माणूस शोधतोय.. या पहिल्या कथेचे शीर्षक व पु नी या कथासंग्रहाला दिले आहे त्यांचा हा कथासंग्रह म्हणजे त्यांना भेटलेल्या त्यांनी वाचलेल्या त्यांनी अनुभवलेल्या माणसांचा कथासंग्रह आहे.. समाजामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटतात आपल्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनी आपलं व्यक्तित्व सिद्ध करणारी अनेक माणसं समाजामध्ये असतात अशा चांगुलपणाने युक्त माणसांची संख्या समाजामध्ये जास्त आहे.. व पु नी अशाच माणसांचा शोध.. मी माणूस शोधतोय.. या कथासंग्रहात केला आहे.. या कथासंग्रहात हप्ता ,अंतर, हुतात्मा, रमी, मुहूर्त, टाहो ,टेरीलिन, शोध, ऋतू बसंती रुठ गयी. नालायक या कथा आहेत यातील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना खोडकर खट्याळ पोरांना नालायक म्हणून ओरडतात.. या नालायक शब्दांचा मुलांच्या मनावर कसा वाईट प्रभाव होतो व आपण कोणतीही चांगली गोष्ट करण्यास कसे लायक नाही ..या मुळे मुलांच्या मनात कसा न्युनगंड तयार होतो व मुलं कशी वाहत जातात तर कांहीं मुलांच्या मनावर याचा चांगला प्रभाव पडतो शैक्षणिक प्रवाहापासून दुर होणारी मुलं या रागवण्यान नालायक म्हण्यान कशी सुधारतात असा नालायक शब्दाचा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव नालायक या कथेतून मांडला आहे सहज साध्या सोप्या शब्दांतून व.पु नी अनेक माणसं आपणास भेटवली आहेत. व समाजातील चांगुलपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.. श्री संभाजी सदामते. ...Read more

  • Rating StarGo Marathi

    भारी पुस्तक आहे. हे वाचूनच मी व. पुं चा फॅन झालो.

  • Rating StarRupesh Randhir

    खरच खुप छान

  • Rating StarManohar Khairnar

    व.पु.ची सर्वच पुस्तक भारी पण हे एक अप्रतिम पुस्तक आहे ..सलाम व.पु..यांच्या लिखणातुन प्रत्येक प्रसंग आपल्या जिवनाशी कुठेतरी निगडीत असतो

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book